✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

प
प्रचेतस यांनी
Wed, 08/31/2016 - 16:43  ·  लेख
लेख
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच. १. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं. २. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार ३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत. ४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे. मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात. ५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती. ६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस ७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर. ८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे. ९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला. हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38589 वाचन

💬 प्रतिसाद (202)

प्रतिक्रिया

शिळे मासे, ताजे मासे ओळखू

संदीप डांगे
गुरुवार, 09/01/2016 - 16:07 नवीन
शिळे मासे, ताजे मासे ओळखू शकणार्‍या तमाम खवैय्यांबद्दल मला प्रचंड आदर आणि असूया आहे. आम्हाला शिंचे कोणते खायचे आणि कोणते फक्त पाहायचे ते पण ओळखता येत नाहीत. --- काही महान लोकांना तर ताजा वडा आणि शिळा पावही ओळखता येत नाही. =))
  • Log in or register to post comments

मयूरची मिसळ २ दिवसांपूर्वीच

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/01/2016 - 17:00 नवीन
मयूरची मिसळ २ दिवसांपूर्वीच खाल्ली. खासच आहे. भूमकर चौकात 'जोशी वडेवाले' नावाने जो फालतू वडा विकला जातो त्याच्या बाजूलाच 'रोहित वडेवाले' चा बटाटावडा, साबुदाणा वडा आणि इतर चाट आयटेम भारी आहेत. तिथून हायवेने मुंबईच्या दिशेने आणखीन थोडे पुढे गेल्यास स्वागत नावाचे बिअर शॉप कम हॉटेल आहे. तिथे मटकी फ्राय अतिशय चवदार. त्याच्या आणखीन थोडे पुढे गेल्यास गावरान नावाचे हॉटेल आहे. तिथले सुके चिकन मस्त. डांगे चौकात स्टेट बँकेच्या शेजारी नविन लोणी स्पंज डोसाचे दुकान झाले आहे. तो लोणी स्पंज डोसा मस्त आहे. असाच डोसा चापेकर चौक क्रॉस केल्यावर ज्या गाड्या लागतात तिथेही मिळतो. पण डांगे चौक वाला खास आहे. डांगे चौक्चे रोजवूड आणि आकुर्डी स्टेशनचे प्राईड ओक्के आहे. आकुर्डी (वेस्ट ) स्टेशनला एक बेकरीवाला आहे. तिथे व्हीट खारी भन्नाट.
  • Log in or register to post comments

रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 09/01/2016 - 17:11 नवीन
रावेतची मयूर मिसळ आणि चिंचवड स्टेशनची एकच आहे का ? मी रावेतला खाल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

नाही (नसावी)

नाखु
गुरुवार, 09/01/2016 - 17:15 नवीन
त्यांची एक शाखा चिंचवड स्टेशनला आहे आणि मुख्य शाखा खंडोबाच्या माळाकडून थर्मॅक्स्ला जातानाचे रस्त्यावर (मोठी खूण समोर असलेली भली थोरली "नक्षत्र"सोसायटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

ओ नाखुदा ..

चौकटराजा
गुरुवार, 09/01/2016 - 19:21 नवीन
ती मयूर मिसळ आमच्या घरासमोर आहे हो हे नक्षत्र कुठं काढलं मधुनच. बाकी मी थोडी भर घालतो. चिंचचड लोकमान्य ब्रिज खाली अप्पांचा वडा, प्रतिभा कॉलेज काळभोर नगर समोरील वडा( शेट्टी उद्यान) हे आपल्या घरगुती वड्याच्या चवीसारखे. भेळ चौकात शर्मा पाव भाजी मस्त व लोकप्रिय. वासूचा वडा ओव्हर रेटेड. ( नुकतीच दोन खादाड॑ मिपाकरं आम्हाला " सावली " निगडीत दिसली. जाम हाणत होते. जोडी म्हण्जे अभ्या ते कोण ते ओळख ... सात अजुबे ... आठवी अपनी जोडी ) सबब सावली हे आलेच. माझ्या मते चिंचवडातील कोण्त्याही सामोशापेक्षा सोमाटणे फाट्यावर सामोसा चांगला मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

रावेत, चिंचवड स्टेशन आणि

गणामास्तर
गुरुवार, 09/01/2016 - 17:36 नवीन
रावेत, चिंचवड स्टेशन आणि थरमॅक्स एनर्जी हाऊस. या सर्व एकचं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आणखीन एक विसरलो. कोयते वस्ती,

अप्पा जोगळेकर
Fri, 09/02/2016 - 10:49 नवीन
आणखीन एक विसरलो. कोयते वस्ती, पुनावळे इथल्या पुरोहित स्वीट्स नामक छोट्या दुकानात कलाकंद मिळतो. माझ्या मते हा जगातला सर्वोत्तम कलाकंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

बारामती वडापाव, अख्या सांगवी

विशाल चंदाले
गुरुवार, 09/01/2016 - 18:15 नवीन
बारामती वडापाव, अख्या सांगवी/पिंपळे गुरवात वर्ल्ड फेमस आहे. चटणी पण भारी असते त्याची. साई चौकातल्या मंडईत, संध्यकाळीच असतो फक्त.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

आजानुकर्ण
गुरुवार, 09/01/2016 - 18:54 नवीन
मस्त माहिती... जोरदार धागा
  • Log in or register to post comments

आमच्या इथे सर्वात उत्तम मिसळ...

चौकटराजा
गुरुवार, 09/01/2016 - 19:25 नवीन
आमच्या इथे सर्वात उत्तम मिसळ आमचेकडेच होणार आहे, पण त्याचे जी एस टी सारखे चालू आहे. आत्मबंध हे सर्व बंध॑ सोडून टाकणारा रस्सा पुण्याहून आणणार आहेत.
  • Log in or register to post comments

गंडम कट्टा

कपिलमुनी
गुरुवार, 09/01/2016 - 21:21 नवीन
अस्सल खानदेशी ऑथेटिकेटेड डिश मिळण्याचे ठिकाण ! संभाजी चौक , निगडी
  • Log in or register to post comments

गुंडम कट्टा

कपिलमुनी
गुरुवार, 09/01/2016 - 21:27 नवीन
असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

संभाजी चौकात नेमके कुठे रे?

प्रचेतस
गुरुवार, 09/01/2016 - 21:37 नवीन
संभाजी चौकात नेमके कुठे रे? आणि खानदेशी म्हणजे काय काय मिळते? तिखट आणि तेलकटपणामुळे खानदेशी खाणे अंमळ जडच जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

आजानुकर्ण
गुरुवार, 09/01/2016 - 21:48 नवीन
खाताना जड जात नाही पण... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पत्ता

कपिलमुनी
गुरुवार, 09/01/2016 - 23:39 नवीन
चौकात स्वीट मार्ट आहे त्याच्या विरुद्ध दिशेस , सध्या गणपती बसतो , खालच्या गाळ्यात आहे हे हॉटेल. बिबडा(coarse papad made from Jowar), चिकनीचे पान(coarse papad made of red Jowar), गुरमई रोटी( a sweet roti made of jiggery infused with cinnamon and special homemade Masala), खानदेशी पुरणपोळी, केळीची भाकरी(Bhakri made with flour made of dried and ground banana), कळण्याची भाकरी(bhakri made of black gram & Jowar), केळीचा बिबडा बिबडा, खानदेशी शेव भाजी, खानदेशी पाटोड्यांची भाजी असे बरेच वेगळा पदार्थ मिळतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वर मान्यवर लोकांनी दिलेल्या

अमितदादा
गुरुवार, 09/01/2016 - 22:50 नवीन
वर मान्यवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादांचं मी स्वतः साठी एकत्रीकरण केलेलं. मिपाकारासाठी सुद्धा सोयीचं होईल म्हणून इथं देत आहे, काही चूक असल्यास माझी टंकन चूक समजावी. काही गोष्टींचं संकलन नाहीये वडापाव 1. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, 2. वासू वडापाव निगडी प्राधिकरण 3. काका वडापाव, थरमाक्स चौक 4. दत्ता वडापाव, चाफेकर चौक 5. कॅम्प एजुकेशन जवळ वडापाव गाडी 6. रोहित वडेवाले भूमकर चौक 7. बारामती वडापाव, साई चौक 8. मिसळ 1. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन, 2. नेवाले मिसळ चिंचवड गाव, 3. दे धक्का लिंक रोड, 4. अतिथी पिंपरी 5. निसर्ग पिंपरी, 7. जनता पिंपरी, 8. बालाजी मिसळ मोरया गोसावी 9. पावभाजी व भेळ 1. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी, 2. ओम शिव स्वादिष्ट, निगडी प्राधिकरण 3. शर्मा निगडी प्राधिकरण, 4. नायडू निगडी प्राधिकरण 5. पिंगारा निगडी प्राधिकरण 6. स्वीट मार्ट 1. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. 2. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव 3. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. 4. प्रदीप स्वीट निगडी 5. यशवंत गांधी पेठ 6. गोकुळ स्वीट निगडी चौक 7. बंदन स्वीट शाहूनगर बाग 8. मिठास परिहार चौक,औंध 9. मासे 1. मुंबई मासोळी डी वाय पाटील आकुर्डी-रावेत रोड 2. मालवण समुद्र गावडे कॉलनी जवळ 3. होटेल पन्हाळगड, आकुर्डी चौक. 4. बिर्याणी 1. KGN चाफेकर चौक 2. पथिक चिंचवड 3. हैद्राबाद बिर्याणी हिंजवडी 4. मुघल महाल हिंजवडी 5. मटण व चिकन 1. काबील-ए-तारीफ पिंपळे सौदागर 2. राजवर्धन थरमॅक्स चौक 3. समाधान वाल्हेकरवाडी 4. मराठवाडा हिंजवडी जवळ 5 जय मल्हार मोरवाडी चौका जवळ 6. शिल्पा गावरान नाशिक फाट्याजवळ 7. वाघेरे रानमळा वाल्हेकरवाडी रोडवर 8. हाॅटेल समाधान डांगे चौक जवळ 9. ग्लोबल ग्रिल सिगरी 10. जगूबाईचे मटण वाल्हेकरवाडी रोडला. शाहकारी 1. रामदेव थाळ -निगडी चौक 2. हॉटेल भोला - केएसबी चौक 3. मयुर - चिंचवड स्टेशन 4. श्रावण डायनिंग हॉल - आयनोक्स जय गणेश
  • Log in or register to post comments

+++

DeepakMali
Fri, 09/02/2016 - 02:04 नवीन
सन्ड्वीच, पाव भाजी आणि pizzaa साठी .. स्लाईस ओफ़ हेवन - पिंपरी... झक्कास चव... प्युअर वेज साठी पिंपरी मधे होटेल गणेश... खास प्रसिद्ध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

थोडी सुधारणा

देवांग
Wed, 09/07/2016 - 11:42 नवीन
वडापाव 1. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, 2. वासू वडापाव निगडी प्राधिकरण 3. काका वडापाव, थरमाक्स चौक 4. गिरिधारी वडापाव, चापेकर चौक 5. कॅम्प एजुकेशन जवळ वडापाव गाडी 6. रोहित वडेवाले भूमकर चौक 7. बारामती वडापाव, साई चौक 8. मिसळ 1. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन, 2. नेवाले मिसळ चिंचवड गाव, 3. दे धक्का लिंक रोड, 4. अतिथी पिंपरी 5. निसर्ग पिंपरी, 7. जनता पिंपरी, 8. बालाजी मिसळ मोरया गोसावी 9.शशीची मिसळ गांधींपेठ पावभाजी व भेळ 1. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी, 2. ओम शिव स्वादिष्ट, निगडी प्राधिकरण 3. शर्मा निगडी प्राधिकरण, 4. नायडू निगडी प्राधिकरण 5. पिंगारा निगडी प्राधिकरण 6. स्वीट मार्ट 1. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. 2. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव 3. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. 4. प्रदीप स्वीट निगडी 5. यशवंत गांधी पेठ 6. गोकुळ स्वीट निगडी चौक 7. बंदन स्वीट शाहूनगर बाग 8. मिठास परिहार चौक,औंध 9. मासे 1. मुंबई मासोळी डी वाय पाटील आकुर्डी-रावेत रोड 2. मालवण समुद्र गावडे कॉलनी जवळ 3. होटेल पन्हाळगड, आकुर्डी चौक. 4. बिर्याणी 1. KGN चाफेकर चौक 2. पथिक चिंचवड 3. हैद्राबाद बिर्याणी हिंजवडी 4. मुघल महाल हिंजवडी 5.न्यू प्रतीक बिर्याणी हाऊस, जुना जकातनाका चिंचवड मटण व चिकन 1. काबील-ए-तारीफ पिंपळे सौदागर 2. राजवर्धन थरमॅक्स चौक 3. समाधान वाल्हेकरवाडी 4. मराठवाडा हिंजवडी जवळ 5 जय मल्हार मोरवाडी चौका जवळ 6. शिल्पा गावरान नाशिक फाट्याजवळ 7. वाघेरे रानमळा वाल्हेकरवाडी रोडवर 8. हाॅटेल समाधान डांगे चौक जवळ 9. ग्लोबल ग्रिल सिगरी 10. जगूबाईचे मटण वाल्हेकरवाडी रोडला. शाहकारी 1. रामदेव थाळ -निगडी चौक 2. हॉटेल भोला - केएसबी चौक 3. मयुर - चिंचवड स्टेशन 4. श्रावण डायनिंग हॉल - आयनोक्स जय गणेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

चाट साठी - अजमेरात माताजी,

साळू
Fri, 09/02/2016 - 00:18 नवीन
चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला. दिल्ली स्वाद - निगडीत. आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.
  • Log in or register to post comments

दिल्ली स्वाद चा पराठा मस्त!

इल्यूमिनाटस
Sat, 09/03/2016 - 19:12 नवीन
दिल्ली स्वाद चा पराठा मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साळू

चाट साठी - अजमेरात माताजी,

साळू
Fri, 09/02/2016 - 00:19 नवीन
चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला. दिल्ली स्वाद - निगडीत. आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.
  • Log in or register to post comments

क्या बात!

चांदणे संदीप
Fri, 09/02/2016 - 20:40 नवीन
हा लेख म्हणजे पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! अजून बरीच ठिकाणे राहिली असल्याने रुमाल टाकून ठेवतो! स्टे ट्यून्ड!! :) - पिंचिकर Sandy
  • Log in or register to post comments

रत्ना

आजानुकर्ण
Fri, 09/02/2016 - 21:45 नवीन
आंबेडकर चौकातील रत्ना हॉटेलचा दर्जा ढपलाय काय? पूर्वी तिथे अतिशय उत्तम पंजाबी/उडुपी पदार्थ मिळत असत.
  • Log in or register to post comments

नाही.

प्रचेतस
Fri, 09/02/2016 - 22:00 नवीन
नाही. अजूनही तीच चव आहे. तिथलं टॉमेटो सूप खूपच जबरदस्त. स्पेशल उतप्पा,मसाला डोसा आणि पंजाबी डिशेस अजूनही लाजवाब मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

मस्त

आजानुकर्ण
Fri, 09/02/2016 - 22:19 नवीन
वर कुठे उल्लेख आला नाही म्हणून सहज चौकशी केली. तिथल्या पंजाबी डिशेससारखी चव अद्याप कुठे चाखायला मिळाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दर्जा

नाखु
Sat, 09/03/2016 - 08:33 नवीन
उतरलाय हे नक्की,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

रत्ना

हलकट बाब्या
Sat, 09/03/2016 - 10:30 नवीन
नजीकच्या काळात इथे मैसूर मसाला डोसा खाण्याचा योग आला होता. हिरवी (पुदिना) चटणी लावून बनवला होता, चव साधारण. बऱ्याच उपहार गृहांमधे लाल चटणी लावून बनवतात. कॉफी पण ठीकच होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

शेर-ए-पंजाब

चाणक्य
Sat, 09/03/2016 - 04:51 नवीन
कासारवाडीचं शेर-ए-पंजाब पूर्वी फार भारी होतं. आता कसं आहे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

शेर-ए-पंजाब

चाणक्य
Sat, 09/03/2016 - 04:51 नवीन
कासारवाडीचं शेर-ए-पंजाब पूर्वी फार भारी होतं. आता कसं आहे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

नवीन बातमी

चौकटराजा
Sat, 09/03/2016 - 05:48 नवीन
पिंची मधील काही ठिकाणी ट्रीप अ‍ॅडव्हाझर व्हिझिटेड असा स्टीकर लावलेला असतो. आता एका काळ्या टी शर्ट मधील आसामी चा फटू लावण्यात येंणार खादाड सम्राट विझिटेड असा ..सदर स्टीकरची आर्डर एक सोलापूर वासी फर्म ला मिळाली आहे असे कळते.
  • Log in or register to post comments

pimprimadhe hotel tiranga best for non veg..

DeepakMali
Sat, 09/03/2016 - 08:36 नवीन
चापेकर चौक येथे सुद्धा चितळेंची शाखा सुरु झालीय..
  • Log in or register to post comments

माणदेशी मटण

कपिलमुनी
Sat, 09/03/2016 - 08:58 नवीन
वाकड गावात हॉटेल परख आहे , खास माणदेशी चवीची मटण थाळी मिळते. आणि कोल्हापूरी पेक्षा वेगळी चव आहे
  • Log in or register to post comments

चितळे पिंपळे सौदागर मध्ये पण

मिपापन्खा
Sat, 09/03/2016 - 19:26 नवीन
चितळे पिंपळे सौदागर मध्ये पण चालू झाले आहे कोकणे चौक मध्ये
  • Log in or register to post comments

विकास लंच होम

कपिलमुनी
Sun, 09/04/2016 - 11:47 नवीन
नासिक ( नाशिक) रोड, कासारवाडी, मासे प्रेमीसाठी खास ! अप्रतिम मासे मिळतात. आधी फोन करुन जाणे
  • Log in or register to post comments

हो पाहिलेय

विनटूविन
Sun, 09/04/2016 - 17:21 नवीन
पण कधीच आधी फोन न केल्याने खायला मिळाले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

परदेशी फरसाण

कपिलमुनी
Mon, 09/05/2016 - 17:43 नवीन
मोरया शेजारचा परदेशी फरसाण वाला चांगला अहे असे ऐकून आहे
  • Log in or register to post comments

कुठे नक्की

नाखु
Tue, 09/06/2016 - 09:12 नवीन
कारण मोरया गणपती आणि परदशी एक्मेकांपासून बरेच लांब आहेत (मोरया घाटावर नदी पाशी० तर परदेशी गांधीपेठेत किमान ३/४ किमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नवखा

कपिलमुनी
Tue, 09/06/2016 - 09:20 नवीन
या भागात नवीन आहे त्यामुळे पेठांची नावे माहिती नाहीत . चापेकर चौकातून मोरयाकडे जाताना दुसरा डावा वळण घ्या तिथे उजव्या' बाजूला मोठा दुकान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

३/४ किमी नाही तर दीड्/दोनशे

प्रचेतस
Tue, 09/06/2016 - 09:26 नवीन
३/४ किमी नाही तर दीड्/दोनशे मीटर्स फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जरा लांबच्या मार्गाने नेत होतो

नाखु
Tue, 09/06/2016 - 09:34 नवीन
तर हे आले लगेच पोच्वायला !!! अगदी अरसिक ब्वा तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आनंद

कपिलमुनी
Tue, 09/06/2016 - 10:54 नवीन
नाखुंचा वाचून ३/४ किमी चालल्याचा आनंद हिरावून घेतला :((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

pcmc मध्ये रात्री 12 नंतर ची

वाल्मिक
Wed, 09/07/2016 - 01:14 नवीन
pcmc मध्ये रात्री 12 नंतर ची पण खाद्य यात्रा कृपया सांगावी
  • Log in or register to post comments

खाद्य यात्रा विचारली म्हणून

गणामास्तर
Wed, 09/07/2016 - 09:43 नवीन
खाद्य यात्रा विचारली म्हणून फक्त तेवढचं सांगतो ;) वरील प्रतिसादात जे 'हॉटेल कराची' सांगितले आहे ते पहाटेपर्यंत चालू असते,अर्थात साडे अकरा नंतर प्रवेश मागील दाराने. निगडी नाक्यावर भुर्जीवाला बराचं वेळ चालू असतो. तसेचं निगडी प्राधिकरणातील 'नायडू' सुद्धा दोनेक पर्यंत चालू असते. तिथे पाव भाजी,कॉफी आणि पुलाव मिळेल. 'फूड ऍट नाईट' म्हणून एक चालू झालेले आहे. फक्त ऑनलाईन ऑर्डरच करायला लागते. रात्रभर सेवा देतात (फक्त जेवण आणून देतात हं ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

रावेत

कपिलमुनी
Wed, 09/07/2016 - 12:34 नवीन
पुण्याहून एक्सप्रेस वे ला वळायाचा आहे तिथे डाव्या बाजूब सँटोसा रीसोर्टच्या बाजूला पंजाबी रसोई आहे . ३ वाजेपर्यंत सर्विस देतो . तिथले इतर लहान ढाबे रात्रभर चालू रहातात पण क्वालीटी भंगार आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

मास्तरबरोबरच एकदा पंजाबी

प्रचेतस
Wed, 09/07/2016 - 12:41 नवीन
मास्तरबरोबरच एकदा पंजाबी रसोईला गेलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नायडू

चाणक्य
Wed, 09/07/2016 - 16:03 नवीन
रात्री साडेबारा नंतर बंद होतय आजकाल. एक म्हणजे डोक्यावरून पाणी. फूड अॅट नाईट ठीक आहे. म्हणजे फार भारी नाही, वेळेला केळं टाईप.पण रात्रभर असते सर्व्हिस ते एक बरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

एवढी सगळी हाटेलं चालतात

बोका-ए-आझम
Wed, 09/07/2016 - 08:31 नवीन
म्हणजे पिंचिकर बहुतेक दररोज बाहेरच जेवत असावेत!;) या धाग्याच्या निमित्ताने प्रचेतस आणि गणामास्तर यांना पिंपरी-चिंचवडचे झोम्याटो हा किताब विभागून देण्यात येत आहे. टाळ्या!
  • Log in or register to post comments

बाहेर कोण कोण जेवायला आलयं,ते बघावं जरा

नाखु
Wed, 09/07/2016 - 08:37 नवीन
बाहेर कोण कोण जेवायला आलयं,ते बघावं जरा(जमल्यास ओळख-पाळख होईल असा सुप्त हेतुही) असू शकतो बोकेशभौ.. चला अता भूमीगत होऊ यात...... भूमीगत नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हाहाहा नाखुनाना गाणं बरं का ;

महासंग्राम
Wed, 09/07/2016 - 10:13 नवीन
हाहाहा नाखुनाना गाणं बरं का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

प्रतीक बिर्याणी

देवांग
Wed, 09/07/2016 - 11:26 नवीन
जुना जकातनाका इथे प्रतीक बिर्याणीमध्ये मस्त बिर्याणी मिळणे ...आणि इथे मिळणार अफगाण तंदूर जबरा आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा