Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

लेखक साहना यांनी रविवार, 18/09/2016 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

वाचने 219375
प्रतिक्रिया 456

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे तद्दन फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा थांबविण्याऐवजी त्याचे सरळसरळ समर्थन सुरू आहे. ज्यांना मांसाहाराचे वावडे नाही त्यांनी असले प्रतीकात्मक पदार्थ वापरण्याऐवजी खरेखुरे मांसाचे पदार्थ वापरावेत. उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे वापरावेत आणि नारळ फोडण्याऐवजी एखादी कोंबडी, बकरी कापावी. मांसाचे वडे म्हणून नैवेद्यात उडीद वडे ठेवणे म्हणजे देवाला फसविण्यासारखे आहे. अशाने देव प्रसन्न होण्याऐवजी कोपायचा.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत. या भ्रामक समजूती म्हणजे तद्दन फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा थांबविण्याऐवजी त्याचे सरळसरळ समर्थन सुरू आहे.
ह्याचे समर्थन कोणीही करत नाही. ह्या क्रूर प्रथाच होत्या हे निर्विवाद. मी स्वत: कट्टर शाकाहारी आहे पण केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पूर्वी असे काहीच नव्हते असे म्हणणे हे केवळ मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.

In reply to by प्रचेतस

@
पण केवळ आपल्याला पटत नाही म्हणून पूर्वी असे काहीच नव्हते असे म्हणणे हे हे केवळ मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
››› +++++++१११११११. ह्याच मताला टनाटनी लोक सहमती दर्शवित नाहीत .

In reply to by श्रीगुरुजी

उडीद वड्यांऐवजी कोंबडीवडे वापरावेत कोंबडीवडे शाकाहारी असतात. ते कोंबडीसोबत खातात म्हणून कोंबडीवडे. बाकी सर्व मान्य आहे.

In reply to by बोका-ए-आझम

मी वर म्हटल्याप्रमाणे शाकाहारी परंपरा ह्या केवळ बौद्ध धर्माच्या यज्ञहिंसेला विरोध आणि जैनांची सम्पूर्ण अहिंसा ह्यातून उगम पावलेल्या आहेत. केवळ त्याचमुळे पूजेतही मांसान्नाला हळूहळू विरोध होत गेला. शिवाय नंतर वैदिक देवता मागे पडून भक्ती पंथावर चाललेल्या भागवत धर्माचाही प्रसार होत गेला. रामायण महाभारत ह्या ग्रंथात मांसान्नाचे (नैवेद्य/श्राद्ध म्हणून) कित्येक उल्लेख सापडतील. रंतीदेवाची कथा तर प्रसिद्धच आहे. खुद्द विश्वामित्राने कुत्र्याची तंगडी खाल्ल्याचे उदाहरण आहे. अगदी अलीकडच्या काळात बघावे तरी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर विजयादशमीला आणि (बहुधा चैत्री पौर्णिमेला) रेडा बळी द्यायची प्रथा होती जी अगदी पंतप्रतिनिधींच्याही काळातही चालू होती. अगदी आजही कोकणातील कित्येक घरात गौरींना मटणाचा नैवेद्य दाखवला जातो तर विजयादशमीला बळी दिला जातो. चैत्रात तर कित्येक बोकडांचा, कोंबड्यांचा बळी चालू असतो. केवळ ह्या धर्मांच्या शाकाहाराच्या प्रसारामुळे हे प्रमाण बरेचसे कमी झाले मात्र त्याचे ट्रेसेस आजही ह्या प्रतिकांच्या रुपाने अस्तित्वात आहेत.

In reply to by प्रचेतस

निदान आजच्या काळात तरी प्रतीकात्मक रूपाने सुद्धा या प्रथा नसाव्यात. म्हणजे नारळ हा नारळ म्हणून फोडावा, बळी देण्याचे प्रतीकात्मक रूप म्हणून नको किंवा वडे हे वडे म्हणूनच असावेत, मांसवड्यांचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून नको. गुलालबिलाल टाकलेला भात असले प्रकार बंद व्हावेत.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत. केवळ प्रथा म्हणूनच ह्या चालू आहेत. प्रथेमागचं कारणही आज कित्येकांना माहीत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कसंय ना गुरुजी, हा एक विचित्र प्रकार आहे बघा. शॉर्टकट मारलेले हे आजचे सर्व विधीच हुकलेले आहेत. 'शास्त्र' म्हणून ह्याच्या ठिकाणी ते वापरा, हे नाही मिळत का तर त्याच्याऐवजी दर्भ, सुपारी, अमुक-तमुक वापरा. हे जे शॉर्टकट मारलेत त्याने पुजेपासूनचा लाभ मिळत नाही फक्त 'काहीतरी केल्याचं समाधान' यजमानाला मिळतं. यजमान विचार करतो की आपण शास्त्रोक्त पुजाविधी करत आहे, पण प्रत्यक्षात ही नकळत फसवणूक आहे. कोणत्याही अस्सल तांत्रिक पुजेत विशिष्ट तीच वस्तू, त्याच स्पेसिफिकेशनची मिळाली नाही तर पूजा केलीच जात नाही. आपल्या सामान्य लोकांच्या घरी ज्या पूजा केल्या जातात त्या शास्त्रार्थ पूजा नव्हेतच. फक्त एक फस्टक्लास गोंधळ आहे. जस्ट अ रिचुअल फॉर द सेक ऑफ दॅट.

In reply to by संदीप डांगे

जर देव चराचरांत आहे, तर डोळे मिटून ध्यान करण्याने किंवा नामस्मरणानेही तेच व्हायला हवं, जे पूजेने होतं. पुरोहित वर्गाने स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी ज्या अनेक फर्मास गोष्टी केल्या, त्यातली एक पूजा असणार. वर प्रचेतसभौंनी १४ व्या शतकाचा उल्लेख केलाय. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नंतरच्या काळात. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात पूजाअर्चा हे प्रकार होत नव्हते का?

In reply to by बोका-ए-आझम

पूर्वीही पूजाअर्चा व्हायच्याच की. मात्र त्यांचे स्वरूप कालानुक्रमने बदलत गेल्याचे दिसते..आजचे पूजेचे स्वरुप पाहिले तर ऋग्वेदादी वेदांचे फ्यूजन अलिकडच्या काळातील स्तोत्रांसह होऊन नवीनच श्लोक तयार झालेले दिसतात शिवाय संतरचित आरत्यांचा वापर तर खुपच मोठ्या प्रमाणावर आहे. वैदिक यज्ञातील हवन ही देवताना तृप्त करण्यासाठी केलेली पुजाच, चालुक्य -शिलाहारांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला नित्योपचारांसाठी दिलेली दाने ही देखील पूजाच, आणि आजच्या काळात आरत्या म्हणत घालीन लोटांगण म्हणत फेर धरणे ही देखील पूजाच.

In reply to by प्रचेतस

बौद्ध किंवा जैनांच्या प्रभावाबद्दल जास्त माहिती नाही. पण मांसाहारी नैवेद्याबद्दल खूपच सहमत. माझ्या माहितीप्रमाणे नवरात्रात बहुधा खांडेनवमीला बळी दिला जातो. महाराष्ट्रासह इतरही राज्यांतही प्रथा आहे. कोकणात (विशेषतः रत्नागिरी जिल्हयात) चैत्रात (भैरीभवानी सारख्या) ग्रामदेवतेची जत्रा असते तेव्हाही बर्‍याच घरी कोंबड्याचा वा मटणाचा नैवेद्य असतो. त्याशिवाय देवीचा गोंधळ (बहुतेक एक बोकड अधिक पाच कोंबडे, नक्की आठवत नाही. शिवाय दारू); कुळाचार, घरात लग्न झाल्यास पाचपरतावणे, तिखट जेवण किंवा गोतांबीर वगैरे असल्यास मांसाहारी नैवेद्य असतोच. ज्यांना लहानपणापासून हे बघायची सवय असते त्यांना त्यात काही विशेष वाटत नाही. बोकड नाही, पण कोंबडी घरी कापणे ही नॉर्मल गोष्ट असू शकते. गावठी कोंबडी अगदी ठाण्यामुंबईतही बरीच लोकं (जिवंत) घरी आणून स्वतः कापत, कारण कापून मिळत नाही. कोकणात (रत्नागिरी जिल्हयात) गौरीगणपतीत खूप घरांत गौरीआवाहनाच्या संध्याकाळी नैवेद्याला मच्छी असते आणि दुसर्‍या दिवशी गौरीपूजनाला कोंबडा किंवा मटण आणि वडे असतात. गणपतीसाठी मात्र शाकाहारी गोडाचा नैवेद्य असतो. गंमत म्हणजे गणपतीला गौरीचा नैवेद्य वर्ज्य म्हणून गौरीला नैवेद्य दाखविताना तो गणपतीला दिसू नये यासाठी त्याच्या गौरीकडील बाजूला केळीचं पान लावतात! पण बहुधा या घरांमध्येही इतरत्र उल्लेख झालेल्या पूजाविधींच्या वेळी शाकाहारी प्रतिकांचा आधार घेतला जातो.

In reply to by बोका-ए-आझम

यज्ञातुन मुर्तीपुजेकडे वळल्यावरचे अवशेष म्हणजे सध्याचे होम हवन. जैन बुद्ध धर्मांच्या वाढत्या प्रभावाखाली अन अर्थात आर्थिक दृष्ट्या सारखे ब्ळी देण प्रकार कठीण होत गेले. तेव्हा मग रीप्लेसमेंट म्हणुन धान्याचा वापर सुरु झाला.

In reply to by बोका-ए-आझम

नाही सांगता येत. कदाचित इस्लामिक राजवटीत. पण हा केवळ तर्क. कारण बऱ्याशच्या पोथ्या ह्या १४ व्या शतकानंतर लिहिल्या गेलेल्या आहेत.

In reply to by प्रचेतस

शोधा तुम्हाला एखादा शीलालेख सापडेल तरी तसा उल्लेख असलेला. सोबत अत्मुदांनाही घ्या म्हणजे तिथलया तिथे (शीलालेखाचीच) कुंडली मांडून नक्की कधी चालू झाले हे प्रतिकात्मक पूजन ते आम्हाला समजेल. अज्ञानी बालक नाखु

In reply to by बोका-ए-आझम

'पूजा' हा शब्द वेदांमध्ये आढळत नाही. उपनिषदांमध्येही बहुधा पूजा हा शब्द नाहीच. प्रचेतस म्हणताहेत तसे आज जे पूजेचं स्वरूप आपल्याला दिसतेय ते त्यामानाने फार अर्वाचीन आहे हे निःसंशय.

नारळाचा नरबळीशी संबंध आहे असे एक बाजूने कबूल केले किंवा नारळाचा नरबळीशी संबंध नाही असे दुसर्‍या बाजूने कबूल केले तर जीभ झडेल का कुणाची?????

In reply to by संदीप डांगे

मान्यवर मी फक्त नारळाच्याच बाजूने आहे (कारण माझ्या घरी नारळाचे झाड आहे) आणि मुख्य म्हणजे त्याला नारळही आहेत. नारळीयन नाखु

In reply to by गॅरी ट्रुमन

आहे असे सिद्ध झाले तर समस्त नारळप्रेमींची अडचण नाही होणार का? फोडला नारळ कि लगेच वाढला काउंट ब्रह्महत्येचा चित्रगुप्ताच्या चोपडीत! समस्त नारळप्रेमी जनता नरकात जाईल अश्याने आणि नरकात प्रचण्ड लॉजिस्टिकल अडचणी निर्माण होतील. स्वर्ग मोकळा पडेल. विश्वाचे संतुलनच बिघडेलना हो अश्याने. तस्मात असे सिद्ध न होणे किंवा कबूल न करणे हेच विश्वाच्या हिताचे आहे. -आनंदयात्री (चिन्ता करितो विश्वाची)

In reply to by आनंदयात्री

अमक्यातमक्याला नारळ दिला वगैरे म्हणायची पण सोय राहणार नाही! ;)

In reply to by गॅरी ट्रुमन

नारळाचा नरबळीशी संबंध आहे असे एक बाजूने कबूल केले किंवा नारळाचा नरबळीशी संबंध नाही असे दुसर्‍या बाजूने कबूल केले तर जीभ झडेल का कुणाची?????
पटत नसताना तसं केलं तर कर्मठ ढुढ्ढाचार्य सोकावतील.

=)))) हा संपूर्ण धागा प्रतिसादासह एकदम वाचला तर काही बक्षीस वगैरे आहे का?

In reply to by पैसा

यांनी पाला खायला(तरी) बकरा शिल्लक ठेवला यावर कुण्ण्णी(सुद्धा) विश्वास ठेवणार नाही असा पक्का समज आहे ! बकरा, पाला, पैसाताई ,गावडे मास्तर,नारळ्,आणि कोहळा सर्वांनी हलके घ्यावे. ता.क. लगेच घरावर मोर्चा काढू नये. गल्लीच्या तोंडाशी असलेल्या घरवाल्याकडे ज्याम थोराड व चावके कुत्रे आहे. सूचना संपली.

In reply to by नाखु

=)) =)) =)) कुत्र्याच्या चाव्यासाठी अँटी रेबीज इंजेक्षणे गेल्याच महिन्यात घेतली आहेत. घाबरते की काय! =)) =)) आमचा ढेल्या भूभू आहे मिपावर. त्याला पण आणू. अवांतरः कोहळा मिळवण्यासाठी आवळा घेऊन येऊ. कोहाळ्याचे सांडगे करायचेत.

In reply to by संदीप डांगे

ओला नारळ म्हणजे कसा मनुष्य समजायचा पण? ओल्या नारळाच्या करंज्या कराव्या म्हणते. बकरा कोणाला हवा असेल तर घेऊन जावा.

In reply to by अजया

एक नारळ देण्यात येइल. (सद्या नारळ देणे म्हणजे = कामावरुन काढून टाकणे कींवा "आता या" म्हणणे) यातील काही नाही...

जरा मूळ मुद्द्याकडे येउ. ओके मान्य मुस्लिमांना झुकत माप दिल. पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अंनिसच्या सहयोगातून यावेळी रक्तदान शिबिर घेतले. रक्त सांडू नका दान करा असे आवाहन केले. कुठतरी प्रबोधनाची सुरवात तर झाली. जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. मुस्लिम समाज हा तुलनेने कडवा व अधिक धर्मांध आहे हे वर एका प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे. तडजोड ही लबाडी नसते. मुस्लिम धर्मातील अनिष्ट प्रथांविषयी मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करते आहेच. हे केल तर ते का केल नाही असे आरोपीच्या पिंजर्‍यात पकडण्यापेक्षा जे काही शक्य आहे ते मर्यादा पाळून करताहेत तर जरा कौतुक करा ना! हिंदुनी आठ आठ पोरे जन्माला घालण्याच्या आवाहना पेक्षा मुस्लिमांना संतति नियमनाला प्रवृत्त करणे हे जास्त चांगले नाही का? खर तर हमीद दलवाईंनी या पेक्षा कठोर भुमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. अर्थात सर्व प्रतिसाद हे विचारमंथनच आहे.सुधारकांमधे जहाल मवाळ तेव्हाही होते आताही आहेत. आपला समाज एकाच वेळी तीन शतकात वावरतो आहे. बदल कुर्मगतीने का होईना होताहेत. आपापल्या परीने गति देण्याचा प्रयत्न करु यात!

In reply to by प्रकाश घाटपांडे

@पण त्यामुळे बकरीद ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाने अंनिसच्या सहयोगातून यावेळी रक्तदान शिबिर घेतले. रक्त सांडू नका दान करा असे आवाहन केले. कुठतरी प्रबोधनाची सुरवात तर झाली. जरा सुसरबाई तुझी पाठ मउ म्हणुन जरा समाज प्रबोधन च्या दिशेने जात असेल तर जरा तडजोड करायला काय हरकत आहे. ››› +++१११. @ तडजोड ही लबाडी नसते. ››› प्रचंड सहमत. @मुस्लिम धर्मातील अनिष्ट प्रथांविषयी मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करते आहेच. हे केल तर ते का केल नाही असे आरोपीच्या पिंजर्‍यात पकडण्यापेक्षा जे काही शक्य आहे ते मर्यादा पाळून करताहेत तर जरा कौतुक करा ना! ››› येस . यालाही सहमती. @हिंदुनी आठ आठ पोरे जन्माला घालण्याच्या आवाहना पेक्षा मुस्लिमांना संतति नियमनाला प्रवृत्त करणे हे जास्त चांगले नाही का? ››› याच्याशी तर सर्वात जास्त सहमत. टनाटनी कपटी लोक.. ते करतात तर आम्हांलाही करू द्या अज्जून टनाटनीपणा.. असं आग्रहानी म्हणतात. तिथे त्यांना नेहमीच्या राष्ट्रहिताच्या गप्पा आठवत नाहीत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाश, तुमचे सगळेच प्रतिसाद अतिशय सौम्य, संतुलित व समजूतदार आहेत (जसे ते नेहमीच पूर्वीही असत). खरे तर मला वाटते, तुमच्यासारखी सौम्य, प्रांजळ व तडजोड स्वीकारणारी व्यक्ति अनिसच्या प्रमुखपदी असती तर आज अनिसचे कार्य बर्‍यापैकी पुढे गेले असते. (हे सर्व मी अतिशय प्रामाणिकपणे लिहीतोय, ह्यात सर्कॅझम अजिबात नाही, गैरसमज नसावा). मुस्लिम सत्यशोधक मंडळ अजून कार्यरत आहे व त्याचे मुस्लिम समाजात काही प्रभोधनाचे कार्य सुरू आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. ह्याविषयी अधिक माहिती कुठे मिळेल?

In reply to by प्रदीप

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची वेबसाईट याच वर्षी तयार झाली आहे http://www.muslimsatyashodhak.org/ तलाकपिडित मुस्लिम स्त्रियांना हिंदु स्त्रियांचा हेवा वाटतो.

In reply to by प्रदीप

प्रकाश, तुमचे सगळेच प्रतिसाद अतिशय सौम्य, संतुलित व समजूतदार आहेत (जसे ते नेहमीच पूर्वीही असत). खरे तर मला वाटते, तुमच्यासारखी सौम्य, प्रांजळ व तडजोड स्वीकारणारी व्यक्ति अनिसच्या प्रमुखपदी असती तर आज अनिसचे कार्य बर्‍यापैकी पुढे गेले असते.
+1

In reply to by एस

धन्यवाद. जे लोक धर्माभिमानाची टिमकी वाजवून टनाटनीपणा करतात.. पण धर्मातल्या मूलभूत चुकांवर स्वत: कधिही भाष्य अथवा क्रुती करत नाहित.. फक्त दुसय्रानी कुणीतरी केलेल्या कथीत सुधारणेवरून स्वत:चकाहितरी केल्याच्या थाटात फलक घेऊन हिंडतात.. . त्याच पैकी हे एक महाशय आहेत. मी मांडलेल्या मुद्यांचा तितकाच मुद्देसुद प्रतिवाद न करता. आव्हान न स्विकारता फक्त फिरवा फीरवीची उत्तरं देत हे बसले. म्हणून त्यांना खोलंलं जरा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बाकी तुम्ही देखील नंतर नंतर मुद्दे न मांडता तुमच्या नेहमीच्याच टनाटनी, आत्मकुंथन असे नेहमीचे शब्द वापरून वैयक्तिक हल्ले सुरु केले हे रोचक आहे. :) तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

आत्मुगुर्जींनी विचारांवर शरसंधान करता करता विचार मांडणाऱ्यांवर शरसंधान केले. पण तरी त्यांनी मांडलेले मुद्दे आणि प्रतिवाद यातून जी माहिती मिळाली ती खूपच सखोल आणि काही गैरसमज दूर करणारी होती. त्याबद्दल आत्मुगुर्जी आणि श्रीगुर्जी या दोघांनाही मी धन्यवाद देतो. Dogmatic attitude is necessary for the development of rational thought because without that, no initial conjectures can be made - हेच यातून सिद्ध झालं आहे. तर आता दोघांनाही - चला, हवा येऊ द्या अशी णम्र विनंती!

In reply to by प्रचेतस

@तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. ››› हर हर महादेव. @श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.››› क्या ब्बात ! व्वाह!

In reply to by अत्रुप्त आत्मा

@श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.››› शांत राहिल्यामुळे स्टॅटेजिकली ते पुढे राहिले. आंम्ही नाही. (ह्ही ह्ही! ) असो.. चालावयाचेच. कुणी तत्वात जिंकतं, कुणी व्यवहारात.

In reply to by प्रचेतस

बाकी तुम्ही देखील नंतर नंतर मुद्दे न मांडता तुमच्या नेहमीच्याच टनाटनी, आत्मकुंथन असे नेहमीचे शब्द वापरून वैयक्तिक हल्ले सुरु केले हे रोचक आहे. :) तुमची ती धर्मसुधारणा आणि इतर करतात तो टनाटनीपणा. श्रीगुरुजींचे मुद्दे कितीही हुकलेले असलेले तरी प्रतिसादांत त्यांनी बाळगलेले तारतम्य कौतुकास्पद आहे असे म्हणावेसे वाटते.
! _________________________ प्रचेतस, एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो. उत्तर द्यायचे का नाही हा तुमचा निर्णय असेल. श्रीरामरक्षा हे संस्कृतमधील स्तोत्र माझे अत्यंत आवडते स्तोत्र आहे. हे स्तोत्र श्री बुधकौशिक ऋषींनी रचले असा स्त्रोत्रात उल्लेख आहे. हे बुधकौशिक ऋषी म्हणजेच महर्षी वाल्मिकी असे वाचण्यात आले होते. हे स्तोत्र नक्की कधी रचण्यात आले असावे व बुधकौशिक ऋषी म्हणजेच महर्षी वाल्मिकी हे बरोबर असावे का?

In reply to by श्रीगुरुजी

बुधकौशिक म्हणजे वाल्मीकि नक्की नाही. अर्थात हा कोण ह्याचा उलगडा नीट होत नाही तरी हे स्तोत्र इसवी सनाच्या दहाव्या बाराव्या शतकानंतर रचले गेले असावे असा माझा अंदाज आहे. निदान ५ व्या शतकानंतरच असे मात्र ठामपणे म्हणता येईल कारण स्तोत्राचा बराचसा भाग पद्मपुराणात आढळतो व त्यात बुधकौशिकाचा उल्लेख नाही. दहाव्या बाराव्या शतकानंतरच का असा अंदाज केला ह्याचे कारण म्हणजे स्तोत्राची श्री गणेशायनम: अशी सुरुवात. गाणपत्य संप्रदायाचा प्रभाव किंवा गणेशाला प्रथम मान द्यायचे श्लोक किंवा गणेशपट्टीकांचा प्रसार त्या काळानंतरच झाला.

In reply to by अत्रुप्त आत्मा

जे लोक धर्माभिमानाची टिमकी वाजवून टनाटनीपणा करतात.. पण धर्मातल्या मूलभूत चुकांवर स्वत: कधिही भाष्य अथवा क्रुती करत नाहित.. फक्त दुसय्रानी कुणीतरी केलेल्या कथीत सुधारणेवरून स्वत:चकाहितरी केल्याच्या थाटात फलक घेऊन हिंडतात.. . त्याच पैकी हे एक महाशय आहेत. मी मांडलेल्या मुद्यांचा तितकाच मुद्देसुद प्रतिवाद न करता. आव्हान न स्विकारता फक्त फिरवा फीरवीची उत्तरं देत हे बसले. म्हणून त्यांना खोलंलं जरा.
तुमच्या सर्व प्रतिसादात वैयक्तिक टीका, टणटणाट, आपणच तेवढे ज्ञानी आणि इतर सर्वजण फिरवाफिरवी करणारे इ. गोष्टींपलिकडे दुसरे काहीही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ते तूम्मी काहिही म्हणा. तुम्ही कपटी पलायनवादी भेकड टनाटनी आहात.. हे कळलंय सगळ्यांना.. त्यामुळे, बसा अता एकटेच कुंथत...! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

यजमान पूजेला बसले आहेत. टनाटन भटजीबुवा पूजा सांगत आहेत. टनाटन भटजीबुवा: हं. ताम्हणात टनाटनी आचमन करा आणि म्हणा मम. यजमान (ताम्हणात आचमन करून हळूवार आवाजात): मम. टनाटन भटजीबुवा: आत्मकुंथनात मग्न असल्यासारखे इतक्या हळू आवाजात नको. एकदम टनाटनी आवाज काढा. यजमान (मोठ्यांदा): मम. टनाटन भटजीबुवा: ताम्हणात पळीभर पाणी सोडा आणि म्हणा आत्मनः. यजमान (ताम्हणात पळीभर पाणी सोडून): आत्मकुंथन. टनाटन भटजीबुवा (संतापून): भेकड, भ्याड, कपटी कुठले. आत्मकुंथन नाही हो. आत्मनः. यजमान(खजील होऊन): आत्मन: टनाटन भटजीबुवा: ताम्हणात पळीभर पाणी सोडा आणि म्हणा श्रुती स्मृती. यजमान (ताम्हनात पळीभर पाणी सोडून) श्रूती स्मृती. टनाटन भटजीबुवा: हं. संपली पूजा. आता लक्ष्मी रस्त्यावरून आणलेली टनाटन अगरबत्ती लावा. यजमान (बुचकळ्यात पडून): एवढ्यातच कशी संपली? टनाटन भटजीबुवा (संतापून): एवढ्यातच म्हणजे? पाताळयंत्री कुठले. ही पूजा म्हणजे महिनाभर चालणारा अश्वमेध यज्ञ वाटला की काय? यजमान ओशाळवाणे होऊन लक्ष्मी रस्त्यावरून आणलेली टनाटन अगरबत्ती पेटवितात. टनाटन भटजीबुवा: हं. चला आता घंटा वाजवून टनाटन आरती करा. यजमानः पण घंटा नाहीय्ये आमच्याकडे. टनाटन भटजीबुवा: मग एका रिकाम्या डब्यात दगड टाकून डबा हलवा. रिकामी भांडीच जास्त आवाज करतात हे माहितीय्ये ना. यजमान एका रिकाम्या डब्यात खडे टाकून झाकण लावून हलवत हलवत आरती करतात. रिकाम्या डब्याचा खूप मोठा आवाज येत असतो. टनाटन भटजीबुवा: चला. काढा आमची दक्षिणा. आता तुम्ही बसा आत्मकुंथन करत आणि आम्ही चाललो पुढच्या टनाटनी पूजेला. अशा तर्‍हेन पूजा पार पडते.

In reply to by श्रीगुरुजी

@रिकामी भांडीच जास्त आवाज करतात हे माहितीय्ये ना.››› स्वत:च स्वत: विरूद्ध पुरावा दिला श्रीखुर्जींनी. एव्हढा मोठ्ठा खडखडाट करून. =))