✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

प
प्रचेतस यांनी
Wed, 08/31/2016 - 16:43  ·  लेख
लेख
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच. १. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं. २. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार ३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत. ४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे. मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात. ५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती. ६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस ७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर. ८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे. ९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला. हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38589 वाचन

💬 प्रतिसाद (202)

प्रतिक्रिया

यायचंय हो खरंच.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 22:43 नवीन
यायचंय हो खरंच. अंबरनाथच्या महदेवानं बोलावणं नाही धाडलं अजून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आम्ही मुंबईकरांनी धागा टाकला,

बोका-ए-आझम
Wed, 08/31/2016 - 23:25 नवीन
महाकट्टा केला, दोन्ही धाग्यांना २०० प्रतिसाद घेतले. मुंबई ती मुंबई! बाकीचे नुसती अजरामर जांभई! (चला पळा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 23:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आझम राव जसं पुण्यात नदी

महासंग्राम
गुरुवार, 09/01/2016 - 09:30 नवीन
आझम राव जसं पुण्यात नदी पल्याड पुणे संपते, तसेच खाडीपूल सोडला कि मुंबई सम्पली. तेव्हा म्हाकट्टा नवी मुंबईत झाला होता, मुंबईत नाही (आता पळतो>>>>>> ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तसं पुणं पण मुंबईतच येतं म्हणा!

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/01/2016 - 23:32 नवीन
सर्व नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात तसं. पुणे हे मुंबईचं सर्वात मोठं उपनगर आहे हे माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

देवा आता तुमच्या सारखे लोकं

महासंग्राम
Fri, 09/02/2016 - 09:30 नवीन
देवा आता तुमच्या सारखे लोकं म्हमईत राहतात म्हंटल्यावर पुणेकर येणारच ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अहो मुवी आपल्या ठाण्याच्या

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 09/01/2016 - 10:27 नवीन
अहो मुवी आपल्या ठाण्याच्या कट्ट्याला तुम्ही तिघांनी टांग दिलीच की. मग तुम्ही सुध्दा येणार येणार म्हणता पण येत नाहीत. तलावपाळीचा कौपीनेश्वर साक्षीला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्ही टांग दिलीच की.

मुक्त विहारि
गुरुवार, 09/01/2016 - 13:32 नवीन
द्या...द्या...द्या...आम्हाला घरचा आहेर... पम्या, लेका, अरे बाबा त्यावेळी खरोखरच मह्त्वाचे काम ऐनवळी निघाले. असो, तुझा त्रागा मी समजू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

ठाण्याच्याच कशाला शोरबा,

मृत्युन्जय
गुरुवार, 09/01/2016 - 15:41 नवीन
ठाण्याच्याच कशाला शोरबा, सिंहगड रोड, पुणे या कट्ट्ञाला देखील मुविंनी टांग मारली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

थांबा..थाबा जरा.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/01/2016 - 14:55 नवीन
मी २५ तारखेला येतो आहे पुण्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कधी बी करा

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/01/2016 - 10:22 नवीन
पन आमाले सांगजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मागील पानावरुन पुढे चालू..

गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 20:24 नवीन
मागील पानावरुन पुढे चालू.. मिसळ - नेवाळेची मिसळ बरेचं लोक खाऊ शकत नसले तरी मला ती आवडते. अजिबात तिखट न झेपणाऱ्या लोकांनी त्या वाटेला न गेलेलंच बरं. त्याची बटाटा भजी मात्र अतिउत्तम. त्या क्वालिटीची भजी अजून तरी मी कुठे इतरत्र खाल्ली नाहीत. कवीची मिसळ चवीला बरी असते, ज्यांना बेडेकरची आवडते तसल्या लोकांसाठी.कवी चतुर्थीला उपवासाची मिसळ पण देतो. बाकी वर उल्लेख आल्याप्रमाणे निसर्ग,जनता आणि मयूर सुद्धा उत्तम. अरिहंत गंडलेलं आहे असे माझे मत. भेळ - अन्नपूर्णा च्या चौका अलीकडे 'चौपाटी' मध्ये चाट चांगले आहेत. थंड पाण्याची पाणीपुरी मिळते, चवीला एकदम मस्त. प्राधिकरणात भेळ चौकाच्या थोडेसे पुढे 'ओम शिव स्वादिष्ट' मधली भेळ,पाणीपुरी आणि रगडा पुरी भारी आहे. पावभाजी,पराठे आणि इतर - गीता स्नॅक सेंटर, शर्मा, नायडू आणि पिंगारा हे तिघे निगडी प्राधिकरणात जवळ जवळ आहेत.पावभाजी सगळ्यांकडे चांगली आहे, गीता मध्ये मस्तानी पण चांगली मिळते. शर्मा कडे मटका कुल्फी आवर्जून खावी अशीचं. पिंगारा मध्ये चीज पराठा सुद्धा आवर्जून खावा असाचं तो हि फक्त 70 रुपयांत. भरपूर चीज भरून देतो. आकुर्डी स्टेशन समोरचं बरेचं प्रसिद्ध असे 'शहाजी पराठा' आहे (तेचं ते लक्ष्मी रोड वाले) पराठे, दही भल्ला,लस्सी एकदम कडक. त्याचे दर मात्र लक्ष्मी रोडच्या शाखे पेक्षा इथे बरेचं जास्त आहेत.त्याच्या बाजूलाचं शवर्मा किंग आहे. उत्तम शवर्मा आणि बर्गर बनवतो तो. पिंपरी मधले छाया पराठा सुद्धा चांगले आहे. अतिशय स्वस्त आणि मस्त पराठे. 50-60 रुपयांत व्हेज आणि 90 रुपयांत चिकन, खिमा पराठा मिळतो. सोबत बटर,दही आणि ग्रेव्ही सुद्धा येते. स्वीट मार्ट - जिलेबी साठी गांधी पेठेतील यशवंत. यांच्याकडे बाकरवडी पण छान मिळते. प्रदीप स्वीट्स च्या पिंचि मध्ये भरपूर शाखा आहेत. एकंदरीत सर्वचं पदार्थ उत्तम क्वालिटीचे मिळतात.निगडी चौकातले गोकुळ स्वीट्स मध्ये देशी शुद्ध तुपातली जिलेबी आणि इमरती मिळते, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबजल वगैरे टाकून. जबरदस्त लागते. चखणा आयटम घ्यायचे असतील तर 'बंधन स्वीट्स' शाहूनगर बागेजवळ. एकापेक्षा एक भारी प्रकार मिळतात. पिंचि मध्ये येत नसले तरी एका स्वीट मार्टचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही ते म्हणजे परिहार चौक,औंध इथले 'मिठास'. काय जागा आहे राव. ड्राय फ्रुट बासुंदी, सीताफळ रबडी खावी तर इथेचं. बंगाली मिठाईचे तर इतके प्रकार आहेत कि बास्स. खीर कदम आणि संदेश चे भयानक सुंदर प्रकार मिळतील. ते आवर्जून खावेचं, राहिलचं तर कमल भोग आणि घेवर पण लै भारी. एका भेटीत समाधान होण्यासारखे नाहीचं हे ठिकाण. मला घरापासून साधारण दहा किमी पडते तरी मी या गोष्टींसाठी तिथे बऱ्याचदा जातोचं जातो.
  • Log in or register to post comments

रच्याकने ते यशवंत लै लै जुनं

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 22:59 नवीन
रच्याकने ते यशवंत लै लै जुनं आहे हं. स्थापना १९४१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

आकूर्डी येथे.....

मुक्त विहारि
Wed, 08/31/2016 - 20:51 नवीन
स्टेशनजवळ (मुंबईच्या भाषेत आकूर्डी-वेस्ट.) मद्रासी (की केरळी...कुणी का असेना लुंगीवाले) हॉल समोर, मटण थाळी उत्तम मिळते. मस्त गरमागरम भाकर्‍या आणि हवा तितका तांबडा-पांढरा रस्सा. शिवाय वेटर पण मागे उभा नसतो. स्वगत : च्यामारी टोपी, ह्या गणपतीत आकुर्डीलाच जावे म्हणतो.
  • Log in or register to post comments

हे एक बर झालं

अभिदेश
Wed, 08/31/2016 - 20:56 नवीन
वेगळा धागा काढलात , नाहीतर लोक पिं. चिं. ला पुण्यात धरत होते आणि पुणे खाद्ययात्रेचा धागा हायजॅक करत होते.
  • Log in or register to post comments

पिंपरी क्यांप मधील घनश्याम धाबा येथील

gogglya
Wed, 08/31/2016 - 20:58 नवीन
पाया सूप पण उत्तम असते.
  • Log in or register to post comments

बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज -

गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 21:18 नवीन
बिर्याणी आणि इतर नॉन व्हेज - चिंचवड मध्ये टाटा मोटर्स च्या मेन गेट कडून मटेरियल गेट कडे जाताना डाव्या हाताला 'पथिक' म्हणून हॉटेल लागते. नेहमीच्या बिर्याणी पेक्षा थोडी वेगळी आहे पण चवीला फारचं उत्तम. दम मसाला वगैरे वेगळा सुद्धा आणून देतो. पिंपरी मार्केट ला 'कराची' मध्ये मटन पॅटिस मिळते, त्याचे वर्णन करायला शब्द पुरेसे नाहीत. मटण खिमाचे बनवलेले पॅटिस आणि वरून खिम्याचाचं घातलेला थोडा घट्ट असा रस्सा, सोबतीला कांदा आणि पुदिन्याची चटणी. जबरा चव एकदम. थोडे कळकट हॉटेल आहे परंतु बाहेरून रागरंग बघून परत फिरू नका नाही तर एका चांगल्या अनुभवाला मुकाल. त्याच्याकडे बिर्याणी आणि चिकन नवाबी मस्त मिळते. चिकन नवाबी हा भाजलेले चिकन तुकडे आणि ऑम्लेट एकत्र करून केलेला प्रकार आहे. हिंजवडी मधले हैद्राबाद बिर्याणी बहुतेक लोकांना माहित असेल त्यामुळे त्याबद्दल जास्त लिहीत नाही. हिंजवडी मध्ये मेझा नाईन समोर नवीन चालू झालेले 'मुघल महाल' एकदम सरस. अत्युकृष्ट अशी 'मुघलाई बिर्याणी' बनवणारा पुण्यातला एकमेव माणूस असावा.एक बिर्याणी तिघांना आरामात पुरते. तिथले स्टार्टर जीवघेणे आहेत. चिकन लेग पीस मॅरीनेट वगैरे करून त्याला चिरा देऊन आत मध्ये खिमा भरून भाजला होता. खत्तरनाक प्रकार आहे तो. पिंपळे सौदागर मध्ये कोकणे चौकात 'काबील-ए-तारीफ' आहे. सर्व मुघलाई पदार्थांची चव एकंदरीत छान आहे. तिथे आवर्जून खावे म्हणजे मुर्ग कलमी मसाला आणि मुर्ग मुसल्लम. कलमी मसालात एका डिश मध्ये तीन भाजलेले लेग पीस विथ खिमा मिक्स ग्रेव्ही असे येतात. थोडासा तिखट बनवायला सांगितलं तर उत्तम लागतो हा प्रकार. कोल्हापुरी थाळी खायची असेल तर थरमॅक्स चौकातलं 'राजवर्धन' ब्येष्ट. एकदम परफेकट चवीचा तांबडा आणि पांढरा रस्सा. ना जास्त तिखट ना एकदम फिका.चिकन/मटन मसाला आणि फ्राय सुद्धा चवदार. महत्त्वाचं म्हणजे तो बोकडाचं मटन देतो. नाही तर इकडे बऱ्याचं ठिकाणी बोल्हाई मिळते. बोल्हाई खायचं असेल तर वाल्हेकरवाडीतलं 'समाधान' चांगलं आहे. खेड जवळ 'बंडू भाऊंचा' ढाबा आहे. तिथली मटन भाकरी सुद्धा भारी आहे. तिथे कुठलाही पदार्थ मागवला तरी रस्सा हा बाय डिफॉल्ट अनलिमिटेड आहे. एक पातेलचं आणून ठेवतात समोर. कंदुरी चिकन/मटन खायचं असेल तर विशालनगर कडून हिंजवडी कडे येताना डाव्या हाताला 'मराठवाडा' हॉटेल आहे. तूर्तास इतकेचं. अजून वेळ मिळेल तशी भर घालतो.
  • Log in or register to post comments

गणा, गणा, अरे गणा, मला

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 21:42 नवीन
गणा, गणा, अरे गणा, मला भेटल्यावर त्यावेळी तुझे हे ज्ञान कुठे तांबडा पांढरा वरपायला गेलते रे दुश्टा. तू पन्नास रावाच्या बैठकीतील हायस राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

तू लगा अचानक उगवणार रात्रि

गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 22:41 नवीन
तू लगा अचानक उगवणार रात्रि अपरात्री मग काय करणार. पुढच्या टायमाला लवकर येणे करावे जेणेकरून आपल्याला "साग्रसंगीत कार्यक्रम" करता येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

व्हय महाराजा.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 22:45 नवीन
व्हय महाराजा, आपण आमच्या गावी येऊन दिलेली टांग लक्षात आहे पण कौटुंबिक कारणासारख्या नाजूक बहाण्याला माफ केलेलं आहे. नेक्स्ट टाईम पींची कट्टा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

पक्षीदरीत का? :)

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 22:46 नवीन
पक्षीदरीत का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नको, ते बोगस आहे. वरून झगमग न

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 22:58 नवीन
नको, ते बोगस आहे. वरून झगमग न आतून भगभग आहे. साधं हुडका पण चवीला भारी हुडका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ए टांग बिंग दिली नव्हती बे.

गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 22:59 नवीन
ए टांग बिंग दिली नव्हती बे. स्पष्ट सांगून गेलतो तसं. ते जाउदे तू ये आता इकडं. गेल्या वेळी अभक्ष्य भक्षण चालणारे/न चालणारे आणि ईतर बरेचं वर्गीकरण करून सर्वांच्या सोयीचे ठिकाण ठरवले होते. यावेळी आपल्या टाइपचा स्पेशल कट्टा करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मास्तरांच्या सामिष व्यासंगास

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 08:18 नवीन
मास्तरांच्या सामिष व्यासंगास आमचा साष्टांग दंडवत! तळेगाव हॉस्टेलला parasite राहत असताना दारू प्यायला अन मटण खायला तळेगाव ते भक्तीशक्ती (पुणे गेट हॉटेल) बोंबलत यायचे (ते ही थंडीच्या दिवसात बाईकवर) दिवस आठवले! मास्तर 1. पदमजी पेपरमिल समोर आदित्य बिर्ला कडून डांगे चौक जाताना डाव्या बाजूला एक नवे जंगी कोल्हापुरी हॉटेल उघडले होते म्हणे, ते कसे आहे? 2. नाशिक फाट्याजवळ कुठंतरी एक अप्रतिम अहमदनगरी मटण अन "मटण अळणी" देणारे हॉटेल आहे म्हणतात,ह्या दोन्ही बद्दल जमल्यास सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

नाशीक फाट्याजवळचं

नाखु
गुरुवार, 09/01/2016 - 09:19 नवीन
नाशीक फाट्याजवळचं (ते नंतर ऊड्डाण पोलाच्या रस्ता रुंदीत ऊडालं अता पुढे कुठेतरी आतल्या बाजूला आहे (कासारवाडीला) खेडशिवापुरनंतर गरमागरम तांदळाची/ज्वारीची भाकरी इथेच खाल्ली आहे, मी अट्टल शाकाहारी असल्याने इथे गेल्यावर झुणका/मसूराची उसळ्/वाटाण्याची आमटीची चव चाखली आहे.माहोल अगदी एखाद्या टपरी वजा (ष्टांण्दाशेजारच्या हाटेलाचा) पण चटणी भाकरी आणि बर्याचदा दहीकांदा एकदम फर्मास त्याच्याकडे एकदा हुलग्याचे शेंगोळेही खाल्ले आहेत. आधिच्या कंपनीत गणामास्तरसारखा अस्सल खवय्या (बाहेरून झकपक नाही तर अट्टल चवीची ठिकाणे शोधणारा) मित्र होता त्याच्या बरोबर सगळ्या समीष हाटेलास भेटी दिल्या आहेत. साध्या खोपटात असलेले हटेल एम्पायर ईष्टेटच्या जवळाच्या पंपाजवळ हे मांसाहारी हाटेल आणि मारुतीराया मंदीरात जवळ जवळ होते. रस्ता रुंदीत मारुतीराया ऊड्डाण रस्त्या पलीकडे गेले आणि हे हाटेल शाहुनगरला केसएबीपासून्च्या रस्त्यावर गेले. हाटेल्चे नाव जगुबाई शाकाहारींसाठी सावलीही चांगले ठिकाण आहे तसेच रसोईसे (मुलांना जास्ती आवडले) पेशवाई ठीक ठाक (म्हणजे मी शाकाहारी असल्याने समिष वाल्यांना चवदार वाटत असावे ,बरीच गर्दी दिसली म्हणून अंदाज) पिंगारा ९जे पुर्वी आकुर्डी ह्चौकातून प्राधिकरणात गेले तेही ठीक्ठाक्च वाटले त्याच्या शेजारी असलेले अतिथी चांगले होते. जयश्री मिसळ (बजाज टेंपोसमोर) चवीला चांगली आहे पण आधीच तयार करून ठेवत असल्याने चिखल-अनुभव येतो. मयुरला तोड नाही पण पिंपरीतील जनता आणि निसर्गही आप्ला आब राखून आहेत. किर्स्पी भज्यांसाठी चिंचव्ड एम आय डीसी हाफीसमोरचा परदेशीचा गाडा मस्त्,त्याच्याच बाजूला दोन स्वीट मार्ट आहेत एकात हातपापडी चांगली मिळते,जवळच असलेले शीतल एके काळी जबरा होते मध्यंतरी मालक खांदेपालट झाल्यावर रया गेली होती,अता जरा पुर्वपदावर येत आहे. स्टेशनच्या मल्हारचा बाजार उठला पण त्या पुर्वी जवळचे भागयश्री डाय्नीम्ग हॉल चांगले होते,माल्काला जागा वाढ्वायची (कु)बुद्धी झाली आणि जागा वाढली आणि गुणवत्ता घटली नंतर बंदच झाले. लस्सी साठी दोन्ही बहिरवाडे चांगले एक बँकेसमोर आणि दुस्र्या पो स्टेशनच्या पिछाडीला. पण अस्सल भज्यांसाठी जयश्री थिअएटराचा बाहेर एक गाडी लावीत असे (अता लावतात का ते माहीत नाही) पुर्वी कंपनीतून चालत जायच्या अंतरावर असल्याने सायंकाळी भजी अग्निहोत्र व्हायचेच. वाल्हेकरवाडी रस्त्याला बरीच हाटेले आहेत सगळीच्या सगळी समिष असल्याने कधी जेवायला गेलो नाही,फक्त एक्दा रानमळ्यात मुनीवर,मोदक आणि सौरभला भेटायला गेलो होतो. चाकणची मल्हार मिसळची घराजवळच्या चौकात नवीन शाखा उघडली आहे कशी आहे माहीत नाही (पण गर्दी अस्ते,पिंचिंमिपाकरांबरोबर एक्दा चाखून पाहू यात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नाशिक फाट्याचे हे तर..

विनटूविन
गुरुवार, 09/01/2016 - 09:43 नवीन
द मराठा, आता फ्लायओव्हर क्रॉस करून पिंपळे गुरवकडे गेले की लागते. इथे सुकी मेथी भाजी, पिठले, भाकरी, काळ्या तूराची उसळ इ. मराठी आयटम छान मिळतात. थोडे पंजाबी (जिरा राईस) वैगरे कॉम्बो करून मस्त जेवण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

'द मराठा' प्युअर व्हेज आहे हो

गणामास्तर
गुरुवार, 09/01/2016 - 09:48 नवीन
'द मराठा' प्युअर व्हेज आहे हो. बापू मटणा बद्दल विचारत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन

नाशीक फाट्याजवळचं

नाखु
गुरुवार, 09/01/2016 - 10:23 नवीन
हॉटेलच नाव महाराष्ट्र खानावळ असेच होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

मला कसला दंडवत घालताय बाप्पू

गणामास्तर
गुरुवार, 09/01/2016 - 09:46 नवीन
मला कसला दंडवत घालताय बाप्पू ! सामिष खायचं म्हणलं कि आम्हाला हाटेलं धुंडाळणं भाग आहे. 'पुणे गेट' सुरुवातीच्या दिवसात चांगलं होतं पण आता बरचं बिघडलंय. त्याच्या मागेच ट्रान्सपोर्ट नगर मध्ये 'जगुबाई मटण खानावळ' आहे. तिथे गेला असतात तर कधी फिरून पुणे गेट ला गेला नसतात. तीर्थ मिळत नाही तिथे पण ट्रान्सपोर्ट वाल्यांचा एरिया असल्यामुळे आजूबाजूला ढिगानी पर्याय उपलब्ध आहेत. पदमजी पेपर मिल जवळचे तुम्ही म्हणताय ते 'पुरेपूर कोल्हापूर'. कोल्हापूरच्या नावानी निघालेल्या इतर बऱ्याच ठिकाणांसारखे हे पण गंडलेले आहे. नाशिक फाट्या जवळ कुठले म्हणताय ते शिल्पा गावरान आहे. 'मटण अळणी" भारीचं आहे तिथले शिवाय तिखट रस्सा वाटी पण एकदम झकास. 'बसणाऱ्या' लोकांसाठी खास जागा आहे ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मास्तर

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/01/2016 - 10:27 नवीन
शिल्पा गावरान लै ऐकुन आहे. जावच म्ह्णतोय एक्दा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

गणामास्तर

चाणक्य
गुरुवार, 09/01/2016 - 21:52 नवीन
पदमजी जवळ आहे ते पुरेपुर कोल्हापूर नव्हे. 'लई भारी कोल्हापुरी' आहे. बाकी ते गंडलंय याच्याशी बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

पुरेपूर कोल्हापूर

बोका-ए-आझम
Sat, 09/03/2016 - 18:04 नवीन
दादरचं पण धन्यवाद आहे. पैसे वाया! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

मटण थाळी ...

अमरप्रेम
गुरुवार, 09/01/2016 - 16:15 नवीन
मोरवाडी चौकातून जवळच कोर्टाकडे जानाऱ्या रोडवर डाव्या हाताला 'जय मल्हार' मध्ये मस्त मटण-भाकरी थाळी मिळते. तिखटाशी ज्यांच जुळत नाही अश्यांनी विचारही करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

मस्त धागा

आजानुकर्ण
Wed, 08/31/2016 - 21:20 नवीन
जरा ठिकाणाच्या जवळपासच्या खुणाही सांगा. नुसतं अरिहंत म्हटल्यावर काय कळणार? आमचे मित्र मनोबा यांनी मोरया गोसावी मंदिरासमोर थालीपीठ खायला घातले होते. आम्ही गेल्यावर पीठ थापून केलेले गरमागरम थालीपीठ एकदम मस्त. (पिंचिंकर) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

अरिहंत म्हणजे मोरया

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 22:39 नवीन
अरिहंत म्हणजे मोरया हॉस्पिटलजवळ. केशवनगर काळेवाडी रोडच्या जस्ट सुरुवातीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अरिहंत हि बकवास जागा आहे

देवांग
Wed, 09/07/2016 - 11:35 नवीन
अरिहंत हि बकवास जागा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरिहंतची सांगली भेळ खूप छान

प्रचेतस
Wed, 09/07/2016 - 11:38 नवीन
अरिहंतची सांगली भेळ खूप छान मिळते. पोहे, उप्पीट पण छान आहेत. मिसळ थोडीशी गंडलेली आहे मात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवांग

सागर भेळ

देवांग
Wed, 09/07/2016 - 14:23 नवीन
तुम्ही बिजलीनगर (गिरीराज जवळ) येथे असलेल्या राजश्री शाहू उद्यान समोर "सागर भेळ" खाऊन बघा ...एक्दम झकास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज

गणामास्तर
Wed, 09/07/2016 - 14:37 नवीन
तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज शेजारी ओल्या नारळाच्या करंज्या मिळतात. कधीही जा गरमचं मिळतील. ते चितळे वगैरे स्वीटमार्ट वाल्यांना वर्षभर पुरवतात. डायरेक्ट तिथून घेतल्या तर बऱ्याचं स्वस्त पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवांग

हायला. जाउयात.

प्रचेतस
Wed, 09/07/2016 - 14:38 नवीन
हायला. जाउयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

जाऊ कि. मी कालचं आणल्या

गणामास्तर
Wed, 09/07/2016 - 14:40 नवीन
जाऊ कि. मी कालचं आणल्या किलोभर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भारीच.

प्रचेतस
Wed, 09/07/2016 - 14:43 नवीन
भारीच. तिथेच जरा अलीकडे प्रेमलोक पार्कच्या चौकात पेण समोसेवाला होता. घरगुती बनवलेले सामोसे एकदम चवदार होते. हल्ली त्याची गाडी कुठे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज

गणामास्तर
Wed, 09/07/2016 - 14:38 नवीन
तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज शेजारी ओल्या नारळाच्या करंज्या मिळतात. कधीही जा गरमचं मिळतील. ते चितळे वगैरे स्वीटमार्ट वाल्यांना वर्षभर पुरवतात. डायरेक्ट तिथून घेतल्या तर बऱ्याचं स्वस्त पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवांग

सांगवीत हाॅटेल जलसा

सत्याचे प्रयोग
Wed, 08/31/2016 - 21:41 नवीन
सांगवीत शितोळे चौकातील हाॅटेल जलसा मध्ये बिर्याणी मिळते प्रत साधारण असते पण भरपूर असते बर्‍याच वेळा संपूर्ण खाल्ली जात नाही.
  • Log in or register to post comments

वरील सर्व ठिकाणी मिपाकट्टा

औरंगजेब
Wed, 08/31/2016 - 22:08 नवीन
वरील सर्व ठिकाणी मिपाकट्टा करुया :-)
  • Log in or register to post comments

गोमंतक

कपिलमुनी
Wed, 08/31/2016 - 22:10 नवीन
जुन्या सांगवी मधे आला की बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत वळायचे तिथे छोटासा हॉटेल गोमंतक आहे . तिथे मासे चांगले मिळतात.अनलिमिटेड रस्सा आहे.
  • Log in or register to post comments

मुनिवर, अन्नपूर्णा हॉटेल च्या

गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 23:20 नवीन
मुनिवर, अन्नपूर्णा हॉटेल च्या चौकात 'मालवण समुद्र' आहे तिथे पण मासे चांगले मिळतात. कोलंबी भात तर अफलातून एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मालवण समुद्रने आता

विनटूविन
गुरुवार, 09/01/2016 - 09:49 नवीन
चव, पर्यायाने नाव आणि इज्जत घालवलेली आहे. शिळे आणि अती तळलेले मासे खाऊन लोक बोअर झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

+१

कपिलमुनी
गुरुवार, 09/01/2016 - 13:23 नवीन
मालवण समुद्र अतिशय वाइट आहे . शिळे मासे असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन

व्हेज थाळी ?

कपिलमुनी
Wed, 08/31/2016 - 22:11 नवीन
सुकांता , बादशाही सारखी थाळी पिंचि मधे कुठे मिळते?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा