✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ई-उपवास

र
रघुनाथ.केरकर यांनी
Wed, 08/17/2016 - 15:34  ·  लेख
लेख
आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला. शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापुर स्टेशन गाठलं, स्टेशन वर पोहचुन बघतो तर काय स्टेशन ला तुफ़ान गर्दी, लोक रेल्वे रुळावर उतरले होते. दोन लोकल्स च्या मोटरमन केबीन मध्ये आंदोलन कर्त्यानी ताबा घेउन दोन्ही गाडया मध्येच थांबवुन धरल्या होत्या. बर्राचा वेळ स्टेशन वर घुटमळत राहीलो, गाडया सुटायची काही चिन्हे दीसेनात, एव्हाना २० - २५ जणांना फोन करुन तिथला आंखो देखा हाल सांगीतला. मग १०-१५ फ़ोटु वेगवेगळ्या कोनातुन काढले, आणी पाउणतास टाईमपास करुन घरी परतलो. घरी परतताना मी जरा खुशीतच होतो, त्याची दोन कारणं होती एक म्हणजे भर पगारी रजा, आणी दुसरं म्हणजे चार दीवस आलेला वीकांत. लोकांचा रेल रोको माझ्या पथ्यावर पडला होता. शुक्रवार, शनीवार, रवीवार आणी सोमवार अशी सलग चार दीवसाची रजा मिळणार होती, कोकणात रहाणार्‍या चाकरमान्याना असे प्रसंग म्हणजे "सोनीयाचा दीनु". मी सुद्धा घरी आल्या आल्या जाहिर केलं की मी गावी चाललो. एवढा मोठा विकांत आहे म्हटल्यावर मी गावी जाणरच हे आई ला अभीप्रेत असल्याने तीने फ़ार काही प्रतीक्रिया दील्या नाहीत. बायकोने मात्र प्रश्नांचा भडीमार केला, तीला थोडक्यात समजावुन घरच्यांचा निरोप घेतला.सावंतवाडीपासुन १५ कीमी वर बांदा नावाचे एक गाव आहे, त्यात आरोस बाग नावाची एक लाहानशी वाडी आहे, तीथे माझे दुरचे नातेवाईक रहातात , मला त्यांच्याकडे २ दीवसांसाठी एका कामा नीमीत्त जायचं होतं. ऑफ़ीसचा ल्यापटॉप आणी दोन जोडी कपडे, एवढच सामान घेउन निघालो. बाय रोड थेट पनवेल गाठलं, पनवेल स्टेशन वर चौकशी केली तर कळालं कि १ वाजता कुठली तरी लेट झालेली गणपती स्पेशल येणार आहे. गाडीत बसल्यावर लक्षात आलं की मोबाइल फोन ची ब्याटरी ४५% वर आलिय. आनंदाच्या भरात ब्याग भरताना, पॉवर ब्यांक घ्यायला विसरलो होतो. "हुश्शार फ़ोन" असल्याने ब्याटरी भराभरा उतरते. आणी त्यातच सकाळी रेल रोको दरम्यान केलेली फ़ोटोग्राफी आणी फ़ोनाफ़ोनी यातच ब्याटरी उतरली होती. गाडी "हॉलीडे स्पेशल" गाडी असल्याने जुने डब्बे होते, आणी त्यात सुधा जनरल डब्बा असल्याने त्यात मोबाईल चार्जींग पॉईंट नव्हते, मग सगळ्यात आधी डेटा कनेक्शन बंद केलं, मग स्क्रीन लाईट कमी केला, नेटवर्क CDMA वरुन GSM केलं. रोहा येईस्तोवर ब्याटरी २५ टक्क्यांवर आली. आता मात्र फोन बंद करावा लागला. घरी फोन करुन तसं कळवल आणी फोन बंद केला. दर दोन तासांनी फोन चालु करुन घरच्याना कॉल करत होतो. आणी त्याच मुळे सावंतवाडी येइ स्तोवर मोबाईल ने दम तोडला. ल्यापटॉप वर मोबाईल चार्ज करावा तर ल्यापटॉप सुद्धा थंड पडला होता. गुरुवारी रात्री लेकाने त्यावर उशीरा पर्यन्त कुंफ़ु पांडा पाहीला होता. त्यामुळे ल्यपटॉप ची ब्याटरी कंप्लीट ड्रेन झाली होती. आता नातेवाईकांकडे पोहोचे पर्यंत बिना मोबाइल रहावे लागणार होते, कल्पनाच डेंजर होती. गाडी रात्री साडेनऊ ला सावंतवाडी स्टेशन ला पोहोचली. शेवटची एस टी जाउन अडीच तास झाले होते, रेल्वे स्टेशन वरच्या रिक्षावाल्याना विचारलं की बांदा ,आरोसबाग येणार का? तर कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी ४०० रुपयाला एक जण तयार झाला. तो देखील बांदयातलाच होता म्हणुन तयार झाला. माझं सुदैव की त्याला माझ्या नातेवाईकंची वाडी माहीत होती. मी रिक्षात बसलो, रिक्षा बांद्याच्या दिशेने निघाली. वाटेत कीर्र काळोख होता आणी एकदम शांतता होती परीसरात फक्त अमच्याच रिक्षाचा आवाज होता. मध्येच एखाद दुसरा ट्रक हॉर्न मारुन निघुन जायचा. रिक्षा बांद्यात पोहोचली आणी डांबरी रस्ता सोडुन आमची रिक्षा कच्च्या रस्त्याला लागली. रस्ता प्रचंड खराब होता, उंटावर बसल्याचा फ़ील येत होता. एवढ्यात नेमका पाउस आला समोरची वीजीबीलीटी अवघ्या ५-७ मिटर वर येउन ठेपली. रिक्षा अगदी संथ गतीने हिंदकळत पुढे जात होती. घड्याळात ११.३० झाले होते. इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवुन म्हणाला "तुमचा घर इला हा." मी बाहेर पाहीलं तर किर्र अंधार, मध्ये मध्ये काजवे पेटत होते. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे आहे घर. तर त्याने रस्त्याच्या डावी कडे बोट दाखवलं आणी म्हणाला "ह्या काय सामक्या आसा" (हे काय समोरच आहे). इतक्यात एक माणुस रॉकेलचा दीवा घेउन आमच्या दिशेने आला. निटसं दीसत नव्हतं पण डोळे थोडे ताणल्यावर लक्षात आलं की हेच ते नातेवाइक ज्यांच्याकडे मी एवढ्या लांब आलो होतो. रिक्षावाल्याला त्याची बिदागी दीली आणी त्याला मोकळं केलं. रिक्षावाल्याने रिक्षा वळवुन माघारी जाण्यापर्यंतच रिक्शाचा आवज आणी प्रकाश होता, मग मात्र तो सुधा कमी कमी होत गेला. मग मी त्या नातेवाईक काकां बरोबर चालु लागलो. त्यांच्या मागोमाग मी एका पडवी सद्रुश्य खोलीत आलो. त्या पडवी सद्रुश्य घरात काळोख होता, कदाचीत लाइट गेले असावे असं मला वाटलं आतुन त्यांच्या पत्नी बाहेर आल्या, त्यानी अजुन मोठा रॉकेलचा दीवा आणुन एक टेबल सद्रुश्य वस्तुवर ठेवला. आणी त्या दीव्यासमोर मला बसायला एक खुर्ची ठेवली, दोन्ही कडच्या खुशाल्या वीचारुन झाल्यवर मी त्याना लाइट गेले आहेत का वीचारल तर त्या दीव्याच्या उजेडात काकांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर एक छद्मी स्मित दीसलं, मला पुढे काही जास्त बोलवेना झाल. बाहेर धो धो पाउस कोसळत होता, वातावरणात वेगळाच गारवा होता. त्यात पायाखाली शेणाने सारवलेली जमीन होती. पडवी सोडली तर बाहेर सभोवताली गच्च अन्धार होता, वेगळाच अनुभव होता तो. एवढयात गरमागरम जेवण आलं. जेवण करुन आडवा झालो. पावसाच्या आणी रातकीड्यांच्या आवाजात कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी ७ ला जाग आली, पडवीतुन बाहेर येउन पाहीलं तर पाउस थांबला होता, बाहेर उन पडलं होतं. घरा भोवती गच्च झाडी होती, चुलीवर अंघोळीचं पाणी तापत होतं. चुलीच्या धुराचा वास मला माझ्या बालपणीची आठवण देउन गेला. मग नकळत पाय चुलीकडे वळले, चुलीच्या समोर बरुन मी विस्तवाचा शेक घेउ लागलो. थोड्याच वेळात ब्रश वैगरे करुन चहा नाष्टा झाला. एवढयात घरी फोन करायची आठवण झाली. ब्यागेतुन मोबाइल काढला आणी चार्जींग करायला निघालो. चार्जर हातात घेउन भिंतीवर लाइटीचा बोर्ड शोधायला लागलो. पडवीच्या सगळ्या भींती शोधल्या पण एकही बोर्ड सापडला नाही. साधी वायरींग पण दीसली नाही. काका माझा हा कर्यक्रम टक लाउन बघत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच ते हसुन म्हणाले "लायट अजुन येउक नाय आसा. गणपती च्या नंतर येयत असा सरपंच सांगा व्हते." मी एकदम शांत झालो. मोबाइल आणी चार्जर पुन्हा ब्यागेत ठेवला. मला खुप प्रश्न पडले होते. कुठला प्रथम वीचारु हेच कळत नव्हतं. तरी सुद्धा न रहावुन मी बोललोच: मी: लायट केवा पासुन नाय आसा? काका: पैल्या पासुनच नाय आसा. मी : म्हणजे? काका: तरी ६० - ७० वर्षा झाली. मी: तुमी अर्ज करुक नाय काय? काका: गेल्यावर्षी केल्लो. सगळे कागद बनवन घेतले. मगे तो सायब बदाललो आनी ते कागद सुधा तेनी धापो केल्यान मेल्यानं. फुडल्या वाडीताकात लायट इली आसा. सरकारी बाईर सुधा पंपाक लायन इली, आमका देवकच लायट नाय आसा गवरमेंटाकडे.आमका आता सवय झाली आसा पन पावने सोयरे इले की पंचायत जाता. काकांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता. मी कल्पनाच करु शकत नव्हतो की विजेशीवाय त्या काकांच्या कुटुंबाने इतके दीवस कसे काढले. खुप अस्वस्थ वाटायला लागलं, पुढचे दोन दीवस मी विना मोबाईल, विना ल्यापटॉप काढले. दोन दीवस सतत, प्रत्येक क्षणाला मला सारखा एकच विचार यायचा की विजेशीवाय इतकी वर्ष हे लोक कसे राहीले. ज्या कामा साठी आलो होतो ते काम उरकले आणी तीसरर्‍या दीवशी पुन्हा मुंबई ला जायला निघालो, सावंतवाडीहुन कोकणकन्या पकडली, गाडितच मोबाइल आणी ल्यापटॉपचार्ज करुन घेतला. मागचे दोन दीवस मी अपघाताने का होइना पण. इ-उपवास केला. कुठल्याही प्रकारचं ईलेक्ट्रीक किंवा ईलेक्ट्रोनीक यंत्र मी ह्य दोन दीवसात वापरलं नव्हतं परतीच्या प्रवासात रात्र भर फक्त डोक्यात एकच वीचार होता, काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु? ​टीप: पहीलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखन व मांडणी मधल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.​
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49043 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

नेमके काय वाईट आहे त्याची खास

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/20/2016 - 18:47 नवीन
नेमके काय वाईट आहे त्याची खास काही टोटल लागली नाही, पर बिहार तो ससुरे नाम से ही बदनाम हो गईस! धनवाद हमारे लालू जी का!, बाकी राजस्थानात असले नसते हो, रस्ते वीज पाणी सब चकाचक! (ह्याचा राजस्थान आमची सासुरवाडी असण्याशी संबंध नाही, जोडणाऱ्याला भर वाळवंटात मांजर सोडतात तसे पोत्यात घालून सोडण्यात येईल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाहा! घाबरले ना!

पैसा
Sat, 08/20/2016 - 19:23 नवीन
त्या नॅशनल highway वरच्या गावात ३७० कुटुंबाना वीज नाही आणि ६ महिने पिण्याचे पाणी एक किमी अंतरावरून आणावे लागते. ती कुळे असल्याने घराजवळ विहीर पाडायला परवानगी मिळत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आयला कुळे म्हणजे तापच असतो!

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/20/2016 - 22:56 नवीन
आयला कुळे म्हणजे तापच असतो! अन तो ऑल इंडिया समान असतो, कधी कुळ म्हणून, कधी हिश्शेदार बटाईदार म्हणून तामिळनाडू मध्ये पंगाली म्हणून तर बिहारात पटीदार म्हणून!असो ते कळले, शिवाय मला वाटते कोकणात छोट्या छोट्या वाड्या एकमेकांपासून लांब अंतरावर असणे हे ही एक कारण असावे, बहुतेक गडचिरोलीकडे सुद्धा असेच आदिवासी पाडे दूर असल्यामुळे बेसिक पायाभूत सुविधा तिकडे नेणे इतर जागांपेक्षा कठीण अन खर्चिक होते अन पर्यायाने कोणीच काम करतही नाही बेटे! केरकरांच्या नातलगांकडेकडे लवकर वीज पोचावी अशी आशा करतो, अन स्नेहांकिताताईंचे कौतुक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तलाठी खरो बोलतासा मां? नायतर

यशोधरा
गुरुवार, 08/18/2016 - 13:26 नवीन
तलाठी खरो बोलतासा मां? नायतर उगा आप्लो काय्येक सांगून दितस, असा नको! कागदपत्रां बघितलेली आसत काय? धनीयांवांगडा बोलणत कित्या नाय बाय घेवचे खातर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

तो कित्या मदत करतलो

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 08/18/2016 - 14:05 नवीन
धनी कित्या मदत करतलो, धनीयांका आदीच कुळा नको आसत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सहसा असा बगूक नाय. दोघांयका

यशोधरा
गुरुवार, 08/18/2016 - 14:08 नवीन
सहसा असा बगूक नाय. दोघांयका समोरासमोर बसवून बोलून मार्ग काढूक व्हयो. दोघांयचे काही बाजू असतले मां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

तेका सगळाच व्हया आसा

रघुनाथ.केरकर
Fri, 08/19/2016 - 12:34 नवीन
धन्याक सगळाच कवळुचा आसा, सगळा मेळान २० एक एकर व्हयत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

केरकर, धन्याक कवळूचा आसा

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 12:47 नवीन
केरकर, धन्याक कवळूचा आसा म्हंजे? तेंच्याच मालकीचे मां ते २० एकर? तुमच्या पावण्यांक सोयी मिळूक व्हये ह्या मान्य पण धनी स्वतःच्याच मालकीचे असलेले २० एकर - असले तर - कित्या गिळात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

कुळ म्हणान नाव लागला

रघुनाथ.केरकर
Fri, 08/19/2016 - 12:58 नवीन
सात बार्‍यार कुळ म्हणान नाव लागला आसा, पावण्यांकडे २ पीढीयेंपासुन हि जमीन आसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

क्रुषकदीना नंतर दोन वर्षांनी हेन्चा नाव लागला.

रघुनाथ.केरकर
Fri, 08/19/2016 - 13:04 नवीन
क्रुषकदीना नंतर दोन वर्षांनी हेन्चा नाव लागला कुळ म्हणान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

कुळ म्हणून नाव लागला म्हंजे

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 13:06 नवीन
कुळ म्हणून नाव लागला म्हंजे काय? कूळच आसत मां ते? तुम्ही पूर्ण म्हायती नाय सांगणत हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

होय ओ , कुळच आसत ते

रघुनाथ.केरकर
Fri, 08/19/2016 - 13:22 नवीन
ते कुळच आसत, आता कुळाक काय सवलती असततं ता काय माका ठाव नाय. आनी माझ्या कडे इतकीच म्हायती आसा. फाल्या वाडीक जातलय आसय. गेलय काय परत सगळा इचारुन घेतय. पण कुळ असला तरी तेका लायट पाणी घर्कुल योजना गावक व्हयी. असा माका वाटता. कायदो काय म्हणता ता काय आपल्याक म्हायत नाय. ता सुधा तपासुन घेतय आसय सध्या. पण आता हय वीषय इलोच आसा म्हणान बोलतय, कुळ कायद्या बद्दल माहीतीपर एखादो धागो कोणी तरी काढुक व्हयो, कोकणात कुळ कायद्याच्या कचाट्यात बरेच जमीनी , जमीनींचे मालक आणी ते जमीनी खाणारी कुळा अडाकली आसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

होय, सगळी माहिती होयी, त्या

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 15:18 नवीन
होय, सगळी माहिती होयी, त्या आधारान तुमकाही प्रश्न सोडवूक मदत होयत. रवळनाथाक चिंता बाकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

देव तुमचा बरा करो

रघुनाथ.केरकर
Fri, 08/19/2016 - 16:01 नवीन
आणी सगळया मिपा वाल्यांचा पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी

एस
Fri, 08/19/2016 - 16:23 नवीन
'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी धन्यवाद. या मालिकेमुळे तुमचा संवाद समजला. :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

रात्रीस खेळ चाले

रघुनाथ.केरकर
Fri, 08/19/2016 - 16:34 नवीन
ज्यांच्या घरी कायम मालवणी बोलली जाते अशा लोकंना ह्या मालीकेतली भाषा बील्कुल आवडत नाही. आमच्या आई च्या शब्दात सांगायचं तर रात्रीस् खेळ चाले मधले उच्चार म्हणजे १४ कॅरेट मालवणी. उदा.. "माका माझ्या आयशीचे बांगड्यो हवेत" इती सुसला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ह्या बाकी खरा हा केरकरानुं..

बाळ सप्रे
Tue, 08/23/2016 - 16:47 नवीन
ह्या बाकी खरा हा केरकरानुं.. तेंचा मालवणी का कोकणी धडगुजरी वाटतां.. त्या गौरीच्या आज्येचा पन कोकणी तसाच.. भेसळ कित्या करतंत रवळनाथाक म्हायत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

नवा ट्रेंड आला आहे

रघुनाथ.केरकर
Tue, 08/23/2016 - 17:30 नवीन
पण तेंचा सुधा बरोबर आसा, अस्सल मालवणी बोलली तर ती मालीका फक्त कोकणातल्यांकाच कळतली. बाकीच्यांचा काय? मालवणी चो आजुन योक प्रकार कोकणातच बघुक गावता. एखादो मुंबयकार मुंबयसुन गावात गेलो काय गावातले तेच्या वांगडा मराठीतच बोलतले, जरी तो मालवणीत बोलत असलो तरी, आणी गावातल्याची मराठी म्हणजे भारीच. हालीची एक गजाल सांगतय, माका वेंगुर्ल्याच्या बाजारात माजो योक जुनो दोस्तदार गावलो. माका सांगता यंदा आमच्या कडे गनपतीला ये हा, ह्या वर्षी गरुडावयला गणापती हाडणार हायेत. मेल्याची भाषा आयकान हसा की रडा ताच कळाक मारग नाय. तेका होय म्हटलय आनी पाय उलचलय. हा माझा वैयक्तीक अनुभव आहे, काही अपवाद देखील असतात हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

=))

पैसा
Wed, 08/24/2016 - 13:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

इतकं वाईट बोललो काय आम्ही? =)

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 17:30 नवीन
इतकं वाईट बोललो काय आम्ही? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

नाय गो यशो, माका तर माज्या

खटपट्या
Fri, 08/19/2016 - 21:24 नवीन
नाय गो यशो, माका तर माज्या घरातल्या गजालीच वाटल्या. बाकी कुळकायद्यार कोनीतरी लीवूक व्होया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे हा जोक होता!...

एस
Fri, 08/19/2016 - 23:03 नवीन
अरे हा जोक होता!...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो की :) त्या मालिकेत इतकं

यशोधरा
Sat, 08/20/2016 - 08:54 नवीन
हो की :) त्या मालिकेत इतकं वाईट मालवणी बोलतात, त्यावरुन मीही ज्योकचा एकदमच क्षीण प्रयत्न केला.. :) कोणाही मालवणी भाषिकाला विचाराल तर त्या मालिकेच्या भाषाबेढबपणाला शिरा पडोच म्हणेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी

असंका
Sat, 08/20/2016 - 17:49 नवीन
'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी धन्यवाद. या मालिकेमुळे तुमचा संवाद समजला. :=))
अगदी मनातलं बोललात...मी तर प्रत्येक वाक्य माईच्या आवाजात ऐकून समजून घेत होतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

माझा HONGKONG मधील एक मित्र

साधा मुलगा
गुरुवार, 08/18/2016 - 12:08 नवीन
माझा HONGKONG मधील एक मित्र सांगतो कि मी दिवसातले १२-१४ तास लाप्तोप वर असतो त्यामुळे विकांताला डोळ्यावर ताण नको म्हणून मी कुठेतरी ट्रेकिंग अथवा निसर्गरम्य ठिकाणी जातो, घरचे, नातेवाईक यांचा फोन आला तरच उचलतो. वीजेच म्हणाल तर आपल्या गावी लवकरात लवकर वीज यावी अशी प्रार्थना करतो, कोकणातील माझ्या आजोळीसुद्धा १५-२० वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती पण आता विजेमुळे परिस्थिती खूप नाही पण बर्यापैकी सुधारली आहे. लोडशेडिंगची कटकट आहेच पण घरी गेल्यावर charger लावायला मिळतो, गेल्या दोन वर्षांपासून तर जरा नदीकाठी गेल्यावर मोबाईलला उत्तम रेंज मिळते. मोबाईलवर रेंज नसली तरी चालते उगा कटकट होते कधी कधी पण वीज आणि पाणी या दोन गरजा असणे मात्र आवश्यक आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी एक डॅशबोर्ड प्रसिद्ध केला होता त्यात भारतातील दुर्गम भागामध्ये वीज पोहोचवण्याचे काम कसे चालू आहे याची माहिती मिळते, यात मला वाटत फक्त विकानसशील राज्यांचा समावेश आहे , त्यात प्रगत महाराष्ट्राचे नाव दिसत नाही. यात मागे मी संपूर्ण भारताचा नकाशा बघितला होता कि त्यात त्यांनी कुठे कुठे वीज आली आहे, पोहोचणार आहे आणि पोहोचायची आहे हे झूम करून कळायचं तो आता मला सापडत नाहीये.
  • Log in or register to post comments

ते लालफीत वगैरे कायबी नसते

कंजूस
गुरुवार, 08/18/2016 - 13:40 नवीन
ते लालफीत वगैरे कायबी नसते.गावातल्या लोकांत एकी पाहिजे.आमदार नेक पाहिजे त्याने हात वर केला तर अर्ध्यातासात एसटी गावात येते आणि कितीही चिंधी रोड असेल आणि कितीही पाऊस पडला तरी फेय्रा बंद होत नाहीत.( पनवेल -धोधाणी बस ,रस्ता).चार महिन्यांत शिमिटचा भक्कम रस्ता आणि नळपाणी येते.( गव्हे रस्ता, दापोली .)सोलर दिवेसुद्धा लावून देतात.(राजमाची , ढाक गाव).उत्तम खेळणी ठेवलेली अंगणवाडी/बालवाडी देतात ( कोंडेश्वर,बदलापूर).उत्तम पॅालिटेक्निक - म्हसळा,आंबेत.
  • Log in or register to post comments

आमदार नेक पाहिजे???

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 08/18/2016 - 14:09 नवीन
?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेख आवडला.

किसन शिंदे
गुरुवार, 08/18/2016 - 15:43 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

पेडल वीज

हेमन्त वाघे
गुरुवार, 08/18/2016 - 23:33 नवीन
पेडल मारून वीज बनवली तर ? Image removed. संदर्भ http://nuruenergy.com/ http://www.alternative-energy-news.info/technology/human-powered/pedal-power/
  • Log in or register to post comments

तुम्ही मनोज भार्गवा ह्या

अमितदादा
गुरुवार, 08/18/2016 - 23:58 नवीन
तुम्ही मनोज भार्गवा ह्या अमेरिकन-भारतीय उद्योगपती च्या Billions in change ह्या प्रोजेक्ट च्या ट्रेलर ची खालील लिंक पहा. तुम्ही सांगितलेला उपायावर ते मोठ्या स्केल वर काम करत आहेत. आणखी माहिती गुगल करू शकता https://m.youtube.com/watch?v=mMfzR9Lu-os http://billionsinchange.com/solutions/free-electric
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

लेखा बरोबर प्रतिसाद हि आवडले.

अमितदादा
Fri, 08/19/2016 - 00:01 नवीन
लेखा बरोबर प्रतिसाद हि आवडले...
  • Log in or register to post comments

पहिलाच लेख असूनही सुंदर

भिंगरी
Fri, 08/19/2016 - 16:35 नवीन
पहिलाच लेख असूनही सुंदर लिहीलाय.अभिनंदन स्नेहांकिताताईला धन्यवाद तात्काळ प्रतिसादाबद्दल. मिपाचा अभिमान वाटतो तो या साठीच. कितीही दंगा करू दे पण एकमेकांच्या मदतीला तत्पर.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख...!!

असंका
Sat, 08/20/2016 - 17:51 नवीन
सुरेख लेख...!! धन्यवाद!! स्नेहांकिता तैंचा लगेच आलेला प्रतिसाद बघून थक्क व्हायला झालंय. यातून आता काहीतरी चांगलं निघू दे ही सदिच्छा!!
  • Log in or register to post comments

रघुनाथ दादा

शि बि आय
Tue, 08/23/2016 - 17:55 नवीन
रघुनाथ दादा लेखन बोर्डवर स्वागत आहे. बाकी इ उपवास कसा वाटला तेही सांगा. तुमचा आणि यशोधरांचा संवाद वाचून त्या गावातलेच दोघं बोलत असावी असे वाटले.
  • Log in or register to post comments

तप्तरता

रघुनाथ.केरकर
Wed, 08/31/2016 - 13:53 नवीन
१७ ऑगस्ट्ला हा धागा प्रकाशीत झाला, बर्‍याच लोकांनी लेखन प्रयत्नांचं कौतुक करत परीस्थीती बद्दल हळ्हळ व्यक्त केली, काहीनी पर्याय देखील सुचवले. धागा प्रकाशीत झाल्यापसुन आजमीतीस महिना देखील उलटला नसेल. पण स्नेहांकीता या आमच्या मीपा भगीनीने स्वताच्या प्रयत्नाने मांजरेकर प्रकरणात लक्ष घालुन, घटना स्थळापसुन २०० किलोमिटरहुन लांब असुन सुधा या प्रकरणात लक्षणीय प्रगती घडउन आणली. गेल्या चार वर्षात जी प्रगती झाली नव्हती ती अवघ्या १५ -१६ दिवसात झाली. आता लवकरच मांजरेकर याना वीज कनेक्शन मीळेल असं वाटतय. स्नेहांकीताजींचे खुप खुप आभार. अभीमान वाटतोय की स्नेहांकीताजीं सारखे सदस्य मीपावर आहेत.
  • Log in or register to post comments

अरेवा! अभिनंदन आणि

संदीप डांगे
Wed, 08/31/2016 - 13:57 नवीन
अरेवा! अभिनंदन आणि स्नेहांकिताताईंचे अनेक आभार, आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई! _/\_ हॅट्स ऑफ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

+१

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 13:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अरेवा. भारीच की.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 14:02 नवीन
अरेवा. भारीच की. इधर बटन दबाया, उधर उजेड पड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फ्लेक्श करा की राव... ;)

मोदक
गुरुवार, 09/01/2016 - 18:45 नवीन
फ्लेक्श करा की राव... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फ्लेक्स करेंगे लेकिन लाईट आणे

संदीप डांगे
Fri, 09/02/2016 - 17:01 नवीन
फ्लेक्स करेंगे लेकिन लाईट आणे के बाद! दिवे लागलेल्या घराचा फोटो आवश्यक आहे त्याला. दणदणीत फ्लेक्स मारु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आणि आता गाववाल्यांना सांगा.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 14:04 नवीन
आणि आता गाववाल्यांना सांगा. नुसत्या गजाल्या करन्यापेक्षा आता लाइट इलंय. मिपा मिपा खेळा. फायदा होईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

अरे वा! मस्त काम झालं.

यशोधरा
Wed, 08/31/2016 - 14:10 नवीन
अरे वा! मस्त काम झालं. स्नेहांकिता, खूप कौतुक आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

+१

नाखु
Wed, 08/31/2016 - 14:15 नवीन
असेच म्हणतो मिपाकर आणि मिपाचा विजय असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे वा!

पैसा
Wed, 08/31/2016 - 15:11 नवीन
स्नेहांकिताला खूप धन्यवाद आणि अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

जवळ जवळ एक वर्षांपूर्वी

रघुनाथ.केरकर
Mon, 08/20/2018 - 14:23 नवीन
जवळ जवळ एक वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट ला मांजरेकरांच्या घरी वीज आली. मी माझ्या वैयक्तिक कामामध्ये असल्याने मला मिपावर हा अपडेट देता आला नाही. या सर्व प्रकरणात आपल्या मिपा भगिनी स्नेहांकिता यांनी खूप मदत केली. मांजरेकरांच्या घरापासून २०० किलोमीटर लांब असून सुद्धा त्यांनी हे सगळं शक्य करून दिला. स्नेहांकिताजी नी जी काही मदत केली त्यासाठी मी स्वता आणि मांजरेकर कुटुंबीय कायम ऋणी राहू. खरंतर ह्या सगळ्या प्रयत्नांचा लेखाजोखा कागदावर उतरून इथे लिहायचा होता. पण वेळे अभावी ते जमलं नाही त्या बद्दल क्षमस्व. तसेच ह्या धाग्यावर ज्या लोकांनी आपली मते मांडली त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वांचे देव बरे करो. रघुनाथ केरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

सर्वांना धन्यवाद.

सस्नेह
Wed, 08/31/2016 - 15:57 नवीन
श्री मांजरेकर यांना वीज कनेक्शन मिळेपर्यंत त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास मी बांधील आहे, इतकेच सांगते. __/\__
  • Log in or register to post comments

क्या बात !!! तुझ्या

स्रुजा
Wed, 08/31/2016 - 19:44 नवीन
क्या बात !!! तुझ्या वेळोवेळच्या प्रतिसादा वरुन वीज मंडळ योजना करत असतं, त्यांच्या मनात पण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे इच्छा असते हे कळतंय. प्रश्न आहे तो जनजागृतीचा. ती ही होईल. हे लवकर बदलेल, असा विश्वास दिल्याबद्दल धन्यवाद. हे खरं सरकारी अधिकार्‍याचं काम ! काऊंटरच्या पलिकडच्या माणसाने नेहमीच जबाबदारीने आणि बांधिलकीने संवाद साधायचा असतो, तो तू करते आहेस त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

पाठपुरावा केल्याबद्दल अभिनंदन!!!

राघवेंद्र
Wed, 08/31/2016 - 19:52 नवीन
पाठपुरावा केल्याबद्दल अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सकारात्मक कार्याबद्दल अभिनंदन

अमितदादा
Wed, 08/31/2016 - 22:31 नवीन
सकारात्मक कार्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

तुस्सी ग्रेट हो

अनन्त अवधुत
गुरुवार, 09/01/2016 - 02:18 नवीन
पाठपुरावा केल्याबद्दल अभिनंदन!!! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा