Skip to main content

पुन्हा झकीर नाईक

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 08/07/2016 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU

वाचने 59011
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतील
ROFL

झाकीर नाईक याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्याला आपली गीता पाठांतर आहे पण या पाठांतराला तो ज्ञान समजतोय. विचित्र माणूस आहे, काहीही बरळतोय. जाताजाता : नाईक म्हणजे मूळ मराठी का? म्हणजे मुस्लिमांनी जबरदस्तीने धर्मांतर केले असावे आणि खापरपणजोबा / पणजोबां पासून चालत आलेल्या धर्माला स्वतःचा धर्म मानतोय का?

In reply to by जगप्रवासी

पाठांतर चांगले असणार्‍यांना सोईस्कर तेवढे उधृतकरणे कठीण नसते, लोक पाठांतराला दाद देत असतात त्यातील विश्लेषण तर्कपूर्ण असेलच असे नाही किंबहूना बर्‍यापैकी तर्कदोष असू शकतात. ह्या लेख दुव्यात त्यांच्या काही तार्कीक उणीवा मुद्देसूद खोडलेल्या दिसतात लेख पटतोय का बघा. ते मुंबईतले आणि व्यवसायाने डॉक्टर होते, कोणातरी साऊथ आफ्रीकेतील मूलतत्ववादी विचारवंताच्या प्रभावा खाली आले असावेत. व्यक्तिगत माहिती पेक्षा त्यांचे मुद्दे तर्कशुद्धपणे खोडले जाणे महत्वाचे, असो.

In reply to by जगप्रवासी

https://www.youtube.com/watch?v=rIJ_3BccAIU ह्यात तो म्हणतो की तो मराठी समजू शकतो पण बोलू शकत नाही. अवांतरः अनेकदा असे आढळते की मूळचे महाराष्ट्रातले मुस्लिम अट्टाहासाने उर्दू बोलतात जे अत्यंत भ्रष्ट, मराठीची सरमिसळ असणारे असते. मुस्लिमाने घरात मराठी बोलले तर तो बाटेल असा गैरसमज त्यांनी करुन घेतला आहे का देव जाणे! वास्तविक, बाहेरच्यांशी बोलताना ह्यातले कित्येक लोक अस्खलित मराठी बोलतात पण घरी नाही. दक्षिणेतील तमिळ, मल्याळी मुस्लिम सर्रास तमिळ वा मल्ल्याळी बोलतात. मोडकी तोडकी उर्दू बोलत नाहीत. मुस्लिमांची धार्मिक भाषा अशी कुठली असेल तर ती नि:संशय अरबी हीच आहे. उर्दू वा अन्य कुठली नाही तरी स्थानिक भाषेपेक्षा उर्दूला भारतातील अनेक भागातील मुस्लिम जास्त जवळची मानतात.

In reply to by हुप्प्या

मुस्लिमांशी संबंध आलेला आहे. कोकणी मुस्लिम आपल्या भाषेला दालदी भाषा असं म्हणतात असं त्यांच्याकडूनच कळलं. मराठवाड्यातील मुस्लिम (परभणी, नांदेड इथले) आपल्या भाषेला दख्खनी उर्दू म्हणतात. त्यांच्यातल्या कुणीही मराठी आपली भाषा असल्याचं म्हटलं नाही, मराठी येत असलं तरी. महाराष्ट्रातल्या बाकीच्या भागातील मुस्लिमांबद्दल माहित नाही.

In reply to by जगप्रवासी

हेच म्हणतो आहे मी, त्याने केलेले वादविवाद बघितले (ऐकले)तर याची प्रचिती येईल. विचारलेल्या अपेक्षित प्रश्नाना उत्तर देण्यापेक्षा त्या विषयाला दळने जास्त पसंद करतो तो. हिंदू वा किरिस्ताव पैकी असाच कोणी भांड जर त्याच्या विरोधात वादविवादाला उभा राहीला तर कपिल कॉमेडी नाइटपेक्षा विनोदी कार्यक्रम होऊन जाईल

श्रीगुरुजी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १. >> अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना? २. >> पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. नग्नपूजा हिंदूंच्या कुठल्याही भक्तीग्रंथांत नाही. हां, तांत्रिक विधी असू शकतो. पण भक्तीमार्गाने जाणाऱ्याने तांत्रिक साधना करायची नसते. नग्नपूजेस शास्त्राधार नाही. ३. >> शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, >> तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत >> शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच. कशाला हवाय महिलांना पुरुषांबरोबर प्रवेश तिथे? काय थोर समता साधली जाणार आहे? नियम पाळायचे नसतील तर सार्वजनिक जागी जाऊ नये. ४. >> तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता मुद्दा आजिबात योग्य नाही. महिलांवर अन्याय करायच्या उद्देशाने प्रथा सुरू झाली नाही. महिलांना जिथे प्रवेश वर्ज्य आहे तिथे त्यांनी जाऊ नये. तरीही ज्या बायकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचंच आहे त्यांनी खुशाल घरी शनीचा पाषाण बसवून त्याची दैनंदिन पूजा करावी. ५. >> असे असेल तर मग साईबाबांची पूजा करू नका असा अत्यंत मूर्खपणाचा आदेश त्यांनी का काढला? >> आणि सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? ते तोतया शंकराचार्य आहेत. ६. >> खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. पृथ्वीराज चव्हाण काहीबाही बरळले म्हणून सनातन संस्थेने गप्प बसायचं का? वाघ म्हंटलं तरी खातो, वाघोबा म्हंटलं तरी खातो. मग वाघुरड्या का म्हणू नये? ७. >> दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर >> लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ. फुल्लीचं चित्रं अगोदरपासून होतं. आणि ज्याला तुम्ही निंदानालस्ती म्हणताय ती केवळ एक ओळ होती. 'दाभोलकरांना विकलांग मृत्यू न येत सत्वर मृत्यू आला हे वाईटातले चांगले आहे' अशा काहीशा अर्थाची ती ओळ होती. असेच उद्गार सरोजिनी नायडूंनी गांधीहत्येनंतर काढले होते. 'He died a king's death' असं काहीसं वाक्य होतं. त्याबद्दल सरोजिनींना कोणी दोष देत नाहीत. ८. >> पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो >> तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं? पोलिसांच्या डोक्यावर जो कोणी बसलाय त्याला सरळ करायला पाहिजे. उलट गप्प बसलं तर अनिष्ट वृत्ती फोफावणार नाही का? ९. >> दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात >> सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो. दाभोलकरांच्या न्यासाने हिशेब सादर केलेले नाहीत. याला आरोप नाही, तर वस्तुस्थिती म्हणतात. दाभोलकरांच्या न्यासांच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे. दाभोलकरांच्या फ्रॉडचे काही पुरावे इथे आहेत : http://shankhnaad.net/india/corruption/item/18-article-126 तसेच इथेही अधिक पुरावे मिळतील : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financia… १०. >> सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या >> लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे. गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था मूर्खांची असल्यास शहाणे कोण हा प्रश्नंच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नग्नपूजा हिंदूंच्या कुठल्याही भक्तीग्रंथांत नाही. हां, तांत्रिक विधी असू शकतो. पण भक्तीमार्गाने जाणाऱ्याने तांत्रिक साधना करायची नसते. नग्नपूजेस शास्त्राधार नाही
१) (अगदी भक्तीपंथीयांची) एखादी पूजापद्धती अमूक किंवा तमूक ग्रंथात असलीच पाहीजे हा नियम हिंदू धर्मात कधी पासून लागू झाला. अप्रत्यक्षपणे ग्रंथबद्द्ध न झालेल्या सर्व पूजा बंद केल्या जाव्यात असे तुम्हाला म्हणायचे नसावे. हिंदू कुलाचारातील असंख्य पूजा पद्धती एखाद्या कोणतीही व्यक्ति ते ज्यात्या काळातील ज्यांच्या त्यांच्या गुरुंनी सांगीतलेल्या असू शकतात ते घरातील /समुदायातील एखाद्या व्यक्तीला अमुक तमुक स्वप्नपडले आणि पूजा चालू झाली अश्याही असंख्य पूजा आहेत. २) आपले "असू शकतो" हे कयासात्मक विधान वास्तवास धरून असण्याबद्दल सॉल्लीड साशंकता आहे. चंद्रेगुत्तीची पूजा बहूधा केवळ अमुक तमूकला स्वप्नपडले किंवा काय सर्वसामान्य अंधश्रद्धेतून हनुमानाची झालेली भक्तीमय उपासना -तेही हनुमानाचे वैराग्य शुकासारखे आहे या विश्वासाने- होती त्याचा बहुतेक तांत्रिक विधीशी संबंध लावणे बहुतेक वाजवी नसावे (चुभूदेघे कदाचित श्रीगुरुजींना माहित असेल तर सांगू शकतील) ३) आजच्या काळात पुर्वीप्रमाणे तांत्रिक साधना तेवढ्या प्रमाणावर होत नसाव्यात, तथाकथीत तांत्रिकसाधनाही भारतातच विकसीत झाल्या आहेत त्यातील काही तांत्रिकसाधना भक्तीमार्गीही असू शकतात. अर्थात यात बर्‍याचदा अघोरी अंधश्रद्धा तांत्रिकतेत असत आणि तशा अघोरी अंधश्रद्धांच्या निराकरण करु इच्छिणार्‍या सुधारणावाद्यांना हिंदू द्वेष्टे ठरवले जाते आहे? काही भक्तीसांप्रदायिकांना नको असलेतरीही तांत्रिकसाधनाही एका अर्थाने हिंदूधर्माच्या भाग ठरतात तांत्रिकसाधना करणार्‍यांनी विरोधकांना हिंदूद्वेष्टे म्हणावे का ? मी तांत्रिकसाधनांचा समर्थक नाही केवळ उपरोक्त प्रतिसादातील विरोधाभास दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे. ४) नग्नच काय कोणत्याही झाना म्हणतात तसे कोणत्याही सगूणसाकार पूजेचे हिंदूधर्मात आधार बर्‍यापैकी ढिसाळ असावेत. वेदा आणि अमुकतमूक ग्रंथशास्त्रात नसलेल्या अनेक पूजा विधींचा शोध भारतीयांनी आपापल्या मर्जीने लावले सर्वपूजा पद्धती एकाच परमेश्वरापाशी पोहोचतात या विश्वासाने हिंदू धर्मात सर्वपूजा पद्धती सामावून घेतल्या गेल्या त्यात नग्नपूजेचा समावेश न होण्याचेही कारण नसावे. तुमची आमची मने भ्रष्ट झाली म्हणून नग्नपूजक दिगंबरांना भ्रष्ट का म्हणावे ? अनेक साधू संत दिगंबरावस्थेत इश्वरभक्ती करत. कुणी दिगंबरावस्थेत भक्तीकरत म्हणजे ते तांत्रिक साधना करत हे खरे मानायचे तर गजानन महाराज ते स्वामीसमर्थ अशा असंख्यांची वर्णी जबरदस्तीने तांत्रिकात लावायची किंवा कसे ? शूकासारखा आदर्श कितीही कठीण असला तरी शूकमुनी हाच भारतीय तत्वज्ञानानुसार आदर्श नव्हे काय ? आणि जर तो तसा असेल तर स्त्री असो वा पुरुष दिगंबरावस्थेत दिसले तरी आपापल्या मनावर काबू ठेवणे ज्याची त्याची जबाबदारी होत नाही का ? ५) चंद्रगुत्तेला स्त्रीयांनी अगदी नग्नपूजा करुनही देव त्यांना कोपत नसे देव प्रसन्न होतो अशी भावना असेल तर इतरत्र देवळांमध्ये स्त्रीयांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे कपडे घालून प्रवेश देण्यात अडथळे निर्माण करणे समजणे कठीण नाही का.

In reply to by प्रचेतस

गामाजींस पुस्तक रेफेरेन्स इत्यादी चे धार्जिणे नसावे वल्ली जी, त्यांस फक्त आपल्या कट्टरपणाची जाहिरात करायची असते असा वहीम आहे आम्हांस, असो, ज्याचे त्याच्यापाशी म्हणा!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापू, जी काही आक्षेपार्ह रूढी आहे तिच्यामागे अध्यात्मिक लाभ आहे का याचा धांडोळा घ्यायची इच्छा आहे. जेणेकरून ती बंद पडल्यास पर्यायी मार्गाने तसाच लाभ मिळवता येईल. जर अध्यात्मिक लाभ मिळंत नसेल तर आक्षेपार्ह रूढी ताबडतोब बंद करण्यात काही अडचण असू नये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

असं काहीही नसतं हो. हे सगळे मनाचे खेळ आहेत. तसं म्हटलं तर स्वतःला उडवून लोकांना ठार मारणाऱ्या आत्मघातकी बाँबरलाही तुला स्वर्गात जायला मिळेल आणि ७२ सुंद-यांचा सहवास मिळेल असं सांगितलं जातंच की. मग त्याची कृतीही आध्यात्मिक लाभ या लेबलाखाली justify करता येईल. मुळात अध्यात्ममध्ये जो आत्म शब्द आहे त्याचा अर्थ मला तरी असा वाटतो की अध्यात्म हे स्वतःपुरतं असावं. इतरांना त्याचा त्रास का? आणि तान्ह्या मुलांना त्रास देऊन आध्यात्मिक लाभ मिळवण्याची अपेक्षा ठेवणं ही आत्यंतिक विकृत गोष्ट आहे. एकीकडे लहान मुलं हे देवाचं स्वरूप असं म्हणणं आणि दुसरीकडे त्यांना आध्यात्मिक लाभासाठी छळणं - हा अव्वल दर्जाचा दुटप्पीपणा अाणि ढोंगीपणा आहे.

In reply to by गामा पैलवान

अध्यात्मिक लाभ! क्लासच!! चालू देत, गापै, एक प्रश्न तुम्ही शाकाहारी की मांसाहारी म्हणे?

In reply to by गामा पैलवान

म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?
परंपरेतील अघोरी, सक्ती, शोषण भाग काढून प्रथा परंपरा केवळ प्रतिकात्मक स्वरूपात जपण्यास काहीच हरकत नाही. विहीरीतले पाणि पवित्र समजून त्याला वैज्ञानिक पद्धतीने शुद्धकरुन बाळाची त्याने नजर काढली किंवा तांब्याभर पाण्याने प्रतिकत्मकतेसाठी ओवाळून घेतले तर त्या अंधश्रद्धा सुधारीत स्वरुपात चालवल्यास काहीच हरकत नाही. बगाडच्या दक्षिणभारतीय परंपरेत सुधारणाकरून बगाडला व्यवस्थीत खूर्ची जोडली आहे, खुर्चीत आरामात बसून मंदिराला प्रदक्षीणा करून घ्या काहीच हरकत नाही, पण उगीच पाठी अणकुचीदार वस्तू खुपसून व्यक्तिस्वातंत्र्य असले तरी स्पृहणीय ठरत नाही. बाकी गुरुजी आणि बोका यांनी उत्तर दिलेच आहे
अध्यात्मिक लाभ मिळंत नसेल तर...
नवसासायासाच्या रुढी परंपरांमध्ये अध्यात्माचा वस्तुतः काही संबंध नाही. -अध्यात्म हे अपेक्षे शिवाय केलेली भक्ती आहे. भौतीक अपेक्षांनी केलेले विधी हे अंधविश्वास असलेले नवसच असतात. - भौतिक अपेक्षांनी केलेले नवसासायास संत एकनाथ आणि भक्ती मार्गातील इतर काही संतांनीही नाकारलेले दिसून येतात- अंध-विश्वासांमध्ये जोपर्यंत अनिष्ट काही नाही -किंवा सुधारणाकरून त्यातील अनिष्ट भाग काढून टाकला तर आपापले अंध-विश्वास एंजॉय करत रहाण्याचे स्वातंत्र्य हवेच. मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून नवस केला ओवाळले नजर काढली पण आजारी पडू नये म्हणूनची लस दिली नाही अंधश्रद्देह्तून आंगावर बाळाला पाजले नाही असे होऊ नये ह्याची अंध-विश्वास बाळगताना दक्षता घेतली जावयास हवी.

In reply to by माहितगार

चंद्रगुत्ते बाबत मी स्त्रीवादी दृष्टीकोणातून बाजू घेण्याचा प्रयत्न केला. चंद्रगुत्तेच्या नाण्याला कदाचित अधिक बाजू असाव्यात हे स्विकारत शर्मीला रेगे संपादीत पूस्तकाचा दूवा देत आहे. अर्थात कर्नाटकातल्याच अक्कामहादेवी यांचे स्त्रीवादी दिगंबर शैवभक्तीचे ठळक उदाहरण उपलब्ध आहे.

In reply to by गामा पैलवान

१. >> अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ ठेवायचं. आणि विहिरीऐवजी घरच्या उथळ रांजणात सोडायचं. एव्हढा साधा तोडगाही असू शकतो ना?
अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा? कशासाठी इतका आटापिटा? कशासाठी त्या कोवळ्या जीवाचा इतका क्रूर छळ? कशाला सुपात ठेवून रांजणात सोडायचं? कसला डोंबलाचा तोडगा? मूर्खपणाला काही सीमा असते का नाही? खेड्यातले अडाणी मूर्खपणा करतात ते समजू शकते, पण शहरातले/परदेशातले सुशिक्षित जो मूर्खपणा करतात त्याला काय म्हणायचं? उपहास मोड ऑन - तान्ह्या बाळाला पाळण्यात घालून खोल, अंधार्‍या विहिरीत सोडण्याऐवजी सुपात ठेवून घरच्या उथळ रांजणात सोडणे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यासाठी आधी सूप आणावं लागेल, नंतर घरी सूप तरंगत राहील एवढा मोठा व खोल रांजण आणावा लागेल. एवढे करूनसुद्धा अंधार्‍या खोल विहिरीतल्या पाण्यात तरंगत ठेवल्यावर बाळाला जी मजा येईल ती मजा सूप उथळ रांजणात तरंगत ठेवून कशी येणार? उपहास मोड ऑफ -
३. >> शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, >> तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत >> शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच. कशाला हवाय महिलांना पुरुषांबरोबर प्रवेश तिथे? काय थोर समता साधली जाणार आहे? नियम पाळायचे नसतील तर सार्वजनिक जागी जाऊ नये.
का? महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम?
४. >> तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता मुद्दा आजिबात योग्य नाही. महिलांवर अन्याय करायच्या उद्देशाने प्रथा सुरू झाली नाही. महिलांना जिथे प्रवेश वर्ज्य आहे तिथे त्यांनी जाऊ नये. तरीही ज्या बायकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचंच आहे त्यांनी खुशाल घरी शनीचा पाषाण बसवून त्याची दैनंदिन पूजा करावी.
कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा.
६. >> खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. पृथ्वीराज चव्हाण काहीबाही बरळले म्हणून सनातन संस्थेने गप्प बसायचं का? वाघ म्हंटलं तरी खातो, वाघोबा म्हंटलं तरी खातो. मग वाघुरड्या का म्हणू नये?
गप्प बसा असं कोण म्हणतंय? जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे. कारण शेवटी जो त्रास होणार तो वर्तक किंवा आठवल्यांना होणार नसून तो सर्वसामान्य साधकांनाच होणार होता.
७. >> दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर >> लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ. फुल्लीचं चित्रं अगोदरपासून होतं. आणि ज्याला तुम्ही निंदानालस्ती म्हणताय ती केवळ एक ओळ होती. 'दाभोलकरांना विकलांग मृत्यू न येत सत्वर मृत्यू आला हे वाईटातले चांगले आहे' अशा काहीशा अर्थाची ती ओळ होती. असेच उद्गार सरोजिनी नायडूंनी गांधीहत्येनंतर काढले होते. 'He died a king's death' असं काहीसं वाक्य होतं. त्याबद्दल सरोजिनींना कोणी दोष देत नाहीत.
ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती.
८. >> पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो >> तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं? पोलिसांच्या डोक्यावर जो कोणी बसलाय त्याला सरळ करायला पाहिजे. उलट गप्प बसलं तर अनिष्ट वृत्ती फोफावणार नाही का?
मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ?
९. >> दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात >> सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो. दाभोलकरांच्या न्यासाने हिशेब सादर केलेले नाहीत. याला आरोप नाही, तर वस्तुस्थिती म्हणतात. दाभोलकरांच्या न्यासांच्या मालमत्तेवर टाच आणली पाहिजे. दाभोलकरांच्या फ्रॉडचे काही पुरावे इथे आहेत : http://shankhnaad.net/india/corruption/item/18-article-126 तसेच इथेही अधिक पुरावे मिळतील : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial...
इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय ही एकमेव योग्य जागा आहे.
१०. >> सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या >> लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे. गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था मूर्खांची असल्यास शहाणे कोण हा प्रश्नंच आहे. आ.न., -गा.पै.
पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील. अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे. कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल.

माहितगार आणि बोका-ए-आझम, बोकोबांचं हे विधान वाचलं : >> सनातनकडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. >> तुम्हीही सनातनची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ. ही अत्यंत घातक विचारसरणी आहे. का ते सांगतो. ऑगस्ट २००८ मध्ये सुशीलकुमार शिंदे नामे एक थुंकीझेल्या हिंदू दहशतवाद म्हणून काहीबाही बरळत होता. सनातन संस्थेवर बंदी घालायला उतावीळ झाला होता. सोबत दिग्विजय सिंग नामे हुजऱ्याही भगवा दहशतवाद म्हणून छाती बडवत होता. या दोघांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी अस्तित्वात नसलेल्या हिंदू दहशतवादावर लक्ष केंद्रित केलं. यातून पुढे कसाबच्या टोळीला घुसखोरी करता आली. पुढे काय घडलं ते सांगायला नको. जर चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात येत असेल तर शासनाला जाब विचारलाच पाहिजे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अरे पैलवाना, तुमच्यासारखे शूर वीर हुशार धर्माभिमानी लोक देशात राहून काँग्रेसशी व सीमेवर जाउन पाकिस्तानशी लढायचे सोडुन परागंदा होउन लंडनमध्ये किरिस्ताव लोकांची सेवा करत पाउंड मिळवत बसले. म्हणुन कसाबचे फावले. असं आमच्या ह्यांचं मत आहे.

In reply to by गामा पैलवान

तुम्हाला नक्की कोण देतं? मला तर असं वाटतं की तुम्ही conspiracy theorist आहात. सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग हे बरळसम्राट आहेत यात शंका नाही पण त्यांची गादी मिपावर तुम्ही का चालवताय? मुंबई हल्ला हे गुप्तचर यंत्रणा, तटरक्षक दल आणि पोलिस यांचं एकत्रित अपयश होतं. सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग यांनी भगवा दहशतवाद म्हणून जो आरडाओरडा चालू केला तो मालेगाव स्फोटानंतर. त्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ला झाला. या दोन गोष्टींचा काय संबंध? माझ्या विधानामागचा हेतू हाच होता की सनातनकडे सनातनचे वकील आहेत, जे सनातनची बाजू यथाशक्ति मांडत आहेत. ते तसं फुकट करत नाहीयेत. त्यांना त्याचा मोबदला मिळत असलाच पाहिजे. तसंच जर आम्हाला सनातनची बाजू मांडण्याबद्दल काही मिळत असेल तरच सनातनची बाजू मांडू. फुकटात काही काम का करायचं? आणि या विचारसरणीमागे धोकादायक काय आहे? जो कुणी पैसे देईल त्याची बाजू वकील नेहमीच मांडतात. आणि कुठल्याही खटल्यात किंवा प्रकरणात किमान दोन बाजू असतातच. त्या मांडल्या गेल्याच पाहिजेत असं कायदा सांगतो. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात येत असेल >>> बरोबर. पण संन्यासी निर्दोष आहे हे संन्याशाला सिद्ध करावं लागेल, किंवा चोर कोण आहे हे शोधून काढावं लागेल. पुरावा ही एकमेव गोष्ट कायदा ओळखतो. त्यामुळे सनातनवाले निर्दोष असतील तर ते सुटतील - त्यांच्यावर कितीही आरोप असले तरी. जर दोषी असतील तर शिक्षा होईल. आता तुमचा जर कायद्यावरच विश्वास नसेल (तुम्ही मागे दिलेल्या एका प्रतिसादावरुन) तर मग गोष्टच संपली.

बोका-ए-आझम, >> त्यामुळे सनातनवाले निर्दोष असतील तर ते सुटतील प्रश्न खटल्याचा नाहीये. कारण की सनातन संस्था कुठल्याही खटल्यात आरोप नाहीच्चे मुळी. न्यायालयाने संस्थेस आरोपी मानण्यास स्वच्छ नकार दिलेला असतांना प्रसारमाध्यमांतून संस्थेविरुद्ध जनमत कलुषित करायचे धंदे चाललेत. ही खरी समस्या आहे. या कृष्णकृत्यांमध्ये हमीद आणि मुक्ता हे दाभोलकरांचे नातेवाईक आघाडीवर आहेत. त्यांना सनातन संस्थेवर बंदी आणायची आहे. आ.न., -गा.पै.

बोका-ए-आझम, >> भगवा दहशतवाद म्हणून जो आरडाओरडा चालू केला तो मालेगाव स्फोटानंतर. त्यानंतर नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई >> हल्ला झाला. या दोन गोष्टींचा काय संबंध? माझं जुनं विधान दुरुस्त करायला हवंय. तिथे दिग्विजय सिंग आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी हेमंत करकरे यांचं नाव हवं होतं. इथे एक लेख आहे. कृपया त्यातला दुसरा परिच्छेद पाहावा : http://www.misalpav.com/comment/857736#comment-857736 चोर सोडून संन्याशाच्या मागे पोलीस लागले की गुन्हेगार बळजोर होतात. उपरोक्त लेखात सनातन संस्थेचं नाव नाही. पण माझ्या आठवणीनुसार त्याच सुमारास सनातन संस्थेवर बंदीची मागणी जोरात होती. २६/११ मुळे ती मागे पडली. आ.न., -गा.पै.

गा.पैं चे प्रतिसाद वाचून हिंदू मूलतत्ववादी, थोड्या का संख्येने, अस्तिवात आहेत हे मान्य असायला हरकत नसावी राईट?

In reply to by अनुप ढेरे

म्हणजे काय आहेतच!! किंबहुना, "पृथ्वी सपाट आहे" अथवा "अल्लाच्या कृपेने जेव्हा 2 हैड्रोजन अन एक ऑक्सिजनचा अणु एकत्र येतो तेव्हा पाणी नावाचे दैवी गिफ्ट तयार होते" ह्या धाटणीची वाक्य (भगव्या परस्पेक्टिव्ह मध्ये) खूप सापडतील गापै ह्यांच्या लेखनात (लेखन म्हणजे फक्त लंब्या लंब्या कॉमेंट्स बरंका)

In reply to by अनुप ढेरे

गा.पै. यांचे प्रतिसाद हा शुद्ध आचरटपणा आहे. त्याला हिंदू मूलतत्ववाद म्हणणं म्हणजे लय मोठा गैरसमज असेल. मला तर वाटतं त्यांना उचकवायला मजा येते. ते सध्या मोगा/चंपाबै यांना एकटं वाटू नये म्हणून असली मारडाला विधानं करत असावेत. जर त्यांचा त्यांनी केलेल्या विधानांवर १% जरी विश्वास असेल तर मात्र केस गंभीर आहे. मग तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी सहमत व्हावं लागेल.

In reply to by बोका-ए-आझम

भाऊ जर आपण सकल मोगा गटार सकल मुसलमान धर्माशी संलग्न करून पाहत असू (नाही म्हणू नका तुमच्या माझ्यासहित ९९% ऍक्टिव्ह मिपाकर ते मानतात) तर सकल गामावाणी कश्यात मोजावी हे अध्याहृत असावे, त्यात सेलेक्टिव्ह असू नये,असे मनःपूर्वक वाटते

गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था.....
ज्ञानाच्या क्षेत्रात लोकप्रीयता हा माहितीचीच्या अचूकतेचा अथवा ज्ञानवंत असल्याचा परिमाण असू शकतो का ? बाकी युरोप आणि ख्रिश्चन जग पृथी सपाट आहे अस बहूमताने आणि लोकप्रीय विश्वासाने सांगत असताना पृथ्वी सपाट आहे असे सांगणारा त्याक्षणी अल्प मतात होता त्याने बायबल एवढ्या कॉपी विकल्या नसतील, बायबलच्या कॉपी अधिक विकल्या जातात म्हणून पृथ्वी सपाट आहे हे सिद्ध होऊ शकते का ? (अनुषंगिक अवांतर : याचसाठी विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे विकिपीडिया हि लोकशाही नाही आणि असूही नये) झाना आणि गापैच्या एका तार्कीक उणीवेत साम्य नक्कीच आहे. वरील प्रतिसादांमधून कुणीतरी झाना संबंधीत विवादा संदर्भाने दुवा दिला आहे त्यात झाना / त्यांची संस्था अथवा त्यांची भलावण करणारे एका आंतरजालीय ब्लॉगरला आंतरजालीय विवादाला नकार देताना कारण काय देतात तर झाना स्वतः अमूक इतके लोकप्रीय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान अद्वितीय का कायसे आहे आणि म्हणून त्याम्च्या पेक्षा कमी लोकप्रीयता असलेल्या व्यक्तिशी ते विवादात/चर्चेत सहभागी होणार नाहीत. मी श्रीगुरुजींनी वापरलेली विशेषणे वापरताना हात आखडता घेईन तरीही "गेल्या १८ वर्षांत सुमारे १७५ ग्रंथ छापून ५० - ६० लाख प्रती विकणारी संस्था...." किंवा याच्या हजारपट विकणारी अजून वेगळी असणारी संस्था असू द्यात केवळ लोकप्रीयता हे ज्ञानवंत असल्याचे लक्षण होऊ शकत नाही, सचिन तेंडूलकर पेक्षा कमी लोकप्रीय असलेल्या एखाद्या क्रिकेटरचा क्रिकेटबद्दलचा एखादा तर्क सचिन तेंडूलकरपेक्षा उजवा नसेलच असे सांगता येत नाही, मग सचिन तेंडूलकर कितीही लोकप्रीय असला तरीही. लोकप्रीय म्हणजे बरोबर या गृहीतकातील तार्कीक उणीवेला तर्कशास्त्रात Argumentum ad populum असे नाव आहे.
In argumentation theory, an argumentum ad populum (Latin for "appeal to the people") is a fallacious argument that concludes that a proposition is true because many or most people believe it: "If many believe so, it is so."
The bandwagon effect is a phenomenon whereby the rate of uptake of beliefs, ideas, fads and trends increases the more that they have already been adopted by others. In other words, the bandwagon effect is characterized by the probability of individual adoption increasing with respect to the proportion who have already done so.[1] As more people come to believe in something, others also "hop on the bandwagon" regardless of the underlying evidence. Argumentum ad populum ची उदाहरणे * Nine out of ten people in the United States claim this bill is a bad idea, therefore this bill is bad for the people. * Fifty million Elvis fans can't be wrong. * Everyone's doing it, therefore it must be good. * In a court of law, the jury vote by majority; therefore they will always make the correct decision. * Many people buy extended warranties, therefore it is wise to buy them. * Millions of people agree with my viewpoint, therefore it must be right. * The majority of this country voted for this president, therefore this president must, objectively, be a good President.

श्रीगुरुजी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १. >> अरे पण कशासाठी करायचा हा गाढवपणा? एकदम मान्य. पण लोकांना जे सांगायचंय ते त्यांच्या कलाने सांगायला हवं. भारतीय लोकांना धर्माच्या भाषेत सांगितलेलं चटकन कळतं. २. >> महिलांना प्रवेश न देण्यासाठी महिलांनी काय घोडं मारलंय? कसले डोंबलाचे नियम? कोणी ठरविले हे पक्षपाती नियम? ज्याने दृष्टांत देऊन मंदिर उभारायला सांगितलं त्याने हे नियम ठरवले आहेत. ३. >> कोणी ठरविला महिलांना प्रवेश वर्ज्य? त्यांना हे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? महिलांनी कशी व कोठे >> पूजा करायची हे तुम्ही कोण ठरविणार? पाहिजे तर तुम्ही घरी शनीचा पाषाण बसवून पूजा करा. ज्याने दृष्टांत देऊन मंदिर उभारायला सांगितलं त्याने हे नियम ठरवले आहेत. ज्यांना ते पाळायचे नसतील त्यांनी तिथे न जाणंच इष्ट. तसंही पाहता शनी शिंगणापूर हे खाजगी मंदिर आहे. ४. >> जेव्हा संस्थेवर संशय येऊन संस्थेची व साधकांची चौकशी सुरू झालेली असते तेव्हा अजून मूर्खपणा करून >> संशय वाढेल असे करू नये हा साधा कॉमनसेन्स आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करावंच लागतं. त्यात कोणी जर अपमान शोधू पहात असेल तर सनातन संस्था काहीही करू शकत नाही. ५. >> ती केवळ एक ओळ नसून अनेक वाक्यांतून मनातील मळमळ ओकलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच >> दुसर्‍या दिवशी त्यांचा लाल फुली मारलेला फोटो वेबसाईटवर प्रसिद्ध करणे ही विकृती होती. माझ्या आठवणीप्रमाणे त्या लेखात मळमळ वगैरे काहीही नव्हती. माझ्याकडे मूळ लेख नसल्यामुळे याबाबत चूकभूल देणेघेणे. तुमच्याकडे तो असल्यास कृपया दुवा द्यावा. फुल्ली मारलेला फोटो पार जुनाच होता. कोणी फ्रॉडस्टर मेला तर त्याच्या फोटोवरही फुल्ली दाखवायची नाही का? ६. >> मूर्खपणा केल्यामुळे पोलिसांच्या डोक्यावर बसलेला झाला का सरळ? पण शिरजोर तर होऊ द्यायचा नाही ना त्याला? ७. >> इथे पुरावे देऊन काहीही उपयोग नाही. हे न्यायालय नाही व इथे कोणीही न्यायाधीश नाही. त्यासाठी न्यायालय >> ही एकमेव योग्य जागा आहे. तुम्ही म्हणालात की सनातन संस्थेने कायदेशीर पाठपुरावा करायला हवा. मी तो होतोय हे दाखवून दिलं. ८. >> कितीही ग्रंथ छापले व कितीही प्रती विकल्या गेल्या तरी वर्तन मूर्खपणाचे असल्यास त्यांना मूर्खच म्हणावे लागेल. म्हणूनच तर शहाणे कोणास म्हणावे हा प्रश्न पडलाय. कोणी शहाणा दाखवून देता का? ९. >> पूर्वी 'श्री' नावाचे एक साप्ताहिक निघायचे. ते प्रचंड लोकप्रिय होते. ते मराठीतले टॅब्लॉईड होते. संध्यानंद >> नावाचे वृत्तपत्रही भरपूर खपते. खपच बघायचा झाला तर 'श्री' वाले प्रचंड शहाणे समजावे लागतील. >> अमेरिकेतही अत्यंत टुकार मासिके/साप्ताहिके निघतात व त्यांचा खप प्रचंड असतो. ते सुद्धा शहाणेच म्हणायचे. साप्ताहिक श्री, संध्यानंद आणि अमेरिकेतली टुकार नियतकालिके यांच्यातला मजकूर आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथातला मजकूर यांत गुणात्मक फरक आहे. याउपर तुम्ही आता स्वत:ला आवरा म्हणून सुचवणार होतो. पण उपरोक्त गुणात्मक भेद तुमच्याकडून दुर्लक्षिल्याने मी स्वत:स आवरायचं ठरवलं आहे. या विषयाबाबत पुढे चर्चा करता येईलसं वाटंत नाही. म्हणून तुमच्याशी चालू असलेल्या चर्चेस माझ्याकडून पूर्णविराम. आ.न., -गा.पै. तळटीप : सनातन प्रभातमधला दाभोलकरांच्या हत्येनंतरचा लेख मिळाला तर तेव्हढ्यापुरती मर्यादित चर्चा करता येईल.

In reply to by गामा पैलवान

१. तद्दन मूर्खपणा आहे हा, भारतात लोकांना फक्त धर्माच्या कलाने सांगितलेले पटकन कळते हा अतिशय भंपक डायलॉग आहे, असे खरेच असल्यास ते पूजा कर्मकांड, सनातन, पानसरे-दाभोळकर, प्रागतिक-कर्मठ, सगळे घाला गाढव/गाढवीच्या नेमक्या अवयवात, पहिला आसाराम ते झाना सगळी कोकरे पकडून आणा अन त्यांस, जनतेला पार लोकसंख्या नियंत्रण ते गावात संडास बांधणे सगळे समजवायला सांगा, बघू धर्माच्या कलाने किती लोक ऐकतात ते, अन बघू किती धर्म हे सगळे सांगतात ते करायला २. & ३. दृष्टांत तुम्हाला दिलाय का त्या देवाने?? नाही इतके ठामेठोक सांगताय म्हणून विचारले हो, बरं, दृष्टांत देणारा इतका कनवाळू होता/आहे अन त्याचेच नियम आहेत तर त्याने त्याच्या चौथऱ्यावर जायला लाठ्या खायला तयार असलेल्या पोरीच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यावा की बाळे नको येऊ वरती शिळेपाशी तुझ्या ह्या आकाशातल्या बापाला त्रास होतोय,दिलाय का असा काही? दिला असेल तर बोला, किंवा मूळ दृष्टांत तुम्हाला तरी दिलाय का बोला? ४. सनातनला ही अवघडजागची दुखणी निस्तरायचा ठेका कोणी दिलाय म्हणे? मी हिंदू आहे अन मी असा कुठलाही हक्क सनातनला दिलेला नाहीये, त्यामुळे उगाच तोंड उघडावे लागते वगैरे मखलाशी सोडा ५.लेख वाचलाय तरी का? की आपलं उगा शनिदेवाच्या दृष्टांतासारखेच मजा मजा ?? ६.कोण कधी शिरजोर झालाय? जगभरातल्या गाढवांचा हा छंद झालाय नुसता कोणी एक राज्यकर्ता शिरजोर झाल्याचे धर्माच्या मागे लपून बोंबलत सुटायचे! अन त्याला शिरजोर न होऊ देण्याच्या नावाखाली कायदे हातात घेऊन स्वैर वागायचे! हाड तिच्येयला त्या धर्मांच्या ७.नो कॉमेंट्स ८.असोच ९.आहे तर गुणात्मक फरक आहे की! संध्यानंद मध्ये किमान काहीतरी कामाचे असते हो! नाही काही तर कोडीच! अमेरिकन टुकार प्रकाशनांबद्दल इथे बोलत नाही , अगदीच अनभिज्ञ असाल तर तुम्ही आयुष्यातल्या एका आनंदाला मुकला आहात असे म्हणेल सनातनवर मी मेसचा डबाही ठेवत नसे/ ठेवणार नाही! आधीच भातात कचकून सोडा त्यात ह्यांचा आचरटपणा, काय तर म्हणे नमस्कार करताना अमुक अँगल असावा अन तमुक मुहूर्ताला कुठली ती सुब्रह्मण्यम किरणे शोषली जातात, साधकाच्या घरात इतक्या किरण शलाका असतात का लेकाचं 450 स्क्वे फु चा हॉल किचन आहे का अँड्रॉमेडा अभ्रिकेतला एखादा सुपरनोव्हा तेच कळत नाही आयुष्यात कधी हे तोंडून निघेल असे वाटले नव्हते तारीही

मी गुरुजींशी सहमत आहे ह्या बाबतीत


माहितगार, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. सनातनचे ग्रंथ किती लोकप्रिय आहेत हे सांगायचा हेतू नाहीच्चे मुळी. वर श्रीगुरुजी सनातनवाल्यांना मूर्ख म्हणंत होते, त्यासंदर्भात ही ग्रंथविक्री बघायला हवी. सुमारे पावणेदोनशे ग्रंथांच्या पन्नासेक लाख प्रति विकल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक ग्रंथाच्या पंचवीसहजार ते तीसहजार प्रती झाल्या. धार्मिक विषय पाहता हा आकडा जरा जास्तच वाटंत नाही का? शिवाय हे सगळे ग्रंथ गेल्या वीसेक वर्षांत कोणीतरी लिहिलेले आहेत. बायबल वा वैदिक संहितांसारखे अगोदरपासून अस्तित्वात नाहीत. सांगण्याचा मुद्दा काये की एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या प्रती निर्माण करून छापून विकण्यासाठी आणि वाचकांना विकत घ्यावेसे वाटण्यामागे केवळ मूर्खपणाच आहे का? की इतर काही पद्धती कार्यरत आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या प्रती निर्माण करून छापून विकण्यासाठी आणि वाचकांना विकत घ्यावेसे वाटण्यामागे केवळ मूर्खपणाच आहे का?
म्हणजे मूर्खपणाही आहे हे तुम्ही कबुल करताय तर... ;) असो. 'मूर्खपणा हा संसर्गजन्य आजार आहे'

In reply to by गामा पैलवान

गापै वर ब्यांडवॅगन इफेक्टची मिहिती जोडली आहेच. आता कम्यूनल रि-इन्फोर्समेंट वाचा. Communal reinforcement is a social phenomenon in which a concept or idea is repeatedly asserted in a community, regardless of whether sufficient empirical evidence has been presented to support it.[1] Over time, the concept or idea is reinforced to become a strong belief in many people's minds, and may be regarded by the members of the community as fact. Often, the concept or idea may be further reinforced by publications in the mass media, books, or other means of communication. The phrase "millions of people can't all be wrong" is indicative of the common tendency to accept a communally reinforced idea without question, which often aids in the widespread acceptance of factoids. factoids = The term factoid can in common usage mean either a false or spurious statement presented as a fact

In reply to by गामा पैलवान

ग्रंथाच्या किती कॉपी विकया गेल्या यावर शहाणपण ठरते. .... बायबल व कुराणांच्याच कॉपी जास्त विकलया गेल्या आहेत ना?

In reply to by गामा पैलवान

१. तसं म्हटलं तर जगात कोकेन आणि हेराॅईनचा खप हा भरपूर जास्त आहे. या अंमली पदार्थांचं सेवन करणारे सगळेच तुमच्या मताप्रमाणे हुशार म्हणायला हवेत. नाही का? २. सनातनविषयी म्हणायचं तर एवढी पुस्तकं विकली गेली हे सिद्ध करणारा एखादा third party, neutral पुरावा आहे का? सनातनवाले काहीही म्हणतील. आपल्या न विकलेल्या वर्तमानपत्राच्या प्रती रद्दीवाल्यांकडे देऊन आपल्या circulation चे आकडे फुगवून सांगण्याबद्दल अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रे बदनाम आहेत. सनातन असं काही करणारच नाही असं कशावरून? ३. ही पुस्तकं कोण घेतंय? त्यांच्यावर ही पुस्तकं विकत घेण्याची सक्ती केली जात नाहीये कशावरून? ४. एवढे ग्रंथ विकून कमावलेल्या उत्पन्नाचा सनातनने हिशोब दिला आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी जे पैसे लागतील ते सनातनकडे कुठून आले?

In reply to by बोका-ए-आझम

बोका-ए-आझम, खप जास्त आहे म्हणजे मजकूर चांगला आहे हा युक्तिवादाचा मुद्दा नाहीये. ज्याअर्थी खप आहे त्याअर्थी त्याच्या मागे भलीथोरली यंत्रणा कार्यरत आहे. श्रीगुरुजी सांगतात तसा मूर्खपणा असता तर एव्हढा खप वाढला नसता. हा मूळ मुद्दा आहे. हेरॉईन सेवणारे महान असोत वा नसोत, त्याचं उत्पादन आणि वितरण यांमागे बुद्धिमान यंत्रणा असतेच ना? खपाचे हिशोब संस्थेच्या कार्यालयात मिळतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

झाना बहुतेक आपल्याशी सहमत होऊ शकतील, पण तुम्हीही याच मुद्यावर त्यांच्याशी सहमत व्हावे अशी त्यांची अपेक्षा असेल (असा कयास)

In reply to by माहितगार

माहितगार, चर्चेचा विषय सनातन संस्थेचा मूर्खपणा हा आहे. ही पार्श्वभूमी विसरता कामा नये. अवांतर टिपणीवरून अन्यथा बाबा रामदेव आणि असदुद्दिन औवेशी हे देखील कशावर तरी सहमत असलेले दाखवता येऊ शकतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

..चर्चेचा विषय सनातन संस्थेचा मूर्खपणा हा आहे. ही पार्श्वभूमी विसरता कामा नये.
गोलपोस्ट मी बदललेली नाही माझ्या दृष्टीने धाग्याची मूळ गोलपोस्ट झानाहीच आहे.

In reply to by माहितगार

माहितगार, बरोबर आहे तुमचं. 'सनातन संस्थेचा मूर्खपणा' हा विषय अवांतर या छापाखाली चर्चिला जायला हवा होता. आ.न., -गा.पै.

दुनिया झुकती हैं | झुकानेवाला चाहिए | चंपाबाईंनी हे सिध्द करून दाखवलेय. धागा झानावर पण ७८% मजकूर सनातन, हिंदूधर्म वगैरेवर. मी मजकूराबद्दल बोलतोय. पोस्टींची संख्या विचारात घेतलेली नाही. माणसाला उचकवायचे, म्हणजे तो चिडतो आणि असा राग आलेल्या माणसांना मग मेंढरासारखे कसेही हाकलता येते हे अगदी खरे आहे. (अगदी मिपा सोडायलाही प्रवृत्त करता येते.) या आभासी दुनियेत राग आवरता येण्याची कला जर आपण शिकलो तर प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्याला त्याचा खूप उपयोग होईल. यास्तव राग आवरण्याची नेट प्रॅक्टीस करण्यासाठी म्हणून मिपावर वावरण्याची सुबुध्दी जेव्हा आपल्याला होईल तो खरा सुदिन असेल.

झकीर नाईक हा दहशतवादाचा वा आत्मघातकी हल्ले करणार्‍यांना चूक ठरवताना निरपराधांना मारणे हे पाप, युद्ध नसताना आत्मघातकी हल्ला हे पाप म्हणतो. पण निरपराध कोण हे कसे ठरवणार? परमपवित्र इस्लामला कबूल न करता अन्य धर्माचे पालन करणे हेही कुणी अपराध समजू शकतो, कुराणातील आयते माहित नसणे हा अपराध समजू शकतो. महंमदाला शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित न मानणे हाही अपराध होऊ शकतो. लोकशाहीत प्रत्येक नागरिक हा सरकारच्या चुकीकरता अपराधी समजला जाऊ शकतो. त्यामुळे निरपराध ही ग्यानबाची मेख मारुन अतिरेक्यांचे काम सोपे केले आहे. इस्लाममधे दारुल इस्लाम आणि दारुल हरब (की खरब) असे जगाचे विभाग केले आहेत. जिथे इस्लाम प्रभावशाली नाही त्या जागेला दारुल हरब म्हणजे युध्दाची वा संघर्षाचे स्थान असे म्हटले जाते. आता युद्धाची सबब आणणे किती सोपे आहे नाही? भारत, अमेरिका, फ्रान्स ह्या जागांना दारुल हरब ठरवले की मग तिथे आत्मघातकी हल्ले धर्मसंमत आहेत असे म्हणायला नाईकसाब मोकळे! कसे?

किंवा आक्रमण हा स्वरक्षणाचा हा सगळ्यात चांगला प्रकार आहे (ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स) अशी म्हण आहे त्याला अनुसरुन झनाजनाबांनी अर्णब गोस्वामीला अब्रुनुकसानीबद्दल माफी मागायला सांगणारी नोटिस बजावली आहे. बातमी भारतात यायची हिंमत होत नाही पण असले धंदे चालूच! बहुधा मोदींची पाच वर्षे उलटल्यावर झनासाहेब इतमामाने विमानतळावर उतरतील आणि तमाम भगतगण त्यांचे जंगी स्वागत करतील असे वाटते.

In reply to by संदीप डांगे

काही गृहितके १. मोदी सरकार पाच वर्षेच टिकेल. लक्षणे तशीच दिसत आहेत. २. झकीर नाईकावर मोदी सरकार कुठलीही दयामाया न दाखवता (त्यांच्या मते) काटेकोर कारवाई करेल आणि कुठे ना कुठे तो अडकेलच. भाषण नाही तर ज्या प्रकारे, जिथून पैसे मिळवलेत त्यात अडकेल. झकीर नाईकाचे पाठिराखे कधीच भाजपसमर्थक नव्हते त्यामुळे त्यांना दुखवण्याची भाजप पर्वा करणार नाही. ३. मोदी सरकार नंतर येणारे सरकार हे भारतात ज्याला निधर्मी म्हणतात त्या प्रकारचे असणार मग ते काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, जद वा अशांचे कडबोळे असेल. त्यांना झकीर नाईकाचे लाखोंनी असणारे पाठिराखे ही एक हक्काची व्होटबँक म्हणून खुणावत असणार. त्यामुळे तिला दुखवणारे, झनाच्या अटकेसारखे कृत्य ते करण्याची शक्यता फार धूसर. त्यामुळे झनाला परत यायचे असेल आणि उजळमाथ्याने फिरायचे असेल तर मोदींचा कालावधी उलटल्यावर यावे लागेल असे मला वाटते आहे. सुटकेची आशा असलीच तर ती बिगर भाजप सरकारच्या आधिपत्याखालीच.

हुप्प्यारावांचे पेपरमधल्या बातम्यांकडे बारीक लक्ष असते

झा.ना ने "बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म का स्वीकारला नाही" ह्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा युट्युब विडोओ पाहीला. नाईकसाहेबांच्या मते धर्मांतरासाठी बाबासाहेबांची पहीली पसंती इस्लामच होती पण त्यावेळेला मुस्लीमसमाजाने तांचे योग्य तसे स्वागत केले नाही म्हणुन नाईलाजाने बाबासाहेबांनी त्यांच्या दुसर्या पसंतीचा धर्म जो की बौध्द हा स्वीकारला असे तारे तोडले आहेत. एखाद्याची दिशाभूल कशी करावी व धादांत खोटेच खरे आहे हे कसे गळी उतरवावे ह्याचे उदाहरण पाहायचे असेल तर हा विडोओ आवश्य पाहावा.

Covert हिप्नोसिस वापरतात जाकिर हुसेन आणि जयंत आठवले दोघेही.इस्लाम चा आक्रमक प्रसार करणाऱ्या मौलांची लेक्चर्स पण याच प्रकाराची असतात. जास्त suggestibility असणारी व्यक्ति त्वरित प्रभावित होते यामुळे,त्या लोकांचे त्वरित मत परिवर्तन होते.ब्रम्ह कुमारी वाले पण हेच technique वापरतात. निशुल्क मेडिटेशन च्या नावाखाली हे लोक सर्व सामान्य लोकांना गोळा करतात .त्यानंतर त्या लोकांमधले जास्त suggestibilty असणारे लोक ओळखून त्याना maount अबु ला मोठ्या 10 दिवसाच्या शिबिरासाठी प्रेरित केले जाते,ज्याला बाबाची भट्टी असेही म्हटले जाते, 10 दिवसात त्या लोकांचे पूर्ण ब्रेन वाशिंग केले जाते,पुढे त्या बाबा लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक बाबींवर हे लोक डोळे zakun विश्वास ठेवतात ,कारण त्याना तसे प्रोग्राम केलेले असते.ओशो ना पण याच कारनासाठी अमेरिकेमधे अटक करण्यात आलि होती,सनातन चे जयंत आठवले हे मास्टर हैप्नोटिस्ट आहेत .दुर्दैवाने ते त्याचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी करत आहेत,

Covert हिप्नोसिस वापरतात जाकिर हुसेन आणि जयंत आठवले दोघेही.इस्लाम चा आक्रमक प्रसार करणाऱ्या मौलांची लेक्चर्स पण याच प्रकाराची असतात. जास्त suggestibility असणारी व्यक्ति त्वरित प्रभावित होते यामुळे,त्या लोकांचे त्वरित मत परिवर्तन होते.ब्रम्ह कुमारी वाले पण हेच technique वापरतात. निशुल्क मेडिटेशन च्या नावाखाली हे लोक सर्व सामान्य लोकांना गोळा करतात .त्यानंतर त्या लोकांमधले जास्त suggestibilty असणारे लोक ओळखून त्याना maount अबु ला मोठ्या 10 दिवसाच्या शिबिरासाठी प्रेरित केले जाते,ज्याला बाबाची भट्टी असेही म्हटले जाते, 10 दिवसात त्या लोकांचे पूर्ण ब्रेन वाशिंग केले जाते,पुढे त्या बाबा लोकांनी सांगितलेल्या प्रत्येक बाबींवर हे लोक डोळे zakun विश्वास ठेवतात ,कारण त्याना तसे प्रोग्राम केलेले असते.ओशो ना पण याच कारनासाठी अमेरिकेमधे अटक करण्यात आलि होती,सनातन चे जयंत आठवले हे मास्टर हैप्नोटिस्ट आहेत .दुर्दैवाने ते त्याचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी करत आहेत,

सकाळी सकाळी tv वर येणारे ख्रिस्ती पाद्री पण कोवर्ट हिप्नोसिस वापरतात आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतात