Skip to main content

ई-उपवास

लेखक रघुनाथ.केरकर यांनी बुधवार, 17/08/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला. शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापुर स्टेशन गाठलं, स्टेशन वर पोहचुन बघतो तर काय स्टेशन ला तुफ़ान गर्दी, लोक रेल्वे रुळावर उतरले होते. दोन लोकल्स च्या मोटरमन केबीन मध्ये आंदोलन कर्त्यानी ताबा घेउन दोन्ही गाडया मध्येच थांबवुन धरल्या होत्या. बर्राचा वेळ स्टेशन वर घुटमळत राहीलो, गाडया सुटायची काही चिन्हे दीसेनात, एव्हाना २० - २५ जणांना फोन करुन तिथला आंखो देखा हाल सांगीतला. मग १०-१५ फ़ोटु वेगवेगळ्या कोनातुन काढले, आणी पाउणतास टाईमपास करुन घरी परतलो. घरी परतताना मी जरा खुशीतच होतो, त्याची दोन कारणं होती एक म्हणजे भर पगारी रजा, आणी दुसरं म्हणजे चार दीवस आलेला वीकांत. लोकांचा रेल रोको माझ्या पथ्यावर पडला होता. शुक्रवार, शनीवार, रवीवार आणी सोमवार अशी सलग चार दीवसाची रजा मिळणार होती, कोकणात रहाणार्‍या चाकरमान्याना असे प्रसंग म्हणजे "सोनीयाचा दीनु". मी सुद्धा घरी आल्या आल्या जाहिर केलं की मी गावी चाललो. एवढा मोठा विकांत आहे म्हटल्यावर मी गावी जाणरच हे आई ला अभीप्रेत असल्याने तीने फ़ार काही प्रतीक्रिया दील्या नाहीत. बायकोने मात्र प्रश्नांचा भडीमार केला, तीला थोडक्यात समजावुन घरच्यांचा निरोप घेतला.सावंतवाडीपासुन १५ कीमी वर बांदा नावाचे एक गाव आहे, त्यात आरोस बाग नावाची एक लाहानशी वाडी आहे, तीथे माझे दुरचे नातेवाईक रहातात , मला त्यांच्याकडे २ दीवसांसाठी एका कामा नीमीत्त जायचं होतं. ऑफ़ीसचा ल्यापटॉप आणी दोन जोडी कपडे, एवढच सामान घेउन निघालो. बाय रोड थेट पनवेल गाठलं, पनवेल स्टेशन वर चौकशी केली तर कळालं कि १ वाजता कुठली तरी लेट झालेली गणपती स्पेशल येणार आहे. गाडीत बसल्यावर लक्षात आलं की मोबाइल फोन ची ब्याटरी ४५% वर आलिय. आनंदाच्या भरात ब्याग भरताना, पॉवर ब्यांक घ्यायला विसरलो होतो. "हुश्शार फ़ोन" असल्याने ब्याटरी भराभरा उतरते. आणी त्यातच सकाळी रेल रोको दरम्यान केलेली फ़ोटोग्राफी आणी फ़ोनाफ़ोनी यातच ब्याटरी उतरली होती. गाडी "हॉलीडे स्पेशल" गाडी असल्याने जुने डब्बे होते, आणी त्यात सुधा जनरल डब्बा असल्याने त्यात मोबाईल चार्जींग पॉईंट नव्हते, मग सगळ्यात आधी डेटा कनेक्शन बंद केलं, मग स्क्रीन लाईट कमी केला, नेटवर्क CDMA वरुन GSM केलं. रोहा येईस्तोवर ब्याटरी २५ टक्क्यांवर आली. आता मात्र फोन बंद करावा लागला. घरी फोन करुन तसं कळवल आणी फोन बंद केला. दर दोन तासांनी फोन चालु करुन घरच्याना कॉल करत होतो. आणी त्याच मुळे सावंतवाडी येइ स्तोवर मोबाईल ने दम तोडला. ल्यापटॉप वर मोबाईल चार्ज करावा तर ल्यापटॉप सुद्धा थंड पडला होता. गुरुवारी रात्री लेकाने त्यावर उशीरा पर्यन्त कुंफ़ु पांडा पाहीला होता. त्यामुळे ल्यपटॉप ची ब्याटरी कंप्लीट ड्रेन झाली होती. आता नातेवाईकांकडे पोहोचे पर्यंत बिना मोबाइल रहावे लागणार होते, कल्पनाच डेंजर होती. गाडी रात्री साडेनऊ ला सावंतवाडी स्टेशन ला पोहोचली. शेवटची एस टी जाउन अडीच तास झाले होते, रेल्वे स्टेशन वरच्या रिक्षावाल्याना विचारलं की बांदा ,आरोसबाग येणार का? तर कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी ४०० रुपयाला एक जण तयार झाला. तो देखील बांदयातलाच होता म्हणुन तयार झाला. माझं सुदैव की त्याला माझ्या नातेवाईकंची वाडी माहीत होती. मी रिक्षात बसलो, रिक्षा बांद्याच्या दिशेने निघाली. वाटेत कीर्र काळोख होता आणी एकदम शांतता होती परीसरात फक्त अमच्याच रिक्षाचा आवाज होता. मध्येच एखाद दुसरा ट्रक हॉर्न मारुन निघुन जायचा. रिक्षा बांद्यात पोहोचली आणी डांबरी रस्ता सोडुन आमची रिक्षा कच्च्या रस्त्याला लागली. रस्ता प्रचंड खराब होता, उंटावर बसल्याचा फ़ील येत होता. एवढ्यात नेमका पाउस आला समोरची वीजीबीलीटी अवघ्या ५-७ मिटर वर येउन ठेपली. रिक्षा अगदी संथ गतीने हिंदकळत पुढे जात होती. घड्याळात ११.३० झाले होते. इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवुन म्हणाला "तुमचा घर इला हा." मी बाहेर पाहीलं तर किर्र अंधार, मध्ये मध्ये काजवे पेटत होते. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे आहे घर. तर त्याने रस्त्याच्या डावी कडे बोट दाखवलं आणी म्हणाला "ह्या काय सामक्या आसा" (हे काय समोरच आहे). इतक्यात एक माणुस रॉकेलचा दीवा घेउन आमच्या दिशेने आला. निटसं दीसत नव्हतं पण डोळे थोडे ताणल्यावर लक्षात आलं की हेच ते नातेवाइक ज्यांच्याकडे मी एवढ्या लांब आलो होतो. रिक्षावाल्याला त्याची बिदागी दीली आणी त्याला मोकळं केलं. रिक्षावाल्याने रिक्षा वळवुन माघारी जाण्यापर्यंतच रिक्शाचा आवज आणी प्रकाश होता, मग मात्र तो सुधा कमी कमी होत गेला. मग मी त्या नातेवाईक काकां बरोबर चालु लागलो. त्यांच्या मागोमाग मी एका पडवी सद्रुश्य खोलीत आलो. त्या पडवी सद्रुश्य घरात काळोख होता, कदाचीत लाइट गेले असावे असं मला वाटलं आतुन त्यांच्या पत्नी बाहेर आल्या, त्यानी अजुन मोठा रॉकेलचा दीवा आणुन एक टेबल सद्रुश्य वस्तुवर ठेवला. आणी त्या दीव्यासमोर मला बसायला एक खुर्ची ठेवली, दोन्ही कडच्या खुशाल्या वीचारुन झाल्यवर मी त्याना लाइट गेले आहेत का वीचारल तर त्या दीव्याच्या उजेडात काकांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर एक छद्मी स्मित दीसलं, मला पुढे काही जास्त बोलवेना झाल. बाहेर धो धो पाउस कोसळत होता, वातावरणात वेगळाच गारवा होता. त्यात पायाखाली शेणाने सारवलेली जमीन होती. पडवी सोडली तर बाहेर सभोवताली गच्च अन्धार होता, वेगळाच अनुभव होता तो. एवढयात गरमागरम जेवण आलं. जेवण करुन आडवा झालो. पावसाच्या आणी रातकीड्यांच्या आवाजात कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी ७ ला जाग आली, पडवीतुन बाहेर येउन पाहीलं तर पाउस थांबला होता, बाहेर उन पडलं होतं. घरा भोवती गच्च झाडी होती, चुलीवर अंघोळीचं पाणी तापत होतं. चुलीच्या धुराचा वास मला माझ्या बालपणीची आठवण देउन गेला. मग नकळत पाय चुलीकडे वळले, चुलीच्या समोर बरुन मी विस्तवाचा शेक घेउ लागलो. थोड्याच वेळात ब्रश वैगरे करुन चहा नाष्टा झाला. एवढयात घरी फोन करायची आठवण झाली. ब्यागेतुन मोबाइल काढला आणी चार्जींग करायला निघालो. चार्जर हातात घेउन भिंतीवर लाइटीचा बोर्ड शोधायला लागलो. पडवीच्या सगळ्या भींती शोधल्या पण एकही बोर्ड सापडला नाही. साधी वायरींग पण दीसली नाही. काका माझा हा कर्यक्रम टक लाउन बघत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच ते हसुन म्हणाले "लायट अजुन येउक नाय आसा. गणपती च्या नंतर येयत असा सरपंच सांगा व्हते." मी एकदम शांत झालो. मोबाइल आणी चार्जर पुन्हा ब्यागेत ठेवला. मला खुप प्रश्न पडले होते. कुठला प्रथम वीचारु हेच कळत नव्हतं. तरी सुद्धा न रहावुन मी बोललोच: मी: लायट केवा पासुन नाय आसा? काका: पैल्या पासुनच नाय आसा. मी : म्हणजे? काका: तरी ६० - ७० वर्षा झाली. मी: तुमी अर्ज करुक नाय काय? काका: गेल्यावर्षी केल्लो. सगळे कागद बनवन घेतले. मगे तो सायब बदाललो आनी ते कागद सुधा तेनी धापो केल्यान मेल्यानं. फुडल्या वाडीताकात लायट इली आसा. सरकारी बाईर सुधा पंपाक लायन इली, आमका देवकच लायट नाय आसा गवरमेंटाकडे.आमका आता सवय झाली आसा पन पावने सोयरे इले की पंचायत जाता. काकांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता. मी कल्पनाच करु शकत नव्हतो की विजेशीवाय त्या काकांच्या कुटुंबाने इतके दीवस कसे काढले. खुप अस्वस्थ वाटायला लागलं, पुढचे दोन दीवस मी विना मोबाईल, विना ल्यापटॉप काढले. दोन दीवस सतत, प्रत्येक क्षणाला मला सारखा एकच विचार यायचा की विजेशीवाय इतकी वर्ष हे लोक कसे राहीले. ज्या कामा साठी आलो होतो ते काम उरकले आणी तीसरर्‍या दीवशी पुन्हा मुंबई ला जायला निघालो, सावंतवाडीहुन कोकणकन्या पकडली, गाडितच मोबाइल आणी ल्यापटॉपचार्ज करुन घेतला. मागचे दोन दीवस मी अपघाताने का होइना पण. इ-उपवास केला. कुठल्याही प्रकारचं ईलेक्ट्रीक किंवा ईलेक्ट्रोनीक यंत्र मी ह्य दोन दीवसात वापरलं नव्हतं परतीच्या प्रवासात रात्र भर फक्त डोक्यात एकच वीचार होता, काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु? ​टीप: पहीलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखन व मांडणी मधल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.​

वाचने 49142
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

मिपावरील पहिल्या लेखनाचे अभिनंदन! लिहीत रहा. आता मिपा स्टाईल प्रतिसाद! क्रमश: लिहिणे राहिले का?
काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?
मोदीना लिहा

बापरे!! बांद्याजवळच्या वाडीत ही परिस्थिती आहे? धक्का बसला.
काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?
स्नेहांकीता ताईंना विचारले पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सावंतवाडी तालुक्यात अजुनही ३७० कुटुंबे अन्धारातच आहेत. आणी हा ऐकीव आकडा नाहीय, हि वस्तुस्थीती आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वाडी/वस्तीचा नेमका पत्ता मिळाला तर छडा लावता येईल आणि उपाययोजनासुद्धा. सध्या अशा विद्युतिकरणासाठी ब-याच सरकारी योजना आहेत.

In reply to by सस्नेह

बाय रोड जायचं असेल तर कास मार्गे जावं लागतं. कोलेभाट आणी आरोस बाग च्या मध्येच हे घर आहे. तेरेखोल खाडीच्या अगदी शेजारी ऐलतीराहुन दगड भिरकावला तर तो पैलतीरी तोरशीत(गोव्यात) पडतो.

In reply to by सस्नेह

केरकर सर उत्तम स्फुट्/लेख अजून येऊद्यात असे अनुभवी लेख.. स्न्हेहांकिता तै : आज मला कळाले वीज आधी चमकते आणि मगच आवाज येतो ते.. तुमची तत्पर सहाय्य मदत (करण्याची तयारी/भूमीका) पाहून खूप खूप आनंद झाला... मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी.. नाखु मिपाकर

In reply to by नाखु

मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी.. +१०० ब्राव्हो स्न्हेहांकितातै !

In reply to by सस्नेह

एक नंबर. आता सुषमा स्वराज मॅडमला 'भारताच्या स्नेहांकिता' असा किताब देण्याचा प्रस्ताव मिपा दरबारी दाखल करतो.

In reply to by सस्नेह

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित स्नेहांकिता - Wed, 17/08/2016 - 20:35 पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.
अश्या कश्या इतक्या तत्पर तुम्ही... ;)

छान लिहिलंत! तुमचे अनुभव लिहीत रहा. इतक्या लोकांकडे लाईट नाही तेही बांद्यासारख्या हायवेवरच्या गावात हे फार विचित्र आहे. त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काही करता येईल ना.

In reply to by पैसा

मागच्या शनीवारी कुणीतरी उपोषणाला बसले होते, पण त्याचा कही उपयोग झालेला दीसत नाही, काहीठीकाणी खुप दीवसांपासुन खांब येउन पडलेयत पण वीज आली नाही. एकीकडे सर्व ग्रामपंचायती फायबर ने जोडण्याचा काम जोरात चालु आहे, तर दुसरी कडे अजुन विजच नाही. खुप वीषण्ण करणारं चीत्र आहे. शनीवार संध्याकाळचा हा एक फोटो. Lamp

In reply to by रघुनाथ.केरकर

पण खरं सांगू का? मला तुमचं हे गाव एका अर्थी फार सुखी वाटतंय विजेसारख्या आधुनिक सुखसुविधा नाहीत तर. 'तुका म्हणे होय मनाशी संवाद| आपुलाचि वाद आपणांसी||' हे तिथे जास्त सोपं असेल असं वाटतं. :-)

कोणी सांगीतले की एक दिवस टिव्ही बघू नकोस, मोबाईल वापरु नकोस तर आपण ते मुळीच ऐकणार नाही. त्यामुळे सक्तीने का होईना उपवास केलात त्याबद्द्ल अभिनंदन ! असा एखादा दिवसाचा ई उपवास मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे. आता मुळ मुद्द्याबद्द्ल. आपल्या नातेवाईकांबद्द्ल सहानुभुती आहेच. आमच्या आजी आजोबांनी देखील आत्तापर्यंत बिना वीजेचे आयुष्य व्यतीत केले. त्यामुळे बिना वीजेचे आयुष्य थोड्या वेळेकरीता का होईना पण बर्‍याच वेळा अनुभवले आहे. ठाण्यात देखील घरी बरीच वर्षे इन्वर्टर नव्हता. दोन वर्षांपुर्वी लावला मात्र आवर्जुन टिव्ही, फ्रीज, इंटरनेट राऊटर, गीजर ई. साधनांना बॅकअप दिलेला नाही. या वस्तूंशिवाय जगायची सवय असलीच पाहिजे असे माझे मत. (इतरांच्या मताचा आदर आहेच.) वाडीवर वीज जोडणी नाहीये, ६०-७० वर्षे वीज नाहिये म्हणजे त्यांना वीजेशिवाय जगायची सवय आहे हे नक्की. पारंपारीक वीजेऐवजी सोलार चा पर्यायाचा विचार करण्याची तयारी आहे काय ? वीजेवर मासिक किती खर्च करायची त्यांची मानसिक तयारी आहे ? या मुद्द्यावर विचार करावा. सध्या मी सोलार एनर्जी विषयावर लक्ष केंद्रित करत आहे. सोलार एनर्जीचा सुरुवातीचा सेटअप अजुनही महाग आहे मात्र काही गोष्टींवर सरकार सवलत देत आहे. साधारण ५-१० हजाराच्या बजेटमधे खेड्यातल्या छोट्या घराच्या प्राथमिक गरजा भागवता येतील काय या दृष्टीने अभ्यास चालू आहे. उदा. ५ ते ७ वॅट चे १ ते २ दिवे, १ पंखा, एक मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि एखादा रेडीयो ही खेड्यातल्या छोट्या घराची गरज असू शकेल असे वाटते. हा सेटअप कमीत कमी ५ वर्षे विनातक्रार चालवता येईल काय या दृष्टीने विचार करत आहे. म्हणजे साधारण महिना १०० रु वीज बील भरणारी व्यक्ती ह्या सेवेचा लाभ घेऊ शकेल. दैनंदिन मेंटेनन्स घरातल्याच किंवा लोकल माणसाला शिकवायचा असा एकंदरीत विचार आहे. अडचणींचा आणि त्यावरील उपायांचा विचार करत आहे. हा विषय मी वेगळा धागा काढून लिहिणारच होतो. मात्र त्याअगोदरच हा धागा आला. मिपाकरांनी आपले अभिप्राय कळविले तर अभ्यासास मदत होईल. कुणाकडे सोलार सिस्टीम वापराचा अनुभव असला तर उत्तमच. साधारण दिपावलीच्या सुमारास राहत्या सोसायटीपासूनच प्रयोग सुरु करायचे ठरविले आहे. तुमच्या नातेवाईकांसारखी अशी एखादी जेन्युईन केस असेल तर केवळ प्रायोगिक तत्त्वावर ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करायची देखील तयारी आहे. साधारण २०१७ च्या सुरुवातीला पुर्णपणे यात उतरायचे ठरविले आहे. बघूया कसे जमते ते !

In reply to by धर्मराजमुटके

अरे वा मुटके साहेब, हि चांगली आयडिया आहे. 10 हजारापर्यंत तुम्ही म्हणताय तेवढी उपकरणे चालत असतील तर लै भारी. खरे सांगायचे झाले तर मलाही तेवढेच वीज लागती. दिवसभर मी हापिसात. तरीसुद्धा मी 700 रु बिल भरतो घराचे. तुम्ही याचे डिटेल्स जाहीर करा, जमेल तेवढी मदत करिन.

In reply to by धर्मराजमुटके

फार्म हाउस वर हा सेटअप नक्की उपयोगी पडेल. धागा काढून अधिक माहिती द्या

In reply to by धर्मराजमुटके

सौर उर्जे बद्दल खुप ऐकुन आहे, सुरवातीचा खर्च सोडला तर पुढे फार काही खर्च नसतो. पण मला काही प्रश्न पड्लेयत: १.पावसाळयात काय? आपल्याकडे ४ महिने पावसाळा असतो. २. मोटार वायंडींग असलेल्या वस्तुंच्या वापरावर मर्यादा येउ शकते का? ३. टेलीविजन संच चालेल का?

In reply to by धर्मराजमुटके

उत्तम प्रकल्प ! सौर उर्जेसारख्या अपारंपारिक उर्जास्त्रोताबद्दलच्या व्यावहारिक पर्यायांसंबंधी इथेच एक वेगळा धागा काढून माहिती द्यावी असे सुचवतो. अश्या पर्यायांची जेवढ्या जास्त लोकांना माहिती होईल तितके चांगले.

In reply to by धर्मराजमुटके

आपल्या प्रयोगासाठी शुभेच्छा आणि उत्सुकताही आहेच. मागे एकदा ठाण्यातील नागरिकाने सोलर आणि पवनचक्कीचा वापर करून विजेचे बिल कमी केले होते, abp माझा वर बातमी होती, त्याचा दुआ आता सापडत नाहीये.

In reply to by धर्मराजमुटके

उत्तम प्रकल्प. आमच्या शेतघरात वीज कनेक्शन मिळणे फार अवघड दिसत आहे. त्यामुळे मी दोन वर्षापूर्वी सोलार उपकरणे, वापर याचा बर्‍यापैकी अभ्यास केला होता. आणि सुमारे २/३ महिने तिथे सोलर फॅन आणि छोटे दिवे वापरून काढलेही होते. धागा काढा. तिथे ते अनुभव लिहीन.

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही अशी अवस्था पाहिली की काय म्हणावे हे कळत नाही :( मिपालेखकांत सामिल झाल्याबद्दल अभिनंदन व स्वागत !

लेख आवडलाच, पण त्या बरोबरच स्नेहांकिता ताईंची तत्काळ मदतीची तयारीही लक्षणीय आहे, आणि त्या अनुषंगाने आलेला धर्मराज मुटके यांचा सौरशक्तीच्या वापराने वीजनिर्मितीचा उल्लेखही वाचनीय. त्यांच्या प्रयत्नांत पुढे काय होतं हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

कोकाणात लायट इली पण आजुन ती सगळ्यापर्यंत पोचाक नाय, लाल फितीत अडाकली आसा असा वाटता.

In reply to by रघुनाथ.केरकर

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित स्नेहांकिता - Wed, 17/08/2016 - 20:35 पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या. प्रतिसाद द्या
स्नेहांकिता यांच्या वरच्या प्रतिसादाला, तुम्ही अजून उत्तर दिले नाहीत.

पहिलाच प्रयत्न असला तरीही छान जमले आहे. नवीन धागा कसा सुरु करावा याचे मार्गदर्शन कोणीतरी मला व्यनि पाठवून करील काय ?

In reply to by जयन्त बा शिम्पि

तुम्ही अगोदर 18/07/2015ला मुहुर्तामागचं शास्त्र ! हा धागा काढला आहात ना, तसाच नवीन धागा सुरू करायचा असतो :) ;) आता विसर पडला असल्यास माहिती : मिपापानाच्या उजवीकडच्या रकान्यातल्या "आवागमन" शिर्षकाखाली असलेल्या "लेखन करा" या पर्यायावर टिचकी मारा, काम होईल.

हौसला अफ़जाइ बद्दल सगळयांचे खुप खुप आभार.

मला महिना २५० ते ३०० च्या वर बील जात नाही. कारण गरजा कमी. शिवाय माझ्याकडे गेल्या १० वर्षाचे वापरलेल्या युनिटच्या नोंदी आहेत. एक एक्सेल शीटच बनवली आहे ज्यात रोजच्या रोज मिटरमधल्या युनिटची नोंद करुन ठेवतो. ज्याने महिना किती युनिट वापरले जातात ते समजते.) त्यामुळे भविष्यात अतिरिक्त बिल आले तरी या नोंदीनुसार ते वाजवी करुन घेवु शकतो, धर्मराजजी तुम्ही सौर उर्जा वापरलीत की एक वेगळा धागा काढा म्हणजे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल.

लेख आवडला, विशेष करून यासाठी, की अन्य कुणी कदाचित लाईट नसल्याने स्वतःचे कसे हाल झाले ते रंगवून सांगितले असते आणि उगाच अजून लाईट नाही म्हणून खोटा उमाळा काढून सरकारला शिव्या घातल्या असत्या. तुमची खरी कळकळ लेखातून पोहोचली. तसेच तुमची खरोखर त्यांना वीज मिळावी यासाठीची धडपड करायची तयारीही पोहोचली. स्नेहाताईचा प्रतिसाद पाहूनपण खूप अभिमान वाटला. धर्मराजमुटके यांच्या उपक्रमाबद्दल औत्सुक्य आहे. हे यशस्वी झाले तर अनेकांचे कल्याण होईल. त्याबद्दल शुभेच्छा.

बांद्याफुडल्या हेवा़ळेसारख्या अगदी कोपर्‍यातल्या गावात लायटी आसत आणि आरोसबागेत नाय म्हणजे अतिच झाला! गप कित्या रवलेसत लोक? आता स्नेहाताईन सांगला तसा करुन बघा. उपयोग होईत कायतरी.

In reply to by यशोधरा

आरोसबागेत लायट आसा पण मांजरेकरांचा घर वाइच फुडे आसा, महावीतरणाक धा एक पोल घालुचे लागतले. पण तेंका काय सवड गावना नाय. ह्याच नाय तर , मांजरेकारांका पाणी हाडुक सुधा एक किलोमीटर येवचा लागता,पावसाचा पाणी उकळुन पितत,दारात न्हय(खाडी)आसा, डीसेंबर पर्यंत तेचा पाणी पीउक गावता, मगे खारा जाता, गिमात मात्र १ किलोमीटर वडी काडुचे लागतत, बाय मारुक परमीशन नाय कारण सात बार्‍यार हेंचा नाव कुळ म्हणान लागला. असा तलाटी सांगता. ह्या पावसात एका पडीयेचो पारो कोसातला, तर तलाटी सांगता कि सातबार्‍यार धनीयाची नावा आसत , तेवा नुकसान भरपाइ गावाची नाय. इतक्या सगळा असान पण ते नाराज नाय आसत, समाधान जगतत, फक्त लायटीचो वीषय इलो कि मात्र भितुरल्या भितुर खदखदतत.

In reply to by पैसा

नेमके काय वाईट आहे त्याची खास काही टोटल लागली नाही, पर बिहार तो ससुरे नाम से ही बदनाम हो गईस! धनवाद हमारे लालू जी का!, बाकी राजस्थानात असले नसते हो, रस्ते वीज पाणी सब चकाचक! (ह्याचा राजस्थान आमची सासुरवाडी असण्याशी संबंध नाही, जोडणाऱ्याला भर वाळवंटात मांजर सोडतात तसे पोत्यात घालून सोडण्यात येईल)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्या नॅशनल highway वरच्या गावात ३७० कुटुंबाना वीज नाही आणि ६ महिने पिण्याचे पाणी एक किमी अंतरावरून आणावे लागते. ती कुळे असल्याने घराजवळ विहीर पाडायला परवानगी मिळत नाही. :(

In reply to by पैसा

आयला कुळे म्हणजे तापच असतो! अन तो ऑल इंडिया समान असतो, कधी कुळ म्हणून, कधी हिश्शेदार बटाईदार म्हणून तामिळनाडू मध्ये पंगाली म्हणून तर बिहारात पटीदार म्हणून!असो ते कळले, शिवाय मला वाटते कोकणात छोट्या छोट्या वाड्या एकमेकांपासून लांब अंतरावर असणे हे ही एक कारण असावे, बहुतेक गडचिरोलीकडे सुद्धा असेच आदिवासी पाडे दूर असल्यामुळे बेसिक पायाभूत सुविधा तिकडे नेणे इतर जागांपेक्षा कठीण अन खर्चिक होते अन पर्यायाने कोणीच काम करतही नाही बेटे! केरकरांच्या नातलगांकडेकडे लवकर वीज पोचावी अशी आशा करतो, अन स्नेहांकिताताईंचे कौतुक!

In reply to by रघुनाथ.केरकर

तलाठी खरो बोलतासा मां? नायतर उगा आप्लो काय्येक सांगून दितस, असा नको! कागदपत्रां बघितलेली आसत काय? धनीयांवांगडा बोलणत कित्या नाय बाय घेवचे खातर?

In reply to by रघुनाथ.केरकर

सहसा असा बगूक नाय. दोघांयका समोरासमोर बसवून बोलून मार्ग काढूक व्हयो. दोघांयचे काही बाजू असतले मां.

In reply to by रघुनाथ.केरकर

केरकर, धन्याक कवळूचा आसा म्हंजे? तेंच्याच मालकीचे मां ते २० एकर? तुमच्या पावण्यांक सोयी मिळूक व्हये ह्या मान्य पण धनी स्वतःच्याच मालकीचे असलेले २० एकर - असले तर - कित्या गिळात?

In reply to by यशोधरा

ते कुळच आसत, आता कुळाक काय सवलती असततं ता काय माका ठाव नाय. आनी माझ्या कडे इतकीच म्हायती आसा. फाल्या वाडीक जातलय आसय. गेलय काय परत सगळा इचारुन घेतय. पण कुळ असला तरी तेका लायट पाणी घर्कुल योजना गावक व्हयी. असा माका वाटता. कायदो काय म्हणता ता काय आपल्याक म्हायत नाय. ता सुधा तपासुन घेतय आसय सध्या. पण आता हय वीषय इलोच आसा म्हणान बोलतय, कुळ कायद्या बद्दल माहीतीपर एखादो धागो कोणी तरी काढुक व्हयो, कोकणात कुळ कायद्याच्या कचाट्यात बरेच जमीनी , जमीनींचे मालक आणी ते जमीनी खाणारी कुळा अडाकली आसत.

In reply to by एस

ज्यांच्या घरी कायम मालवणी बोलली जाते अशा लोकंना ह्या मालीकेतली भाषा बील्कुल आवडत नाही. आमच्या आई च्या शब्दात सांगायचं तर रात्रीस् खेळ चाले मधले उच्चार म्हणजे १४ कॅरेट मालवणी. उदा.. "माका माझ्या आयशीचे बांगड्यो हवेत" इती सुसला

In reply to by रघुनाथ.केरकर

ह्या बाकी खरा हा केरकरानुं.. तेंचा मालवणी का कोकणी धडगुजरी वाटतां.. त्या गौरीच्या आज्येचा पन कोकणी तसाच.. भेसळ कित्या करतंत रवळनाथाक म्हायत..

In reply to by बाळ सप्रे

पण तेंचा सुधा बरोबर आसा, अस्सल मालवणी बोलली तर ती मालीका फक्त कोकणातल्यांकाच कळतली. बाकीच्यांचा काय? मालवणी चो आजुन योक प्रकार कोकणातच बघुक गावता. एखादो मुंबयकार मुंबयसुन गावात गेलो काय गावातले तेच्या वांगडा मराठीतच बोलतले, जरी तो मालवणीत बोलत असलो तरी, आणी गावातल्याची मराठी म्हणजे भारीच. हालीची एक गजाल सांगतय, माका वेंगुर्ल्याच्या बाजारात माजो योक जुनो दोस्तदार गावलो. माका सांगता यंदा आमच्या कडे गनपतीला ये हा, ह्या वर्षी गरुडावयला गणापती हाडणार हायेत. मेल्याची भाषा आयकान हसा की रडा ताच कळाक मारग नाय. तेका होय म्हटलय आनी पाय उलचलय. हा माझा वैयक्तीक अनुभव आहे, काही अपवाद देखील असतात हा.