✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हिशेब

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 09/01/2016 - 11:52  ·  लेख
लेख
हिशेब मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो. बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे. घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर? (सत्यकथा नावे बदलून)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
61336 वाचन

💬 प्रतिसाद (291)

प्रतिक्रिया

चौराकाका, तुम्ही का अचानक

संदीप डांगे
गुरुवार, 09/01/2016 - 19:11 नवीन
चौराकाका, तुम्ही का अचानक पेन्शनरांसारखे बोलायला लागलात...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ह्या धाग्याचं द्विशतक झालं की

सूड
गुरुवार, 09/01/2016 - 19:12 नवीन
ह्या धाग्याचं द्विशतक झालं की पेढे वाटायचा संकल्प एका मिपाकराने कायप्पावर केला आहे. तेव्हा बाकी काही होवो न होवो धाग्याचं द्विशतक लवकर करा ब्वा!!
  • Log in or register to post comments

लो एम इज क्राईम! किमान चारशे

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 19:13 नवीन
लो एम इज क्राईम! किमान चारशे म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दोनशेच्या पुढे किती का होईना!

सूड
गुरुवार, 09/01/2016 - 19:15 नवीन
दोनशेच्या पुढे किती का होईना!! पण खरंय, डोक्यावरुन पाणी चारशे तरी पायजेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओ, अर्धे पेढे माझ्यासाठी

संदीप डांगे
गुरुवार, 09/01/2016 - 19:40 नवीन
ओ, अर्धे पेढे माझ्यासाठी वेगळे काढून ठेवा.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पेढ्यांच्या आधी दिग्गज

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 19:39 नवीन
पेढ्यांच्या आधी दिग्गज अनाहितांस कौल लावा! अनायसे ज्येष्ठागौरी बसल्याच आहेत श्रावणातल्या, तेव्हा लावून टाकायला हवा कौल! अनाहितांस कौल लावल्याशिवाय काय धागा तरत नाय बा ।।सत्वर पाव ग अनाहिता ताई मला, कॉमेंट वाहीन तुला।। टीप :- ही एक हलकीफुलकी कॉमेंट आहे तरी कृपाया माझ्या तायांनो, माझी पिसे काढू नका ही नम्र विनंती, नाहीतर पेढ्याबर मला बी गिळाल कच्चा! अनाहितांचा(च) सालस , गोंडस भाऊ बापुल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बापुल्या!

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 19:43 नवीन
बापुल्या!
=)) बापरे!! मी हसुन हसुन मेले!! टक्कु मक्कु शोनु नंतर बापुल्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ओ ताय, मी वेगळा भाऊ हाय!

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 20:13 नवीन
ओ ताय, मी वेगळा भाऊ हाय! टक्कू मक्कू शोनू आमचा मित्र नाहीये! कारण त्याला बुलेट आवडत नाही ना!! =)) , मोदक ला आवडते, मोदक जव्हेरभाऊंच्या पक्या सारखा ग्रामपंचायतीपुढे बुलेट वर बसला होता मी तिथे गेलो तर म्हणाला तुला पण बुलेट आवडते का? मी म्हणले हे तर थोरच आहे! तेव्हापासून आम्ही मित्र आहोत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

लोल.. बापू ____/\___

स्रुजा
गुरुवार, 09/01/2016 - 20:29 नवीन
लोल.. बापू ____/\___ काय बोलायचं या धाग्यावर ?? डांगे अण्णा आणि पिरा ला आपलं स्टँडिंग मम म्हणुन ठेवते. एक साधासा उद्गार तो काय ! आणि किती तो खल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आणि हो, मिपाबायका म्हणा ब्वॉ

स्रुजा
गुरुवार, 09/01/2016 - 20:30 नवीन
आणि हो, मिपाबायका म्हणा ब्वॉ ! अनाहिता इज सो लास्ट ईअर यु नो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

करेक्ट!! मिपाबायका!

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 20:32 नवीन
करेक्ट!! मिपाबायका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ते मिपाबायका अजरामर आहे! माझं

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 20:39 नवीन
ते मिपाबायका अजरामर आहे! माझं खापरपतवंड जेव्हा मिपावर उलथेल तेव्हाही तेच उपयोगात राहणार आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

देवा!!

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 09/02/2016 - 15:38 नवीन
लैच जबरदस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ओ सुडराव शतक झालं!! कबूल

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 20:28 नवीन
ओ सुडराव शतक झालं!! कबूल केल्याच्या अर्धे पेढे तरी खरेदी करा आता म्हणे मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कबूल केल्याच्या अर्धे पेढे

सूड
गुरुवार, 09/01/2016 - 21:06 नवीन
कबूल केल्याच्या अर्धे पेढे तरी खरेदी करा आता म्हणे मी
छे हो पुण्यात राहायला आल्यापासनं पेढे वैगरेंसारख्या गोष्टी स्वत: खरेदी करणं म्हणजे महापाप!! एका मिपामित्राने कबूल केलेन. मज मिळाले की आपणासही देईन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

धोका देण्याच्या ह्या प्रकारचे

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:09 नवीन
धोका देण्याच्या ह्या प्रकारचे वर्णन करायला एक अतिशय ग्राम्य म्हण आहे हिंदी भाषेत, कशीबशी आवरलेली आहे ती आता, भावना तुम्ही समजलेच असाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सर्वात जलद शतक मारणार हा धागा

अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/01/2016 - 19:44 नवीन
सर्वात जलद शतक मारणार हा धागा. खरे साहेबांचा शनिवार वाड्यावर सत्कार करूया. बाकी पेठकर साहेबांचा प्रतिसाद उत्तम.
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो, तुम्ही तिला

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/01/2016 - 20:17 नवीन
मी काय म्हणतो, तुम्ही तिला स्पष्टच का विचारलं नाहीत? की कागं, बापाने जी कामं करणं अपेक्षितच आहे त्याला तू ड्यूटी का म्हणतेस? ती तू त्याला लावून दिलेली आहेस की त्याने प्रेमाने अंगावर घेतलेली आहे? अजूनही तुम्ही जर हे प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं इथे दिलीत तर मिपाकरांचे चर्चाकष्ट वाचतील. असं अर्धवट माहिती असलेलं लेखन केल्याने या आणि आधीच्या लेखातून 'स्त्रिया स्वार्थी असतात, स्वातंत्र्याचा उपभोग घेतात, मजा मारतात आणि काही जबाबदाऱ्या घेत नाहीत' असे तुमचे विचार असल्याचा भास होऊ शकतो. तुमची प्रतिमा 'किंचित स्त्रीद्वेष्टी व्यक्ती' अशी झालेली तुम्हाला चालेल का?
  • Log in or register to post comments

जालावरील प्रतिमा आभासी असतात

सुबोध खरे
गुरुवार, 09/01/2016 - 20:26 नवीन
जालावरील प्रतिमा आभासी असतात आणि लोकांची माझ्याबद्दल प्रत्यक्ष जगात काय प्रतिमा आहे याचा मला शष्प फरक पडत नाही. माझ्या बायकोचे नाव लग्नानंतर मी बदलले आणि "तिच्याच " आवडीचे ठेवले आहे. ( तिला तिचे पहिले नाव आवडत नव्हते) याबद्दल माझ्या लष्करी वर्गमित्रांनी मला mcp म्हटले होते.मुलीचे नाव हि तिची ओळख आहे इ इ. मी याचे स्पष्टीकरण कुणालाही देण्याच्या फंदात पडलो नाही. तेंव्हाही नाही आणि आजही माझा एक मित्र तिला आवर्जून लग्नाच्या अगोदरच्या नावाने हाक मारतो. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अहो सर अश्याने आढ्य म्हणतील

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 20:42 नवीन
अहो सर अश्याने आढ्य म्हणतील लोक मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अहो म्हणतातच सानू की?

सुबोध खरे
गुरुवार, 09/01/2016 - 21:32 नवीन
अहो म्हणतातच सानू की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नाय बा मला काय नाय, तुम्हाला

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:34 नवीन
नाय बा मला काय नाय, तुम्हाला चालतंय म्हणल्यावर आम्ही काय बोलणार, वेन्जॉय! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बापूसाहेब

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 11:45 नवीन
बापूसाहेब "सानू कि" म्हणजे मला काय ?( घेणं देणं) "त्वा नू कि" म्हणजे तुम्हाला काय करायचंय. मी "सानू कि" विचारलं गैरसमज नसावा म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बरे या बायकांना त्यांच ऐकणारे

कायरा
गुरुवार, 09/01/2016 - 20:29 नवीन
बरे या बायकांना त्यांच ऐकणारे नवरे मिळतात. सगळ्या बायका एवढ्या भाग्यवान नसतात.
  • Log in or register to post comments

हा खरा प्रतिसाद आहे!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 20:30 नवीन
हा खरा प्रतिसाद आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा

फुल२ काडी प्रतिसाद आहे..

स्रुजा
गुरुवार, 09/01/2016 - 20:32 नवीन
फुल२ काडी प्रतिसाद आहे.. मानलं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा

अरे मी नक्की कोणाला द्यायचेत

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 20:44 नवीन
अरे मी नक्की कोणाला द्यायचेत पेढेssssssss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

सावधान

मिसळ
गुरुवार, 09/01/2016 - 21:25 नवीन
हे असे बायकोचे ऐकणारे नवरे बाहेर 'खाली मुंडी आणि पाताळ धुंडी' असतात. त्यांचं मेल्यांच काय कौतुक सांगू नका. आणि ३-३ मोलकरणींच काय मेलं ते ऐवढं, सगळं आवरावं लागत शेवटी त्या घरातल्या स्त्रीलाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कायरा

बाहेर पडल्यावर बायको म्हणाली

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/01/2016 - 20:53 नवीन
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
डॉक्टरसाहेब, जर दोघांनी एकमेकांच्या संमतीने अशी विभागणी मान्य केली असेल तर त्रयस्थाने त्यावर फार विचार करण्याची गरज नाही. माझ्या माहितीतील ३ उदाहरणे देतो. १) नवरा व बायको दोघेही ५० च्या पुढचे आहेत. ते पुण्यातील आहेत. त्यांना एकच मुलगा आहे. तो अमेरिकेत आहे. त्याचे ४-५ वर्षांपूर्वी लग्न झाले. नवरा सौदीत काम करतो. बायको बॅकेत काम करते व मुंबईतील एका शाखेत व्यवस्थापक आहे. मुलगा व सून अमेरिकेत असले तरी दोघेही वेगवेगळ्या शहरात आहेत व दोन्ही शहरे एकमेकांपासून बरीच दूर आहेत. या पुण्यातील कुटुंबातील सर्व चार जण पुण्यात नसून प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी एकटा आहे. पण त्या सर्वांनीच ही परिस्थिती स्वतःहून स्वीकारलेली आहे. आम्हाला ही परिस्थिती विचित्र वाटते, पण हे त्या सर्वांना मान्य आहे. २) ओएनजीसीत समुद्रात कायमस्वरूपी असणार्‍या जहाजावर एक केटरर होता. वर्षातील बरेच महिने तो जहाजावर असायचा. काही दिवस रजा घेऊन तो घरी यायचा. त्याची बायको व दोन्ही मुले व घर मुंबईत आहे. त्याने जहाजावर अनेक वर्षे काम केले. ते काम सोडल्यावर गुजरातमधील एका पर्यटनस्थळावरील एका हॉटेलात त्याने केटरिंगचे काम स्वीकारून वर्षातील बराच काळ तो तिथेच असतो. बायको मुंबईत काम करते व शिकणारा मुलगा तिच्याबरोबर असतो. मुलगी पदवीधर असून दुबईत काम करते. कुटुंबातील ४ सदस्य ३ वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्याच्या सांगण्यानुसार तो जेव्हा सुटी घेऊन मुंबईत घरी परत जातो तेव्हा त्याच्यात व बायकोत औपचारिक संभाषण असते. नवरा लग्नापासून बहुसंख्य काळ घरापासून लांबच असल्याने तिने स्वतःचा ग्रुप व स्वतःची वेळ घालविण्याची साधने शोधली आहेत. त्यामुळे तो घरी परत आला तरी त्यांच्यात फारसा संवाद नसतो. परंतु त्या सर्वांनी हे स्वतःहून स्वीकारले आहे. ३) वयाच्या २५ व्या वर्षापासून मर्चंट नेव्हीत काम करणारा एक जण मला माहित आहे. तो वर्षातील ७-८ महिने जहाजावर असतो व उर्वरीत ३-४ महिने घरी असतो. सध्या त्याचे वय ५० आहे. त्याला २ टीन एजर्स मुले आहेत. मुलगी १६-१७ वर्षाची असून मुलगा १३-१४ वर्षांचा आहे. १-२ वर्षापूर्वी दुर्दैवाने त्याची बायको कर्करोगाने वारली. मर्चंट नेव्हीत काम केले असल्याने भरपूर पैसे जमा केले आहेत. आम्हाला सर्वांना वाटले की बायको गेल्यावर तो नोकरी सोडून मुलांसाठी घरी थांबेल कारण टीन एजर्स मुलांना आई नसताना निदान वडीलांचा आधार मिळाला असता. पण या पठ्ठ्याने आपल्या सासूसासर्‍यांना मुलांकडे बघण्यासाठी घरी आणून ठेवले आहे (त्याचे स्वतःचे आईवडील पूर्वीच गेलेले आहेत) व त्याने आपला जहाजावरील जॉब सुरू ठेवला आहे. मुलांना आई नसताना वडीलांची आत्यंतिक गरज असताना हा मात्र नोकरी सोडायला तयार नाही. परंतु त्या सर्वांनी ही परिस्थिती मान्य केली आहे. आपल्याला त्यांचे वागणे कितीही अयोग्य वाटले तरी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो व तो त्यांच्या दृष्टीने बरोबरच असतो. आपण त्याबाबतीत काहीही करू शकत नाही.
  • Log in or register to post comments

काय कंसिस्टीणसी आहे राव =)) ,

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:41 नवीन
काय कंसिस्टीणसी आहे राव =)) , "ड्युटी" ह्या एकम शब्दोद्भव धाग्यावरही गुर्जी चक्क मेगाबायटी बोलून गेले देवा! लोकं धाग्यावर चार पैसे किंवा बजेट नुसार 2 पैसे देऊन जातात, गुर्जी खाणकन बंदा रुपयाच आपटून जातात बघा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जर दोघांनी एकमेकांच्या

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 11:52 नवीन
जर दोघांनी एकमेकांच्या संमतीने अशी विभागणी मान्य केली असेल तर त्रयस्थाने त्यावर फार विचार करण्याची गरज नाही गुरुजी हे मान्य आहेच. परंतु नवरा पाच दिवस नोकरी करतो आणि बायको पाच दिवस मुलीला सांभाळते मग दोन दिवस नवरा मुलीला सांभाळत असेल तर ते दोन दिवस बायकोने त्याचे काम करावे कि नाही. म्हणजे नवऱ्याने पाच दिवस नोकरी करायची आणि दोन दिवस पूर्णपणे मुलीला सांभाळायचे आणि बायकोने पाच दिवस मुलीला सांभाळायचे आणि दोन दिवस कम्प्लिट आराम? हे कुठेतरी खटकलं. खाली म्हटल्याप्रामण बायकोला आठवड्यात काही वेळ पूर्ण पणे स्वतःसाठी हवा असेल तर ते हि मान्य पण त्याचा "हिशेब" होऊ नये असे वाटते. कदाचित आमची विचारसरणी जुनी/ जुनाट झाली असेही असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरं, मग काय ठरलं शेवटी?

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/01/2016 - 20:56 नवीन
बाकी लोकांना दुस-याच्या घरात नाक खुपसायची आवड असतेच हे अगदी आंतरजालावरही सिद्ध करणारा धागा आहे. जगात इतके बाकीचे आणि महत्त्वाचे विषय आहेत. पण जरा नवरा-बायकोच्या relationship वर धागा आला तर समस्त पब्लिक त्याच्यावरच घोंघावतंय.
  • Log in or register to post comments

मी पेढे मिळायच्या आशेने आलो

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:04 नवीन
मी पेढे मिळायच्या आशेने आलो शपथ सांगतो ! डोक्यावर रिंगण असणारी परी वाली स्मायली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी वेळ काढायला आले होते..

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/01/2016 - 21:10 नवीन
मी वेळ काढायला आले होते.. पेढ्यांच नाव निघालं म्हणून थांबलेय.. आमची ती जांभळी, शिंग असलेली आणि हीहॉहॉ टाईप हसणारी स्मायली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

त्या जांभळ्या स्मायलीचं

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/01/2016 - 21:16 नवीन
त्या जांभळ्या स्मायलीचं नामकरण "पाताळविजयम स्मायली" करायला हवे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मला पण पेढे देणार कबूल केलेन

सूड
गुरुवार, 09/01/2016 - 22:37 नवीन
मला पण पेढे देणार कबूल केलेन म्हणून चार प्रतिसाद दिले हो!! सवाशे झालेत आता तांबड्या जोगेश्वरीच्या कृपेने लवकर उरलेले पंच्याहत्तर व्हावेत, याहून मागणं लई नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बोका शेटबाकी लोकांना दुस

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 11:54 नवीन
बोका शेट बाकी लोकांना दुस-याच्या घरात नाक खुपसायची आवड असतेच हे अगदी आंतरजालावरही सिद्ध करणारा धागा आहे. हेच तर कारण आहे कि इतक्या कचकोळ धारावाहिक असतानाही सगळ्या चालतात. लोकांना स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त "रस" असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुम्ही स्वतः दुसर्‍याबद्दल

पिलीयन रायडर
Fri, 09/02/2016 - 18:35 नवीन
तुम्ही स्वतः दुसर्‍याबद्दल धागा टाकुन लोकांना काय टॉण्ट मारताय?! कमाल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हो ना !! + १११११

स्रुजा
Fri, 09/02/2016 - 20:56 नवीन
हो ना !! + १११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अहो लोकांत तुम्ही मी सगळेच

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 21:02 नवीन
अहो लोकांत तुम्ही मी सगळेच आलो ना ? मी धागा टाकला आणि तुम्ही प्रतिसाद दिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अहो पण तुम्हाला जर हे बरोबर

पिलीयन रायडर
Fri, 09/02/2016 - 21:23 नवीन
अहो पण तुम्हाला जर हे बरोबर वाटत नाही तर मुळात धागा काढलाच कशाला? धागा काढुन वर अशी चर्चा करणं चुक आहे असं तुम्हीच कसं काय म्हणताय? आणि त्यात आम्हालाही ओढताय? आणि हे असं करणं चुक आहे हेच सांगायला आम्ही प्रतिसाद देतोय, अर्धवट माहितीवर तिर्‍हाईंताबद्दल चवीचवीनी चर्चा करायला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला वाटते इथून पुढे मिपावर

अभिजीत अवलिया
Fri, 09/02/2016 - 21:31 नवीन
मला वाटते इथून पुढे मिपावर तिऱ्हाईत व्यक्तीबद्दल चर्चा करणाऱ्या धाग्यांना बंदी असावी. कुणाच्या खाजगी आयुष्याबद्दल अशा सार्वजनिक ठिकाणी चर्चा करण्याचा हक्क कुणालाच असू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

लोकांना स्वतःच्या पेक्षा

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 21:34 नवीन
लोकांना स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त "रस" असतो. यात "तुम्हाला जर हे बरोबर वाटत नाही" हे कुठे आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अच्छा म्हणजे तुम्ही धागा

पिलीयन रायडर
Fri, 09/02/2016 - 22:07 नवीन
अच्छा म्हणजे तुम्ही धागा काढुन वर बोकाभाऊंशी "लोकांना दुसर्‍यांच्या भनगडीत नाक खुपसायची आवड असते" ह्याला सहमत होऊन परत वर "तुम्ही आणि मी सुद्धा आलोच लोकांमध्ये" असं म्हणुन आता "मला हे बरोबर वाटत नाही असं कुठे म्हणलो" असं विचारताय.. म्हणजे लोकांच्या भानगडीत नाक खुपसणे चुक नाही असे तुम्हाला वाटते तर... कारण हा धागा त्याचेच उदाहरण आहे.. काका, उगाच खुसपट काढायचे म्हणुन नाही तर वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे तुम्ही असे धागे काढण्याचं फार आश्चर्य वाटत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

यात कुणाचीही भानगड नाही की

सुबोध खरे
Fri, 09/02/2016 - 23:50 नवीन
यात कुणाचीही भानगड नाही की कुणी त्यात नाक खुपसत नाही. आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. बरोबर की चूक हे ज्याच्या त्याच्या बुद्धी प्रमाणे ज्याने त्याने ठरवायचे आहे. कुणाचेही नाव न घेता एक जेनेरिक गोष्टसांगितली आहे. गमतीत लिहीले तर त्याचा उलटा अर्थ काढाल असे वाटले नव्हते. आसो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आजकालच्या काही मुलींची

स्रुजा
Fri, 09/02/2016 - 23:54 नवीन
आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
मला तरी या धाग्यात काही पुरुषांची च मानसिकता दिसतीये, आणि मी ताकाला जाऊन भांडं लपवत नाही त्यामुळे ती मला चुकीची वाटते आहे हे सरळ सांगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जरा उलगडून सांगाल काय ?

सुबोध खरे
Sat, 09/03/2016 - 00:06 नवीन
जरा उलगडून सांगाल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

फक्त पुरषांची मानसिकता दिसते?

खटपट्या
Sat, 09/03/2016 - 00:10 नवीन
फक्त पुरषांची मानसिकता दिसते? ती मुलगी हक्काने नवर्‍याकडून काम करवून घेते दे दीसत नाही का? आणि तीचा अविर्भाव असा आहे की "आठवड्यातून दोन दीवस केलेच पाहीजे असा आहे" अशी ऑफीससारखी कामे वाटून घेतल्यावर काय मजा त्या संसारात? काँट्रॅक्ट आहे की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अहो खटपट्या भाऊ, धाग्यात

स्रुजा
Sat, 09/03/2016 - 00:15 नवीन
अहो खटपट्या भाऊ, धाग्यात दिसतीये, प्रतिसादांत नाही. आणि सांगते उलगडुन @ खरे काका, थोड्यावेळाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अहो पण तुम्हाला / मला हे कुठं

रेवती
Sat, 09/03/2016 - 00:18 नवीन
अहो पण तुम्हाला / मला हे कुठं माहितिये की तो कुठं आणि कसा कमी पडला म्हणून असं भजं झालय? वर दिसतं त्यापेक्षा वेगळं असू शकेल याची धडधडीत शक्यता दिसतिये ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा