Skip to main content

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

लेखक त्रिवेणी यांनी रविवार, 07/08/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो. मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता. १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? आपली नम्र जोशी पुण्यात पन्गा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23077
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

फारच जास्त वैयक्तिक होतंय काय?बाळाचं वय 40 आहे हे आपण विसरला आहात काय?

In reply to by लालगरूड

तुम्ही तीन वेण्यांऐवजी दोन किंवा एक वेणी बांधुन बघा ???

आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे.कधी पोकल बांबू ट्राय केलाय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. लाटणं पण फार फायदेशीर या त्रासाला.

तुम्हीच असा आयडी घेतल्यावर नवर्याने घरात दंगा केला तर काय बिघडलं? असो, मुलाला एखादी आंटी असल्यास तिच्याकडे हे प्रकरण सोपवावे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे बापू, मी कुठं? हे लालगरूड उडलेत..... माझ्या सल्ल्याची कॉपी म्हनून मणून माझे नाव टाकलेत. पण प्रतिसाद जबरीच.

In reply to by अभ्या..

रूपकात्मक अभ्या वर्जिनल अभ्याच्या लैच जवळ गेल्याची उस्फुर्त पावती म्हणून वर्ग करणेत यावा आमचा प्रतिसाद

पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत. आणि मुलाची आंटी अता म्हातारी झालीय.दुसर्या एखाद्या आंटीच्या ताब्यात देवुन अजुन लेनेके देने पडायचे.

पण आजकालच्या नाटकी डायर्या लिहणार्या बायकांमध्ये तुम्ही एक वेगळी बायको दिसलात. -फटके द्यावेच लागतात ( शाब्दिक सुद्धा))

In reply to by स्पा

माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे, गुडगांव येथे एका MNC नौकरी करतो. पण त्याला हि एकच खंत आहे, त्याला कधीच मारले नाही. जेवल्या नंतर त्याचे ताट धुतल्या तांदूळा सारखे स्वच्छ असते. (माझ्या ताटात कधी कधी एखाद दुसरा तांदुळाचा दाणा राहून जातो किंवा कधी थोड खाली सांडतो). दुधी, तोराई पासून ते पालक इत्यादी सर्व भाज्या आनंदाने खातो. फरक एकच आमची सौ. नौकरी करत नव्हती. अवांतर आज घरात धिंडवडे व सोबतीला बैरी पुदिन्याची चटणी आणि लाल भोपळ्याचा रायता असा बेत आहे. (नाग पंच मी टुडे). -अनेकतिर्‍हाईत

=)) =)) =))

वागण्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्या सुचना सतत देत रहा.आणी नवरे लोकाकडे जन्म जात नाटकीपणा असल्याने तो कमी होईल की नाही हे सांगु शकत नाही

>>>> १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? स्वतःवर कंट्रोल ठेवा. -दिलीप बिरुटे

In reply to by रेवती

रेवती ताई अग यु नो समाजकार्य ,सुपारी घेते मी ईथे पोकळ बांबूचे फटके देऊन मिळतील ( मला पडायच्या आत पळते मी;) )

आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात पण रिझल्ट पक्का. त्याला एका भाईची गरज आहे.

In reply to by अभ्या..

>>>>> की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? अभ्या आपल्या कोनाडा या शाळेत घेऊ किमान समजूतदार तरी होतील ते..... ;) -दिलीप बिरुटे (कोनाडा संस्थापक अध्यक्ष) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ????? सर तुम्ही स्वतः चालते बोलते विश्वविद्यालय आहात. साक्षात वाचस्पती की बृहस्पती काय ते आहात. शाळा म्हणून डिमोशन नका ओ करु. (मी परमनंट ना आता?)

१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? जमल्यास नवऱ्याला स्वतःहून गिफ्ट म्हणून (वाडधीव्हस, यानवर्सरी साधून) जब्रा, बोस, क्रिएटिव्ह चे हेडफोन द्यावे, (किंवा स्वतःला तरी ते विकत घ्यावे), अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा, हे सगळे जर धोंड्याच्या वाणात जमवून आणलेत तर नवरा नुसता प्यासीवच होणार नाही तर "आपल्या मम्मी पप्पांचा" कमरेत वाकवाकून आदर ठेवेल, हे निश्चित समजा, शिवाय हा उपाय पर्मनंट आहे, नवरा जरा आऊट ऑ लाईन जाताना दिसला की सरळ कन्सोलची रिमोट किंवा साऊंड सिस्टिमचा ऑडिओ केबल वगैरे लपवून ठेवावा, शून्य मिनिटात परत तुमचा आज्ञाधारी टॉमी होईल.! (स्वानुभव नाही, भोचकपणे करणाऱ्या विरुद्ध शिस्तीत डिटेल धावा पोजिशन घेऊन बसलोय ह्याची नोंद घ्यावी ही विनंती) आपल्या शिव्या हाच आमचा आहेर! अजिबात कळवू नये!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बर. तुम्ही हिते लै चांगले चांगले लिहता आणि बायकोला बिल्कुल घाबरत नाहित असेच सांगतो. (आल्या तर) ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

"अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा,"
कालच विचारत होती कि वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे.

=)))

माई मोड ऑन ४० म्हणजे लहान च की . बाकी तुझ्या खोडी सांगितल्या नाहीत नेहमीप्रमाणे . माई मोड ऑफ

एकांगी सल्ले देणे सोपे आहे. पण बायको, सासू,सासरे यांची एकजूट पाहिजे. बायकोने फटकारल्यावर नवर्‍याने आई, बाबांकडे अभय मागायचे, असे झाले तर कठीण आहे. शाब्दिक फटके देणे चुकीचे आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन पोकल बांबूचे फटके दिले तर हे बाळ ताळ्यावर येईल.

एक पुस्तक विकत घ्या आणि घरात देवाच्या फोटोच्या जागी लावा. (हा वाक्प्रचार आहे.शब्शः अर्थ शोधत बसू नका.आमच्या देव्हार्यात पुस्तकेच असतात.) "आमचे हे माझ्या मुठीत" लेखक माई

तुमच्या नवर्याचा दिवसातला किती वेळ मित्र मैत्रिणीं बरोबर जातो? मला असं वाटतं की तो त्याचा स्टॅमिना कुठे गुंतवत नसल्याने असे होत असावे. पूर्णतः अननुभवी सौरभ

१. नवर्याची जिद्द पूर्ण करू नका आणि मारू हि नका. पहिल्यांदा थोडा त्रास होईल. पण एकदा त्याला कळले कि जिद्द करून काही फायदा नाही. तो आपसूक शांत होईल. २. त्याने मागितलली आवाक्यात असलेली वस्तू नंतर काही दिवसांनी त्याला आणून द्या. ३. खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी लागते. सुरवातीला तास भर वाट तरी काही हरकत नाही. १०-१५ दिवस त्रास होईल. नंतर हा हट्टीपणा कमी होईल. १००% ग्यारंटी वाला हा उपाय आहे. माझ्या सौ. ने हाच वापरला होता. आज मी ताटात कधी एक कण टाकत नाही.

नवरा जर लेफ्टिस्ट (डावरा) असेल तर त्याला लाल गरुडाची भीति घाला.

एकांगी उपदेश करणे सोपे आहे. पण नवर्याला शिस्त लावायची असेल तर सगळ्या वडिलधार्यांची एकजूट पाहिजे. नाहीतर बायकोने मारल्यावर सासू/ सासरे यांच्याकडे अभय मिळते, हे कळले की नवरे जास्त हट्टी होतात.मारणे चुकीचे आहे पण हट्ट केल्यावर सगळ्यांनी समजावणीचा एकच सूर लावला पाहिजे.

तुम्हाला होणारा त्रास आऊटसोर्स करा. म्हणजेच स्वतःहून नवर्‍याचं दुसरं लग्न लावून द्या. तुमचा त्रास वाचेल.

धन्यवाद मंडळी तुमचे अमुल्य सल्ले असल्यामुळे नक्कीच मदत होईल. @श्रीगुरुजी हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.

काहीही करा, पण मारू नका नवर्याला. (किंवा मोठं भांडण झाल्यावर मग त्याने कानाखाली जाळ काढल्यास वाईट वाटून घेऊ नका.) - रडूबाळ

त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ' मोड वरून जी प्रगती केली आहे ती निच्छित च कवतुकास्पद आहे. ;)

त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ' मोड वरून जी प्रगती केली आहे ती निच्छित च कवतुकास्पद आहे. ;)

अशा रितीने धाग्याने पन्नाशी गाठल्यामुळे त्रिवेणी यांचा लाटणं आणि पोकळ बांबू मारुन देऊन सत्कार करण्यात येत आहे

धाग्याची शंभरीही गाठून देता येईल पण 'धागा खरा आहे की गंमत म्हणून काढलेला?' हा प्रश्न पडलाय म्हणून गप्प बसण्यात येत आहे. धागाकर्तीने घाईघाईने आभार मानल्याने कन्फूजन वाढले आहे.

की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
मुळात तुम्हाला या गृहितकात काहीच चूक वाटत नाही? ; समजूतदार नवरा हे ऑक्सीमोरॉन आहे! ;)

दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत. त्यामुळे उपाय असे काही असूच शकत नाही. मुल मोठ होण्याची वाट बघा. सर्वसाधारणपणे आईने शिक्षा केली की मुलं soft corner मिळेल अशा ठिकाणी धावतात. ते या केसमध्ये देखील दिसत आहे. तरी soft corner नसताना शिक्षा करा. नाहीतर... वयात आल्यावर आपणहून अक्कल येईल याची वाट बघा.