Skip to main content

टाटा नॅनो कार घ्यावी काय ?

लेखक अक्षरमित्र यांनी शुक्रवार, 05/06/2015 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे. माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे. दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत. गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा. जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये. नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत. इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा. टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.

वाचने 46930
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by खटासि खट

http://www.carwale.com/marutisuzuki-cars/alto800/mileage/ माझा प्रतिसाद वरील दुव्यावरून होता.येथे सी एन जी चे मायलेज २१. ९८ दिले आहे. हि एक माझी चूक झाली कि मारुतीचे अधिकृत आकडे दिले नाहीत. http://www.marutisuzuki.com/alto800.aspx येथे ते पहा. परंतु मारुतीच्या अधिकृत जाहिरातीत तेच ३०.४६ आहे. यात केंद्र सरकारच्या वाहन विषयक नियमानुसार केलेल्या चाचण्यात मिळालेले मायलेज आहे. हे वाहनाच्या टायरची हवा बरोबर हवी. त्यातील वंगण व्यवस्थित व्हिस्कोसिटी चे हवे, बाहेरील तापमान ५-३२'सेल्सियस हवे, सरळ सपाट रस्ता, ताशी वेग ४०, वार्याचा वेग ४० किमी पेक्षा कमी गाडी ३०० किमी चालवलेली हवी अशा अनेक अटीनुसार केलेले असते. तेंव्हा या अटी प्रत्यक्ष वापरात असणे अशक्यच आहे. आणि साधारणपणे प्रत्यक्ष वापरत हे २५ ते ४० टक्के कमीच मिळते जास्त नाही. आपण एक गल्लत करीत आहात ती म्हणजे आपण आल्तो k १० ची तुलना न्यानो बरोबर करीत आहात. आपण तुलना अल्टो ८०० शी करणे आवश्यक आहे के सिरीज ची इंजिने नवीन श्रेणीतील आहेत आणि हे इंजीन खरं तर वैगन आर चे इंजिन असून ते अल्टोला लावले आहे.हे ९९८ सी सी चे इंजिन असून त्याची शक्ती ६८ बी एच पी आहे ( पहिल्यांदा हि अल्टो १.१ होती जिला वैगन आरचे १०६१ सी सी चे इंजिन होतेआणि त्याची शक्ती ६४ बी एच पी होती ).तेंव्हा मारुती अल्टो के १० ची तुलना नानो बरोबर करणे म्हणजे घोडा आणि गाढवाची तुलना करण्यासारखे आहे.

In reply to by सुबोध खरे

तुलना कशाशी करावी असं काही या धाग्यावर ठरलेय हे दिसलेलं नाही. १. मी स्पार्कचा स्वतःचा अनुभव दिलेला आहे. २८० किमी मधे फक्त घाट सोडून इतर अंतर एसी लावून. २०० किमी धरा. जर एसी नसता तर ३० च्या वर मिळाला असता मायलेज. २. मित्राची कार बहुधा हुंद्याईची आय १० होती. मी सँट्रो म्हटलेलं आहे. ३. पुण्यात आल्यानंतर सीएनजी च्या मायलेबद्दल सांगितलं असता मित्राने त्याचा अनुभव सांगितला. त्याची नवी अल्टॉ आहे. मी अल्टो असंच म्हटलेलं असताना तुमचा प्रतिसाद अगदीच जाहीर निर्भत्सना केल्याच्या थाटात आलेला दिसला. त्याबद्दल मी खंत, खेद, निषेध वगैरे लोकशाही आयुधं न वापरता फक्त फॅक्टस ठेवल्या आहेत. ४. मी दिलेली लिंक मोबाईल वरून दिलेली आहे. तीत सीएनजीचा मायलेज ३२.४ दिलेला आहे. आणखी एक दोघांचे अनुभव असेच आहेत. जुन्या कारची तुलना का करावी ? ५. मारुतीची सेलेरिओ ही १००० सीसी ची सीएनजी कार हायवेला ३१.७ इतका मायलेज देते. तिचं डिझेल वर्जन २७.८ इतका मायलेज देते. ते ७९३ सीसी इंजिन आहे. पेट्रोल चं ७९३ सीसी इंजिन २३ - २४ मायलेज देते. जर या कारला बाहेरून सिक्वेन्शिअल किट बसवून घेतलं तसुही सुद्धा निश्चित ३२ च्या पुढे मायलेज देईल. ६. आता घोडा आणि गाढवाची तुलना इथपर्यंत प्रगती झालीच आहे तर हळू पळणा-या कमी गर्दभशक्तीच्या गाढवाने कमी खाल्ल पाहीजे, तर जास्त अश्वशक्तीच्या घोड्याने जास्त खाल्लं पाहीजे. पण जर गाढव जास्त खात असेल आणि घोडा कमी खाऊन जास्त कार्यक्षमता दाखवत असेल तर विचार करायला पाहीजे, ६०० सीसी च्या कारला इंधन कमी लागेल की १००० सीसीच्या ? बाकी सगळं ठीक आहे टायर मधे हवा आहे. मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. बकरीला पिल्लं झाली. दोन कोंबड्या खुडूक झाल्या. ओढ्यावरचा पूल वाहून गेला आहे. पण आम्ही तिथपासून २५० किमी अंतरावर राहत असल्याने फारसा धोका नाही. काळजी करू नये. आपला ६०० गदर्भशक्तीचा झोपाळू नाना

In reply to by खटासि खट

६०० सीसी च्या कारला इंधन कमी लागेल की १००० सीसीच्या ?
चुकीच्या पद्धतीने विचारलेला प्रश्ण. इंजिन लाँगॅटिव्हीटी हा मुद्दा फाट्यावर मारुन जर का लिन मिक्स्चर दिलं तर १००० सी.सी. च्या गाडीला ६०० पेक्षा कमी इंधन लागेल असं ट्युनिंग करुन घेता येईल.

In reply to by खटासि खट

जाऊ द्या साहेब तुमचा इगो दुखावला असेल तर माफ करा. पण मूळ मुद्दा त्यांचे बजेट ३ लाख पर्यन्त आहे. त्यात येण्यासारखी गाडी म्हणजे नवी नानो आहे जुन्या सी एन जी अल्टो के १० पेक्षा ती बरी पडेल असे मला वाटते. राहिली गोष्ट आपण मला कारदेखो चा दुवा दिलात मी आपल्याला कारवालेचा दुवा दिला. ते सर्व इतर लोक आहेत. परंतु मारुती कंपनीचा दुवा जर ३० चे मायलेज म्हणत आहे तर कंपनी आपले मायलेज कमी का दाखवेल? बकरीला पिल्ल झाली कोंबड्या खुडूक झाल्या हा आपला इगो दुखावला असल्याची लक्षणे दाखवतात. मी मारुती कंपनीने दिलेल्या आदर्श परिस्थितीतील मायलेज मोजण्याच्या पद्धतीबद्दल लिहिले आहे. जी मोटार वाहतूक कायद्याप्रमाणे असावी लागते. अशी आदर्श परिस्थिती फक्त कागदोपत्री उपलब्ध असल्यामुळे प्रत्यक्ष शहरात मिळणारे मायलेज हे २५ ते ४० टक्के कमी असते. एका धाग्यावर हेरो च्या मोटार सायकलचे मायलेज १०३ म्हणले आहे हे असह आदर्श परिस्थितीत आहे. प्रत्यक्ष त्यांना फक्त ७०-८० इतकेच मिळते. असो मुंबईत आल्तो के १० सी एन जी ची किंमत ४ लाख ६८ हजार आहे. तेंव्हा तीन लाखाच्या आत दुसर्याने वापरलेली चांगली अल्टो के १० मिळणे जरा कठीणच आहे. म्हणून हि तुलना अनाठायी आहे असे वाटले. ४. ६८ आणि २. ५ लाखाच्या गाडीची( नानो) तुलना घोडा आणि गाढव अशी केली ती कदाचित चूक झाली पण हीच तुलना सफरचंद आणि संत्र अशी करायला हवी होती. राहिली गोष्ट आपण टोयोटा प्रायसपण सुचवू शकता.आपल्याकडे अल्टो नाही पण तरीही आपण ऐकीव माहितीवर वाद घालू इच्छिता. माझ्याकडे मारुती तसेच नानो या दोन्ही गाड्या असून मी त्यांची सर्व्हिस पासून सगळे स्वतः पाहिलेले आहे. मी सांत्रो किंवा स्पार्कबद्दल काहीच म्हणत नाही. जो माणूस त्यांना सेकंड hand गाडी विकतो तो बर्याचवेळेस त्यात काहीतरी कटकट असल्याशिवाय विकणार नाही. अशी कटकट असलेली गाडी आपण स्वानुभव नसताना का घ्यायला सांगता आहात हे कळले नाही? असो मी काही इंजिनियर नाही तेंव्हा आपण जास्त बरोबर असाल ठीक आहे माझी चूक मान्य करतो आणि वाद संपवतो

In reply to by सुबोध खरे

इगो दुखावला हे मला माहीत नव्हतं. गाढव आणि घोडा असा नॅनोचा प्रवास सुरू झाल्याने मजा केली फक्त. खरं म्हणजे आपण असा दावा करणारा मनुष्य स्वतःला फसवतोय का, की इतरांना की मारुतीला असा दावा करून १८ चं मायलेज दिलं होतं. आता आपणाला अल्टो ८०० चं मायलेजही १८ च्या पुढे असल्याचं लक्षात आलंच असेल. १८ आणि ३० मधे फरक आहे. ह्सर्वात महत्वाचं, ज्या पोस्टला आपण उत्तर देताना इतकी अ‍ॅग्रेसिव्ह भाषा वापरली आहे, त्या पोस्ट मधे ३ लाखामधे सेकंड हँड गाडी येईल असं म्हटलं आहे. स्पार्क २ लाखात मिळते. तीन लाख बजेट आहे हे ध्यानात असल्याने तसं लिहीलं होतं, ज्याला आपण अमूक तमूक तुलना करू नये असं म्हटलेलं आहे. ते कशासाठी हे अजून गुलदस्त्यातच आहे. किमान कारण तरी जाणून घ्यायचं होतं. मला नॅनो आवडत नाही म्हणून मी असा सल्ला दिला. सिंपल. मनाला लावून घेऊ नका आणि उत्तेजित होऊ नका. शुभरात्री !

In reply to by खटासि खट

स्पार्क २ लाखात मिळते कौनसे देश मे??? भौ स्पार्क ची किम्मत ४ लाखाच्या खाली नाही. http://www.carwale.com/new/quotation.aspx#pqid=130054150&t=1-3181

In reply to by सुबोध खरे

बरं इनोव्हा माझ्याकडे खरेच आहे. मी त्यांना तसं म्हटलेलं नाही कारण इनोव्हा काही तीन लाखात मिळत नाही. आपण खूप घोळ घालत आहात. मित्राने दिलेली माहीती ऐकीव आणि तुम्ही दिलेली माहीती मात्र ऑथेंटिक असा भेदभाव का बुवा ? की मित्राने इथे लिहीलं की ती लिखीत माहीती होऊन ऑथेंटिक होते ? लॉजीक कळेल का यामागचं ? मी आपल्याला एक सोडून चार ठिकाणचे दाखले दिलेले आहेत. हायवे मायलेज म्हटल्यावर शहरात किती चालते हे कशासाठी ? की हा सारा शब्दच्छल पहीली पोस्ट बरोबरच होती यासाठी ? आता पुन्हा एकदा माझी मूळ पोस्ट वाचा , त्यावर तुमचं उत्तर वाचा आणि आता काय म्हणत आहात हे ही वाचा. आपली रजा घेतो बरं का डॉक्टरसाहेब. नाहीतर आणखी काही दुखावले जाईल हो..

In reply to by खटासि खट

मित्राने दिलेली माहीती ऐकीव आणि तुम्ही दिलेली माहीती मात्र ऑथेंटिक असा भेदभाव का बुवा ? की मित्राने इथे लिहीलं की ती लिखीत माहीती होऊन ऑथेंटिक होते ? लॉजीक कळेल का यामागचं ? मी आपल्याला एक सोडून चार ठिकाणचे दाखले दिलेले आहेत. ऑथेंटिक किंवा विश्वासार्ह हि मारुती कंपनीचीच म्हणायला पाहिजे (ज्यांनी ती कार बनवली आहे) . ते तर आदर्श परिस्थितीत ३० च म्हणताहेत. वर त्याच्या खाली तारांकित डीस्क्लेमरही आहे. मग शहरात किंवा हाय वे वर ३६ देणाऱ्या मित्राचेच आपल्याला बरोबर म्हणायचे असेल तर तसं आपण मान्य करून टाकू. बाकी इनोव्हा किंवा सांत्रो किंवा स्पार्क चे येथे प्रयोजन मला कळले नाही. असू द्या. माझ्या मंद बुद्धीमुळे असेल. किंवा फाटे कसे फोडतात ते माहिती नसल्यामुळे असेल. तुम्ही म्हणता ते बरोबर हे मान्यच करून टाकू. मग ठरलं तर अल्टो ३५ ते ४० मायलेज शहरात देते. विषय संपला.

In reply to by सुबोध खरे

Adarsh paristhiti chi detonation kaay ?tumhala standard tests condition mhanyachey ka ? Aadhi १४ mhanat hota. १४ varun ३० paryant alat yabaddal thanx. ३० chya pudhe ka denar nahee ? Tumhee posts meet vachat chala. Sequential kit jast mileage deil. Adarsh paristhiti madhe kit konate. Load kiti, speed kiti he sanga.

In reply to by सुबोध खरे

. बाकी इनोव्हा किंवा सांत्रो किंवा स्पार्क चे येथे प्रयोजन मला कळले नाही. असू द्या. माझ्या मंद बुद्धीमुळे >>> Tumhala uddeshun posts lihayachya hotya ka? Dhaga kartya chya prashnala nahee ka ? Innovative cha ullekh tumheech kelat na ? Asa ka bar kartay ? Tumhee ha vishay prestige issue cha kelay. So full stop from my side. Thanks

In reply to by जिन्क्स

इनोव्हा असं टाईप केलं की मोबाईल वर कधी शब्द बदलतो कळत पण नाही. अनेक ठिकाणी ततपप केलं आहे. हा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की ब्राऊझरचा की मिपाचा हे कळेना (आताही असं होतंय पीसी वरून)

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, ८०० वापरलीय, आता अल्टो के१० वापरतो गेली २ वर्ष.
याच्या तुलनेत आल्टोची वातानुकुलन यंत्रणा जेमतेम आहे
यावर तीव्र असहमती आहे. बोन चिलिंग्ग एसी आहे गाडीचं. अ‍ॅव्हरेज म्हणाल तर १७-१९. पेट्रोल आहे.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट साहेब वर खटासि खट यांना लिहिलेला प्रतिसाद पहा आपण तीच चूक करीत आहात. अल्टो ८००च्या वातानुकूलन यंत्रणेची के १० शी तुलना होऊ शकत नाही. ४८ बिएच पी आणि ६८ बी एच पी शक्तीची इंजिने अनुक्रमे आहेत. अल्टो के १० ची मुंबईत प्रत्यक्ष किंमत ४ लाख ६८ हजार आहे. http://www.carwale.com/new/quotation.aspx#pqid=129924116&t=1-3822 हि किंमत वरच्या श्रेणीतील कार ची आहे (ए श्रेणीतील नव्हे तर बी श्रेणीतील) या किमतीला अल्टो क्घेण्यापेक्षा थोडेसे पैसे (१४% किंवा ६०,०००) ५ .२ लाख जास्त टाकून मी WAGON R पसंत करेन. http://www.carwale.com/new/quotation.aspx#pqid=129924543&t=1-2784 आता तुम्हांला मायलेज १७ ते १९ मिळते आहे.( ते अर्थातच प्रत्यक्ष आहे दाखवायचे नव्हे). ते कुठे आणी ३६ कुठे?

In reply to by सुबोध खरे

बर ८०० के १० मधली माझी गल्लत झाली. मी अल्टो के१० व्हीएक्सआय सगळ्या अ‍ॅक्सेसरीज सकट ४.०८ ला ऑन रोड घेतलीय.

In reply to by वेल्लाभट

अल्टो व्हीएक्सआयची किंमत ठाण्यात ऑन रोड ४. ३१ लाख दाखविली आहे. (पण हे पेट्रोलचे मॉडेल आहे सी एन जी नव्हे) त्यात आपल्याला मिळणारा डिसकाउंट ३० ते ३५ हजार असेल वरची किमत अ‍ॅक्सेसरीजची. असाच डिसकाउंट ( हा ३७ हजार आहे) आपल्याला wagon R ला हि मिळेल. http://www.autocarindia.com/auto-news/best-car-discounts-for-june-2015-…

In reply to by सुबोध खरे

अल्टो ८०० सीसी चा सीएनजी मायलेज http://www.cardekho.com/maruti/maruti-alto-800-mileage.htm अल्टो के १० चा सीएनजी मायलेज http://www.cardekho.com/maruti/maruti-alto-k10-mileage.htm

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर सुबोध खरे आपण आमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही के १० चा मायलेज सांगितलेला आहे. तिला अल्टोच म्हणतात. आपण फसावणुकीचा गुन्हदाखवलल करताना जे आरोप लावले आहेत त्यात मायलेजचा उल्लेख आहे. आता एसी, बीएचपी हे नवेच मुद्दे आलेले आहेत. आपला मायलेजचा मुद्दा खारीज झाला आहे का ? नव्या मुद्यांसाठी आम्ही न्यायालयात नवी सफाई देऊच. पण आधीच्या खटल्यात निर्दोष मुक्तता झाली किंवा नाही हे समजल्यास आपला आभारी राहीन. आमच्या वकिलास एक शंका आहे की के १० चा उल्लेख करू नये असा या धाग्य्वार कुठे करार, तह, एमओयू झालेला आहे का ? आम्ही सेकंड हँड कार नॅनो पेक्षा चांगली पडते असं म्हटलेलं आहे. ६०० सीसी ची कार के १० किंवा ८०० सीसी च्या इंजिनपेक्षा जास्त चांगलं कुलिंग कसं काय देईल हा एक नवा प्रश्न उपस्थित झालेला आहे. टाटाची सिएरा नावाची एक कार आलेली होती. या कारचा एसी भयंकर तापदायक होता. सुरुवातीच्या इंडीका कार्समधेही बोंब होती. एसी ही टाटासाठी नामुष्की बनलेली होती एकेकाळी. के १० ची तुलना करू नये या मुद्याशी मी सहमत नाही. तो तुमचा प्रश्न आहे.

नॅनोच्या जन्मापासूनचा प्रवास आणि या धाग्याचा प्रवास दोघांमधेही खूप सारखेपणा जाणवतोय. सुरुवातीला नॅनोच्या वाट्याला आलेली तुच्छ गाडीची इमेज बदलून ती नक्कीच चांगली होत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय या धाग्यावर जवळजवळ बर्‍याच दिग्गज मिपाकरांनी लावलेली हजेरी आणि स्वतःचे सांगीतलेले अनुभव नक्कीच उपयुक्त आहेत. थोडे दिवस अजून काही प्रतिसाद येताहेत काय हे बघून लवकरात लवकर निर्णय पक्का करतोय.

वरील सगळॅ रिप्लाय वाचले आहेत... माझ्यासारखे नॅनोबद्दल निगेटीव्ह रिप्लाय खुप कमी आहेत.. पण ज्यांनी खरे युज केली आहे त्यांचे म्हणे खरेच आहे.. त्यामुळे काही हरकत नाही... पण तरीही ३.४५ का काय कोणी म्हणाले ना.. येव्हडी किंमत दिली तर आणखिन १-२ लाख अजुन घातले तर चांगली गाडी येइल.. जिच्या मध्ये सेफ्टी जास्त असेल तुलनेने... फॅमिली बरोबर बाहेर जायचे म्हणजे सेफ्टी जास्तच हवी.. मी असे म्हणात नाही.. ५ लाखाच्या गाडीचा भरोसाच आहे, पण नॅनो पेक्षा जास्त सेफ्टी... मी आता पुन्हा नविन गाडी घेताना, पुर्ण सेफ्टी फीचर सहीत घेइन.. बाकी गाडीच्या दिसण्यावर असण्यावर थोडेफार पोझीटीव्ह निगेटीव्ह असतेच .. तुम्हाला सेफ्टी पेक्षा, फक्त सिटीमध्ये आरामात .. टुव्हीलर च्या ऐवजी गाडी हवी असेल तर नॅनोच बरोबर... पण तुम्हाला त्यच बरोबर फँमिली ट्रीप.. गावाकदे जाणे वगैरे साठी गाडी हवी तर थोडी सेफ्टी वाली जास्त चांगली.. भले तुम्ही १ वर्षांनतर गाडी घ्या पण ती योग्य घ्या ...

In reply to by गणेशा

५ लाखांच्या कोणत्या गाड्यांत कोणते सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत याबद्दल थोडी माहीती देणार का?

In reply to by गणेशा

आयला, कमीतकमी नॅनोच्या लुक बद्दल फार कमी निगेटीव्ह रिप्लाय येतात..तुमच्या सेफ्टी ची नक्की व्याख्या काय आहे ?. क्रश टेस्ट हा जर निकष असेल तर भारतात बनणा-या ४-६ लाख या रेंज मधील सर्व गाड्या यामध्ये नापास आहेत..अगदी स्विफ्ट सुध्दा..ही लिन्क बघा.. Indian Car Unsafe मुळात रतन टाटा यांना या गाडीची संकल्पना, भर पावसात एका दुचाकीवर लहान मुलांना घेऊन जाणा-या वडिलांची ताराम्बळ पाहून सुचली होती.. दुचाकीवाल्यांना स्वस्तात चारचाकी का खिशात नसावी ही मुळ कल्पना..डोक्यावर छत्र व दुचाकीला पर्याय...त्यांनी जेव्हा ही कल्पना मांडली, तेव्हा १ लाखात गाडी कशी बनेल, म्हणून टाटांना स्वता:च्या कंपनीकडूनच खूप विरोध झाला.. एक छान वाक्य आहे टाटांचे त्यांच्या इन्जीनियर्सला " जेव्हढा वेळ आणी त्रास तुम्ही मला हे अशक्य आहे, हे पटवून देण्यासाठी घेताय, त्यापेक्षा थोडा जास्त वेळ हे कसे शक्य होईल यासाठी द्या." एव्हड्या कमी बजेटमध्ये बनली म्हणून असेल, पण लक्झरी असणे हे या गाडीच्या संकल्पनेत नव्हतेच कोठे.. पण भारतात ही कल्पना रुचली नाही.. गरीबाला गरीब म्हंटलेले चालत नाही.. म्हणून मार्केटींग पुर्ण फसले... आता हीच गाडी नवीन रुपात आली..लक्झरी आहे, रिफाईनमेंट आहे.. त्यामुळे बेस्ट आहे बघा.. हीच गाडी आता घरोघरी सेकन्ड कार ची जागा नक्की घेणार यात शंका नाही...

In reply to by ब़जरबट्टू

तुम्ही म्हणता तसे असू शकते... आणि गरीबाला गरीब म्हंटलेले आवडत नाही हे वाक्य खरेच... काही हरकत नाही नॅनो नविन घेतल्यावर ... मी नॅनो वापरली नसल्याने रोखठोक काही म्हणत नाही, माझ्या सेफ्टीची व्याखा आहे असे काही नाही.. पण पुढून जर थोडीशी धडक बसली तर मागचा आणि पुढचा भाग एकच होयील ही भिती... बाकीच्या गाड्या तश्या होणार नाहीत असे नाही.. पण तुलणेने त्या नॅनो पेक्षा अधीक चांगल्या असे माझे उगाचच गाडी बघुन मत.. ओमनी गाडी पण मला ह्याच मुळे आवडत नाही... डायरेक्ट पुढे ड्रायव्हर असतो .. अल्टो गाडी उंची ला कमी आहे... बाकी जर ३.५ लाख आणि ५ ते ६ लाखात काहीच जास्त सेफ्टी फिचर चा फरक नसेल तर नॅनोच चांगली मग...

हा घ्या अजून एक नॅनोवाला रोचक धागा : :::::: नॅनो कार घेण्याचा विचार चालू आहे :::::: नॅनो खरे तर नॅनो ही वेगळी गाडी असल्यामुळे इतर "कार्स" ची तुलना उचित ठरत नाही. स्वतः वापरुन मत बनवावे. गेली चार वर्षे वापरतोय. आमचा अनुभव चांगला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

स्वतः वापरताहेत. अनुभवाचे बोल. चौ,को;साहेब, अजून माहीती द्या ना! आरामदायीपणा (सस्पेन्शन), हाय स्पीडला गाडीची स्टॅबीलीटी,अ‍ॅव्हरेज, चालवतानाचा कम्फर्ट, एसीची कार्यक्षमता, मेन्टेनन्स कॉस्ट, डीलर सर्व्हिस वगैरे.

नक्की घ्या, फक्त अ‍ॅटो ट्रांसमिशन नको कारण ३.५ लाखात अल्टो मॅन्युअल जास्त चांगला पर्याय आहे .मारुती गाड्यांचे जास्त आयुष्य, कमी देखभाल खर्च आणि चांगली रिसेल व्हॅल्यू ह्यामुळे मारूतीचे अल्टोचे पागडे (माझ्या मते) जड आहे. नॅनो अ‍ॅटो ट्रांसमिशन घ्यायची असेल तर हे अवश्य वाचा - http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/164034-tata-nano- amt-automatic-official-review.html स्लॅग्/डीले मुळे चढावावर (अगदी फ्लायओव्हर असला तरी) तारांबळ उडू शकते - खासकरून पहिल्यांदाच गाडी चालवत असाल तर! नॅनो मॅन्युअल एक खरंच उत्तम पर्याय आहे!

आमच्या बाबाची न्यानो कार आहे. त्याने ती त्याच्या बॉसकडून घेतली. त्याचा बॉस न्या म्ह्णत होता पण बाबा नो म्हणत होता म्हणून बहुतेक या कारला न्यानो असे म्हणतात. शेवटी बाबाने प्रमोशन आणि कार एकदम बॉसकडून घेतले. बॉस ने आता टोयाटो का काहीतरी घेतली आहे. पुढच्या प्रमोशनला आमच्याकडे टोयाटो असणार आहे.

एक वर्षांपूर्वी छोट्या कार्समधे टर्बोचार्जर नसायचा. हल्ली सर्रास वापर होतो. त्यामुळे इंजिनची पावर आणि मायलेज या दोन्हीमधे वाढ होते. मारुतीची नवी ६६० सीसी ची कार ४९ - ५१ सीसी इतकी अश्वशक्ती निर्माण करते. भारतात यायला अवकाश आहे. इंजिनची कार्यक्षमता हा निकष असायला हवा. किंमत हा निकष ठेवला तर हा धागा चर्चेला ठेवण्याची गरज नाही. दोन फटफट्या मधे वेल्ड केल्या आणि वरून हूड ओढलं तरी स्वस्तात कार मिळेल. कल्याण मधे डुक्कर रिक्षा मिळायची तशी कार सहज बनवून देता येईल. इंजिन ३५० सीसी. चंदीगढ मधे उप्र मधे हाताने बनवलेली रिक्षा मिळते. ती सहज कार मधे कन्व्हर्ट होईल. खूप स्वस्तात काम होईल. झालंच तर लॉनमूव्हरचं इंजिन वापरून पत्रे ठोकून कार बनू शकते. काही वर्षांपूर्वी सिक्स सीटर्स आल्या होत्या अशा.

In reply to by खटासि खट

एक चारचाकी ठेला घेऊन त्यावर खुर्ची छत्री फिट केली अन ढकलत न्यायला माणूस नोकरीवर ठेवला तर कसे राहील? अशीही सिटी ट्रॅफिकमधे कितीक स्पीडने जाते गाडी? "आमची कार" असा बोर्ड लावायचा समोर, की झाले.

धाग्याची शंभरी ओलांडली, तरी सत्कार कसा नाही झाला अजून.. जेपी भौ कुठे गेलेत? पण शंभराच्या वर प्रतीसाद होऊनही नॅनो घ्यावी की घेवू नये त्याचा उलगडा काय झाला नाही. धाग्याचा प्रवास मात्र नॅनो वरून हातगाडी पर्यंत झाला :)

In reply to by स्वच्छंदी_मनोज

मायलेज आणि सेफ्टी मध्ये गाडं अडकलंय. मायलेज मधे मारूती अल्टो सीएन्जी पुढेच असणार नेहमी. सेफ्टी मधे कोण पुढे असेल सांगता येणार नाही. अल्टो नॅनो पेक्षा जास्त सेफ आहे का?

In reply to by स्वच्छंदी_मनोज

माझ्या अंदाजाने, धागाकर्त्याला मात्र उलगडा झाला असेल, असे रिप्लाय वरुन वाटत आहे.. आलेले रिप्लाय आणि नॅनो बद्दल थोडासा घ्यावी का म्हणुन सोफ्ट क्वार्नर यामुळे ते नॅनोच घेतील असे मला ९९ % वाटते आहे.. चांगले आहे.. नविन गाडी बद्दल शुभेच्छा !..

गाडी स्वतः कधीही ६०-७० च्या पेक्षा जास्त स्पीडने चालवणार नसाल आणि गाडीच्या आजूबाजूने ६०-७० च्या पेक्षा जास्त स्पीडने जाणार्या गाड्या नसतील तर बिंधास्त घ्या वरच्या पैकी एखादी कंडिशन नसेल तर मात्र सेफ्टीचा विचार सगळ्यात आधी करा आणि मायलेजचा नंतर माझ्यामते चारचाकी घेताना खाली दिलेले मुद्दे सगळ्यात आधी विचारात घ्यावे (दिलेल्या क्रमाने) सेफ्टी (एबीएस, एअर बॅग्स, ई.) लेग स्पेस स्पेअर्स आणि सर्विसिंग सेंटर्स 1. Safety first ABS, Air bags, etc. 2. Internal usable space you may not go for long drive now...but in future you will definitely go for it 3. Spares cost and servicing cost and service center availibility Buying any car is very easy, maintaining it is difficult as well as costly या तिन्ही मुद्द्यांवर मला नॅनो कुठेच फिट्ट बसलेली दिसत नाही अजून १ महत्वाची गोष्ट, जी घरी नॅनो असणार्या कुठल्याच मिपाकराने लिहिलेली नाहिये जर कधी चुकुन माकून एखादी बाईक्/रिक्शा/चारचाकी नॅनोला हलकेच चुंबन/गळामिठी देउन गेली आणि सुदैवाने आतल्या माणसांना साधे खरचटले सुध्धा नाही तरीही बॉडीच्या दुरुस्तीचा खर्च अंदाजे किती असेल?

In reply to by टवाळ कार्टा

नॅनो कुणीतरी घेवून जाताना दिसलं की का कुणाक ठावूक, पण एक दयाभाव मनात दाटून येतो. कदाचित नॅनो घेवून कुणीच माजोरडे पणानं लेन कटींग करून चालवू शकत नाही म्हणून असावं, पन नॅनो वाले नेहमीच सज्जन माणसासारखे गाड्या चालवतात. मोठ्या गाड्या पण नॅनो ला फारसं पींपींपाँपाँ करताना दिसत नाहीत. निमूट वळसा घालून ओव्हर टेक करतात.
जर कधी चुकुन माकून एखादी बाईक्/रिक्शा/चारचाकी नॅनोला हलकेच चुंबन/गळामिठी देउन गेली आणि सुदैवाने आतल्या माणसांना साधे खरचटले सुध्धा नाही तरीही बॉडीच्या दुरुस्तीचा खर्च अंदाजे किती असेल?
मोठ्या गाडीएवढाच (इंडिका) असावा. टाटावाले (उदा: पंडित ऑटो) लुटायलाच बसलेले आहेत असा माझा माझ्या गाडीमुळं अनुभव आहे. मारूतीचे स्पेअर्स टाटा पेक्षा स्वस्त आहेत का?

In reply to by काळा पहाड

हो हो. दयाभावाबद्दल अगदी खरं आहे. "गरीब बिचारा माधुकरी" छाप नजरा झेलायची सवय झाली होती. - आमच्या हपीसातला पार्किंगवाला रखवालदार अगदी दयार्द्र मुद्रेने कोपर्‍यातली जागा देई. तिथे नॅनोव्यतिरिक्त कोणतीच गाडी बसू शकत नसे. - एकदा रिवर्स घेताना एकाची गाडी पाडली. मला वाटलं होतोय आता राडा. पण त्याने स्वतःची गाडी वगैरे उचलली आणि मागे उभा राहून मला "यूंद्या..यूंद्या..बास..." करत सुरक्षितपणे रस्त्यावर काढलं!

टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो घ्या किंवा चांगली bike घ्या! असली भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली!

In reply to by माकड

टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो घ्या किंवा चांगली bike घ्या! असली भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली! >> can we buy auto for personal use? where to buy in Maharashtra/pune?do we need special license for driving? How much does it cost?

In reply to by nanaba

खासगी वापरासाठी रिक्षा घेता येते. रजिस्ट्रेशन खासगी वापराचे केले की झाले. रिक्षाला रंग वेगळा द्यावा लागतो. पण, तीन चाकी अनस्टॅबिलिटीपेक्षा चार चाके बरी. रिक्षा एसी कशी करणार? पाऊस आत येतो म्हणून ताडपत्र्या झाकाव्या लागतात इ.

नॅनो ला नेहमी दयेच्या दृष्टीने पहिले जाईल पण गर्दी मध्ये घुसवायला , पटकन पार्क करायला नॅनो सारखी दुसरी गाडी नाही . घरात एकच गाडी वापरली जाणार असेल तर आल्तो बरी , जर दुसरी गाडी असेल तर शहरामध्ये चालवायला नानो सारखी दुसरी गाडी नाही ( रेवा आहे पण किमत काहीच्या काही आहे . )

टाटा nano घेण्यापेक्षा ऑटो घ्या किंवा चांगली bike घ्या! असली भिकार दिसणारी आणि चालणारी गाडी मी जगात पहिल्यांदा पहिली! >> can we buy auto for personal use? where to buy in Maharashtra/pune?do we need special license for driving? How much does it cost?

In reply to by nanaba

तिला काय लायसन्स लागत नाही म्हणे

In reply to by nanaba

कित्ती मोठ्ठं आहे नाही. जरा हे पहा. अशा दिसणार्‍या गाड्या जगात भरपूर आहेत. आणि चालतात ही. https://en.wikipedia.org/wiki/Mitsubishi_i-MiEV https://en.wikipedia.org/wiki/Toyota_Aygo https://en.wikipedia.org/wiki/BMW_i3

In reply to by अकिलिज

जाऊ द्या हो साहेब सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. ऐश्वर्या राय भंयकर दिसते असे म्हणणारे काही कमी आहेत का?