✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

संघः कलियुगातील एक चमत्कार

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 09/12/2016 - 13:26  ·  लेख
लेख
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
83205 वाचन

💬 प्रतिसाद (480)

प्रतिक्रिया

मी पयला

जेपी
Mon, 09/12/2016 - 13:28 नवीन
हे राम .!

संघ अभ्यासकांसमोर माझी शंका

पगला गजोधर
गुरुवार, 09/15/2016 - 11:55 नवीन
संघ अभ्यासकांसमोर माझी शंका संयुक्त महाराष्ट्र / वेगळा विदर्भ, या वरती संघाची वा संघगणांची भूमिका काय ? संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी संघाची वा संघगणांची भूमिका काय होती ? व सध्याच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना बाबत संघाची वा संघगणांची भूमिका काय आहे ? (संघगणांची = संघाचे जेष्ठ कार्यकर्ते / विचारवंत / थिंकटॅंक मेम्बर लोकांची )
↩ प्रतिसाद: जेपी

अरे गणपती तरी होऊ द्या की रे.

अभ्या..
Mon, 09/12/2016 - 13:30 नवीन
अरे गणपती तरी होऊ द्या की रे. का असले मेगाबाईटी विषय ऐन लेखामालेच्या काळातच काढता? जरा त्यांच्याकडे पण बघा. हाओतच की नंतर तुमचे २००-३०० करायला.

अभ्या भौ.. अगदी बाडीस

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 14:05 नवीन
अभ्या भौ.. अगदी बाडीस तुमच्याशी बाबतीत. बाकी टायटल वाचूनच धागा २००-३०० मारणार याची खात्री नक्की आहे.
↩ प्रतिसाद: अभ्या..

बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे

आदूबाळ
Mon, 09/12/2016 - 13:30 नवीन
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
उदाहरणं देता येतील का?

मला नाही वाटत संघ या पैकी

मृत्युन्जय
Mon, 09/12/2016 - 13:53 नवीन
मला नाही वाटत संघ या पैकी कुठेही आहे. हा संघाची लोक यापैकी काही उद्योगांमध्ये जरुर आहेत पण त्यामुळे तो उद्योग संघाचा होत नाही. जसे की जनता सहकारी बँक.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक

चिनार
Mon, 09/12/2016 - 14:18 नवीन
कोणत्याही बँकेत संघाचे 'स्टेक' असतील असे वाटत नाही. अर्थात काही बँकाच्या संचालक मंडळावर संघाचे लोक आहेत. आणि त्या बँका बऱयापैकी संघाच्या कंट्रोल मध्ये आहेत. उदा. खामगाव अर्बन बँक (शेडूल्ड बँक आहे ) ह्या बँकेचे एक माजी अध्यक्ष माझ्या ओळखीत आहेत आणि ते संघाचे स्वयंसेवक होते (आता आहेत का माहिती नाही)
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खामगाव अर्बन बँक गावाचं

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 14:24 नवीन
खामगाव अर्बन बँक गावाचं काहडल तुमिंन दिन बनौला राजेहो
↩ प्रतिसाद: चिनार

खामगावचे का तुम्ही ?? मंग

चिनार
Mon, 09/12/2016 - 14:29 नवीन
खामगावचे का तुम्ही ?? मंग तुमाले मी कोनाविषयी बोलत हाय ते मालूम पडलं असंनंच ....
↩ प्रतिसाद: महासंग्राम

नाय म्या अकोल्याचा पर लै

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 15:11 नवीन
नाय म्या अकोल्याचा पर लै उन्हायाच्या सुट्ट्या खामगावात गेल्या.. तुमी बोलू रायले तो मानुक्ष माहित आहे मले.
↩ प्रतिसाद: चिनार

आता तं भेटाचं लागन तुमाले..

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:16 नवीन
आता तं भेटाचं लागन तुमाले.. म्या बी अकोल्यात कहाडले तीन वर्ष..भारत विद्यालयात व्हतो (हे शाळा बी संघाची हाय म्हनतेंत!)
↩ प्रतिसाद: महासंग्राम

भेटान बावा कई भेटता.... तैयार

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 15:22 नवीन
भेटान बावा कई भेटता.... तैयार हावो आपण. भारत विद्यालय संघाची होती आता सगळे निब्बर बेकार मास्तर अन पोट्टे भरलेत क्वालिटी गेली तिची आता.
↩ प्रतिसाद: चिनार

काय सांगता ??

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:25 नवीन
काय सांगता ?? आमचे दुर्गे सर वारले हो मागच्या वर्षी..खूप वाईट वाटलं..
↩ प्रतिसाद: महासंग्राम

दुर्गे सर म्हणजे देव माणूस..

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 15:29 नवीन
दुर्गे सर म्हणजे देव माणूस.. मी त्या शाळेत नव्हतो पण बाकीच्या मित्रांकडून त्यांच्या शिस्तीबद्दल ऐकून होतो. आता तेवढी तळमळ असणारे शिक्षक कमीच आहेत.
↩ प्रतिसाद: चिनार

खरोखर देव माणूस...!!

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:33 नवीन
खरोखर देव माणूस...!!
↩ प्रतिसाद: महासंग्राम

मग या बँका संघकार्यासाठी

आदूबाळ
Mon, 09/12/2016 - 14:59 नवीन
मग या बँका संघकार्यासाठी स्वस्तात (पक्षी: नॉन-आर्म्स लेंग्थ टर्म्सवर) कर्ज देतात का? तसं असेल तर "पैशाचाही गैरव्यवहार नाही" हे वाक्य चुकीचं आहे. तसं नसेल तर मग बँक संघाच्या "कंट्रोल"मध्ये असण्याचा उपयोग काय झाला?
↩ प्रतिसाद: चिनार

ह्याविषयी कल्पना नाही..

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:12 नवीन
ह्याविषयी कल्पना नाही..
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मग या बँका संघकार्यासाठी

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 15:15 नवीन
मग या बँका संघकार्यासाठी स्वस्तात (पक्षी: नॉन-आर्म्स लेंग्थ टर्म्सवर) कर्ज देतात का?
संघकार्य कर्जावर चालत नाही. संघकार्य स्वयंसेवकांच्या गुरूदक्षिणेवर चालते.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा

आदूबाळ
Mon, 09/12/2016 - 15:36 नवीन
मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा नेमका उपयोग काय आहे? त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः जनता / जनसेवा सहकारी बँकेने आजवर संघकार्यात / संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रकारे योगदान दिलं आहे?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा

चिनार
Mon, 09/12/2016 - 15:39 नवीन
मग बँका कंट्रोलमध्ये असण्याचा नेमका उपयोग काय आहे?
जनसंपर्क वाढत असावा..
↩ प्रतिसाद: आदूबाळ

धनसंपर्क

नर्मदेतला गोटा
Mon, 09/12/2016 - 16:49 नवीन
धनसंपर्क
↩ प्रतिसाद: चिनार

ठाण्यातील एक अग्रगण्य बँक

खटपट्या
Mon, 09/12/2016 - 23:33 नवीन
ठाण्यातील एक अग्रगण्य बँक संघाची आहे. अगदी प्रत्येक शाखेत हेगडेवारांचा फोटो लावलेला आहे. संघाला प्रचारक लागतात व कार्यकर्ते लागतात. प्रचारक आणि कार्यकर्त्यांनाही पोट असते. संघातील लोकांना नोकर्‍या देण्यासाठी या बँका उपयोगी पडतात. माझ्यामते यात काही गैर नाही. आजही या बँकेत कडक शीस्त आहे. संघाचा म्हणून कोणाचा गैरव्यवहार खपवून घेतला जात नाही. त्याचप्रमाणे बँकेची अंतर्गत कामे जी करोडो रुपयांची असतात ती संघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना देता येतात. देशावर काँग्रेसच्या भ्रष्ट राजकारण्यांच्या हातात असणार्‍या सहकारी बॅंकापेक्षा संघांच्या बँका कीतीतरीपटीने उजव्या आहेत.
↩ प्रतिसाद: चिनार

समजा, दोन समान क्वालीफिकेशन

आदूबाळ
Tue, 09/13/2016 - 09:08 नवीन
समजा, दोन समान क्वालीफिकेशन असलेल्या अर्जदारांमधून एक निवडला कारण तो संघ स्वयंसेवक आहे. आणि यात काही गैरव्यवहार नाही. रैट?
↩ प्रतिसाद: खटपट्या

अजिबात नाही जर बँक सरकारी

साहना
Tue, 09/13/2016 - 11:12 नवीन
अजिबात नाही जर बँक सरकारी नसेल तर. आपल्या खाजगी मालमत्तेवर नेमणूक वगैरे करताना आपण वाट्टेल तो निकष लावू शकता. उद्या तुम्हाला ड्रायवर ठेवायचा आहे तर सर्वांत चांगले qualification असणाऱ्याला तुम्ही ठेवू शकता किंवा जास्त विश्वासू माणसाला ठेवू शकता. तुमची गाडी, तुमचा पैसे, तुमचा निर्णय.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

..

चंपाबाई
Tue, 09/13/2016 - 09:15 नवीन
संघाच्या ब्यान्का म्हणजे नेमक्या कोणत्या ब्यान्का? संघाच्या किती ब्यान्का आहेत? दोन चार सात ... शंभर ? मग उरलेल्या सगळ्या ब्यान्का भ्रष्टच आहेत का?
↩ प्रतिसाद: खटपट्या

संघाच्या बँका म्हणजे संघ

खटपट्या
Tue, 09/13/2016 - 13:32 नवीन
संघाच्या बँका म्हणजे संघ अधिक्रुत रीत्या चालवत नाही पण संचालक मंडळ आणि कर्मचारीवर्ग हा संघात काम करणारा असतो. त्यांच्या बर्‍याच बँका आहेत. जनता पार्टीचे सरकार होते तेव्हा या बँका चालू झाल्या. संघाच्या बँका सोडल्या तर बाकी सार्‍या भ्रष्ट असे कोणी म्हणालेले नाही.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

+१ बरोबर

रुस्तम
Tue, 09/13/2016 - 16:09 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे पेणला देखील अशीच पतपेढी आहे.
↩ प्रतिसाद: खटपट्या

त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 15:52 नवीन
त्याहून पिन-पॉईंटेड प्रश्नः जनता / जनसेवा सहकारी बँकेने आजवर संघकार्यात / संघाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रकारे योगदान दिलं आहे
आबा याचं उत्तर बहुदा नाही असं असावं किंवा योगदान दिल असेल ते वेगळ्या स्वरूपात असू शकत. उदा. वनवासी कल्याण आश्रमाला देणगी किंवा वस्तू इ. स्वरूपात (अर्थात हा फक्त माझा अंदाज आहे).
↩ प्रतिसाद: आदूबाळ

एखाद्या सामाजिक संस्थेला

अभ्या..
Mon, 09/12/2016 - 16:06 नवीन
एखाद्या सामाजिक संस्थेला/संघटनाला किंवा राजकीय पक्षाला म्हनू हवे तर एखादी बँक (कोऑपरेटिव्ह्/शेड्युल्ड्/पतसंस्था पण) कायद्यात राहून काय मदत करु शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकाना तेवढे अधिकार किंवा निधी नसतात माझ्या मते. काही कर्ज प्रकरणात्/उद्योगदंद्यात झुकते माप देणे, नेटवर्क वाढवित नेणे ही नॉर्मल बँकात सुध्दा चालणारी कामे होत असावीत. वैय्क्तिक मला म्हणले तर अतिशय बेक्कार अनुभव आहे. माझ्या हपिसपासून २० फूटावर असलेल्या बँकेत परिवारातील असूनही केवायसीसाठी मला फर्मचे अकाउंट दिलेले नाहीये. (आधार, राशन, व्होटर, शोपअ‍ॅक्ट, रेंट अ‍ॅग्रीमेंट, बँक पासबुक, खातेदार ओळख एवढे सगळे देऊन सुध्दा सीएचा रिपोर्ट आण म्हणून दिले नाही. रिटन मागितले तर तसेही दिले नाही. नवीन फर्मचा झीरो ट्रन्झक्शन देऊ का म्हणले तर तोही नाकारला. त्यांना काय हवे होते आजही मला कळलेले नाही.) दुसर्‍या कोऑपरेटिव्हने १ दिवसात चेकबुक वगैरे रेडी पाठवून अकाउंट प्रोसेस केली.
↩ प्रतिसाद: महासंग्राम

एखाद्या सामाजिक संस्थेला

महासंग्राम
Mon, 09/12/2016 - 16:17 नवीन
एखाद्या सामाजिक संस्थेला/संघटनाला किंवा राजकीय पक्षाला म्हनू हवे तर एखादी बँक (कोऑपरेटिव्ह्/शेड्युल्ड्/पतसंस्था पण) कायद्यात राहून काय मदत करु शकते हा मोठा प्रश्न आहे. बँकाना तेवढे अधिकार किंवा निधी नसतात माझ्या मते. काही कर्ज प्रकरणात्/उद्योगदंद्यात झुकते माप देणे, नेटवर्क वाढवित नेणे ही नॉर्मल बँकात सुध्दा चालणारी कामे होत असावीत
. अगदी बरोबर हा प्रत्येक बँकेचा स्वतःचा प्रश्न आहे. आणि जे सेवाकार्य चालते ते त्यासाठी वेगळा राखीव निधी असतो हे कार्य CSR अंतर्गत चालते.
↩ प्रतिसाद: अभ्या..

एकंदरीत कष्ट आणि त्यातून

असंका
Mon, 09/12/2016 - 16:26 नवीन
एकंदरीत कष्ट आणि त्यातून मिळणारा फायदा याचं गुणोत्तर बघितलं, तर आपण जे केलं ते सर्वोत्तम.
रिटन मागितले तर तसेही दिले नाही.
हे नक्की कसे केलंत याबाबत उत्सुकता आहे जरा. जमलं तर सांगाल काय?
↩ प्रतिसाद: अभ्या..

शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर

अभ्या..
Mon, 09/12/2016 - 16:49 नवीन
शिंपल अकाउंटंट साहेब. मॅनेजर मला म्हणला दोन दोन प्रुफ हवेत. हपिसाचे अन माझे, प्रोप्रायटर म्हणून. मी माझे आधार, पॅन, राशनकार्ड आणि एका बँकेचे पासबुक दिले. हपिसाचे म्हणून शॉप अ‍ॅक्ट दिले (जे नवीन नुकतेच काढलेले होते. आधी माझी पार्टनरशिप फर्म होती) हपिसचे रेन्ट अ‍ॅग्रीमेंट कॉपी दिली. मॅनेजर म्हणला ह्या जागी ऑफिस चालते ह्याचा पुरावा द्या. मी शॉपअ‍ॅक्ट दिलेला होता. तो म्हणे सीएकडून सर्टिफिकेट आण. त्यात काय लिहु हे पण मी विचारले. मॅनेजर म्हणे त्यांना माहित असते. तू आण. मी सीएला विचारता तो म्हणे तसे काही नाही. एवढे पुरेसे आहे. बँकेचे ऑफिसर मला अगदी शिस्तीत समजावत होते की केवायसी आता खूप कडक केलीय. मध्ये काही अतिरेकी प्रवृत्तीचे अकाउंट सापडलेत. फर्मचे दोन पुरावे लागतीलच. माझे डोसके फिरले. काय ते लिहुन द्या म्हणता त्यांनी सरळ सांगितले वादच घालायचा असेल तर तू इथे काढूच नकोस ना अकाउंट. मला खात्याची गरज होती. मी वाद न घालत बसता दुसर्‍या बँकेत ओपन केले. (तेवढ्याच कागदपत्रांवर)
↩ प्रतिसाद: असंका

बरोबर. मला हेच वाटलेलं.

असंका
Mon, 09/12/2016 - 18:06 नवीन
बरोबर. मला हेच वाटलेलं. तोंडी विनंतीचा पुरावा रहात नाही दादा. त्यामुळे अशी विनंती उडवून लावणं अगदी सहज शक्य असतं. शक्यतो विनंती जी करायची तीच लेखी करायची. अगदी नम्रपणे. पुन्हा विनंती करून पोच घ्यायची. "माझा अर्ज का नाकारण्यात आला याची कारणे कळवा, जेणेकरून मला त्यांची आपल्याला समाधानकारक होइल अशी पूर्तता करून देता येइल" असं पत्र द्या. मग बघा. ९०% वेळा कटकट नको म्हणून आहे त्या कागदांवर तुमचं अकाउंट उघडलं जाइल. बाकी वेळेला - जर खरंच बँकेनं तसा नियम केला असेल, तर मात्र तो तुम्हाला लेखी उत्तर देइल. पण अर्थात तुम्हाला पण तेवढंच हवंय ना?
↩ प्रतिसाद: अभ्या..

बँकेचा माणूस पाठवा आणि ऑफीस

खटपट्या
Mon, 09/12/2016 - 23:37 नवीन
बँकेचा माणूस पाठवा आणि ऑफीस चालू आहे की नाही बघा. असे करतात काही बँका...
↩ प्रतिसाद: अभ्या..

गरजू कार्यकर्त्यांना नोकरी/

खेडूत
Mon, 09/12/2016 - 15:59 नवीन
गरजू कार्यकर्त्यांना नोकरी/ कर्जे देणे हे पाहिले आहे. एके काळी अश्या बँकेत नोकरी मिळण्यासाठी मंडळी कांही वर्षे संघात गेलेली पाहिलीयत. आमच्या गावात ही पतसंस्था संघिष्ट असून, अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. बाकी ब्यालंस शीट वगैरे कळत नाही, पण ते लोक प्रामाणिक वाटले.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आधी म्हटल्याप्रमाणे या

मृत्युन्जय
Mon, 09/12/2016 - 18:04 नवीन
आधी म्हटल्याप्रमाणे या संघाच्या बँका नाहितच. हे विधान आणि "संघाने गांधीजींना मारले हो" ही आरोळी यात अर्थाअर्थी काही फरक आहे असे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मलाही तसंच वाटतं. पण असली

आदूबाळ
Mon, 09/12/2016 - 14:52 नवीन
मलाही तसंच वाटतं. पण असली सरसकट लोटून दिलेली "हाण सावळ्या" वाक्यं वाचली की बाकीच्या लेखावर विश्वास ठेवायची इच्छा उरत नाही.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

काही सहकारी बँका मध्ये RSS

साधा मुलगा
Mon, 09/12/2016 - 13:58 नवीन
काही सहकारी बँका मध्ये RSS आहे असे ऐकले आहे. वनवासी कल्याण आश्रम सारखे उपक्रम RSS चे आहेत. उद्योग, शेती आणि ग्राहक क्षेत्राबद्दल माहिती नाही. माझी सर्व ऐकीव माहिती आहे. बाकी मेगबायीटी प्रतिसाद आणि माहिती द्यायला मिपावर भरपूर लोकं आहेतच ;)
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे

श्रीगुरुजी
Mon, 09/12/2016 - 15:00 नवीन
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
>>> उदाहरणं देता येतील का?
जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक इ. मध्ये संघाचे कार्यकर्ते सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना संघाचेच ऑफशूट आहे. बँकिंग क्षेत्रात संघाची वेगळी संघटना आहे. संघाने सरस्वती विद्या मंदीर या नावाने अनेक शाळा काढलेल्या आहेत. विद्यार्थी क्षेत्रात अभाविप ही संघाचेच ऑफशूट असलेली विद्यार्थ्यांची संघटना आहे. संघाची भारतीय किसान संघ या नावाने असणारी शेतकरी संघटना आहे. साधारणपणे ज्या संस्थेच्या नावाच्या शेवटी संघ हा शब्द असतो, त्या संघाने सुरू केलेल्या असतात.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

किंवा भारती .. जसे विज्ञान

पुष्कर जोशी
Wed, 09/14/2016 - 13:29 नवीन
किंवा भारती .. जसे विज्ञान भारती, संस्कार भारती, विद्या भारती ...
बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. >>> उदाहरणं देता येतील का? जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक इ. मध्ये संघाचे कार्यकर्ते सुरवातीपासून मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आहेत. भारतीय मजदूर संघ ही कामगार संघटना संघाचेच ऑफशूट आहे. बँकिंग क्षेत्रात संघाची वेगळी संघटना आहे. संघाने सरस्वती विद्या मंदीर या नावाने अनेक शाळा काढलेल्या आहेत. विद्यार्थी क्षेत्रात अभाविप ही संघाचेच ऑफशूट असलेली विद्यार्थ्यांची संघटना आहे. संघाची भारतीय किसान संघ या नावाने असणारी शेतकरी संघटना आहे. साधारणपणे ज्या संस्थेच्या नावाच्या शेवटी संघ हा शब्द असतो, त्या संघाने सुरू केलेल्या असतात.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

...

चंपाबाई
Mon, 09/12/2016 - 13:39 नवीन
हिंदू विस्कळीत होता म्हणे ! आदिवासी अप्रगत आहेत म्हणे. म्हणुन संघ झटतोय म्हणे ! ... दहा हजार वrshhe ( म्हणजॅ मुसुलमान ख्रिस्चन येण्यापूर्वीपासुन )हे असेच आहे. हिंदू एकतॅची तेंव्हा फिकिर का नव्हती ?

नेहमीप्रमाणे....

मुक्त विहारि
Mon, 09/12/2016 - 13:46 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
↩ प्रतिसाद: चंपाबाई

+१

अनिरुद्ध प्रभू
Mon, 09/12/2016 - 14:03 नवीन
+११११
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

2015 पर्यंत संघाची अधिकृत पट

विशुमित
Mon, 09/12/2016 - 13:43 नवीन
2015 पर्यंत संघाची अधिकृत पट संख्या किती आहे, ही माहिती/विदा जाणकारांकडून मिळेल का? अंदाजे सुद्धा चालेल.

परफेक्ट सांगता येणे अवघड आहे

पुष्कर जोशी
Wed, 09/14/2016 - 13:32 नवीन
परफेक्ट सांगता येणे अवघड आहे ... कारण परिवार खुप मोठा आहे तरी विश्व संवाद केद्राकडे माहीती मिळू शकते
↩ प्रतिसाद: विशुमित

सांगता येणे अवधड आहे .. १.

पुष्कर जोशी
Wed, 09/14/2016 - 13:39 नवीन
सांगता येणे अवधड आहे .. १. नोंदणी (Registration) असा काही प्रकार नाही २. परीवारात अनेक संघटना आहेत .. तरी पण विश्व संवाद केन्दात काही आकडा मिळू शकेल ..
↩ प्रतिसाद: विशुमित

१. नोंदणी (Registration) असा

आदूबाळ
गुरुवार, 09/15/2016 - 20:12 नवीन
१. नोंदणी (Registration) असा काही प्रकार नाही
हायला! ऐकावं ते नवलच! संघात रजिस्ट्रेशन होत नाही?! म्हणजे उद्या कोणीही उठून स्वतःला स्वयंसेवक म्हणवू / न म्हणवू शकतो?
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

पट नामक प्रकार असतो. बहुधा

अनुप ढेरे
गुरुवार, 09/15/2016 - 21:46 नवीन
पट नामक प्रकार असतो. बहुधा प्रत्येक शाखेचा एक. त्यात नाव मेंटेन करतात.
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ढेरेशास्त्री खरे खरे सांगा,

अभ्या..
गुरुवार, 09/15/2016 - 23:14 नवीन
ढेरेशास्त्री खरे खरे सांगा, तुम्ही कधीच शाखेत गेला नाहीत ना? ;) . . सहज एक गोष्ट/किस्सा ऐकलेला आठवला. तळजाईला मा. बाळासाहेब देवरसांच्या काळात शिबिर झालेले. प्रचंड उपस्थिती होती. उपस्थित गणवेशधारीं स्वयंसेवकांची परफेक्ट
संख्या
१५ मिनिटात सरसंघचालकाकडे दिली गेली. नो लिखापढी.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

..

चंपाबाई
गुरुवार, 09/15/2016 - 23:19 नवीन
पट म्हणजे अंक असतो.
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा