प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..)
मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रमेशच्या घरी आई, विधवा बहिण नोकरीवाली, आणि बायको अशा तीन बायका आहेत. बायको दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामेपण बायकोच करते आणि आई सदैव कोणत्या ना कोणत्या भिशीला अगर भजनी मंडळात गेलेली असते. बहिण रविवार म्हणून टीव्ही पहात आरामात सोफ्यावर बसलेली. .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी त्याला विचारले वैदेही (त्याची बायको) कुठे आहे? तो म्हणाला ती ऋतुलला ( त्याच्या मुलाला ) गिटारच्या क्लाससाठी घेऊन गेली आहे.
वैदेही ही एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रमेशला विचारले मग तू का सोडायला जात नाही? त्यावर तो म्हणाला कि पाच दिवस मी नोकरी करतो, घरासाठी राबतो. मग शनिवार रविवार तिने सगळं बघायला नको का? ती तिची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तू काय काय करतो? तो म्हणाला, मला सुटीच असते. मग मी नऊला उठतो. वैदेहीने बनवलेला चहा व ब्रेकफास्ट खातो. मग पेपर वाचून सावकाश अंघोळ करतो. मी म्हटले तेव्हा वैदेही काय करते ? तर म्हणाला, ती मुलांना उठवते, ब्रश करवून दुध देते, सर्वांचा चहा बनवते. ब्रेकफास्ट बनवते, मग देवपूजा करते. मग आई आणि बहिण यांच्या मदतीने जेवण बनवते.दोन दिवस तिला सुट्टी असते, सो तिने बरंच काम करून रमेशला आराम कसा मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे. शनिवार रविवार मला पूर्ण फ्री.
माझ्या तोंडावर आले होते कि अरे मग तातःवडा भर तीही राबतेच ना ? शनिवार रविवार इला नको का थोडी विश्रांती ?.. पण मी थांबले.
बाहेर पडल्यावर नवरा म्हणाला हा बघ आठवड्याचा आराम कसा वसूल करतो ?बिचारी बायको आठवडाभर बाहेर राबते आणि शनिवार रविवार घरी गृहिणी म्हणून ?. बिचारी सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करते भरपूर पैसे मिळवते. आणि हा इथे राजासारखा राहतो. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस तो बाहेर जातो तर दोन दिवस तिनं एन्जॉय का करू नये ?
घरात तीन बायका आहेत पण राबणारी एकच. चांगले तीस हजार रुपये मिळवते तर स्वैपाकाला बाई ठेवायला काय झालं ? नाहीतर बायकांवर खर्च करण्यापेक्षा याने तिला स्वैपाकात आणि इतर कामात मदत केली तर काय बिघडले ?.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगा चार तास शाळेत जातो. सगळ्या कामाला शनिवार रविवारी तरी हात लावूदेत ना त्याला. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस संपूर्ण आराम करायचा आपण आणि राबायचे बायकोने हा कसला हिशेबीपणा.
..मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर?
(मिथ्यकथा नावे बदलून)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10952
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगागा!
ख्या ख्या ख्या
हॅ हॅ हॅ
अगदी अगदी
In reply to हॅ हॅ हॅ by सुबोध खरे
बाकी चालू द्या,
पि जी म्हणून राहू शकतील का ते
कसलं काय?
युद्धस्य कथा रम्यः साठी हा
हे भारी आहे.
काजू कतली द्या हो.
In reply to हे भारी आहे. by बोका-ए-आझम
काहीतरी
In reply to काजू कतली द्या हो. by मृत्युन्जय
खल्लास!!!
_/\_
ह्या धाग्याने मला अंतर्मुख
=))
झालं......
झाला का हिशोबाचा ताळा?
क ह र !!
नई जम्या, इतका काही खास वाटला
+2016
In reply to नई जम्या, इतका काही खास वाटला by टवाळ कार्टा
1+
लोलवा!!
हिशेब लागला नाही. डॉ. खरे
सहमत! ;))
In reply to हिशेब लागला नाही. डॉ. खरे by रेवती
+१
In reply to हिशेब लागला नाही. डॉ. खरे by रेवती
कुणाला तरी घरी बसवाच. निदान
In reply to हिशेब लागला नाही. डॉ. खरे by रेवती
आणि पेढ्याचं आधीच सांगा..
In reply to कुणाला तरी घरी बसवाच. निदान by स्रुजा
हही हही हही हही हही !!!
हा हा हा हा
सुखी संसाराची गुरुकिल्ली
In reply to हा हा हा हा by आजानुकर्ण
भारीच....