श्वास...
जीर्ण झाली सारी पाने
आता हवा एक देठ नवा
तिच फुले अन तेच वारे
आता हवा गंध नवा
सावल्यांनी घेरले आहे
आता हवा एक सूर्य नवा
ओशटलेली सारी नाती
आता हवा एक बंध नवा
जुने झाले श्वास सारे
आता हवा एक श्वास नवा
राजेंद्र देवी
काव्यरस
वाचने
1599
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम कविता!
धन्यवाद...
In reply to उत्तम कविता! by चांदणे संदीप
वा!!
धन्यवाद
In reply to वा!! by पथिक