Skip to main content

समाजकारण बातमी

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 01/10/2019 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९ च्या नव्या पानावर आपणा सर्वांचे स्वागत ! या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे सण आपण साजरे करणार आहोत त्यामुळे एकंदरीत महिना आनंदाचा असेल अशी आशा बाळगतो. वैयक्तीक रित्या मला स्वतःला हा महिना नेहमीच त्रासाचा जातो. व्यवसाय करणार्‍याला अनेक जणांना खुश ठेवावे लागते. दिवाळी हा महिना ग्राहकांना भेट देण्याचा महिना असतो. त्यामुळे घरातील खरेदी, ग्राहकांना द्यायच्या भेटींची खरेदी ह्यात आर्थिक नियोजनाचा कस लागतो. बरेचसे ग्राहक कॉर्पोरेट क्षेत्रातील असल्यामुळे देण्यात येणार्‍या भेटवस्तू देखील त्या दर्जाच्या असाव्या लागतात.

पुन्हा झकीर नाईक

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 08/07/2016 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही.

शेतकर्यांचे हित होईल का ? शेतकरी स्वतः काय करू शकतो?

लेखक नाखु यांनी बुधवार, 25/05/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
कालच लोकसत्तमध्ये एक बातमी वाचनात आली.कृषी उत्पन्न बाजार समीतीचे नियंत्रण हटवून्/शिथील करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे शेतकरी थेट ग्राहकाला आपला भाजीपाला (कांदे बटाट्यासह विकू शकतो).अता या अनुषंगाने आणखी एक बातमी दोन दिवसांपुर्वी वाचनात आली
देविदास मारुती परमाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 10 मे रोजी त्यांनी 952 किलो कांदा पुण्याच्या बाजारात विक्रीस पाठविला होता.