✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुलगी आता इकड़चि झालेली आहे

व
वैभव.पुणे यांनी
Mon, 10/17/2016 - 19:35  ·  लेख
लेख
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच! लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम! नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल! नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल! आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल! आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे! मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच! नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे! लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच! सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच! सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए! रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो! त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी! आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच! नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग! शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे! आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय! **शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
मुक्तक
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
28931 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

त्या पेक्षा तुम्ही आणी तुमचे

गंम्बा
गुरुवार, 10/20/2016 - 12:14 नवीन
त्या पेक्षा तुम्ही आणी तुमचे घरचेच का नाही स्वताच्या सवयी आणि विचार बदलत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव.पुणे

एस बॉस ! नक्कीच प्रयत्न चालू

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 21:36 नवीन
एस बॉस ! नक्कीच प्रयत्न चालू आहेत यावर पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा

वैभव.पुणे -

कविता१९७८
गुरुवार, 10/20/2016 - 12:54 नवीन
वैभव.पुणे - ज्याच्या किंवा जिच्या बरोबर आयुष्य काढायचे तिची किंवा त्याची अशी राजरोस पणे बदनामी करु नये. पटत असेल तर एकत्र राहायचे नाही तर वेगळे पर्याय आहेतच. पण "तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना" असं असेल तर उगाच तक्रार करण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव.पुणे

नाहि हो ताइ. तस काहि नाहिये.

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 21:36 नवीन
नाहि हो ताइ. तस काहि नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

अजयातै

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/20/2016 - 19:00 नवीन
णव्या लोक्सना थुमच्यासारखे लोक्स प्रोस्ताहाण देत नसल्यामुळे सगळा गुंता होऊन बसलेलाहे! ते काही नाही. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे! - आपला णम्र बबन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

णव्या लोक्सना

धर्मराजमुटके
गुरुवार, 10/20/2016 - 19:01 नवीन
णव्या लोक्सना बापये माणसांनी प्रोस्ताहाण द्यायचे की बायकामाण्सांनी ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रोस्ता हाणु का रे बाळ बबण?

अजया
Fri, 10/21/2016 - 08:54 नवीन
प्रोस्ता हाणु का रे बाळ बबण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

=))

अजया
गुरुवार, 10/20/2016 - 10:43 नवीन
ओ ताई, सुद्दलेकन कर्ने कायीच अवघड नाहि. घरातली व्यथा न् मिपावर कथा ;)
  • Log in or register to post comments

=))

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 10:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हा हा हा !!!

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 10:46 नवीन
हा हा हा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मणोरंजनासाठी कायपन

पैसा
गुरुवार, 10/20/2016 - 10:46 नवीन
मणोरंजनासाठी कायपन! लेखाचे टॅग्ज बघा. त्यात "मौजमजा" पण आहे. बाकी सूद्दलेखन कर्ने माला तरी फारच औघड जाते आहे ब्वा. त्यात तो मेला मोबल्याचा ऑटोकरेक्ट एकसारखा ड्वाले वटारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हल्ली कायप्पावरील विनोद पाहून

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:36 नवीन
हल्ली कायप्पावरील विनोद पाहून बायकोबद्दल लिहिणं हे मौजमजेचा प्रकार झालेला दिसतोय. ती फ्याशन आता मिपात पण आली वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जाम भारी "घरातली व्यथा न्

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 10:48 नवीन
जाम भारी "घरातली व्यथा न् मिपावर कथा ;)"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अहो हि मौज मज्जा नाहीये हो.

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 10:54 नवीन
अहो हि मौज मज्जा नाहीये हो. खरी व्यथा आहे. पण आता मिपा कारणांमुळे अशा अशा गोष्टी येतायेत ना, हा मुद्दा विसरून मलाच मौज मजा येतीये !!! तो लिहलेला प्रॉब्लेम च विसरल्या सारख्या वाटायलाय !!! :) आभारी आहे सगळ्यांचा !
  • Log in or register to post comments

एकच पर्याय.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/20/2016 - 11:00 नवीन
मुलं-बाळं नसतील तर वेळीच काडीमोड घ्या. दोघेही सुखी व्हाल. कारण स्वभावावर (दोघांच्याही) औषध नसतं.
  • Log in or register to post comments

सरळ एक घाव दोन तुकडे??

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 11:03 नवीन
सरळ एक घाव दोन तुकडे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अहो ! हे काय भलतंच !

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 11:06 नवीन
अहो ! हे काय भलतंच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आम्ही व्यथा मांडली तर तुमचा

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 11:07 नवीन
आम्ही व्यथा मांडली तर तुमचा वेगळंच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव.पुणे

व्यक्तिगत धुणी.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/20/2016 - 12:58 नवीन
वेळेवर केल्या तर गोस्टी 'भलत्याच' ठरत नाहीत. मुलं झाल्यावर हाच विचार 'भलताच' ठरतो. एकमेकांचे पटत नसेल तर काडीमोड मुळे कोणावरही अन्याय होत नाही. पण एकादा का निष्पाप जीवांना ह्या जगात आणलेत तर त्यांच्यावर नक्कीच १०० टक्के अन्याय होतो. विचार करा. अजून वेळ हातची गेलेली नाही. अडखळत अडखळत तिन पायांची शर्यत चालायची की स्वतःच्या ताकदीवर वेगळी वाट निवडायची. सल्ला पसंत नसेल तर तक्रार न करता जगायला शिका. तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव.पुणे

तुमची व्यक्तिगत धुणी

असंका
गुरुवार, 10/20/2016 - 13:29 नवीन
तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.
+१..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सार्वजनिक घाटावरची मौज

चित्रगुप्त
गुरुवार, 10/20/2016 - 20:00 नवीन
तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.
अहो मग कलगीतुरा कसा रंगणार दादा ? सार्वजनिक घाटावरची मौज कशी बघायला मिळणार ? आता तर खुद्द लेखकालाच मौज वाटू लागलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तक्रार न करता जगायला शिका

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 21:39 नवीन
तक्रार न करता जगायला शिका
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१११११

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:37 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/20/2016 - 12:39 नवीन
सहमत. जर मुलं बाळ झाली असतील तर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष द्या, नोकरी-व्यवसायाकडे लक्ष द्या, वेगळ्या बिछान्यावर झोपा, जोडीदाराची दखलच घेऊ नका, घटस्फोट सुद्धा देऊ नका. बाहेर भानगड केलीत तर पुरावे मागे ठेवू नका. एक दिवस जोडीदार स्वतःच कंटाळून निघून जाईल. चुकुनही मारहाण करु नका किंवा स्वतःहून घटस्फोट मागू नका. तसे केले तर पोटगी द्यावी लागेल. शिवाय ते अमानवी आहे. - (प्रेरणा - आपली अडचण उषाताईंचा सल्ला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 11:07 नवीन
हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी मिपा, बक्ष दो (सुद्दालेकन कि) खता हो गयी :)
  • Log in or register to post comments

=))

पैसा
गुरुवार, 10/20/2016 - 11:15 नवीन
हमारा इरादा तो कुछ भी न था तुम्हारी खता खुद सजा हो गयी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक गुजराती म्हण.

बाजीप्रभू
गुरुवार, 10/20/2016 - 12:43 नवीन
एक जुनी गुजराती म्हण आहे, तिचा अर्थ सांगितल्यावर बरेच जण तुटून पडतील तरी देखील सांगतो. "ઘરમાં આવતા બિલાડી.... "घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं" हे ज्यांना जमत नसेल त्यांनी बायकोने डोक्यावर मिऱ्या वाटल्यास त्रागा करू नये.
  • Log in or register to post comments

??

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/20/2016 - 13:27 नवीन
घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं आणि घरात येणारा उंदीर आणि नवा जावई ह्यांचे काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

पाळायचे असेल!

अजया
गुरुवार, 10/20/2016 - 13:42 नवीन
पाळायचे असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पिंजरा

नाखु
गुरुवार, 10/20/2016 - 16:30 नवीन
कामी येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आणि जावयाला?

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:40 नवीन
आणि जावयाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

क्या बात है!

अजया
गुरुवार, 10/20/2016 - 12:48 नवीन
_/\_ साष्टांग बरं का.
  • Log in or register to post comments

घरात येणारी मांजर आणि येणारी

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/20/2016 - 13:22 नवीन
घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं आवरा.
  • Log in or register to post comments

लग्गेच घटस्फोट घ्यावा

nanaba
गुरुवार, 10/20/2016 - 13:51 नवीन
हेच बरं .. एका भयानक विचाऱ्याच्या नवऱ्यापासून वेळीच सुटका होईल बायकोची!
  • Log in or register to post comments

ऑन या सिरीयस नोट,

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 15:29 नवीन
ऑन या सिरीयस नोट, लग्नाला महिना झालाय फक्त, लग्न हि एक मोठी घटना असते आयुष्यातली, मुलीच्या साठी मुलापेक्षा कैक पटीने. स्थानांतर, भूमिका, आयुष्य, जबाबदाऱ्या एका रात्रीतून बदलतात. मुलाचं किन्वा त्याच्या कुटुंबाचे तसे नसते, एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो. आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. जगावेगळ्या अपेक्षा नाही तर नेहमीच्याच. अगदी तिने उठून सर्वांसाठी चहा करावा. पारंपरिक अपेक्षा, लै न्हाई मागणं छाप वाटतील पण मुलीच्या बाजूने बघितलं तर... तिने कायम आईच्या हातचा चहा पिऊन दिवसाची सुरुवात केलेली असेल तर? आजकाल 70च्या दशकातल्या मुली नाहीत, त्या शिकतात, जॉब करतात, आई त्यांची मुलासारखी काळजी घेते, काही अगदी बोटावर मोजण्याइतक्या मुली आजकाल फक्त घरकाम करतात. लग्नही उशिरा म्हणजे 23 च्या पुढे होतायत, एव्हाना आयुष्याची घडी बसलेली असते. ती पूर्ण मोडून नवी घडी, नव्या घरात, नवीन माणसांसोबत बसवायची तर वेळ लागणार, मनस्ताप होणार शिवाय सून म्हणून, बायको म्हणून अपेक्षा आहेतच, वरच्या लेखात आलेली टिपिकल मानसिकता हीच कि सुनेने आदर्श सुनेसारखे वागावे, गंगाधर टिपरेच्या शुभांगीसारखे. पण आपण स्वतः कसे वागतो हे कधी बघणार? आयुष्य सुखी हवे असेल तर कोणाकडून त्याच्या मर्जीशिवाय कोणत्याही अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा ठेवू नये. मुलगी माहेरी जास्त संबंध ठेऊन असतात, असणारच, असं लगेच एक पारंबी सोडून दुसरीवर झेप घ्यायला ती काही टार्जन नाही. माहेर हे महत्त्वाचं आहेच, सासर शी तुलना करायला जाऊ नये. आईबापनी कष्ट करून संसार केला त्याचे कौतुक काय? म्हणजे कायम पलंगावर लोळत संसार केला तर काय लाथा झाडाव्या. आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे. मुद्दा काय आहे की एका स्त्रीचे कन्या ते पत्नी/स्नुषा हे रूपांतर समजून घेणे आवश्यक. लगेच जजमेंटल होऊ नये. पूर्वग्रहानुसार लोक होऊन बसतात आणि मग झालेले गैरसमज आयुष्यभर मिटत नाहीत. बाकी स्वभाव पटत नसेल तर थोडा वेळ द्यावा, समजून घेण्याची पात्रता आहे का हे बघावं, स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे. जुळवून घ्यायची इच्छा नसेल तर काडीमोड घ्यावा पण त्यानंतर चे त्रास लक्षात असू द्यावे, कोणाच्या पोटात शिरून काही माहिती काढू शकत नाही, पण सरळ जजमेंटल होणे गैर तसेच स्वतःची गैरसोय करून दुसऱ्याला सहन करणेही. जे सुवर्णमाध्य काढतात ते सुखी होतात, वत्सा, तुजप्रत कल्याण असो! - संसारानंद स्वामी संदीपबाबामहाराज
  • Log in or register to post comments

प्रतिसाद खूप आवडला..

सानझरी
गुरुवार, 10/20/2016 - 15:53 नवीन
प्रतिसाद खूप आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

राजाभाउ
गुरुवार, 10/20/2016 - 16:30 नवीन
+१ एक नंबर. (अर्थात नेहमीप्रमाणेच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक नवं माणूस आल्याने बदलणारे

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/20/2016 - 17:07 नवीन
एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो. हे कैच्या कैच आहे. उगाच मुली किती गरीब बिचार्‍या छाप प्रतिसाद वाटला. आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. तुम्ही अंमळ जुन्या काळातले दिसता. त्यामुळे नविन हुंडापद्धत तुम्हास ठाऊक नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आप्पा साहेब, थोडं थांबा,

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 17:20 नवीन
आप्पा साहेब, थोडं थांबा, दुसरी बाजूही टंकणार आहे, आणि तसं बघितलं तर वरचा प्रतिसाद केवळ मुलींची बाजू घेत नै आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

स्वतःचे काही चुकतंय का तिकडे

वैभव.पुणे
गुरुवार, 10/20/2016 - 21:46 नवीन
स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे.
पूर्ण उत्तर अगदी आवडले. मनापासून धन्यवाद !!
आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे.
सडेतोड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१११११११११

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:41 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नवरा नीट वागत नसेल, त्याला कारण असेल

सामान्य वाचक
गुरुवार, 10/20/2016 - 16:18 नवीन
बायकोच्या वागण्याला पण काहीतरी कारण असेल ना हो? तुमच्या 100 अपेक्षा आहेत, चांगलि गोष्ट आहे अपेक्षा तिच्या पण असणार ना तुम्ही 1 कुत्रे पाळा, तुम्ही द्याल ते खाईल, उठ म्हटले कि उठेंल , बस म्हटले कि बसेल ( बहुतेक बर का) आणि शिवाय तुमच्या कडून काही अपेक्षा पण करणार नाही ( हे सुद्धा बहुतेक )
  • Log in or register to post comments

सहमत

कविता१९७८
गुरुवार, 10/20/2016 - 16:36 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

हे घ्या औषध..तुमच्या

मराठी कथालेखक
गुरुवार, 10/20/2016 - 16:22 नवीन
हे घ्या औषध..तुमच्या जगण्यातलं 'challenge' सुखकर होईल याने. Image removed.
  • Log in or register to post comments

नवरयाची सध्या इतकी परिस्थिति

कविता१९७८
गुरुवार, 10/20/2016 - 16:49 नवीन
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल! हे नवर्‍यानेच ठरवलंय का? नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल! हे बायकोच्या बाबतीत ही होउ शकेल ना मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच! तीच्या आईवडीलांकडे तीचं चांगलं नव्हतं का? आणि कशा वरुन नवर्‍याच्या घरात तिचं चांगलं होणारे? नवरा आणि सासु सासरेच ठरवणार का हे? नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे! हे म्हणजे अगदी आमची जमीन विकुन आमच्याकडे बक्कळ पैसा येईल असे भाकीत केल्यासारखे वाटते. नवर्‍याचे इनकम काहीच नसेल तर ही खुपच दुर्दैवी गोष्ट आहे प्रत्येक बायकोसाठी. कमावत्या नवर्‍याला बायको मान देईलच पण रिकामटेकड्या नवर्‍यामुळे तीची अवहेलना होत असेल तर कठीण आहे. निदान बायकोने तरी नोकरी किंवा उद्योग धंदा करुन पैसे कमावेत जेणेकरुन आपल्या बेसिक गरजा भागवण्यासाठी बायकोला सासु सासर्‍यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत.
  • Log in or register to post comments

पण सध्या नवरा 0 असल्यासारखा

पूर्वाविवेक
Sat, 10/22/2016 - 16:44 नवीन
पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
कश्यात ० आणि कश्यात १००? जरा विस्तारून सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

मस्त आहे, कलगीतुरा....

सस्नेह
गुरुवार, 10/20/2016 - 17:14 नवीन
मस्त आहे, कलगीतुरा....
  • Log in or register to post comments

कलगीतुरा

चित्रगुप्त
गुरुवार, 10/20/2016 - 18:35 नवीन
मस्त आहे, कलगीतुरा.... असेच म्हणतो. बहार आने से पहले खिजां चली आयी... असे होऊ घातलेल्या या धाग्यावर हलकीशी फुंकर आणि दोन चार काड्या पडल्यावर शेकोटी मस्त पेटलीय.... लाटणी घेऊन एकदा का अनाहिता मैदान्यात उतरल्या, की मग काय उणे ?
  • Log in or register to post comments

काहीही हं चित्रगुप्तकाका,

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 19:07 नवीन
काहीही हं चित्रगुप्तकाका, विनोदी धाग्यावर कश्याला लाटणी घेऊन यायचे? सध्या लाटणी दिवाळीच्या कामात अडकलियेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

किती शतकं ह्याच चर्चा करणार

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 19:15 नवीन
किती शतकं ह्याच चर्चा करणार रे?? बास करा ना राव.. किंवा किमान आमचा बोका गार करायला एखादी "जावयाने काय करावं आणि काय करु नये" टाईप जिल्बी तरी पाडा. काय नेहमी नेहमी मुलींच्या वागण्यावर, रहाण्यावर, सासर-माहेरावर, कपड्यांवर चर्चा?? लग्न पुरुषाचंही होतं ना? त्यालाही सासर माहेर असतं ना? जावयाने आपल्या सासु सासर्‍यांशी कसे वागावे ह्यावर बोला बरं. मुलांनी सतत "माझे आई बाबा आणि त्यांनी काढलेल्या खस्ता" म्हणुन कसे रडु नये हे सांगा. परवाही ती चेपुवर पोस्ट फिरत होती, म्हणे आईबापापासुन वेगळं केलं तर त्या बेसिस वर मुलगा मुलीला घटस्फोट देऊ शकतो. का बाबा, मुलीला मायबाप नाहीत का? त्यांना सोडायचं ही परंपरा. मुलानी सोडा म्हणलं मायबापाला, तर ते क्रौर्य.. कालच ते करवाचौथ नामक प्रकरण पाहिलं. त्यातही हेच चालु आहे. ३ महिन्याचं पिणारं बाळ घेऊन उपवास केला एका महान मुलीने. का तर सासुसासरे आलेत इथे. त्यांनी "आमच्याकडे असंच असतं" म्हणुन करायला लावला. तिकडे नवरा ऑफिसच्या पार्टीत दाबुन हाणत होता. रात्री ९.३० ला धावत पळत (भरल्या पोटी) चाळणीत थोबाड दाखवायला आला. आणि ह्यात काही चुक आहे असं त्याला एक क्षणभरही वाटलं नाही. कुणी तरी आपल्यासाठी थेंबभर पाणीही न पिता बसलंय, आणि ह्याला हे "त्यात काय मग! करायलाच हवं.. आमच्याकडे असंच असतं" वाटतंय.. तुम्हीही तेच रडगाणं गाताय.. इकडची झाली.. इकडेच लक्ष द्या आणि आईबापाने कष्ट काढले.. न काय न काय.. जरा काही २०१६ ला शोभेल असं बोला..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा