Skip to main content

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

लेखक त्रिवेणी यांनी रविवार, 07/08/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो. मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता. १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? आपली नम्र जोशी पुण्यात पन्गा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23077
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

भारी विडंबन! लालगरूडाचे प्रतिसादही भारीच!

अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे) एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.

अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे) एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.

In reply to by इशा१२३

म्हणजे जेव्हा लग्न लागतं तेव्हा तो पाळण्यात असतो म्हणायचयं का आपल्याला . अ.भा.गुडघ्यात मेंदु संघटना विरोधक

In reply to by लालगरूड

विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा. मुलाचं वय जेवढं तेवढं माणसाचा बाप या पदवी चं वय असतं तसंच लग्न झाल्या पासून तो माणूस नवरा या पदवी ला पात्र होत असल्याने जेवढी वर्षं लग्नाला तेवढी नवरेपदाला.

प्रर्थमतः उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. काय करणार? पाणी तुंबलेले होते. निचरा होता होता उशीर झाला. मूळ प्र्श्न नवरा आधी पासुन ह्ट्टी होता का? का आत्ता आताशी झाला. असो. इलाजः तुम्ही एक स्ट्राँग इंसेंटीव डिसइंसेंटीव कार्यक्रम हातात्य घ्या. ह्ट्ट केला की डिसेंसेंटीव, हट्ट सोडला की इंसेंटीव. आणि ह्यात सुद्धा कायम बदल ठेवा. तोच तोच पणा आला तर प्रॉब्लेम पुन्हा येण्याची शक्यता असते. किंवा "क्रेल" वापरा. त्याने हट्ट केला तर त्याच्यापेक्षा मोठा हट्ट तुम्ही करा.(तो तुमचा हक्क आहे) ह्या पद्धतीने सर्व "तुंबाजी खोत" सुतासारखे सरळ होतात.

भारी विडंबन आणि त्यावर लालगरुड सरांनी मारलेल्या भरार्या आवडल्या. एकदम अचुक लक्षवेध पैजारबुवा,

केवळ शाब्दिक फटके देऊ नका त्याने नवरूबाळ निगरगट्ट होतात बाळ झोपले की फॅन बंद करणे भांडी चुकून पाड़ने .बातम्या बघतना मिक्सर लावणे पोरांवर जोरात ओरड़ने.लेकि बोले छाप टोमने पोराना मारने याने फरक पड़तोय का बघा

लालगरुड सरांनी ? सर हे फक्त प्रा.डॉ. यांनाच म्हणतात, अशी समजूत होती.

बाळाला पाठिशी घालणार्‍या त्याच्या आईबाबांना इटलीच्या प्रवासाला पाठवून देणे. तुलाही पुण्य घडेल. आणि तुझ्या साबा इटलीमधे हरवल्या तर दुधात साखर पडेल.

In reply to by पैसा

साबांना आता फ्रेंच रिव्हिएराची स्वप्नं पडत आहेत म्हणे.तिथे हरवाल का असं त्या विचारत असताना इशाने ऐकुन पियुला सांगितलं असं भुमी म्हणत होती. खखो मोनु जाणे ;)

In reply to by पैसा

पै तै अग काय सांगु तुला. त्या जर्मनीला हरवल्या होत्या पण आल्या परत घरी. तिथल्या पोलिसांच,लोकांच कामच तत्पर न.

भूमिका तपासा @ माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. जग हि रंगभूमी आहे . तुमचा नवरा '' हट्टी आणि नाटकी '' नवऱ्याची भूमिका करत आहे तुमची भूमिका समजून घ्या . भूमिका रंगवताना आनंद झाला पाहिजे संयम संपणे आणि शाब्दिक फटके मारून आनंद होत नसून वाईट वाटत असेल तर भूमिका समजली नाही हे उघड आहे अलका कुबल चे सिनेमे वारंवार पाहून बायकोची निराळी भूमिका समजू शकेल असे तज्ञ् लोक सांगतात

१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? त्याच्याशी जरा चांगले वागुन बघा. नवरा आहे तो. तुमच्या ऑफिसमधला प्युन नाही आहे. जरा प्रेमाने, हसुन, न करवादता बोला, त्याच्या घरच्यांची काळजी घ्या, आईवडिलांचा मान ठेवा, फरक पडेल कदाचित. २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? इतर समजुतदार बायकांसारखे वागायचा प्रयतन करा. अवघड जाइल थोडे सुरुवातीला, त्रासही होइल. पण तेच हिताचे आहे हे कळुन येइल. पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत. काउंन्सेलर्सची मदत घ्या. नाहितर सरळ डिव्होर्स लॉयर शोधा. काउंसेलर अर्थात तुमच्यासाठी आणी वकील तुमच्या नवर्‍यासाठी. पोकळ बांबु आणी लाटणांचा सढळ हस्ते उपयोग दोन्ही बाजुंनी होत असेल तर तुम्हाला दोघांनाही मानसोपचारांची फार गरज आहे असे सुचवेन.

98

99

100

अशा रितीने त्रि ची शंभरी भरली आहे. अखिल जालीय सासू संघटनेकडुन एक गेमिंग कन्सोल,एक हेल्मेट ,चिलखत आणि एक हेडफोन देऊन त्रि च्या नवर्याचा मालकांचा त्यांच्या धैर्याला सलाम म्हणून सत्कार करण्यात येत आहे ;)

;)

हिकडं बी धुडगूस.

=))