Skip to main content

टाटा नॅनो कार घ्यावी काय ?

लेखक अक्षरमित्र यांनी शुक्रवार, 05/06/2015 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे. माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे. दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत. गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा. जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये. नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत. इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा. टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.

वाचने 46930
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

आज रिकामा वेळ सापडल्याने धागा परत वाचला. एकंदर सगळे प्रतिसाद वाचून, त्यातल्या त्यात धाविघाभु श्री काळापहाड यांचे सर्वव्यापी प्रतिसाद वाचून मनात एक (छोटीशी) शंका दाटून आली. इच्चारूनच टाकतो. कापासैब, तुम्ही पूर्वी टाटा मधे नोकरीला होता का हो? आय मीन, नोकरी का सोडावी लागली वगैरे काही इतिहास आहे का? हलके घ्या, रागावू नका.

In reply to by आनंदी गोपाळ

डॉक... हा वैयक्तीक प्रश्न काय रूचला नाय ब्वा. 'हलके घ्या असे लिहून असे प्रश्न विचारणे' म्हणजे 'आपल्याला कोणीतरी असाच प्रश्न अशाच डिस्क्लेमरसह विचारण्याची परवानगी देणे' आहे असे वाटत नाही का..?

In reply to by मोदक

मोदका, धागा पूर्ण वाचून फक्त या एकाच महोदयांचे अनेक प्रतिसाद, तेही अगदी कळकळीने अँटी नॅनो दिसले. सहज वाटलं, भै इतनि खुन्नस कायको? त्यांना प्रश्न विचारला तर तो वैयक्तिक झाला. पण हा प्रश्न त्यांना नको विचारू तर कुणाला विचारता येईल? ;)

In reply to by आनंदी गोपाळ

बरोबरै.. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा टोन पटला नाही इतकेच.

कोणती गाडी घ्यावी याचा गुगलाभ्यास करताना हि website सापडली.. http://www.vahanpurchase.com/ निर्णय घेणं सोपं होते का बघा.

मी माझा भाऊ आणि आमचे वडील या तिघांत मिळून मारुती आणि टाटा च्या ९ गाड्या वापरल्या आहेत. यात नॅनो, इंडिका(पेट्रोल) सुमो आणि सफारी येतात, शिवाय मारुती ८००, अल्टो , वॅगन आर आणि स्विफ्ट येतात. टाटा च्या गाड्यांचे पत्रे आणि चॅसीस मारुतीच्या पेक्षा नक्कीच जास्त शक्तिमान आहेत त्यांचे सुटे भाग सुद्धा एकंदर जास्त स्वस्त आहेत आणि गाड्यांच्या देखभालीचा खर्च सुद्धा मारुती पेक्षा थोडासा कमी आहे.नॅनो मध्ये अल्टो पेक्षा जास्त आतील जागा आहे. अल्टोपेक्षा ए सी कितीतरी जास्त चांगला आहे.पण नॅनो स्वतःला चालवायला अल्टोपेक्षा कठिण वाटते( पॉवर स्टिअरिंग नाही आणि आहे हा फरक असल्याने) शिवाय मारुतीची इंजिने टाटा पेक्षा जास्त मुलायम आहेत. ऍव्हरेज मध्ये फारसा फरक पडत नाही. बाकी लोक काय म्हणतात याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. ज्याला नॅनो आवडेल त्याने ती घ्यावी असेच मी म्हणेन.

मी नॅनो आणि अल्टो दोन्ही वापरल्या आहेत ,नॅनोसारखी आटोपशीर गाडी नाही,अल्टोचे इंजिन स्मुथ असले तरी तीचात नॅनोएवढी स्पेस नाही हे खते आहे.लोकं नॅनो घेऊन् लेह लडाख करुन आले आहेत ,आता बोला?

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

What’s most impressive though is the phenomenal amount of space the Nano has. Legroom, both in the front and the back, can easily rival larger saloons and despite its petite exterior dimensions, it manages to be one of the most spacious hatchbacks across segments. http://www.autocarindia.com/auto-features/tata-nano-twist-vs-maruti-alt…

आमच्याकडे २ नॅनो आहेत, पहिली (Basic Model) लाँच झाली तेव्हा घेतली होती आणि दुसरी (Topend mannual) २०१५ च्या दसऱ्याला घेतली होती. दोन्ही गाड्या ताशी ५५ ते ७० प्रतिकिमी च्या वेगाने चालवल्या तर सरासरी अनुक्रमे २४, २२ चे माईलेज देतात हे अनूभवातून सागतो आहे. माझ्याकडे नवीन नॅनो असते, दर आठवड्याला अंदाजे ३०० किमीचा प्रवास होतो ( चिंचवड-सातारा-चिंचवड). आताच माझे ९७०० हजार किमी पुर्ण झालेत. अतिशय चांगली गाडी,कोणती तक्रार नाही. कसलाही इंधनाचा वास येत नाही, हा मात्र आवाज येतो पण बाहेरच्याना ! तशीही गाडी आतून आपली असते :) तुमच्या २ चाकी पेक्षा कमी सर्वीस खर्च. बिनधास्त घ्या.