Skip to main content

हिशेब

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 01/09/2016 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेब मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो. बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे. घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर? (सत्यकथा नावे बदलून)

वाचने 61435
प्रतिक्रिया 291

प्रतिक्रिया

काही जुन्या अ‍ॅडव्हरटाइजमेंट्स बघत होतो. हा धागा प्रतिसाद वाचल्यावर काही जुन्या मनोवृत्तींची जागा मॅच झालेली पाहुन मौज वाटली. 1 2 3 5 5

पेठकरकाका व स्वीट टॉकर यांचे प्रतिसाद आवडले. सुट्टीच्या दिवशी मुलीबरोबर आईवडिलांनादेखील फिरायला एकत्र जावेसे वाटले नाही. लेखात ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे हे वाचल्यावरच डोक्यात घंटा वाजायला हवी. नवरा कितीही उच्च पदस्थ असू दे, प्रेम एकमेकात हवे ना! नवर्‍यानेही आधी पासून फक्त पैसा पैसा केले असेल व आता खरेच पैसा हातात येत असेल तर ती म्हणेल की बाबा रे, आधी माझे तुझ्याबरोबरचे चार क्षण मातीमोल केलेस तर आता कर खर्च तुझा तो पैसा! निदान त्याचा तरी वापर करू दे! समजा परिस्थिती वेगळी असेल व बायकोच्या अपेक्षा गगनाला भिडणार्‍या असतील व तिने त्या पूर्ण व्हाव्यात या हेतूने नवर्‍याला खूप सपोर्ट केलेला असेल व या पदाला पोहोचण्यास मदत केली असेल तर माहित नाही. नक्की दोघांमध्ये काय झालेय हे माहित नाही. त्यांची परिस्थिती काहीही असो पण पतीपत्नीमधील भावबंध उत्तमरित्या समजणार्‍या डॉ. खरे यांना कोण बरोबर? हा प्रश्न पडावा याचे आश्चर्य वाटले.

In reply to by रेवती

रेवती ताई नवरा ऐतखाऊ आळशी ऐदी आणि जे काय म्हटलंय असा काही नाहीये. किंवा पैसा पैसा करणाराही नाहीये. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येऊन इंजिनियर झाला. चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. लग्न बघूनच झालेलं आहे. लग्न अगोदर भाची नोकरी करत होती. लग्नानंतर तिने नोकरी सोडली.( कारण माहित नाही) मुलाला एक भाऊ आहे जो वडिलांबरोबर राहतो. लग्न झाल्यावर काही दिवसांनी जागा कमी पडते म्हणून यांनी अगोदरचा एक छोटा दुसरा फ्लॅट होता तेथे हे दोघे राहू लागले. ते घर विकून आता यांनी मोठे तीन बेडरूमचे घर घेतले आहे. बायकोच्या अपेक्षा काही गगनाला भिडणाऱ्या नाहीत( निदान वाटत तरी नाहीत). दोघांचे संबंध कधीही असे वाटले नाही कि ऐकिवात आलेले नाही

In reply to by सुबोध खरे

खरे काका, तुमच्या प्रतिसदांवरुन हे अगदी सामान्य कुटुंब वाटत आहे. मुलगी काही सिरीयल्स मध्ये दाखवतात तशी कजाग वगैरेही वाटत नाही. तुम्हालाही अगदी पक्की माहिती नसुन नुसते अंदाजच आहेत. त्यामुलीने अगदी गम्मत म्हणुनही म्हणले असेल. एरवी तिच्या हाताखाली कामाला बायका असल्या तरी त्याव्यक्तिरिक्त घरात पुष्कळ काम असतेच. तिने लग्नानंतर नोकरी का सोडली ह्यालाही अनेक कारणे असतील. आत्ता परिस्थिती उत्तम वाटत असली तरी आधी तिने कष्ट काढले असतील. तिला घरात थोडा मोकळा वेळ हवा असेल. शिवाय वडीलांना आठवडाभर मुलीसोबत घालवायला वेळ नसेल म्हणुन तिची काळजी त्यानी वीकांताला घ्यायची असे ठरले असेल, त्यात वाईट काहीच नाही. तिने केवळ "ड्युटी" हा शब्द वापरला ह्या एका तकलादु मुद्द्यावर ज्यांच्याबद्दल मुदलात तुम्हालाच १००% माहिती नाही त्यांच्याबद्दल मिपाकरांनी कशी चर्चा करायची? का करायची? "घरात बसुन बायकांनी नवर्‍याला कामाला लावणे" असा मुद्दा असु शकतो चर्चेचा.. पण एका विशिष्ट कुटूंबाबद्दल कशासाठी बोलायचे? की ह्या एका अर्धवट उदाहरणातुन बायकांबद्दल सरसकटीकरण करायचे आहे? एका निर्णयामागे १०० कारणं असतात.. वरकरणी बाहेरच्यांना काहीही वाटले तरी खरी परिस्थिती काय हे फक्त नवरा बायकोलाच माहिती असते. आणि त्यांचे ते सुखी असताना बाहेरच्यांनी निष्कारण चर्चा करुन काही होत नसतं. एक तिर्‍हाईत म्हणुन तुम्ही तोकड्या माहितीवर असे धागे का काढत आहात असा प्रश्न राहु राहुन पडतो.. ते ही तुमच्या कडे लिहायला माहितीचा एवढा खजिना असताना..

अहो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे आठवड्याचे पाच दिवस त्याला ऑफिसात चांगली विश्रांती मिळते. दोन दिवस केले घरकाम तर बिघडले कुठे. कैच्या कै धागा.

In reply to by संदीप डांगे

कुठलं पेटंट वाक्य... एक दुसरा हिशोब करा. कामाच्या वेळेत (सोम-शुक्र) मिपावर येणारे प्रतिसाद आणि कामाच्या वेळेबाहेर मिपावर येणारे प्रतिसाद. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफिसात किती मानेवर खडा ठेवून काम करतात हे महामहोपाध्याय खरे डॉक्टरांना कळेल. (वीकेंड आला की पोटात गोळा येणारा पण कामच्या वेळेत रिलॅक्स असणारा सॉफ्टवेअर इंजिनियर) आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

आता शेवटी बहुमोल मतः -नवरा आणि बायको जे काही आहे ते आपापसात बघून घेतील.
(बाकी पोटात गोळा यायचं कारण?? नै हरकत नसेल तर सांगा, आम्हाला गॉसिप करायला तेवढा अजून एक विषय)

In reply to by संदीप डांगे

अ‍ाठवडाभर ऑफिसात रिलॅक्स असल्यावर वीकेंडला घरची कामं करावी लागतील यामुळं गोळा येणारच की! ;) ऑफिसातल्या बॉसला गंडवता येतं. घरच्या बॉसला नाही.

In reply to by कंजूस

भाचीनेही गमतीने सांगितले असेल मामाला तर आपला प्रतिसादांचा रतिब फुकाचा ठरेल. अरे असा तर विचारच आला नाही डोक्यात मगत मोठ्ठाल्ला पॅराडाइम शिफ्ट होऊन जाईल पण असे नसेल बहुधा अशी आशा धरतो.

In reply to by मारवा

पण असे नसेल बहुधा अशी आशा धरतो.
बरोबर, तुम्ही धराच आशा, सोडली तर तुम्हाला गॉसिप कसे करता येईल?

In reply to by मोदक

हो का? बरं बरं.... तुमचं नाक बिघडलंय असं कळवतो. कुणी लिहलंय ह्यापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं - एवढं तत्त्व पाळतोय, आत्ताही! आणि जिथले बिल त्याच टेबलावर पे करायचं, उधार ठेवायचं नाही हे दुसरं तत्त्व! आत धाग्याबद्दलः ड्युटी म्हणजे कर्तव्यही म्हणायचं असेल तिला.. मला अशा 'असेल, नसेल' वाल्या गोष्टींवर, त्याही नवरा-बायकोच्या तर अजिबात रस नाही वाटत. तिने ते गंभीरपणे म्हटलं असेल तरी मला ते चुकीचं वाटत नाही. घरी राहणार्‍या बायकांबद्दल माझी मते पूर्वग्रहदूषित नाहीत. त्यांच्याबद्दल नोकरी करणार्‍या स्त्रियांइतकाच आदर आहे. माझंच उदाहरण देतो: माझ्या स्वतःच्या बायकोला मी तीची चांगली नोकरी सोडून मुलांसाठी घरी बसायला सांगितलंय, माझ्या घरातही दोन बायका मदतीला होत्या.. तिची काय ससेहोलपट होते ते मला माहित आहे, जाणीव आहे. बायकोही मला कुठल्याही कामाला हात लावू देत नाही. अगदी शब्द झेलायला तयार असते. बाहेरच्या लोकांना, आमच्या नातेवाईकांना तर असंच वाटत असतं की "हि इथे राणीसारखी राहते". सो दे गॉसिप! ज्याचं खरं त्याला ठावूक असतं, लोकांनी उगाच गॉसिप करुन मिपासारख्या ठिकाणी असलं काही मांडावं आणी ज्या पद्धतीने मांडावं (घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो.) ह्याचं फारच म्हण्जे फारच वाईट वाटलं... तुम्हाला नै वाटलं? ह्या धाग्यात गॉसिपशिवाय कणभरही काही महत्त्वाचे असेल तर कॄपया सांगा... माझे सर्व प्रतिसाद इथून डीलिट मारायला संपादकांना सांगेन व धागाकर्त्याची जाहीर माफी मागेन. धन्यवाद! (कर्मधर्मसंयोगाने जर त्या मुलीने वा मुलाने खरेंचा हा धागा वाचला तर खुद्द खरेंबद्दल त्यांचे काय मत होईल हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे असे माझे मत आहे. त्यावर कोणी बोललेले दिसत नाही अजून...)

In reply to by संदीप डांगे

धागा त्या मुलीनेच वाचण्याबद्दल.. अगदी दाट शक्यता आहे. खुप लोक मिपा वाचत असतात. माझ्या इथल्या लेखनावरुन कालच एका ओळखीतल्या मुलीने "तुच पिरा आहेस का?" असां विचारलं. तिचा इथे आयडी सुद्धा नाही. तिला मिपा माहिती आहे हे ही मला माहिती नव्हतं. पण आपल्या लिहीण्यावरुन लोकांना अंदाज येतोच. काका तर खर्‍या नावाने लिहीत आहेत. त्यांचे कुणी ना कुणी नातेवाईक नक्कीच मिपा वाचत असतील. त्यांना अंदाज यायला वेळ लागणार नाही. पण तसं काही होऊ नये हीच इच्छा!

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई "धागा त्या मुलीनेच वाचण्याबद्दल" याच साठी मी बराच तपशील लिहीलेला नाही आणि जृसे लिहीले आहे त्याने कुणाला कळण्याची शक्यता नाही.पण मी जे लिहिले आहे ते तसेच आहे. छिद्रान्वेषी लोकांना फाट्या वर मारा

In reply to by संदीप डांगे

हो का? बरं बरं.... तुमचं नाक बिघडलंय असं कळवतो. बर्र.. तसे समजा. कुणी लिहलंय ह्यापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं - एवढं तत्त्व पाळतोय, आत्ताही! आणि जिथले बिल त्याच टेबलावर पे करायचं, उधार ठेवायचं नाही हे दुसरं तत्त्व! हे नक्की आहे ना..?

In reply to by मोदक

नक्की नक्की. कारण कुठल्या धाग्यावर मी किंवा कुणी काय बोललो होतो हे विसरुन जातो, खरं बोलतोय, आयशप्पथ! काही लोक दांभिकपणात सातत्य ठेवतात त्यामुळे तुम्हाला स्कोअरसेटलींगचा वास येण्याची शक्यता वाढते, त्यात दोष माझा नव्हे, दांभिकपणाचा आहे असे कळवतो. =))

In reply to by संदीप डांगे

काही लोक दांभिकपणात सातत्य ठेवतात त्यामुळे तुम्हाला स्कोअरसेटलींगचा वास येण्याची शक्यता वाढते, त्यात दोष माझा नव्हे, दांभिकपणाचा आहे असे कळवतो. =)) हा प्रतिसाद जपून ठेवेन. =))

In reply to by मोदक

हे नक्की आहे ना..? मते बदलतात माणसांची मोदकशेठ. कधीकधी काही माणसांची मते माणूस, धागा , वेळ आणि विषय पाहुन पण बदलतात

In reply to by मृत्युन्जय

हे अगदी खरे बोललात मृत्यूंजयसाहेब, इथे मिपावरच तर अनेकांचे अनेकदा असे होतांना पाहिले आहे मी स्वतःच्या डोळ्यानी. तुमचे निरिक्षण चोक्कस आहे!

In reply to by संदीप डांगे

अरे काय तुम्ही लोक्स राव!! तुमचे हे "नक्की का??? नक्की ना???" पुराण ऐकून आमच्या जुन्या जखमा वाहू लागतात!! एम्बुश आठवते झालेले, अन मुख्य म्हणजे पाठीत वार करणारे आठवतात!

कालाच्या पट्टीवर मी योग्य वेळी जन्माला आलो आता योग्य वेळी जाणार. जाताना पुढच्या पिढीला दंडवत करून प्राण सोडणार.

ह्या धाग्याचं द्विशतक झालं की पेढे वाटायचा संकल्प एका मिपाकराने कायप्पावर केला आहे. तेव्हा बाकी काही होवो न होवो धाग्याचं द्विशतक लवकर करा ब्वा!!

In reply to by सूड

पेढ्यांच्या आधी दिग्गज अनाहितांस कौल लावा! अनायसे ज्येष्ठागौरी बसल्याच आहेत श्रावणातल्या, तेव्हा लावून टाकायला हवा कौल! अनाहितांस कौल लावल्याशिवाय काय धागा तरत नाय बा ।।सत्वर पाव ग अनाहिता ताई मला, कॉमेंट वाहीन तुला।। टीप :- ही एक हलकीफुलकी कॉमेंट आहे तरी कृपाया माझ्या तायांनो, माझी पिसे काढू नका ही नम्र विनंती, नाहीतर पेढ्याबर मला बी गिळाल कच्चा! अनाहितांचा(च) सालस , गोंडस भाऊ बापुल्या!

In reply to by पिलीयन रायडर

ओ ताय, मी वेगळा भाऊ हाय! टक्कू मक्कू शोनू आमचा मित्र नाहीये! कारण त्याला बुलेट आवडत नाही ना!! =)) , मोदक ला आवडते, मोदक जव्हेरभाऊंच्या पक्या सारखा ग्रामपंचायतीपुढे बुलेट वर बसला होता मी तिथे गेलो तर म्हणाला तुला पण बुलेट आवडते का? मी म्हणले हे तर थोरच आहे! तेव्हापासून आम्ही मित्र आहोत !

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

लोल.. बापू ____/\___ काय बोलायचं या धाग्यावर ?? डांगे अण्णा आणि पिरा ला आपलं स्टँडिंग मम म्हणुन ठेवते. एक साधासा उद्गार तो काय ! आणि किती तो खल..

In reply to by स्रुजा

ते मिपाबायका अजरामर आहे! माझं खापरपतवंड जेव्हा मिपावर उलथेल तेव्हाही तेच उपयोगात राहणार आहे!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कबूल केल्याच्या अर्धे पेढे तरी खरेदी करा आता म्हणे मी
छे हो पुण्यात राहायला आल्यापासनं पेढे वैगरेंसारख्या गोष्टी स्वत: खरेदी करणं म्हणजे महापाप!! एका मिपामित्राने कबूल केलेन. मज मिळाले की आपणासही देईन. ;)

In reply to by सूड

धोका देण्याच्या ह्या प्रकारचे वर्णन करायला एक अतिशय ग्राम्य म्हण आहे हिंदी भाषेत, कशीबशी आवरलेली आहे ती आता, भावना तुम्ही समजलेच असाल

सर्वात जलद शतक मारणार हा धागा. खरे साहेबांचा शनिवार वाड्यावर सत्कार करूया. बाकी पेठकर साहेबांचा प्रतिसाद उत्तम.

मी काय म्हणतो, तुम्ही तिला स्पष्टच का विचारलं नाहीत? की कागं, बापाने जी कामं करणं अपेक्षितच आहे त्याला तू ड्यूटी का म्हणतेस? ती तू त्याला लावून दिलेली आहेस की त्याने प्रेमाने अंगावर घेतलेली आहे? अजूनही तुम्ही जर हे प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं इथे दिलीत तर मिपाकरांचे चर्चाकष्ट वाचतील. असं अर्धवट माहिती असलेलं लेखन केल्याने या आणि आधीच्या लेखातून 'स्त्रिया स्वार्थी असतात, स्वातंत्र्याचा उपभोग घेतात, मजा मारतात आणि काही जबाबदाऱ्या घेत नाहीत' असे तुमचे विचार असल्याचा भास होऊ शकतो. तुमची प्रतिमा 'किंचित स्त्रीद्वेष्टी व्यक्ती' अशी झालेली तुम्हाला चालेल का?

In reply to by राजेश घासकडवी

जालावरील प्रतिमा आभासी असतात आणि लोकांची माझ्याबद्दल प्रत्यक्ष जगात काय प्रतिमा आहे याचा मला शष्प फरक पडत नाही. माझ्या बायकोचे नाव लग्नानंतर मी बदलले आणि "तिच्याच " आवडीचे ठेवले आहे. ( तिला तिचे पहिले नाव आवडत नव्हते) याबद्दल माझ्या लष्करी वर्गमित्रांनी मला mcp म्हटले होते.मुलीचे नाव हि तिची ओळख आहे इ इ. मी याचे स्पष्टीकरण कुणालाही देण्याच्या फंदात पडलो नाही. तेंव्हाही नाही आणि आजही माझा एक मित्र तिला आवर्जून लग्नाच्या अगोदरच्या नावाने हाक मारतो. असो

In reply to by सुबोध खरे

नाय बा मला काय नाय, तुम्हाला चालतंय म्हणल्यावर आम्ही काय बोलणार, वेन्जॉय! _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापूसाहेब "सानू कि" म्हणजे मला काय ?( घेणं देणं) "त्वा नू कि" म्हणजे तुम्हाला काय करायचंय. मी "सानू कि" विचारलं गैरसमज नसावा म्हणून.

In reply to by कायरा

हे असे बायकोचे ऐकणारे नवरे बाहेर 'खाली मुंडी आणि पाताळ धुंडी' असतात. त्यांचं मेल्यांच काय कौतुक सांगू नका. आणि ३-३ मोलकरणींच काय मेलं ते ऐवढं, सगळं आवरावं लागत शेवटी त्या घरातल्या स्त्रीलाच.

बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
डॉक्टरसाहेब, जर दोघांनी एकमेकांच्या संमतीने अशी विभागणी मान्य केली असेल तर त्रयस्थाने त्यावर फार विचार करण्याची गरज नाही. माझ्या माहितीतील ३ उदाहरणे देतो. १) नवरा व बायको दोघेही ५० च्या पुढचे आहेत. ते पुण्यातील आहेत. त्यांना एकच मुलगा आहे. तो अमेरिकेत आहे. त्याचे ४-५ वर्षांपूर्वी लग्न झाले. नवरा सौदीत काम करतो. बायको बॅकेत काम करते व मुंबईतील एका शाखेत व्यवस्थापक आहे. मुलगा व सून अमेरिकेत असले तरी दोघेही वेगवेगळ्या शहरात आहेत व दोन्ही शहरे एकमेकांपासून बरीच दूर आहेत. या पुण्यातील कुटुंबातील सर्व चार जण पुण्यात नसून प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी एकटा आहे. पण त्या सर्वांनीच ही परिस्थिती स्वतःहून स्वीकारलेली आहे. आम्हाला ही परिस्थिती विचित्र वाटते, पण हे त्या सर्वांना मान्य आहे. २) ओएनजीसीत समुद्रात कायमस्वरूपी असणार्‍या जहाजावर एक केटरर होता. वर्षातील बरेच महिने तो जहाजावर असायचा. काही दिवस रजा घेऊन तो घरी यायचा. त्याची बायको व दोन्ही मुले व घर मुंबईत आहे. त्याने जहाजावर अनेक वर्षे काम केले. ते काम सोडल्यावर गुजरातमधील एका पर्यटनस्थळावरील एका हॉटेलात त्याने केटरिंगचे काम स्वीकारून वर्षातील बराच काळ तो तिथेच असतो. बायको मुंबईत काम करते व शिकणारा मुलगा तिच्याबरोबर असतो. मुलगी पदवीधर असून दुबईत काम करते. कुटुंबातील ४ सदस्य ३ वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्याच्या सांगण्यानुसार तो जेव्हा सुटी घेऊन मुंबईत घरी परत जातो तेव्हा त्याच्यात व बायकोत औपचारिक संभाषण असते. नवरा लग्नापासून बहुसंख्य काळ घरापासून लांबच असल्याने तिने स्वतःचा ग्रुप व स्वतःची वेळ घालविण्याची साधने शोधली आहेत. त्यामुळे तो घरी परत आला तरी त्यांच्यात फारसा संवाद नसतो. परंतु त्या सर्वांनी हे स्वतःहून स्वीकारले आहे. ३) वयाच्या २५ व्या वर्षापासून मर्चंट नेव्हीत काम करणारा एक जण मला माहित आहे. तो वर्षातील ७-८ महिने जहाजावर असतो व उर्वरीत ३-४ महिने घरी असतो. सध्या त्याचे वय ५० आहे. त्याला २ टीन एजर्स मुले आहेत. मुलगी १६-१७ वर्षाची असून मुलगा १३-१४ वर्षांचा आहे. १-२ वर्षापूर्वी दुर्दैवाने त्याची बायको कर्करोगाने वारली. मर्चंट नेव्हीत काम केले असल्याने भरपूर पैसे जमा केले आहेत. आम्हाला सर्वांना वाटले की बायको गेल्यावर तो नोकरी सोडून मुलांसाठी घरी थांबेल कारण टीन एजर्स मुलांना आई नसताना निदान वडीलांचा आधार मिळाला असता. पण या पठ्ठ्याने आपल्या सासूसासर्‍यांना मुलांकडे बघण्यासाठी घरी आणून ठेवले आहे (त्याचे स्वतःचे आईवडील पूर्वीच गेलेले आहेत) व त्याने आपला जहाजावरील जॉब सुरू ठेवला आहे. मुलांना आई नसताना वडीलांची आत्यंतिक गरज असताना हा मात्र नोकरी सोडायला तयार नाही. परंतु त्या सर्वांनी ही परिस्थिती मान्य केली आहे. आपल्याला त्यांचे वागणे कितीही अयोग्य वाटले तरी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो व तो त्यांच्या दृष्टीने बरोबरच असतो. आपण त्याबाबतीत काहीही करू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काय कंसिस्टीणसी आहे राव =)) , "ड्युटी" ह्या एकम शब्दोद्भव धाग्यावरही गुर्जी चक्क मेगाबायटी बोलून गेले देवा! लोकं धाग्यावर चार पैसे किंवा बजेट नुसार 2 पैसे देऊन जातात, गुर्जी खाणकन बंदा रुपयाच आपटून जातात बघा!

In reply to by श्रीगुरुजी

जर दोघांनी एकमेकांच्या संमतीने अशी विभागणी मान्य केली असेल तर त्रयस्थाने त्यावर फार विचार करण्याची गरज नाही गुरुजी हे मान्य आहेच. परंतु नवरा पाच दिवस नोकरी करतो आणि बायको पाच दिवस मुलीला सांभाळते मग दोन दिवस नवरा मुलीला सांभाळत असेल तर ते दोन दिवस बायकोने त्याचे काम करावे कि नाही. म्हणजे नवऱ्याने पाच दिवस नोकरी करायची आणि दोन दिवस पूर्णपणे मुलीला सांभाळायचे आणि बायकोने पाच दिवस मुलीला सांभाळायचे आणि दोन दिवस कम्प्लिट आराम? हे कुठेतरी खटकलं. खाली म्हटल्याप्रामण बायकोला आठवड्यात काही वेळ पूर्ण पणे स्वतःसाठी हवा असेल तर ते हि मान्य पण त्याचा "हिशेब" होऊ नये असे वाटते. कदाचित आमची विचारसरणी जुनी/ जुनाट झाली असेही असेल.

बाकी लोकांना दुस-याच्या घरात नाक खुपसायची आवड असतेच हे अगदी आंतरजालावरही सिद्ध करणारा धागा आहे. जगात इतके बाकीचे आणि महत्त्वाचे विषय आहेत. पण जरा नवरा-बायकोच्या relationship वर धागा आला तर समस्त पब्लिक त्याच्यावरच घोंघावतंय.

In reply to by बोका-ए-आझम

मी पेढे मिळायच्या आशेने आलो शपथ सांगतो ! डोक्यावर रिंगण असणारी परी वाली स्मायली

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी वेळ काढायला आले होते.. पेढ्यांच नाव निघालं म्हणून थांबलेय.. आमची ती जांभळी, शिंग असलेली आणि हीहॉहॉ टाईप हसणारी स्मायली!

In reply to by पिलीयन रायडर

मला पण पेढे देणार कबूल केलेन म्हणून चार प्रतिसाद दिले हो!! सवाशे झालेत आता तांबड्या जोगेश्वरीच्या कृपेने लवकर उरलेले पंच्याहत्तर व्हावेत, याहून मागणं लई नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोका शेट बाकी लोकांना दुस-याच्या घरात नाक खुपसायची आवड असतेच हे अगदी आंतरजालावरही सिद्ध करणारा धागा आहे. हेच तर कारण आहे कि इतक्या कचकोळ धारावाहिक असतानाही सगळ्या चालतात. लोकांना स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त "रस" असतो.