✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

त
त्रिवेणी यांनी
Sun, 08/07/2016 - 18:29  ·  लेख
लेख
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो. मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता. १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? आपली नम्र जोशी पुण्यात पन्गा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
मदत

प्रतिक्रिया द्या
22829 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

सोन्याबापू

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 18:38 नवीन
फारच जास्त वैयक्तिक होतंय काय?बाळाचं वय 40 आहे हे आपण विसरला आहात काय?
  • Log in or register to post comments

षटकार =))

जव्हेरगंज
Sun, 08/07/2016 - 19:24 नवीन
षटकार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

असं करा

इरसाल
Mon, 08/08/2016 - 11:51 नवीन
तुम्ही तीन वेण्यांऐवजी दोन किंवा एक वेणी बांधुन बघा ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती

अजया
Sun, 08/07/2016 - 18:40 नवीन
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे.कधी पोकल बांबू ट्राय केलाय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. लाटणं पण फार फायदेशीर या त्रासाला.
  • Log in or register to post comments

अभ्या

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 18:41 नवीन
तुम्हीच असा आयडी घेतल्यावर नवर्याने घरात दंगा केला तर काय बिघडलं? असो, मुलाला एखादी आंटी असल्यास तिच्याकडे हे प्रकरण सोपवावे.
  • Log in or register to post comments

अभ्या _____/\______ =)) =))

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/07/2016 - 18:46 नवीन
अभ्या _____/\______ =)) =)) कहर आहेस लगा तू =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

अरे बापू, मी कुठं?

अभ्या..
Sun, 08/07/2016 - 18:55 नवीन
अरे बापू, मी कुठं? हे लालगरूड उडलेत..... माझ्या सल्ल्याची कॉपी म्हनून मणून माझे नाव टाकलेत. पण प्रतिसाद जबरीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

रूपकात्मक अभ्या वर्जिनल

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/07/2016 - 19:05 नवीन
रूपकात्मक अभ्या वर्जिनल अभ्याच्या लैच जवळ गेल्याची उस्फुर्त पावती म्हणून वर्ग करणेत यावा आमचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हेहेहेहेहे पावती पावली.

अभ्या..
Sun, 08/07/2016 - 19:07 नवीन
हेहेहेहेहे पावती पावली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मी आपलं टाईमपास करत होतो ....

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 19:25 नवीन
मी आपलं टाईमपास करत होतो ..... आंटी चा अर्थ कळलेला दिसतोय __/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पोकल बांबुचा प्रयत्न करुन

त्रिवेणी
Sun, 08/07/2016 - 18:46 नवीन
पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत. आणि मुलाची आंटी अता म्हातारी झालीय.दुसर्या एखाद्या आंटीच्या ताब्यात देवुन अजुन लेनेके देने पडायचे.
  • Log in or register to post comments

ओ नो

अजया
Sun, 08/07/2016 - 18:54 नवीन
पण आजकालच्या नाटकी डायर्या लिहणार्या बायकांमध्ये तुम्ही एक वेगळी बायको दिसलात. -फटके द्यावेच लागतात ( शाब्दिक सुद्धा))
  • Log in or register to post comments

खिक्क

स्पा
Mon, 08/08/2016 - 09:24 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे

सूड
Mon, 08/08/2016 - 14:44 नवीन
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे, गुडगांव येथे एका MNC नौकरी करतो. पण त्याला हि एकच खंत आहे, त्याला कधीच मारले नाही. जेवल्या नंतर त्याचे ताट धुतल्या तांदूळा सारखे स्वच्छ असते. (माझ्या ताटात कधी कधी एखाद दुसरा तांदुळाचा दाणा राहून जातो किंवा कधी थोड खाली सांडतो). दुधी, तोराई पासून ते पालक इत्यादी सर्व भाज्या आनंदाने खातो. फरक एकच आमची सौ. नौकरी करत नव्हती. अवांतर आज घरात धिंडवडे व सोबतीला बैरी पुदिन्याची चटणी आणि लाल भोपळ्याचा रायता असा बेत आहे. (नाग पंच मी टुडे). -अनेकतिर्‍हाईत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

=))

पैसा
Sun, 08/07/2016 - 18:55 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

बाब्बो,,, मरतेय हसून:)

पियुशा
Sun, 08/07/2016 - 18:59 नवीन
बाब्बो,,, मरतेय हसून:)
  • Log in or register to post comments

नवर्याच्या

मनिमौ
Sun, 08/07/2016 - 19:01 नवीन
वागण्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्या सुचना सतत देत रहा.आणी नवरे लोकाकडे जन्म जात नाटकीपणा असल्याने तो कमी होईल की नाही हे सांगु शकत नाही
  • Log in or register to post comments

छान. (मिपावर असा जीवंतपणा हवा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/07/2016 - 19:03 नवीन
>>>> १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? स्वतःवर कंट्रोल ठेवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खिक्क!

जव्हेरगंज
Sun, 08/07/2016 - 19:25 नवीन
कहर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या प्रॉब्लेम साठी

सामान्य वाचक
Sun, 08/07/2016 - 19:07 नवीन
झेन यांनी 5 वर्ष साठी सांगितलेला उपाय चालणार नाही ना ?
  • Log in or register to post comments

अस सतत मारल्याने णवरे निगर

पियुशा
Sun, 08/07/2016 - 19:08 नवीन
अस सतत मारल्याने णवरे निगर गट्ट होतात त्यांच्या कला कलाने घ्या;)
  • Log in or register to post comments

=))

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/07/2016 - 19:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

तुला काय अन्भव आहे गं?

रेवती
Sun, 08/07/2016 - 20:10 नवीन
तुला काय अन्भव आहे गं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

रेवती ताई अग यु नो समाजकार्य

पियुशा
Sun, 08/07/2016 - 21:10 नवीन
रेवती ताई अग यु नो समाजकार्य ,सुपारी घेते मी ईथे पोकळ बांबूचे फटके देऊन मिळतील ( मला पडायच्या आत पळते मी;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

झेन (एस्टीलो)

अभ्या..
Sun, 08/07/2016 - 19:13 नवीन
आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात पण रिझल्ट पक्का. त्याला एका भाईची गरज आहे.
  • Log in or register to post comments

नाय रं अभ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/07/2016 - 19:16 नवीन
>>>>> की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? अभ्या आपल्या कोनाडा या शाळेत घेऊ किमान समजूतदार तरी होतील ते..... ;) -दिलीप बिरुटे (कोनाडा संस्थापक अध्यक्ष) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ???

अभ्या..
Sun, 08/07/2016 - 19:23 नवीन
शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ????? सर तुम्ही स्वतः चालते बोलते विश्वविद्यालय आहात. साक्षात वाचस्पती की बृहस्पती काय ते आहात. शाळा म्हणून डिमोशन नका ओ करु. (मी परमनंट ना आता?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमती चपराशी पदोत्सुक बापू

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/07/2016 - 19:24 नवीन
सहमती चपराशी पदोत्सुक बापू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

त्याला एका भाईची गरज आहे

भीडस्त
Mon, 08/08/2016 - 09:18 नवीन
त्याला एका भाईची गरज आहे मा अभ्याजी टंकलेखन करता करता ब ऐवजी चुकून भ तर नाही ना टाईप केलात ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

१.मी नक्की काय करावं की

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/07/2016 - 19:14 नवीन
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? जमल्यास नवऱ्याला स्वतःहून गिफ्ट म्हणून (वाडधीव्हस, यानवर्सरी साधून) जब्रा, बोस, क्रिएटिव्ह चे हेडफोन द्यावे, (किंवा स्वतःला तरी ते विकत घ्यावे), अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा, हे सगळे जर धोंड्याच्या वाणात जमवून आणलेत तर नवरा नुसता प्यासीवच होणार नाही तर "आपल्या मम्मी पप्पांचा" कमरेत वाकवाकून आदर ठेवेल, हे निश्चित समजा, शिवाय हा उपाय पर्मनंट आहे, नवरा जरा आऊट ऑ लाईन जाताना दिसला की सरळ कन्सोलची रिमोट किंवा साऊंड सिस्टिमचा ऑडिओ केबल वगैरे लपवून ठेवावा, शून्य मिनिटात परत तुमचा आज्ञाधारी टॉमी होईल.! (स्वानुभव नाही, भोचकपणे करणाऱ्या विरुद्ध शिस्तीत डिटेल धावा पोजिशन घेऊन बसलोय ह्याची नोंद घ्यावी ही विनंती) आपल्या शिव्या हाच आमचा आहेर! अजिबात कळवू नये!
  • Log in or register to post comments

आण्भवाचे बोल काय बाप्पू???

अभ्या..
Sun, 08/07/2016 - 19:26 नवीन
आण्भवाचे बोल काय बाप्पू??? जियो वहीनी. क्या तरीका ढून्ढा है. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

जौ द्या नको तोंड उघडायला!

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/07/2016 - 19:32 नवीन
जौ द्या नको तोंड उघडायला! (तोंडाला कुलूप स्मायली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कौन वाहिनी बी हायेत का

महासंग्राम
Mon, 08/08/2016 - 12:44 नवीन
कौन वाहिनी बी हायेत का मिपावर.... खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मधेच येऊन वाचते! आता गपा!

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 08/08/2016 - 17:36 नवीन
मधेच येऊन वाचते! आता गपा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

बर. तुम्ही हिते लै चांगले

अभ्या..
Mon, 08/08/2016 - 17:38 नवीन
बर. तुम्ही हिते लै चांगले चांगले लिहता आणि बायकोला बिल्कुल घाबरत नाहित असेच सांगतो. (आल्या तर) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बायकोला वाचायला देतो

भुमन्यु
Mon, 08/08/2016 - 15:42 नवीन
"अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा,"
कालच विचारत होती कि वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

=)))

यशोधरा
Sun, 08/07/2016 - 19:15 नवीन
=)))
  • Log in or register to post comments

माई मोड ऑन

मितभाषी
Sun, 08/07/2016 - 19:22 नवीन
माई मोड ऑन ४० म्हणजे लहान च की . बाकी तुझ्या खोडी सांगितल्या नाहीत नेहमीप्रमाणे . माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments

एकांगी

तिमा
Sun, 08/07/2016 - 19:23 नवीन
एकांगी सल्ले देणे सोपे आहे. पण बायको, सासू,सासरे यांची एकजूट पाहिजे. बायकोने फटकारल्यावर नवर्‍याने आई, बाबांकडे अभय मागायचे, असे झाले तर कठीण आहे. शाब्दिक फटके देणे चुकीचे आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन पोकल बांबूचे फटके दिले तर हे बाळ ताळ्यावर येईल.
  • Log in or register to post comments

मुक्त विहारि

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 19:31 नवीन
एक पुस्तक विकत घ्या आणि घरात देवाच्या फोटोच्या जागी लावा. (हा वाक्प्रचार आहे.शब्शः अर्थ शोधत बसू नका.आमच्या देव्हार्यात पुस्तकेच असतात.) "आमचे हे माझ्या मुठीत" लेखक माई
  • Log in or register to post comments

बदला.

एस
Sun, 08/07/2016 - 19:32 नवीन
बदला.
  • Log in or register to post comments

अरेरेरेरेरे मराठी की हिंदी?

अभ्या..
Sun, 08/07/2016 - 19:34 नवीन
अरेरेरेरेरे मराठी की हिंदी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

व्हॉटेव्हर वर्क्स! ;-)

एस
Sun, 08/07/2016 - 22:38 नवीन
व्हॉटेव्हर वर्क्स! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=)))

सस्नेह
Mon, 08/08/2016 - 10:42 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बदला लूंगी

चतुरंग
Mon, 08/08/2016 - 11:29 नवीन
आठवलं!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी-सौरभ

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 19:34 नवीन
तुमच्या नवर्याचा दिवसातला किती वेळ मित्र मैत्रिणीं बरोबर जातो? मला असं वाटतं की तो त्याचा स्टॅमिना कुठे गुंतवत नसल्याने असे होत असावे. पूर्णतः अननुभवी सौरभ
  • Log in or register to post comments

खल्लास =)))))))

मितभाषी
Sun, 08/07/2016 - 19:39 नवीन
=)म))) =)) =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

विवेकपटाईत

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 19:38 नवीन
१. नवर्याची जिद्द पूर्ण करू नका आणि मारू हि नका. पहिल्यांदा थोडा त्रास होईल. पण एकदा त्याला कळले कि जिद्द करून काही फायदा नाही. तो आपसूक शांत होईल. २. त्याने मागितलली आवाक्यात असलेली वस्तू नंतर काही दिवसांनी त्याला आणून द्या. ३. खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी लागते. सुरवातीला तास भर वाट तरी काही हरकत नाही. १०-१५ दिवस त्रास होईल. नंतर हा हट्टीपणा कमी होईल. १००% ग्यारंटी वाला हा उपाय आहे. माझ्या सौ. ने हाच वापरला होता. आज मी ताटात कधी एक कण टाकत नाही.
  • Log in or register to post comments

लाल

तिमा
Sun, 08/07/2016 - 19:40 नवीन
नवरा जर लेफ्टिस्ट (डावरा) असेल तर त्याला लाल गरुडाची भीति घाला.
  • Log in or register to post comments

निषेढ....

लालगरूड
Sun, 08/07/2016 - 19:45 नवीन
निषेढ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा