✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

स
सतिश पाटील यांनी
Mon, 10/17/2016 - 18:03  ·  लेख
लेख
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय. त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी. 1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या... आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य? २) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे. ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला? अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे. काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय... साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव? असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
19375 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

हजार.

आदूबाळ
Mon, 10/17/2016 - 18:08 नवीन
हजार.
  • Log in or register to post comments

सगळा दारुगोळा अगोदरच दुसर्या

माझीही शॅम्पेन
Mon, 10/17/2016 - 18:23 नवीन
सगळा दारुगोळा अगोदरच दुसर्या धाग्यावर ओतला गेला आहे शक्यता कमी आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

इथंही पिवळे करु इच्छिणारे (हात !)खूप आहेत....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/17/2016 - 18:09 नवीन
तुम्हाला भरपूर कच्चा माल मिळणार ...पोतं घेऊन तयार रहा...
  • Log in or register to post comments

सुरुवातीला मला खुप हसू येत

अभ्या..
Mon, 10/17/2016 - 18:11 नवीन
सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे.
अभिनंदन. पुत्रजन्माबद्दल.
  • Log in or register to post comments

ये आपण बसुया म्हणून आमंत्रण

मोदक
Mon, 10/17/2016 - 18:21 नवीन
ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय... फ्रस्टेटेड मिपाकरांना घेवून जावा... ;)
  • Log in or register to post comments

यात मजेशीर काय आहे ?

प्रसाद_१९८२
Mon, 10/17/2016 - 18:29 नवीन
यात मजेशीर काय आहे ?
  • Log in or register to post comments

हलकट मित्र

कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 18:57 नवीन
कित्ती चांगला आहे तुमचा मित्र ! माझे निर्लज्ज , हलकट मित्र कितीतरी पोरींनी हाकलल्यानंतरसुद्धा बसायला बोलवत नाहीत. एक ठाणेकर मित्र तर पुणे ते लंडन व्हाया थायलंड नकारघंटा घेउन आलाय पण बसायचे नाव घेइना !
  • Log in or register to post comments

कोन ओ ? कोन ओ ?

माम्लेदारचा पन्खा
Mon, 10/17/2016 - 21:14 नवीन
आमालाबी कळूंद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नाव सांगा, घेउन येतो त्याला.

खटपट्या
Mon, 10/17/2016 - 21:28 नवीन
नाव सांगा, घेउन येतो त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

लोकं पत्ते काय मागतात... नावं

मोदक
Mon, 10/17/2016 - 21:31 नवीन
लोकं पत्ते काय मागतात... नावं काय विचारतात.. छ्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

जा पण बुलेटवर जाऊ नका, मित्र

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/17/2016 - 21:36 नवीन
जा पण बुलेटवर जाऊ नका, मित्र कोलून लावेल! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भेंडी

नाखु
Tue, 10/18/2016 - 09:36 नवीन
त्या घेतलेल्या पत्यांचे पुढे काय करतात ते कळेना. आम्च्या कॅटमधून घेतलेल्या किलवर छक्का आणि बदाम गुलामचे काम झाले असेल तर परत देणे . अखिल मिपा उगा पत्ते नका मागू आणि फुका नावे नका सांगू या संघटनेचा सक्रिय सभासदांकडून मिपा कट्टाहितार्थ जारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

काही लोक तर बळेच दुसऱ्या

विशुमित
Tue, 10/18/2016 - 17:47 नवीन
काही लोक तर बळेच दुसऱ्या बिचाऱ्याचा पत्ता देऊ का म्हणतात त्याला न विचारता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पुणं लंडन कळलं

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 10/18/2016 - 21:41 नवीन
पण थायलंडमध्येही नकारघंटा? कठीणे. आपणच घेउन बसायला हव अशावेळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

छातीवर केस

चित्रगुप्त
Mon, 10/17/2016 - 19:11 नवीन
त्याच्या छातीवर केस आहेत ना ? मिळेल मग मुलगी. (कुणीतरी दुवा द्या रे आधीच्या धाग्याचा).
  • Log in or register to post comments

पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला

सानझरी
Mon, 10/17/2016 - 19:16 नवीन
पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो,
हेच नको असेल पोरिंना.. माझ्या दादासाठी मुली बघत होतो तेव्हा हा अनुभव आलेला. आमचे २ फ्लॅट्स एकत्र आहेत. मुलीला बघायला गेलो तेव्हा मुलीचे वडील सरळ म्हणाले की हां, लग्नानंतर वेगळे करुनच घेऊ.. ओळख पाळख नसताना, पहील्याच भेटीत ते हा निर्णय घेऊन मोकळे झाले. आम्ही हे ऐकुनच चाट पडलो..
  • Log in or register to post comments

आपण काय बोलणार, आमच्या

विवेकपटाईत
Mon, 10/17/2016 - 20:36 नवीन
आपण काय बोलणार, आमच्या (स्वर्गीय) मातोश्रीने अस्मादिकांना न विचारता मुलगी ठरवून टाकली होती. बहुतेक तिला हि विचारले गेले नसावे. अस्मादिक मातृभक्त, एक हि प्रश्न विचारला नाही. होकार / नकार काय प्रकार असतो, याचा अनुभव घ्यायला मिळाला नाही. असो.
  • Log in or register to post comments

असुदे असुदे

इरसाल
Mon, 10/17/2016 - 20:39 नवीन
मित्राला म्हणावं तिसरी पोरगी बघ !!!!!!
  • Log in or register to post comments

मामाची पोरगी नाय का रे!

वैभव.पुणे
Mon, 10/17/2016 - 21:25 नवीन
मामाची पोरगी नाय का रे!
  • Log in or register to post comments

दोन नकारात एवढं निराश

खटपट्या
Mon, 10/17/2016 - 21:30 नवीन
दोन नकारात एवढं निराश होण्यासारखं काये? अजून कीमान एक डझन बघ म्हणाव. काय फरक पडतोय. मागे जे काही झाले ते विसरुन परत तयार रहा. (हायला मला हा अणुभव नाय मिळाला...:(
  • Log in or register to post comments

सायबा तुमच्या मित्राच्या

महासंग्राम
Mon, 10/17/2016 - 22:03 नवीन
सायबा तुमच्या मित्राच्या दुःखात सहभागी आहे मी ... कधी त्याला म्हणावं घाबरू नको तू एकटा नाहीयेस बसायला.
  • Log in or register to post comments

बसायला....

शंतनु _०३१
Tue, 10/18/2016 - 22:09 नवीन
बैठा कट्टा कधी आहे ते सांगता का ? अशा दुख:द प्रसंगात बसायला आम्हीही येवु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

कठीण काम आहे

पैसा
Mon, 10/17/2016 - 22:10 नवीन
महाराष्ट्रात स्त्रिया ९२५ प्रति एक हजार पुरुष. तुमच्या मित्राचा नंबर त्या ७५ मधे लागू नये ही सदिच्छा. बाकी मला तर मुलगा बघणे प्रकाराचा अनुभव नाही. कोणाला नकार दिलेला नाही. साहजिकच असली काही कारणे मी सांगू शकणार नाही. इतर अनुभवी लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत पॉपकॉर्न घेऊन फांदी पकडून बसत आहे. आता त्या संस्कृती, भावना, आशा, अपेक्षा, विनोद वगैरे येऊ देत सावकाश.
  • Log in or register to post comments

लग्न न झालेली ७५ मुले वाजपेयी

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/20/2016 - 13:52 नवीन
लग्न न झालेली ७५ मुले वाजपेयी, मोदी, अडवाणी वगैरे बनतात. बाकीचे, ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काल पर्वा पर्यंत तरी कलाम सर

शब्दबम्बाळ
गुरुवार, 10/20/2016 - 13:57 नवीन
काल पर्वा पर्यंत तरी कलाम सर होते या जोक मध्ये! अडवाणींची एन्ट्री झाली वाटत आता! :D शतप्रतिशत भाजपा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

लालकृष्ण अडवाणींच लग्न झालं

अनुप ढेरे
गुरुवार, 10/20/2016 - 14:03 नवीन
लालकृष्ण अडवाणींच लग्न झालं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मोदींचेही

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 14:20 नवीन
मोदींचेही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

नांवात काय आहे?

प्रभाकर पेठकर
Fri, 10/21/2016 - 09:09 नवीन
नांवात काय आहे? असे कोणीतरी म्हणून ठेवले आहेच. (कोणी? ते नांव आठवत नाही) नांवे कोणाचीही लावा ३ शिट्ट्यांचा हिशोब कांही चुकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नाही आवडलं तर द्यावा लागणार

अजया
Mon, 10/17/2016 - 22:34 नवीन
नाही आवडलं तर द्यावा लागणार ना नकार.मग काहीतरी कारणं शोधावी लागतात.म्हणून पत्रिका मागतात लोक! नाही जुळली हे बर्यापैकी मन न दुखवणारे कारण असावे ;)
  • Log in or register to post comments

भयानक कारणं

आदिजोशी
Tue, 10/18/2016 - 13:12 नवीन
आमच्या एका मित्राला घरात कमोड नाही म्हणून नकार मिळालेला आहे :)
  • Log in or register to post comments

हायला..... कायबी

वटवट
Wed, 10/19/2016 - 12:53 नवीन
हायला..... कायबी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

कुछ भी हां..

पाटीलभाऊ
गुरुवार, 10/20/2016 - 14:29 नवीन
लग्नात सासऱ्याकडून कमोड मागायला पाहिजे होता मग :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

असू द्या, नका वाईट वाटून घेऊ.

रेवती
Tue, 10/18/2016 - 17:51 नवीन
असू द्या, नका वाईट वाटून घेऊ. पूर्वी नै का मुलीला गाता येत नाही, स्वयंपाकघरातल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नै म्हणून नकार यायचे तश्यातला प्रकार समजून विसरून जायचं. आता ज्या मुलींना गाता येत असे त्यांनाही असे काय मोठे प्रोत्साहन मिळायचे सासरी? पण आपलं उगीच काहीतरी. स्वयंपाकघरातील प्रश्नाचं उत्तर चुकलं तर आयुष्यभर तसंच राहणारे का? शिकेलच की ती! पण नाही! समदं कसं रेडीमेड पायजे.
  • Log in or register to post comments

+111

गिरिजा देशपांडे
Wed, 10/19/2016 - 11:40 नवीन
+111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सहमत

बरखा
गुरुवार, 10/20/2016 - 13:21 नवीन
रेवती यांच्याशी अगदी सहमत. मागील काही काळ असा होता कि मुलं कसलीही शुल्लक कारणं मुलींना देउन नाकारत होते. त्यावर परत उलट जाब विचारता पण येत नसे. त्या वेळी त्या मुलींची मानसिक स्थिती काय होत असेल? मुली सुध्धा आता त्यांच्या अपेक्षा स्पष्ट सांगत असतिल तर त्यात नवल का वाटाव? मुलांनी या गोष्टीचे वाईट वाटून घेउ नये. आज ना उद्या कुणीतरी मिळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अपेक्षा सांगणे वाईट नाहीच, पण

महासंग्राम
गुरुवार, 10/20/2016 - 14:19 नवीन
अपेक्षा सांगणे वाईट नाहीच, पण त्या काय अवाच्या सव्वा नसाव्यात... माझ्या एका मित्राला ४ चाकीगाडी, फ्लॅट या बरोबर आई-वडील सोबत रहायला नको अशी अपेक्षा व्यक्त केली. घर, गाडी त्याने सगळं मान्य केलं पण आता त्याच्या आई वडिलांना तो एकटाच मुलगा होता त्यांना कुठे ठेवणार. तसेही आताचे पालक समंजस झाले आहेत. ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत. आई वडील सोबत नको हि अपेक्षाच चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बरखा

आताचे पालक समंजस झाले आहेत

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 14:23 नवीन
आताचे पालक समंजस झाले आहेत ^^^ असे पालक दुर्मिळ असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

हाहाहा... असतीलही दुर्मिळ पण

महासंग्राम
गुरुवार, 10/20/2016 - 14:32 नवीन
हाहाहा... असतीलही दुर्मिळ पण मग ते सारे दुर्मिळ पालक आमच्या मित्रांचे आईवडील आहेत असं म्हणावं लागेल. कसला लकीये ना मी ;) कायम शिंगल मंदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

करेक्ट.

त्रिवेणी
गुरुवार, 10/20/2016 - 20:57 नवीन
करेक्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ते मुलाच्या संसारात जास्त

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 19:18 नवीन
ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत असं काही नाही. मुलग्यांच्या संसारात त्यांचे आईवडील लक्ष घालतात पण आजकाल मुलींचेही आईवडील यात अ‍ॅडवले आहेत. तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन. मिपाकरीण पिराच्या लाडक्या आहेत त्या! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

सकाळी सकाळी प्रातःस्मरणीय

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 19:28 नवीन
सकाळी सकाळी प्रातःस्मरणीय ताईंची आठवण काढलीस! चला, त्या आनंदात आपल्या डिग्र्या चुलीत घालुन त्यावर इकडच्या स्वारीसाठी भाकर्‍या भाजायला घेऊ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खी खी खी.

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 19:35 नवीन
खी खी खी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ताई

धर्मराजमुटके
गुरुवार, 10/20/2016 - 21:16 नवीन
ताई, डिग्र्या चांगल्या भारी आहेत ना ? बीए बीकॉमच्या डिग्र्यांच्या जाळावर भाजलेल्या भाकर्‍या टेस्टी लागत नाहीत म्हणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

डिग्र्या दणदणीत आहेत हो..

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 21:39 नवीन
डिग्र्या दणदणीत आहेत हो.. अगदी विंजिनेरिंग वगैरेच्या! पण कसंय ना की त्यांना फक्त चुल पेटण्याशी मतलब आहे. तुम्ही शास्त्रज्ञ असा वा प्राध्यापक (का अगदी अंतराळात जाऊन आलेल्या असा..) घरी येऊन नवर्‍यासाठी भाकरी करता आलीच पाहिजे असा सोप्पा नियम आहे. तेव्हा स्वतःला का जाळेनात, भाकर्‍या होण्याशी मतलब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

कोण आहेत ह्या अपूर्ण

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 21:41 नवीन
कोण आहेत ह्या अपूर्ण रॅमतीर्थंकर बाई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

https://www.youtube.com

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 21:45 नवीन
https://www.youtube.com/results?search_query=aparna+ramtirthakar+speech ह्या बाई कोण आहेत नक्की ते मलाही माहिती नाही. सामाजिक कार्यकर्त्या असाव्यात, वकिल आहेत. पण बायकांनी काय करावे आणि काय नाही ह्याबाबत मतं जहाल आहेत. नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अर्थातच त्या ते सांगत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नवर्‍यांनी काय करावे ह्या

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 21:51 नवीन
नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अरे वा! सहिये, मी काय म्हणतो ताई आमच्या प्रकरणांस काढून देतो मिपा आयडी, तिला जरा समजावा नवऱ्याने काय करावे ते ठरवायची रीत नसते भारतीय संस्कृतीत म्हणून ! काय सांगू माझा सासुरवास (माझ्यापाशी पदर नाही/नसतो/कधीच नसेल म्हणून नाहीतर आत्ता बोळा तोंडात कोंबून हुंदका काढून दावला असता). ललिता पवारीणीला शरद तळवलकर नवरा मिळणे ह्यालाच कार्मिक न्याय म्हणतात का, असा एक भाबडा प्रश्न मला हल्लीच पडलाय :P :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हीच ती पुरुषांची मुस्काटदाबी!

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 22:23 नवीन
हीच ती पुरुषांची मुस्काटदाबी!! ह्याच अन्यायाला तोंड फोडतात अपर्णाताई.. उगी उगी.. चला डोळे पुसा! बापुंसारखा दणकट माणुन तोंडात बोळा कोंबुन हुंदका काढतोय! आमचा पार्वतीच आठवला!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सद्ध्या दणकट बापू टाईम प्लिज

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 22:31 नवीन
सद्ध्या दणकट बापू टाईम प्लिज घेऊन बसलाय म्हणजे बघा हे आपला पार्वती विग गुडघ्यावर ठेऊन विड्या ओढतोय हो! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नवर्‍यांनी काय करावे ह्या

सुबोध खरे
Fri, 10/21/2016 - 10:07 नवीन
नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने कोणत्याही बाईला आपल्या नवऱ्याने काय करावे हे "दुसऱ्या" "बाई"ने( किंवा माणसाने सुद्धा पण माणसे दुसऱ्या माणसाला सांगायला जाणार नाहीत) सांगितलेले पटणार नाही. आणि जरी ते पटण्यासारखे असले तरी ते केवळ "दुसऱ्या बाई"ने सांगितले म्हणून त्यांना मान्य होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा