पुन्हा झकीर नाईक
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8
झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो.
बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.
खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India)
माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात.
सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY
अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल?
एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे.
असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो?
https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाऊ द्या हो ! नका मनावर घेऊ
माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल
=)) =)) =)) =)) =)) =))
प्रवक्त्यांना खेचू नये ;)
आज माहितगार ह्यांच्या
गावडे मास्तर
..अन तंगडी ओढत आहेत
+१११११
करेक्ट
का ब्रे ?
थेअरॉटीकली सनातनची अधिकृत
वा वा!
किती निर्व्याज हास्य ते!
धाग्याचा महत्वाचा मुद्दा राहिला बाजूला
पाठांतर चांगले असणार्यांना
हो झा नाईक मूळ मराठी आहे
माझा महाराष्ट्रातल्या कोकणी मुस्लिमांशी आणि मराठवाड्यातील
झाकिर नाएकची स्मरणशक्ति चांगली आहे.
श्रीगुरुजींस उद्देशून प्रतिसाद
साशंकता
स. रा. गाडगीळ ह्यांच्या
गामाजींस पुस्तक रेफेरेन्स
अर्थातच.
आक्षेपार्ह रूढी
आध्यात्मिक लाभ?
अध्यात्मिक लाभ! क्लासच!! चालू
म्हणजे पाळण्याऐवजी सुपात बाळ
शर्मीला रेगे संपादीत पूस्तक
१.
माहितगार आणि बोका-ए-आझम,
.. माई मोड ऑन.
हे सगळे पुरावे
तुमचे प्रतिवाद इथे व्यर्थ आहे
माहित आहे बापू.
प्रश्न खटल्याचा नाहीये ....
भगवा दहशतवाद आणि २६/११
नॉर्मल लोकांसाठी...
म्हणजे काय आहेतच!!
काहीही अनुपराव!
भाऊ जर आपण सकल मोगा गटार सकल
गापै = झाना... ??
गापै आणि झानांच्या तार्कीक उणीवेतील साम्य
श्रीगुरुजींस उद्देशून प्रतिसाद.
१. तद्दन मूर्खपणा आहे हा,
सनातनची प्रकाशने (माहितगार यांना प्रतिसाद)
एव्हढे ग्रंथ आणि एव्हढ्या
कम्यूनल रि-इन्फोर्समेंट
फ्याक्टॉईड काय आहे?
.. सहमत
गा.पै. - काही प्रश्न.