Skip to main content

लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

लेखक सतिश पाटील यांनी सोमवार, 17/10/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय. त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी. 1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या... आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य? २) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे. ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला? अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे. काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय... साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव? असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19545
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

लग्नाबद्दल अपेक्षा /निकष काहीही असू शकतात, हरकत नाही. पण आपल्या निकषांत समोरची व्यक्ती बसत नाही हे आधीच माहित असताना विनाकारण 'वधू/वर परि़क्षण' करण्यात वेळ वाया घालू नये आणि समोरच्याला मानसिक त्रासही देवू नये उदा: वर लेखकाने सांगितलेला पहिला नकार. मुलाला सरकारी नोकरी नाही हे आधीच माहित होते ना, मग आलेत कशाला बघायला ?

अय्या, अजून दोनच मुलींकडून नकार आला आणि एवढं नैराश्य आलं!! किमान डझनभर नकारांनंतर हा लेख वाजवी होता.

In reply to by स्मिता.

असतात हो काही लोक स्वतःला ग्रेट समजणारे, दोन नवीन लेखांना नकारात्मक प्रतिसाद मिळाले तर मिपावर लिहणे सोडणारे,

In reply to by स्मिता.

नै तर काय.. तिकडे लोक वर्षानुवर्ष किल्ला लढवत आहेत. आणि हे पंधरा मिनिटात थकले.. काय राव!!

ही मुलाने नकार दिलेली दोन्ही माझ्या नजरेसमोर घडलेली उदाहरणे . माझ्या एका मित्राला परीसारखी बायको पाहिजे होती. आम्ही त्याला किती समजावले की अरे आधी स्वतःकडे बघ. म्हणजे तो काही वाईट नव्हता दिसायला पण गंधर्व किंवा गेलाबाजार राजबिंडा म्हणावा असा पण नव्हता. परीच्या नादात त्याने कितीतरी चांगल्या मुलींना नकार दिला. शेवटी वयाच्या ४० नंतर त्याला शोभेश्या मुलीशी लग्न झाले. गमतीची गोष्ट म्हणजे ती त्याच्या घरापासून ३ किमी वर रहात होती. अजून एकाचे आईवडील भयंकर संशयी. गुजरातमध्ये स्थायिक असलेले मराठी कुटुंब आणि एकुलता एक मुलगा. संपूर्ण गुजरात, मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या मुली बघून झाल्या. नकाराची काही मजेशीर कारणे, अर्थात वेगवेगळ्या मुलींसाठी - १. मुलगी येताना scooty वरून गॉगल लावून आली - मग ती फॅशनेबल वाटतेय. २. कारखानदार वडिलांची एकुलती एक मुलगी - लग्नानंतर घरजावई करून घेतलं तर ३. कार चालवता येते असं मुलीने सांगितलं - लग्नानंतर तिने कार पाहिजे म्हणून हट्ट धरला तर ४. बाकी सगळं ठीक होतं (मुलगी आवडली पण होती) - पण मग अजून तिचं लग्न का बरं झालं नसेल. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि ते सांगत नाहीयेत. हे संभाषण माझ्या समोर चालू होतं तर मी नकळत म्हणलं सुद्धा की या न्यायाने याचे पण अजूनपर्यंत लग्न झालं नाहीये त्याचं काय? अशी काही मजेशीर तर काही विचित्र कारणे. शेवटी याचे पण लग्न ४० नंतर घरापासून २ गल्ल्या सोडून राहणाऱ्या मुलीबरोबर झालं. ४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या टीम मधला एक मुलगा MPSC ची तयारी करत होता. मी विचारलं त्याला की तुला चांगल्या बहुद्देशीय IT कंपनीमध्ये नोकरी आहे, चांगला पगार आहे, पुढे मागे परदेशी जायला मिळेल मग एकदम सरकारी नोकरीच्या मागे का लागलास? तो म्हणाला आजकाल मुली IT वाले नको म्हणतात. कामाचे अनिश्चित तास, प्रोजेक्टचे टेन्शन, कंपनी कधी कुठे पाठवेल सांगता येत नाही. त्यापेक्षा सरकारी नोकरी बरी. ९-५ ऑफिसला जायचं त्यात काम केलं तर केलं नाहीतर नाही. ६व्या वेतन आयोगामुळे पगारही IT च्या तोडीसतोड आहेत आणि वरकमाईचे मिळतील ते वेगळेच. सरकारी घर मिळायची पण शक्यता असते. त्यामुळे म्हणे मुली आजकाल IT वाला मुलगा असेल तर आधीच नकार देतात.

In reply to by ट्रेड मार्क

पूर्वी रोहिणी की अश्याच कोणत्यातरी वधुवर मासिकात अपेक्षा असायच्या. आमच्या राजकन्येला शोभेसा राजपुत्र हवा जो तिला प्रेमाच्या पंखांवर बसवून परदेशी नेईल. किंवा मग आमच्या ज्येष्ठ राजकुमाराला अमक्या तमक्या विवाहमंडलाने स्वप्नांची राणी मिळवून दिलीये तश्याच अपेक्षेने कनिष्ठ राजकुमाराला एखादी राजकुमारी मिळावी म्हणून पुन्हा येथे आलोय. जिच्या हसण्याने आमची मंगलप्रभात होईल वगैरे वगैरे. अश्या जाहिराती देऊन किंवा वाचून ज्यांची लग्ने झालियेत ते आता काय करत असतील असे एकदा मनात आले होते.

In reply to by रेवती

ओ ताई त्या रोहिणी मासिकाला नावं ठेवायचं काम नाही. आमचं लग्न पण त्यातूनच झालेलं आहे आणि २४ वर्षं झाली. मागच्या वर्षी तोच हनिमून परत रिपीट करूनही झाला. आता या वर्षी सिमल्याला जातोय. हि पहा झैरात http://www.misalpav.com/node/33431

In reply to by सुबोध खरे

मासिकाला नावं ठेवत नाहिये पण स्थळाची माहिती देताना जे लिहितात ते पाहून मजा वाटायची. तुमच्या लग्नावेळीही स्थळाचे वर्णन असेच केले होते काय? ही चेष्टा म्हणून विचारत नाहीये. सिमल्याची जाहिरात आवडलीच. लग्नाच्या पंचविसाव्या वादीला लोक आवर्जून न ऐकलेल्या, वेगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही कुठे जाणार आहात?

In reply to by रेवती

झैरात मागच्या वर्षी कुणूरला गेलो होतो त्याची होती सिमल्याला आता जाणार आहे. आणि पंचविसाव्या वाढदिवसाचे अजून ठरवलेले नाही. महाबळेश्वर पासून स्वित्झर्लंड पर्यंत कुठेही. तेंव्हा खिशाकडे पाहून

In reply to by ट्रेड मार्क

ह्या प्रचंड ब्रह्माण्डात योग्य वेळी जन्म झाला, जवळ स्वतः:चे घर, गाडी, स्मार्टफोन सुद्धा नसताना (घर अजून देखील नाही) देखील लग्न झाले आणी योग्य वेळी निरोप घेईन ह्याबद्दल भाग्यवान समजावे का मी आता स्वतःला ?

In reply to by अभिजीत अवलिया

अश्या परिस्थितीत ज्यांचे लग्न तर झालेच पण त्याचबरोबर जे नवराबायको एकमेकांबरोबर सुखाने नांदत आहेत यासाठी त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे.

लग्न हा एवढा का इश्यू आहे कधीच समजलं नाही. कधीतरी बस करा ना हा विषय. बरं, स्वतःचं लग्न झालेले लोक दुसऱ्यांना नकार मिळाला म्हणून धागे-बिगे काढतात.. तुमचं झालं ना लग्न? होईल की समस्त मित्रपरिवाराचं.. आता लग्न होणं ही गोष्ट अत्यंत दुर्मीळ आणि अगदी चुकून घडणारी असती तर ठीक होतं. इथे वीट येईल इतक्या संख्येने लग्नं करतात दर हंगामात लोक. इतकं नैराश्य यायला काय झालं?

In reply to by पिशी अबोली

लग्न हा एकच इश्यू आहे असं नाहीये बरं. दुसर्‍यांचं लग्न झालेलं असलं की त्यांनी मूल होऊ द्यावे की नाही, असेल तर त्याची ड्युटी कुणी करावी, त्यांनी मुलांना कसे वळण लावावे, शाळेत डब्बा काय द्यावा हेही विषय आहेत की.

गोळाबेरीज.

  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा धागाकर्त्याची सामाजीक कळकळ
  • केली परदेशवारी तरी त्रिशतकी धाग्याचीच याद भारी (मिपाकरांना)
  • नकार पचवणे एक कला (फक्त तो दुसर्यानेच नेहमी पचवावा)
  • आधी आमच्यावर अन्याय झाला अता आम्ही तुमच्यावर करू (एक सामाजीक क्रांती अशीही )
  • नकारावस्थेतून जायचे नसेल तर प्रेमविवाह करा (अर्थात दोन्ही एकाच स्थळी अनिवार्य .प्रेम एका ठिकाणी व विवाह दुसरीकदे हा मालिकांचा हक्काचा विषय आहे तसे अजिबात करू नये
  • जाहीरातीला भुलू नये ,जाहीरातीतले दावे अवाच्या सव्वा असतातच आपण सजग रहावे आणि भ्रमनिरास करून घेऊ नये.
  • भाकर्या बडविण्याचे कसब पुढे वाया जात नाही. इतर बडविण्यात उपयोगी पडते.
  • वेळेत लग्न होणे आणि टिकणे हे भाग्याचे लक्षण असू शकते पण त्यामुळे नास्तीकांना न्युनगंड येऊ शकतो त्याचे काय? असा विचार प्रतिसादकर्त्याचा कोमल मनास का शिवला नाही?
  • विवाहीत्,विवाहोत्सुक आणि नवविवाहीत अश्या सगळयांना सामावून घेणारा सदाबहार धागाविषय.

In reply to by नाखु

उत्तम गोषवारा. एखादा कार्यक्रम संपला की कसे सगळ्यांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमातून काय साध्य झाले ते सांगितले जाते तसे वाटले.

In reply to by नाखु

वेळेत लग्न होणे आणि टिकणे हे भाग्याचे लक्षण असू शकते पण त्यामुळे नास्तीकांना न्युनगंड येऊ शकतो त्याचे काय? असा विचार प्रतिसादकर्त्याचा कोमल मनास का शिवला नाही?
म्हणजे नास्तिकांची लग्न वेळेवर होत नाहीत किंवा टिकत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं नसेल आशा करतो ;)