Skip to main content

पुन्हा झकीर नाईक

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 08/07/2016 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU

वाचने 59010
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

लक्ष्य का देतात बरे लोक्स त्या आयडी ला उकळ्या फुटत असणार हे वाच वाचून Sample treatment म्हणून यापुढे या सोनेरी टोळीच्या एकही पोस्ट ला उत्तर देऊ नका

In reply to by चंपाबाई

समीर गायकवाडने हत्या केलीय हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे निषेध केला नसेल. तुम्हाला भारी घाई सगळ्याची.

धागा भरकटविण्यात नेहमीच्याच यशस्वी कलाकारांनी यश मिळविले हे खरे आहे. त्यामुळे झाकीर नाईक व त्याची धर्मांध विषारी वक्तव्ये या मूळ विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. परंतु धागा भरकटविण्यासाठी जे खोटे आरोप केले आहेत त्यावर प्रत्त्युत्तर देणे आवश्यक आहे. यापूर्वीच एक दीर्घ प्रतिसाद देऊन सनातनवर केलेले खोटे आरोप व त्यामागची वस्तुस्थिती समोर आणलेली आहे. त्यानंतर अजून काही खोटे आरोप झाले आहेत. त्यावर पुन्हा एकदा वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
गुरूजी, अगदी संजीव पुनाळेकर जसं वरवरचं स्पष्टीकरण देतात तसच बोललात. आता "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे त्या वकील पुनाळेकरचं व्यक्तव्य बरच काही सांगून जातं.
तुम्ही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर तावातावाने जे पूर्वग्रहदूषित आरोप केले जात आहेत, तेच इथे मांडले आहेत. त्यामागे काहीही सत्य नाही. "सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे वाक्य श्रीपाल सबनीस नामक आचरटशिरोमणी संदर्भात हे उद्गार होते. हे वक्तव्य खूप काही सांगून जाते असा भास होत असेल तर इथेही ते सांगा आणि संबंधित तपाससंस्थांनाही सांगा.
मग अकोलकर का फरार आहे?? आणि खामुंपाधुं ने म्हटल्याप्रमाणे एबीपी माझावरची त्या साक्षीदाराची मुलाखत तुम्ही ऐकली नाही वाटतं. डाॅ तावडे बंदूका बनवण्यासाठी गेला होता तिथे. एबीपीवरची मुलाखत सापडत नाहीये ,
अकोलकर फरारी आहे असे पोलिस म्हणतात. तो का फरार आहे ते पोलिस आणि तोच जाणे. तो गेली ६-७ वर्षे फरारी आहे म्हणे. असेल. पण या खुनाशी त्याचा संबंध आहे का याबद्दल अजून पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. एखादा माणूस फरारी आहे हे कारण त्याला दोषी ठरविण्यासाठी पुरेसे नाही. हा साक्षीदार तोंड लपवून का मुलाखत देत होता? दाभोळकरांच्या खुनानंतर जवळपास पावणेतीन वर्षानंतर तावडेला पकडले. त्याआधी २०१३ मध्ये नागोरी व खंडेलवालला पकडले होते. पावणेतीन वर्षे हा साक्षीदार का गप्प राहिला? त्याला खुनाची पूर्ण माहिती होती तर त्याने ती इतके दिवस का लपवून ठेवली? तो जे काही बोलला त्याचा आधार काय? तो जे म्हणेल त्यावर न्यायालय डोळे झाकून विश्वास ठेवणार का? एकंदरीत खोटा साक्षीदार उभा करण्याचा हा प्रकार दिसतोय.
सनातनची शेकडो ब्यान्क खाती असुन त्यात तो फरारी मनुष्य उलाढाली करतो म्हणे
शेकडो खाती असण्याचा आणि खुनाचा संबंध आहे काय? भारतीय नागरिक कायद्याप्रमाणे कितीही खाती उघडू शकतो. ज्याप्रमाणे गायकवाडकडे २५-३० भ्रमणध्वनी संच सापडले अशा ब्रेकिंग न्यूज झळकत होत्या, तसेच हे पण आहे. या गोष्टींचा खुनाशी संबंध आहे का?
तावडेने बंदुक तयार करण्यासाठी साडविलकरकडे एक माणूस पाठवला होता,तोच तो अकोलकर!! दोन-तीन माणसेही मागितली होती, सकाळच्यावेळी वाॅच ठेवायला इ. सर्व आणि बरीच माहिती साडिलकरने सांगितली आहे.
तावडेने माझ्याकडे अण्वस्त्रे तयार करण्यासाठी माणूस पाठविला होता असे उद्या साडविलकर सांगेल! असे सांगणारा व त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे धन्य आहेत. __________________________________________________ एकंदरीत पुरावे गोळा करून नंतर तावडे व गायकवाडला पकडण्याऐवजी आधी त्यांना पकडून नंतर खटल्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टी माध्यमांना सांगून (२५-३० मोबाईल, शेकडो खाती इ.) तोच गुन्हेगार आहे असे समाजात पसरविणे म्हणजे आधी बाण मारून नंतर त्याभोवती वर्तुळ काढण्याचा प्रकार आहे. हे दोघेही, प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे पुढील अनेक वर्षे, जामीन न मिळता व खटला सुरू न होता तुरूंगात राहतील व त्यांच्याविरूद्ध सातत्याने दोषारोप केले जातील असं दिसतंय.

तुम्ही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर तावातावाने जे पूर्वग्रहदूषित आरोप केले जात आहेत, तेच इथे मांडले आहेत. त्यामागे काहीही सत्य नाही.
मग तुम्हाला थेट NIA मधून माहिती मिळते का?
"सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" हे वाक्य श्रीपाल सबनीस नामक आचरटशिरोमणी संदर्भात हे उद्गार होते.
खिक्क, सबनीसांना आचरट शिरोमणी म्हणताय? तुमच्या बुद्धीची कीव येत आहे,अहो त्यांनी पत्र लिहून मोदींची माफी मागितली होती. आणि " सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" या व्यक्तव्यात तुम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही?
हे दोघेही, प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांच्याप्रमाणे पुढील अनेक वर्षे, जामीन न मिळता व खटला सुरू न होता तुरूंगात राहतील व त्यांच्याविरूद्ध सातत्याने दोषारोप केले जातील असं दिसतंय.
ख्याक्, उजव्या विचारसरणीचं सरकार असूनसुद्धा तुम्ही असे म्हणताय?

In reply to by बोका-ए-आझम

माॅर्निंग वाॅकला आल्यावरच दाभोलकरांना मारले,म्हणून सबनीसांना घाबरवण्यासाठी पुनाळेकरने तसे ट्वीट केले होते.

In reply to by श्रीगुरुजी

आदरणीय गुरूजी, त्यांनी ट्वीट कोणत्या आशयाने केले होते ते सार-या जगाला माहित आहे,तरीही तुम्ही सोंग घेताय? इथल्या निरपेक्ष आयडींनी पुनाळेकरच्या ट्वीटबद्दल प्रकाश टाकावा. वरच्या प्रतिसादामध्ये गुरूंजींचे ढोंग उघड पडले आहे.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

आणि ते ट्वीट त्यांना घाबरवण्यासाठी होतं हा निष्कर्ष कशावरून काढलाय तुम्ही? हे म्हणजे दादा कोंडके आणि सेन्सॉर यांच्यातील वादाप्रमाणे आहे. सेन्सॉरवाले म्हणायचे - दादांच्या चित्रपटांमधले संवाद द्वयर्थी असतात. दादा म्हणायचे की तुम्ही नेमका वाईटच अर्थ का घेता? अशातलाच हा प्रकार आहे.

In reply to by बोका-ए-आझम

सनातनचे वकील पुनाळेकर यांनी सबनीसांबद्दल केलेलं ट्वीट हे धमकीवजा खोडसाळपणाचचं होतं


In reply to by श्रीगुरुजी

सबनीस सतत मोदीविरोधी बोलत होते ना!!आणि ते डाव्या विचारांचे विद्रोही होते म्हणून, दाभोलकर जे बोलत होते त्याचे उत्तर टनाटनवाल्यांकडे नव्हते म्हणून त्यांना संपवले,same here . . आता तुम्ही काहीतरी फालतू प्रतिवाद करणार आणि माझं म्हणणं अमान्य करणार,तुम्ही अमान्य केलं तरी सत्य परिस्थिती लपत नाही,लवकरच टनाटनी जेलच्या आत असतील.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

सबनीस सतत मोदीविरोधी बोलत होते ना!!
चूक क्रमांक १) आचरटशिरोमणी सबनीस मोदींविरोधी बोलत नसून असंबद्ध बरळत होते. चूक क्रमांक २) पात्रता नसताना ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. ते त्यापूर्वी बहुसंख्य महाराष्ट्रीयांना माहितीच नव्हते. कोण सबनीस, काय सबनीस, त्यांची साहित्यसंपदा काय हे कोणालाच माहिती नव्हते. आपल्याला कोणी ओळखतच नाही हे लक्षात आल्यावर सबनीसांनी झटपट प्रसिद्धीसाठी इतर सर्वजण जो शॉर्टकट निवडतात तोच निवडला. तो म्हणजे मोदींना शिव्या देणे. मोदींना शिव्या दिल्या की एका रात्रीत प्रसिद्धी मिळते हे यापूर्वी अनेकांनी अनुभवले आहे (उदा. नेहा धुपिया नावाची विस्मरणात गेलेली नटी). तुमच्या आकलनातील चूक अशी की आचरटशिरोमणी हे मोदींविरोधी सतत बोलत नसून प्रसिद्ध होण्यासाठी फक्त काही दिवस ते मोदींविरूद्ध असंबद्ध बरळत होते.
आणि ते डाव्या विचारांचे विद्रोही होते म्हणून,
म्हणजे नक्की काय होते? आधी भोंदू केजरीवाल, नंतर चारचौघात रस्त्यावर लघुशंका करून देशविरोधी घोषणा देणारा कन्हैया कुमार आणि आता आचरटशिरोमणी सबनीस हेच तुमचे आदर्श दिसताहेत. धन्य आहे!
दाभोलकर जे बोलत होते त्याचे उत्तर टनाटनवाल्यांकडे नव्हते म्हणून त्यांना संपवले,same here
दाभोलकरांच्या नक्की कोणत्या बोलण्यामुळे त्यांना टनाटनवाल्यांनी संपविले? कोणत्या न्यायालयात हे सिद्ध झाले आहे? गेली जवळपास ३ वर्षे हे खोटे आरोप केले जात आहेत व ३ वर्षात सनातनला अडकविण्यासाठी काहीच पुरावे न मिळाल्याने शेवटी साडविलकरसारख्या खोट्या साक्षीदाराला तयार केले जात आहे.
आता तुम्ही काहीतरी फालतू प्रतिवाद करणार आणि माझं म्हणणं अमान्य करणार,तुम्ही अमान्य केलं तरी सत्य परिस्थिती लपत नाही,लवकरच टनाटनी जेलच्या आत असतील.
तुमची हास्यास्पद वाक्ये, तुमची पूर्वग्रहदूषित मते आणि तुमचे विनोदी अंदाज म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

म्हणजे इकडे तुम्ही पोलिस, सरकारी वकील आणि न्यायाधीश हे सगळेच एकदम झालात की. आता शिक्षा पण सुनावून टाका.
सबनीस सतत मोदीविरोधी बोलत होते ना!!आणि ते डाव्या विचारांचे विद्रोही होते म्हणून,
सनातन ही संघपरिवारातली संस्था आहे का? सगळे डावे जसे सारखे नाहीत तसे सगळे उजवेही सारखे नाहीत. आणि श्रीपाल सबनीस काय करतील अशी टीका मोदींवर शिवसेनेचे संजय राऊत करताहेत. तेही माफी न मागता. सनातनच्या लोकांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. का म्हणे?
दाभोलकर जे बोलत होते त्याचे उत्तर टनाटनवाल्यांकडे नव्हते म्हणून त्यांना संपवले,same here
लवकरच टनाटनी जेलच्या आत असतील. जेलच्या आत म्हणजे आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली असं होत नाही. वाटते तेवढी ही गोष्ट साधीसरळ नाहीये. जर दाभोळकरांच्या हत्येमागे सनातन असेल तर त्या संघटनेवर बंदी घालून तिच्या सदस्यांना गुन्हेगार घोषित करायलाच हवं, पण तसं अजून झालेलं नाही. जे तुरूंगात आहेत ते निर्दोष आहेत असं मी म्हणत नाहीये पण त्यांच्यावरचे आरोप सिद्ध न करता त्यांना सरसकट गुन्हेगार म्हणून जाहीर करणं हे चूक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

बोकोबा, असं वेड्यासारखं नाही हं करायचं. केजरीवाल एखाद्याला भ्रष्टाचारी म्हणाले की तो बाय डिफॉल्ट भ्रष्टाचारी असतोच. त्यासाटी भ्रष्टाचाराचे पुरावे वगैरे फालतू गोष्टींची गरज नसते. तसेच खामुंपाधुं या महात्म्याने सनातननेच खून केले असे म्हटले की ते सनातननेच केलेले असतात. त्यासाठी पुरावे, खुनामागचा हेतू इ. गोष्टींची गरजच नसते.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

>>> मग तुम्हाला थेट NIA मधून माहिती मिळते का? अभ्यास वाढवा. >>> खिक्क, सबनीसांना आचरट शिरोमणी म्हणताय? तुमच्या बुद्धीची कीव येत आहे,अहो त्यांनी पत्र लिहून मोदींची माफी मागितली होती. आधी बरेच काही आचरटासारखे बरळले. नंतर राणा भीमदेवी थाटात गर्जना केली की मला फासावर चढविले तरी माफी मागणार नाही. आणि शेवटी शेपूट घालून निमूटपणे माफी मागितली. तुमच्या दोघांच्याही सुमार बुद्धीची कीव वाटते. >>> आणि " सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला" या व्यक्तव्यात तुम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही? नाही.

https://www.youtube.com/watch?v=mUOxaNNUZHM पुन्हा तेच ते संतापजनक उदाहरण! गणिताच्या शिक्षकाकरता मुलाखती होत आहेत. एक सांगतो २+२=३, एक सांगतो २+२=४ आणि अजून एक सांगतो २+२=५ तर कुठला शिक्षक निवडाल? गणिताच्या शिक्षकाला असले प्रश्न विचारतात का? आणि धर्माच्या बाबतीत ह्या अतिसामान्य समीकरणासारखे अचूक उत्तर काय हे माहित असते का? उदा. मूर्तीपूजा चूक का बरोबर, ईश्वर एक का अनेक, पुनर्जन्म असतो का नसतो, पापपुण्याचा हिशेब मृत्युनंतर होतो का नाही, व्याज लावणे पाप की योग्य? ह्याचे उत्तर इतके सरळ सोपे कसे असेल? आपणच असे जाहिर करायचे की आपलेच उत्तर चोख बाकीच्यांचे चूक हा काय प्रकार आहे? इथे झकीर नाईकाने स्वतःच्या धर्माचा दुराभिमान दाखवला आहे. एका इमानी कुत्र्याप्रमाणे जो भाकरी खिलवतो त्या धन्याचे पाय चाटणे इथे दिसते. सौदी सरकार जो अफाट पैसा पुरवतो त्याच्या समर्थनार्थ काय वाट्टेल ते बोलणे आणि त्याला विद्वत्तेचा बेगडी मुलामा चढवणे इथे दिसते आहे. जिथे मुस्लिम अल्पसंख्य आहेत निदान त्या देशात अन्य धर्मांना उघड उघड चूक म्हणणे हे धार्मिक तेढ निर्माण करणारच. तेव्हा ह्या माणसाला उत्तर देणे आवश्यक आहे.

In reply to by हुप्प्या

झानाच्या गणिताला भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या ब्लॉगमधून चपखल उत्तर दिले आहे. वर शाम भागवतांनी दुवा दिला आहे.

झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या वाहिनीवर बांगलादेश बंदी घालणार आहे म्हणे. भारतात सुद्धा त्याच्या वक्तव्यांची चौकशी केली जाणार आहे म्हणे. बांगलात अतिरेकी हल्ला झाल्यावर व अतिरेक्यांनी आपण झाक्याच्या प्रवचनांपासून प्रेरणा घेतली असे सांगितल्यावर माध्यमे जागी झाल्यासारखी दिसताहेत. झाक्या अनेक वर्षे जात्यंध विष ओकतोय. गिरिराज सिंह, आदित्यनाथ यांचे प्रत्येक वाक्य ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवून गहजब करणार्‍या व त्यांच्या प्रत्येक वाक्यावर वाहिन्यांवर चर्चासत्र करणार्‍या प्रेस्टिट्यूट्सना आजतगायत झाक्याच्या विषाची दखल घ्यावीशी वाटली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. असो. प्रेस्टिट्यूट्स व तथाकथित पुरोगामी व निधर्मी विचारवंत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे वेगळे वर्तन अपेक्षित नव्हते. आता निदान माध्यमातून तरी निषेधाचे क्षीण सूर येत आहेत. हे तथाकथित पुरोगामी व निधर्मी विचारवंत झाक्याच्या वर्तनाबद्दल अजूनही मूग गिळून गप्प आहेत. झाक्याच्या वाहिनीवर, प्रवचनांवर बंदी घालून काहीही साध्य होणार नाही. आंतरजालीय जगात अशा बंदीला अर्थ नसतो. आपले विखारी विचार मुस्लिमांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्याकडे इतर शेकडो मार्ग उपलब्ध असतील. त्याची व्याख्याने तपासून त्या व्याख्यानांचा कायदेशीरपणा तपासून नंतरच त्याच्यावर कायद्याच्या मार्गाने कायदेशीर कारवाई करणे उचित ठरेल. बंदी हा उपाय निष्फळ ठरण्याचीच जास्त शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, हेटस्पीच बद्दल कारवाई करता येतात तरीही बंदी काय किंवा इतर कायदेशी कारवाई काय अशक्य नसली तरी झानांची वक्तव्ये सहसा काठावरची पण भारतीय कायद्याचे कमित कमी उल्लंघन होईल अशा पद्धतीने आहेत, त्यामूळे सध्याच्या कायद्यातून खूप प्रभावी कार्यवाही संभव असण्याची शक्यता कमी हे वास्तव केव्हातरी चिमुटभर मिठा सोबत स्विकारावे लागेल आणि मुख्यभर त्यांच्या (अ)विचारांना मुद्देसूदपणे तार्कीक उणीवा नमुद करुन खोडण्यावर ठेवावा लागेल आणि हे काम अभ्यासकांच्या कार्यक्षेत्रात मोडत, असे काम सरकार कडून होण्याची शक्यता कमी असेल असा माझा व्यक्तिगत कयास आहे. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

तेच सांगतोय मी. झाक्याविरूद्ध बंदीच्या कारवाईने फार काही साध्य होणार नाही. त्याचे विचार खोडण्याचा जितका प्रयत्न होईल, त्याच्या दामदुपटीने निधर्मांध (स्वतःला पुरोगामी व निधर्मी विचारवंत समजणारे) त्याच्या बाजूने उभे राहतील. सरकारने फक्त त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत आहे का याकडे लक्ष ठेवावे व तसे होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी.

In reply to by श्रीगुरुजी

सरकारने फक्त त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत आहे का याकडे लक्ष ठेवावे व तसे होत असल्यास कायदेशीर कारवाई करावी.
(बहुधा) कायद्याच्या परिघात बसतील एवढ्याच मुलतत्ववादी वैचारीक पायर्‍या चढण्यात झाना तत्वज्ञान प्रसृत करतो, त्याचे शिष्यगण इतर नकारात्मक पायर्‍या इतरत्र चढतात (ज्याला तो जबाबदार असू शकत नाही असे त्याचे म्हणणे असावे जे खरेही असू शकते) त्यामुळे (त्याची काही गंभीर आणि प्रत्यक्ष चूक असल्याशिवाय) कायदेशीर कारवाईलाही मर्यादा पडणार हे ओघाने येते. तो भारतात वापस येईल नाही येईल पाकीस्तान सारखा अजून एखादा देश त्याला भारता बाहेर राहण्यास साहाय्य करेल काहीच माहीत नाही. शिवाय त्याला अजून नवे काही बोलण्याची गरज आहे असेही नाही. त्याला जे बोलायचे ते बोलून इंटरनेटवर टाकून तो मोकळा झाला आहे. आपण म्हणताय पण अभ्यासकांनी तर्कशुद्धपणे खंडण करण्या शिवाय इतर मार्ग कितपत उपलब्ध आहेत या बद्दल बरीच साशंकता आहे.

अशाच चिथावणीखोर प्रचाराने २०१२ साली मुंबईत रझा अकादमीच्या गुंडांनी हैदोस घातला होता. त्यात पोलिसांच्या व वाहिन्यांच्य गाड्या जाळल्या. महिला पोलिसांची विटंबना केली. पण कुणा पुरोगाम्याची दातखिळी उघडली होती काय? कारण आता डॉ. झाकीर नाईक यांचे जे तर्कशास्त्र आहे, तेच पुरोगामी तत्वज्ञान झालेले आहे. दहशतवादी इस्लाम आणि पुरोगामीत्व यात किंचीतही भेदभाव उरलेला नाही. जी भूमिका नाईक इस्लामच्या नावाने मांडतात, तीच पुरोगामी शहाणे वैचारिक युक्तीवाद म्हणून मांडत असतात. इस्लाम परिपुर्ण असल्याचा त्यांचा दावा तमाम भारतीय पुरोगाम्यांनी मानला नसता, तर सनातन वा अन्य कुठल्या हिंदू संघटनेच्या बरोबरीने झाकीर नाईक यांच्यावरही बंदीचा आग्रह पुरोगाम्यांनी धरला नसता का?
(भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून)

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या माहितीसाठी सांगतो दुसर-या एका संस्थळावर मी फुरोगाम्यांशी वाद घालत असतो.आयडीनाम वेगळं आहे!!! दांभिक उजवे विचार आणि स्युडो सेक्युलरांचा मला फार राग येतो, तुम्ही दांभिक उजवे आहात, इकडे बहुतांशी उजवे आहेत अन् तिकडे डावे!!! परिस्थिती बघून प्रतिसाद देत असतो. . | | | (खरा सेक्युलर)

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

म्हणजे त्या संस्थळावरसुद्धा हाच विनोदी प्रयोग सुरू आहे असं दिसतंय. चालू द्या! त्या संकेतस्थळावरील सदस्यांना सुद्धा करमणुकीचा हक्क आहेच ना!!

अवांतर : श्रीगुरुजी, >> सनातन ही अत्यंत मूर्ख व दुराग्रही लोकांची संघटना आहे. कशावरून? मूर्खपणाचं आणि दुराग्रहाचं एखादं उदाहरण मिळेल काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१) अंदाजे २ वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर निमंत्रितांना एका विषयावर वादविवादासाठी बोलविले होते. महाराष्ट्रातील एका गावात एक अघोरी प्रथा सुरू होती. एका पाळण्यात तान्ह्या मुलांना ठेवून तो पाळणा एका खोल विहिरीत सोडला जात असे. काही क्षण पाळणा पाण्यावर तरंगल्यानंतर तो बाहेर काढला जात असे. अंधार्‍या विहिरीमुळे व भीतिमुळे तान्ही मुले रडून आकांत करीत असत. परंतु अनेक वर्षे सुरू असलेल्या प्रथेचे भूत डोक्यात असल्याने गावकरी ही अघोरी प्रथा थांबविण्यास तयार नव्हते. या विषयावर बोलण्यासाठी ३-४ मान्यवर वक्ते सहभागी झाले होते. त्यात अंनिसचे कोणतरी होते व सनातनचे अभय वर्तक होते. त्या परिसंवादात अभय वर्तक त्या अघोरी प्रथेचे समर्थन करीत होते व तुम्ही फक्त हिंदूंच्याच प्रथांविरूद्ध का आहात, इतर धर्मांच्या प्रथांविरूद्ध का बोलत नाही असे विचारत होते. त्यांचा दुसरा प्रश्न बरोबर होता. परंतु हिंदूंमध्ये जर अशा अघोरी प्रथा असतील तर त्या बंद व्हायलाच हव्यात. लोक ऐकत नसतील तर कायद्याने व पोलिसदल वापरून बळजबरीने हे प्रकार बंद व्हायलाच हवे. इतर धर्मांमध्ये सुद्धा अशा अघोरी प्रथा आहेत, त्यामुळे आपल्या धर्मातील अशा प्रथांना बंदी घालायला विरोध करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. २) काही महिन्यांपूर्वी तृप्ती देसाई नामक महिलेने शनी शिंगणापूरच्या चौथर्‍यावर पुरूषांप्रमाणे महिलांना देखील प्रवेश मिळावा यासाठी जोरदार आंदोलन केले होते. माझे असे वैयक्तिक मत आहे की चौथर्‍यावर पुजार्‍यांशिवाय कोणालाच प्रवेश देऊ नये. परंतु जर पुरूषांना चौथर्‍यावर जायची परवानगी असेल तर महिलांना सुद्धा तसे जाता यावे. या विषयावर एका वाहिनीवर चर्चा सुरू असताना अभय वर्तकांनी अशी परवानगी द्यायला विरोध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार शंकराचार्य किंवा हिंदू धर्माचार्य यांना विचारून त्यांना मान्य असेल तर त्यांच्या संमतीनेच अशी परवानगी द्यावी. हे शंकराचार्य किंवा धर्माचार्य कोण? त्यांना का विचारायचे? त्यांना याबाबत कायदेशीर किंवा धार्मिक अधिकार कोणी दिले? त्यांनी महिलांना परवानगी द्यायला विरोध केला तर ते मान्य करायचे का? ३) दाभोळकरांचा खून झाल्याझाल्या काही क्षणातच त्यासाठी सनातनला दोषी ठरविणे सुरू झाले. सर्व वाहिन्यांवरून तावातावाने सनातनविरूद्ध बोलले जात होते. एकप्रकारे पोलिस तपास एका विशिष्ट दिशेला वळावा, त्यात सनातनला अडकवावे व त्यामुळे खर्‍या खुन्यांना पुरावे नष्ट करून सुखरूप पळून जाता यावे यासाठीच हा प्रयत्न असावा. सनातनचे जुने अंक काढून त्यातील प्रक्षोभक लेखांचे दाखले दिले जात होते. सनातन महामूर्खांची संस्था असली तरी ते सुपारी किलर्सना पाठवून खून करणे शक्य दिसत नाही. मागील ३ वर्षात जंगजंग पछाडून सुद्धा सनातनविरूद्ध पुरावे मिळालेले नाहीत. आता पोलिस खोटे साक्षीपुरावे उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. असे असले तरी आपण रिसिव्हिंग एंडला आलेलो आहेत हे लक्षात घेऊन सनातनने पोलिटिकल करेक्ट भूमिका घेऊन गप्प रहायला हवे होते. परंतु दुसर्‍या दिवशी सनातनच्या अंकात दाभोळकरांवर एक लेख छापून आला ज्यात त्यांची निंदानालस्ती करण्यात आली होती. दाभोळकरांच्या पापांची शिक्षा त्यांना मिळाली अशा अर्थाची अत्यंत मूर्खपणाची वाक्ये त्या लेखात होती. एवढेच नव्हे तर सनातनच्या संकेतस्थळावर दाभोळ्करांचे चित्र छापून त्यावर लाल फुली मारलेली दाखविली होती. आपल्या मूर्खपणामुळे आपण आपल्यावरील संशयाला पुष्टी देत आहोत व आपल्याच अनेक साधकांना संकटात टाकत आहोत हे ज्यांच्या लक्षात येत नव्हते ते महामूर्खच आहेत.

आमच्या लेखी तर धर्माचा ध सुद्धा उच्चारू न शकणाऱ्या बारक्या पोरांची सुंता करणे किंवा त्यांच्या कानाला भोके पाडणे (आयुष्यभर कधी डूल घालणार नसले तरी) हे ही अघोरीच आहे पूर्णतः फक्त, व्हॉटअबाऊटरी अन भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे वाल्या दिवट्यांना ते कळत नाही, असो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

उद्देश माहित नाही. माझेही कान टोचलेले आहेत पण का ते माहित नाही. जेव्हा टोचले तेव्हा अर्थातच choice नव्हता. सुंतेबद्दल म्हणाल तर त्याचे काही वैद्यकीय फायदे आहेत असं वाचलेलं आहे. सुंता ज्यूंमध्येही होते आणि त्यांच्यात शिक्षणाचं प्रमाण आणि स्त्रियांना मिळणारं स्वातंत्र्य हे मुस्लिमांपेक्षा जास्त आहे. पण अगदी आधुनिक ज्यूंमध्येही सुंता केली जाते. वैद्यकीय फायदे (असतील तर) मिपावरील डाॅक्टर्स जास्त व्यवस्थित सांगू शकतील.

In reply to by बोका-ए-आझम

बोक्याभाऊ, मला नेमका रेफेरेन्स आठवत नाहीये (कॉलिंग बॅटू, वल्ली अँड अदर लरनेड सोल्स) पण बहुदा एक वैदिक साहित्यात हा उल्लेख आहे की 'ज्याच्या कानातील पाळ्यांना केलेल्या छिद्रातून सूर्यकिरण आरपार होत नाहीत तो विप्र/ब्राह्मण नाही तर दानव/राक्षस असून त्याला दिलेले दान हे कुपात्री दान म्हणवेल' का काय से , शिवाय त्याचे काही वैद्यकीय फायदे असल्याचे सुद्धा (अजूनतरी) मला माहिती नाहीत, असल्यास जाणून घेणे आवडेल

In reply to by आरोह

इथे उद्देश लक्षात घेणे प्रतिसादकाचा हेतू नसावा, प्रश्न वयाचे १८ वर्ष पूर्ण सोडून द्या आगदी न कळत्या वयात पालकांनी/समाजाने मुलांच्या शरीरावर कायम स्वरुपी बदल करण्याचे निर्णय परस्पर घेण्या बद्दल त्यांना साशंकता व्यक्त करावयाची असावी. मी व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे आणि माझ्या पालकांनी माझ्या कानाला लहानपणी भोक पाडले असते तर ते मला नक्कीच रुचले नसते मग त्यांचा उद्देश कितीही स्तुत्य असू द्यात.

पालक मुलांची सुंता का करतात, किंवा त्यांचे कां का टोचतात... किती साधा प्रश्न...तत्वज्ञान उगाळून तुम्ही एकदम गोल गोल फिरवला

In reply to by आरोह

या धाग्याच्या परिघाशी संबंधीत उत्तर दिले. आपल्याला धागा लेखाच्या उद्दीष्टापलिकडे माहिती हवी असेल तर इतर लोक मदत करु शकतील. शुभेच्छा.

श्रीगुरुजी, केवळ एका कार्यक्रमावरून सनातन संस्था मूर्ख असल्याचा निष्कर्ष काढण्यात थोडी घाई होते असं वाटंत नाही का? १. >> त्या परिसंवादात अभय वर्तक त्या अघोरी प्रथेचे समर्थन करीत होते त्यामागे कारण काय दिलं होतं? आणि अध्यात्मिक कारण नसेल तर ती प्रथा बंद करायला काहीच हरकत नाही. २. >> त्यांच्या म्हणण्यानुसार शंकराचार्य किंवा हिंदू धर्माचार्य यांना विचारून त्यांना मान्य असेल तर त्यांच्या संमतीनेच >> अशी परवानगी द्यावी. हे शंकराचार्य किंवा धर्माचार्य कोण? त्यांना का विचारायचे? त्यांना याबाबत कायदेशीर >> किंवा धार्मिक अधिकार कोणी दिले? जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती. ३. >> असे असले तरी आपण रिसिव्हिंग एंडला आलेलो आहेत हे लक्षात घेऊन सनातनने पोलिटिकल करेक्ट भूमिका >> घेऊन गप्प रहायला हवे होते. डरपोकांनी पोक काढून पो.क. भूमिका घ्यावी. खरं ते छापायची हिम्मत आजच्या घडीला फक्त सनातन प्रभात मध्येच आहे. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून व्हावा हा निर्देश ओढूनताणून आणलेला आहे. तसेच सनातननी दाभोलकरांची निंदानालस्ती कुठल्याही लेखात केलेली नाही. आ.न., -गा.पै. जाताजाता : दाभोलकर फ्रॉड माणूस होता/आहे हे सनातन संस्था सोडल्यास कोणीही उघड बोलायला धजत नाही.

In reply to by गामा पैलवान

जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.
हाऊ डू यू से दॅट, मोनिशा..... ;)

In reply to by गामा पैलवान

केवळ एका कार्यक्रमावरून सनातन संस्था मूर्ख असल्याचा निष्कर्ष काढण्यात थोडी घाई होते असं वाटंत नाही का?
सनातनच्या मूर्खपणाची मी ३ वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.
१. >> त्या परिसंवादात अभय वर्तक त्या अघोरी प्रथेचे समर्थन करीत होते त्यामागे कारण काय दिलं होतं? आणि अध्यात्मिक कारण नसेल तर ती प्रथा बंद करायला काहीच हरकत नाही.
म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का? या अघोरी प्रथेमागचे कारण अध्यात्मिक असो, नैतिक असो, पारमार्थिक असो, धार्मिक असो किंवा अजून कोणतेही असो, प्रथा अघोरी असल्यामुळे ती बंद व्हायलाच पाहिजे.
२. >> त्यांच्या म्हणण्यानुसार शंकराचार्य किंवा हिंदू धर्माचार्य यांना विचारून त्यांना मान्य असेल तर त्यांच्या संमतीनेच >> अशी परवानगी द्यावी. हे शंकराचार्य किंवा धर्माचार्य कोण? त्यांना का विचारायचे? त्यांना याबाबत कायदेशीर >> किंवा धार्मिक अधिकार कोणी दिले? जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.
मी व बहुसंख्य हिंदू कोणत्याही शंकराचार्य किंवा हिंदू धर्मपंडितांच्या उपदेशावर आचरण करीत नाहीत. स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून आम्ही आचरण करतो. कोणाच्या तरी सांगण्यावर अंधविश्वास ठेवून आचरण करायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नव्हे. शंकराचार्य सांगतात की साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीचे पूजन करू नका. हा मूर्खपणाचा उपदेश किती हिंदूंनी आचरणात आणला आहे? शंकराचार्य मनाला येईल ते सांगतील. ते सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून विचार न करता आचरणात आणायचं का? मी देवळात जातो व घरीही पूजाअर्चा करतो. पण मी हे माझ्या मनाला आवडते व त्यापासून मला शांती व समाधान मिळते म्हणून करतो. शंकराचार्य सांगतात म्हणून नव्हे. उद्या शंकराचार्यांनी देवळात जायला बंदी घातली किंवा पू़जा करू नका सांगितले तरी ते माझ्या मनाला पटत नसल्यामुळे मी त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करेन.
३. >> असे असले तरी आपण रिसिव्हिंग एंडला आलेलो आहेत हे लक्षात घेऊन सनातनने पोलिटिकल करेक्ट भूमिका >> घेऊन गप्प रहायला हवे होते. डरपोकांनी पोक काढून पो.क. भूमिका घ्यावी. खरं ते छापायची हिम्मत आजच्या घडीला फक्त सनातन प्रभात मध्येच आहे. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून व्हावा हा निर्देश ओढूनताणून आणलेला आहे. तसेच सनातननी दाभोलकरांची निंदानालस्ती कुठल्याही लेखात केलेली नाही.
केवळ सनातनमध्ये छापून आले म्हणजे ते खरेच आहे असे नाही. दाभोलकरांच्या चित्रावर फुल्ली मारली म्हणजे त्यांचा खून सनातननेच केला आहे हा निष्कर्ष अवास्तव असला तरी जेव्हा संशयाची सुई सनातनवर वळलेली होती तेव्हा अशा संशयाच्या वातावरणात दाभोळकरांच्या खुनानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या चित्रावर लाल फुली मारणे हे सनातनविषयी संशय वाढविणारे होते. त्यामुळे सनातनवर संशय अजून वाढला व त्यामुळे सनातनचे अनेक साधक हे पोलिसांच्या रेडारवर आले. सनातनने हा मूर्खपणा टाळायला हवा होता. परंतु तारतम्य व सनातन यांचे एकमेकांशी हाडवैर असल्याने तसे झाले नाही.
जाताजाता : दाभोलकर फ्रॉड माणूस होता/आहे हे सनातन संस्था सोडल्यास कोणीही उघड बोलायला धजत नाही.
दाभोळकर हे फ्रॉड होते हा आरोप फक्त सनातनच्या वृत्तपत्रात करून फायदा नाही. असे आरोप करणे म्हणजे केजरीवालांच्या आरोपांसारखे असतात. त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. निव्वळ आरोप करण्यापेक्षा त्याचा कायदेशीर पाठपुरावा करून न्यायालयात खटला दाखल करणे हाच एकमेव उपाय आहे.

In reply to by गामा पैलवान

मी सुद्धा श्रीगुरुजींचा प्रतिसाद येऊन जाण्याची वाट पहात होतो. हा धागा सनातन संस्थे बद्दल नसल्यामुळे त्या बद्दल या धाग्यात भाष्य टाळतो. शंकराचार्य विषयक मुद्यातील निसटत्या बाजूंकडे लक्ष वेधावेसे वाटते.
जर शंकराचार्य वा इतर हिंदू धर्मपंडितांचे ऐकायचे नसेल तर देवळात जायचंच कशाला? घरच्या घरी करावी की हवी तेव्हढी भक्ती.
१) हिंदू धर्म-संस्कृतीची सुरवात शंकराचार्यांपासून किंवा कोणत्याही धर्मपंडितापासून होत नाही आणि शंकराचार्यांपाशी किंवा इतर कुणापाशी संपत नसावा. २) देव कशात बघायचा ते कोणत्या देवळात नमस्कार करायचा आणि भक्ती कशा पद्धतीने करावयाची हे प्रत्येक हिंदू स्वतः ठरवतो, त्याचे देवाशी नाते डायरेक्ट असते भक्त तथाकथीत पंडीतांच्या सांगण्यावर अवलंबून असला पाहीजे असे काहीही नसावे, एवढेच नव्हे कुणाला गुरु मानायाचे हे प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवते. अमुक यांनाच पंडीतानांच किंवा शंकराचार्यांना गुरु माना असे हिंदू धर्मात काहीही नसावे. ३) अघोरी नवसा सायासांना विरोधाची सुधारणावादाची संत एकनाथ संत तुकारामांपासूनची परंपरा आहे, बदलत्या काळाला स्विकारणे आणि काळासोबत बदलणे हा हिंदूधर्म आणि समाजाचा गुणधर्म असावा. ४) हिंदू धर्माची मूळ विचारसरणी विचारांच्या उदात्ततेवर आधारलेली असावी संकुचितते वर नसावी.

तार्कीक उणिवांचे खंडन तर्कशुद्ध पद्धतीने कसे करावे याचा उत्कृष्ट नमुना हफिंग्टन पोस्टवरच्या फरहान मुसावीच्या It's Time We Muslims Chose Common Sense Over Zakir Naik लेखातून आला आहे. झाकीर नाईकांच्या मुद्द्यांचे अगदी व्यवस्थीत तर्कशास्त्रीय खंडन केले आहे. त्यांचा इमेल पत्ता मिळाला तर विनंती करून कॉपीराईट फ्री करुन घेऊन मराठी सहीत विवीध भाषात अनुवादीत करुन घ्यावा असा लेख. याच विषयावर हफिंग्टन पोस्टवरच अजून एक वाचनीय लेख झुबीन मदन यांचा आला आहे. दोन्ही दुवे लेख आवडल्यास सोशल मिडीया शेअर करण्या एवढे उत्तम वाटतात.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

हे तात्पुरते असेल, बॅलन्सशीट आणि इतर काही माहिती सबमीट करण्यात मागेपुढे झाले असेल. त्यांच्या राजकीय दृष्टीकोणाशी काही संबंध असणार नाही आणि मतदारांवर होल्ड असेल तर उमेदवार त्यांना पक्ष चिन्हा शिवाय अपक्ष सुद्धा निवडून आणता येतील. त्यांचे उमेदवार अपक्ष निवडून येण्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच अधिक पोहोचेल किंवा कसे.

हो बरोबर आहे. पक्षानं जो काही कर भरला असेल त्याची कसलीच माहिती न दिल्यामुळे एमआयएमवर ही कारवाई करण्यात आली आहे. "मतदारांवर होल्ड असेल तर उमेदवार त्यांना पक्ष चिन्हा शिवाय अपक्ष सुद्धा निवडून आणता येतील." हे हि खरय.

श्रीगुरुजी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही भाष्ये करेन म्हणतो. १. >> सनातनच्या मूर्खपणाची मी ३ वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत. ज्याला तुम्ही मूर्खपणा म्हणताहात तो कित्येक लक्षावधी लोकांच्या मते मूर्खपणा नाहीये. २. >> म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का? इथे असा तिरपागडा अर्थ काढायची काय गरज आहे? पर्यायी प्रथा सुरु करता येत नाहीत का? तशी सुरू करायची असेल तर मूळ प्रथा पद्धतशीरपणे बंद करायला हवी. एकदम दिसली प्रथा आणि केली बंद असं का म्हणून? अभय वर्तकांनी पर्यायी प्रथेसाठी जर विचारविनिमयाचा आग्रह धरला तर त्यास आंधळं समर्थन म्हणंत नाहीत. ३. >> मी व बहुसंख्य हिंदू कोणत्याही शंकराचार्य किंवा हिंदू धर्मपंडितांच्या उपदेशावर आचरण करीत नाहीत. >> स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरून आम्ही आचरण करतो. >> कोणाच्या तरी सांगण्यावर अंधविश्वास ठेवून आचरण करायला हिंदू धर्म म्हणजे इस्लाम नव्हे. गाडी चुकली हो. शंकराचार्य वा हिंदू धर्मपंडित यांनी उपदेश केला तर तो अतार्किकच असतो हे गृहीतक साफ चुकीचं आहे. ४. >> शंकराचार्य सांगतात की साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीचे पूजन करू नका. >> हा मूर्खपणाचा उपदेश किती हिंदूंनी आचरणात आणला आहे? >> शंकराचार्य मनाला येईल ते सांगतील. >> ते सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून विचार न करता आचरणात आणायचं का? आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला? ५. >> मी देवळात जातो व घरीही पूजाअर्चा करतो. पण मी हे माझ्या मनाला आवडते व त्यापासून मला >> शांती व समाधान मिळते म्हणून करतो. शंकराचार्य सांगतात म्हणून नव्हे. एक काम करा. एके दिवशी देवळात जा आणि तिथले नियम न पाळायचा हेका धरा. पाखंडी तृप्ती देसाई जसा हेका धरते अगदी तस्साच धरून पहा. मग बघा शांती मिळते का ते. ६. >> उद्या शंकराचार्यांनी देवळात जायला बंदी घातली किंवा पू़जा करू नका सांगितले तरी ते माझ्या मनाला >> पटत नसल्यामुळे मी त्यांच्या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करेन. अचूक निर्णय. त्याबद्दल अभिनंदन. मात्र देवळात जाऊ नका म्हणून उपदेश करायला शंकराचार्यांची अक्कल गहाण पडलेली नाही अजूनतरी. ७. >> जेव्हा संशयाची सुई सनातनवर वळलेली होती तेव्हा अशा संशयाच्या वातावरणात दाभोळकरांच्या खुनानंतर >> लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या चित्रावर लाल फुली मारणे हे >> सनातनविषयी संशय वाढविणारे होते. दाभोलकरांचं फुल्ली मारलेलं चित्रं जुनंच आहे. शिवाय दुसऱ्या दिवशी लगेच संशयाची सुई वगैरे वळलेली नव्हती. तसं बघायला गेलं तर संस्थेवर नेहमीच बिनबुडाचे आरोप होत आलेत. प्रत्येक आरोपाला घाबरत बसलं तर साधना करायची कशी? ८. >> त्यामुळे सनातनचे अनेक साधक हे पोलिसांच्या रेडारवर आले. सनातनने हा मूर्खपणा टाळायला हवा होता. >> परंतु तारतम्य व सनातन यांचे एकमेकांशी हाडवैर असल्याने तसे झाले नाही. यांत तुम्हाला सनातन संस्थेचा मूर्खपणा दिसतो, पण पोलिसांचा अक्कलशून्यपणा दिसंत नाही. कमाल आहे. कर भरता ना तुम्ही? मग शासनाला जाब विचारा ना जरा. ९. >> दाभोळकर हे फ्रॉड होते हा आरोप फक्त सनातनच्या वृत्तपत्रात करून फायदा नाही. अगदी बरोबर. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती? जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे? असो. एकंदरीत सनातन संस्थेचे विचार तुम्हाला पटत नसले तरी त्यांना मूर्खबिर्ख विशेषणे लावू नयेत. इतकंच मागणं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ज्याला तुम्ही मूर्खपणा म्हणताहात तो कित्येक लक्षावधी लोकांच्या मते मूर्खपणा नाहीये.
असेल बोवा. पुलंनी म्हटलेच आहे की "जगात कुंभार थोडे, गाढवे फार".
२. >> म्हणजे अध्यात्मिक कारण असेल तर ही अघोरी प्रथा सुरूच ठेवावी का? इथे असा तिरपागडा अर्थ काढायची काय गरज आहे? पर्यायी प्रथा सुरु करता येत नाहीत का? तशी सुरू करायची असेल तर मूळ प्रथा पद्धतशीरपणे बंद करायला हवी. एकदम दिसली प्रथा आणि केली बंद असं का म्हणून? अभय वर्तकांनी पर्यायी प्रथेसाठी जर विचारविनिमयाचा आग्रह धरला तर त्यास आंधळं समर्थन म्हणंत नाहीत.
पर्यायी प्रथा? तान्ह्या मुलाला पाळण्यात ठेवून खोल, अंधार्‍या विहिरीत सोडून पाळणा पाण्यावर तरंगत ठेवण्याच्या अघोरी प्रथेला पर्याय शोधायचा? धन्य आहे. अघोरी प्रथा पद्धतशीरपणे बंद करायची म्हणजे काय करायचं? आधी पाण्यावर पाळणा तरंगत ठेवणे थांबवून पाळणा फक्त विहिरीत लटकत ठेवायचा, नंतर पुढच्या वर्षी पाळणा अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत न नेता पाण्यापासून १० फूट वर लटकत ठेवायचा, नंतर प्रत्येक वर्षी १०-१० फूट कमी करायचे आणि शेवटी पाळणा विहिरीच्या काठावर नुसताच बांधून ठेवायचा. ती प्रथा अशी पद्धतशीरपणे बंद करायची का? असल्या अघोरी प्रथा या तातडीने संपूर्ण बंद करायच्या असतात. पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. महिला नग्नावस्थेत रस्त्याने जाऊन देवीची पूजा करायच्या. पोलिसांनी बळाचा वापर करून हा मूर्खपणा संपूर्ण बंद केला. जर असली प्रथा पद्धतशीरपणे बंद करायचा प्रयत्न केला असता तर पहिल्यांदा पूर्ण नग्न न होता फक्त कंबरेवर वस्त्र चढवून पूजा करा, मग काही वर्षांनी फक्त वर आणि खाली वस्त्र परिधान करा, नंतर काही वर्षांनी अजून एखादे वस्त्र चढवा असले काही तरी झाले असते. प्रथा अघोरी आहे व त्यामुळे ती तातडीने संपूर्ण बंद व्हायला पाहिजे. अघोरी प्रथेला पर्यात नसतो व त्याचे समर्थनही करता येत नाही. वर्तक तर पर्याय सोडाच पण प्रथा बंद करायलाच विरोध करीत होते. मूर्खपणा तो हाच.
गाडी चुकली हो. शंकराचार्य वा हिंदू धर्मपंडित यांनी उपदेश केला तर तो अतार्किकच असतो हे गृहीतक साफ चुकीचं आहे.
मी असलं गृहितक धरलेलंच नाही. तो जे उपदेश करतात तो मी आंधळेपणाने न पाळता स्वतःची बुद्धी वापरतो व त्यानुसार आचरण करतो. शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवा का नको याविषयी शंकराचार्यांची मते काहीही असोत, तिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने प्रवेश हवाच असे माझे मत आहे. परंतु वर्तक मात्र याबाबतीत शंकराचार्यांचा सल्ला घ्यावा असा आग्रह धरीत होते. मूर्खपणा तो हाच.
आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला?
अनेकजण स्वयंभू शंकराचार्य आहेत. कांची कामकोटी पीठाचे प्रमुख स्वतःला शंकराचार्य मानत असले तरी इतर चार पीठांचे प्रमुख कांची कामकोटीला मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने दक्षिणेत कांची कामकोटी हे शंकराचार्यांचे पीठ नसून कर्नाटकातील शॄंगेरी हेच खरे पीठ आहे. याव्यतिरिक्त रत्नागिरीचा भोंदू नरेंद्र महाराज स्वतःला शंकराचार्य म्हणवून घेतो. कोल्हापूरलाही शाहू महाराजांनी पर्यायी पीठ स्थापन केले आहे. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचा मूर्खपणा हा की त्यांनी शिर्डीचे साईबाबा देव नसल्यामुळे त्यांच्या मूर्तीची पूजा करणे हे धर्मविरोधी आहे असा फतवा काढून साईबाबांची पूजा करण्यास विरोध केला. श्री श्री आद्य शंकराचार्य हे सुद्धा मानव होते व त्यांची मूर्ती सर्व पीठात असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास इ. सर्व संत मानव होते. त्यांच्या मूर्तीची सर्वत्र पूजा होते. अशा परिस्थितीत साईबाबांची मूर्ती पूजु नये असे सांगणे हा मूर्खपणा होता. त्यांच्या दुर्दैवाने सर्वसामान्य हिंदू त्यांच्या ओंजळीने पाणी न पिता स्वतःच्या बुद्धीने वागणारा असल्याने शंकराचार्यांच्या सल्ल्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.
एक काम करा. एके दिवशी देवळात जा आणि तिथले नियम न पाळायचा हेका धरा. पाखंडी तृप्ती देसाई जसा हेका धरते अगदी तस्साच धरून पहा. मग बघा शांती मिळते का ते.
जिथे सर्वांसाठी समान नियम नाहीत व काही जणांसाठी अन्यायकारक नियम आहेत, तिथे विरोध होणारच. तृप्ती देसाई पाखंडी असो वा अजून काही असो, तिने पुढे आणलेला मुद्दा योग्यच होता
अचूक निर्णय. त्याबद्दल अभिनंदन. मात्र देवळात जाऊ नका म्हणून उपदेश करायला शंकराचार्यांची अक्कल गहाण पडलेली नाही अजूनतरी.
असे असेल तर मग साईबाबांची पूजा करू नका असा अत्यंत मूर्खपणाचा आदेश त्यांनी का काढला? आणि सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष का केले?
दाभोलकरांचं फुल्ली मारलेलं चित्रं जुनंच आहे. शिवाय दुसऱ्या दिवशी लगेच संशयाची सुई वगैरे वळलेली नव्हती. तसं बघायला गेलं तर संस्थेवर नेहमीच बिनबुडाचे आरोप होत आलेत. प्रत्येक आरोपाला घाबरत बसलं तर साधना करायची कशी?
खून झाला त्याच दिवशी लगेचच सनातनवर संशयाची सुई वळलेली होती. दाभोळकरांच्या मृत्युनंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांची निंदानालस्ती करणारा लेख लिहिणे व त्यांच्या फोटोवर लाल फुली मारणे यात कसली आली आहे डोंबलाची साधना? ही तर निव्वळ मनातील मळमळ.
यांत तुम्हाला सनातन संस्थेचा मूर्खपणा दिसतो, पण पोलिसांचा अक्कलशून्यपणा दिसंत नाही. कमाल आहे. कर भरता ना तुम्ही? मग शासनाला जाब विचारा ना जरा.
पोलिस अक्कलशून्य आहेत हे माहित असताना कशाला त्यांच्या हातात कोलीत द्यायचं? त्यातून त्रास होणार तो तुम्हालाच होणार ना? माकडाच्या हातात कोलीत दिलं व त्याने घराला आग लावली तर नुकसान माकडाचं का तुमचं?
अगदी बरोबर. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती? जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे?
दाभोळकर हे फ्रॉड आहेत हे केवळ सनातन प्रभात मध्ये आरोप करून सिद्ध होत नाही. हे आरोप न्यायालयात सिद्ध व्हावे लागतात. नुसते शाब्दिक आरोप करत बसला तर तुमचा केजरीवाल होतो.
एकंदरीत सनातन संस्थेचे विचार तुम्हाला पटत नसले तरी त्यांना मूर्खबिर्ख विशेषणे लावू नयेत. इतकंच मागणं आहे.
जे उघड दिसतंय तेच मी सांगितलंय. सनातन ही मूर्खांची संस्था आहे याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपल्या वर्तनाने सनातनच्या लोकांनी ते अनेकवेळा सिद्ध केलेलं आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सनातन संस्थेच्या काही विचारातील तार्कीक उणीवा इतर धाग्यातून दाखवता येतील म्हणून इथे माझ्या तर्फे चर्चा वाढवण्याचा मोह शक्यतो टाळतो आहे. गुरुजींची टिका कठोर वाटेल पण बर्‍यापैकी सहमत आहे. राम, कृष्ण, विठ्ठल ते मेसाई भारतात पुजल्या जाणार्‍या असंख्य दैवतांचा वेदात उल्लेख नाही ज्याला जे प्रिय आहे अगदी विघ्नकर्त्या शनीचे ते दर्ग्यांचे पुजन सुद्धा भारतीय मनोभावे करतात. सतीबंदी सारखे काही अघोरी देवदासींचे शोषण असे अपवाद सोडले तर अमुक तमुकचे पुजन करु नये हा अनावश्यक हस्तक्षेप स्पृहणिय नाही, लोक तर स्विकारणारच नाहीत.
पूर्वी कर्नाटकातील चंद्रेगुत्ती इथे नग्नपूना चालायची. महिला नग्नावस्थेत रस्त्याने जाऊन देवीची पूजा करायच्या.
यात स्त्रीयांवर सक्ती आणि शोषण नसेल तर स्त्री पुरुषांनी कशा पद्धतीने पुजन करावे हा त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर व्हावयास हवा होता, सधू संत देवता नग्न असू शकतात तसे भक्तांनी नग्नतेचे ते अंगभरुन कपडे घालण्याचे स्वातंत्र्य घेतले तर उर्वरीत जगाचा त्यात हस्तक्षेप कितपत रास्त राहतो या बद्दल साशंक आहे.

काही मतं पटली नाहीत. श्रीगुरुजी उत्तरं देतीलच पण मी राहावलं नाही म्हणून हे मुद्दे मांडतोय. १.
ज्याला तुम्ही मूर्खपणा म्हणताहात तो कित्येक लक्षावधी लोकांच्या मते मूर्खपणा नाहीये.
लक्षावधी लोकांचा गणपती दूध पितोय यावरही विश्वास बसला होता. तो मूर्खपणाच होता. लक्षावधी लोक करताहेत म्हणून चुकीची गोष्ट बरोबर कशी होईल? २. श्रीगुरुजींच्या प्रतिक्रियेवरुन हे सांगतोय - तान्ह्या मुलांना पाळण्यात बसवून अंधाऱ्या विहिरीत सोडणं हा नुसता अघोरीपणा नाही, हा क्रूरपणा आहे. जगातील कुठल्याही धर्माने असं सांगितलं तरी त्याचा विरोध व्हायला पाहिजे. हे बंदच व्हायला पाहिजे. अभय वर्तकांचा दुसरा आक्षेप - तुम्हाला फक्त हिंदूंच्याच प्रथा दिसतात का - त्यावर माझं उत्तर असं आहे की आमचं आमच्या धर्मावर प्रेम आहे म्हणूनच त्यातले दोष निघून जावेत अशी आमची इच्छा आहे. दोष दाखवणे म्हणजे धर्माचा अधिक्षेप करणे नव्हे. ३.
शंकराचार्य वा हिंदू धर्मपंडित यांनी उपदेश केला तर तो अतार्किकच असतो
असं अजिबात नाही. पण कुणाचाही उपदेश तर्कबुद्धीला पटत नसेल तर तो का ऐकावा? मला माझ्या आईवडिलांचे न पडलेले सल्ले मी ऐकत नाही. आणि शंकराचार्य किंवा कोणीही माझ्या जन्मदात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटत नाही. ४.आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या अधिपतींनाच शंकराचार्य असं संबोधतात. बाकी सारे तोतये आहेत. सनातन संस्था धर्मशास्त्राप्रमाणे आचरण असावं असा आग्रह धरते. एव्हढंच नव्हे तर त्याप्रमाणे साधक आचरण करतातही. अनेक खऱ्याखुऱ्या शंकराचार्यांनी संस्थेस अनेक वेळा आशीर्वाद दिले आहेत. यात मूर्खपणा कसला?>>> हा मुद्दा वेगळाच आहे. शंकराचार्यांनी साईबाबांची पूजा करु नका असं म्हणण्याचा आणि सनातन संस्थेला आशीर्वाद देण्याचा संबंध काय? ते एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. आणि शंकराचार्यांनी सनातनला आशीर्वाद दिले असतीलही. तेही माणूस आहेत. त्यांच्या हातून चुका होऊ शकतात. ५. हा मुद्दा समजला नाही. हेही उदाहरण म्हणूनच दिलेलं आहे. आणि तृप्ती देसाई पाखंडी कशा झाल्या बुवा? त्यांचं आंदोलन निरर्थक होतं आणि त्यात राजकीय स्टंटबाजीही भरपूर होती. पण त्यात पाखंडीपणा कुठून आला? ६. ठीक आहे. ७. सनातन पोलिसांच्या रडारवर पूर्वीपासून होती. आणि दाभोळकरांचे फुली मारलेले फोटो आणि त्यांच्या मृत्यूनंतर सनातनने छापलेले लेख यांचा विपरित अर्थ काढला जाईल हे सनातनमधल्या साधकांना समजलं नाही का? ८. पोलिसांनी संशयितांना अटक केलेली आहे. ते सनातनचे सदस्य आहेत. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करणं हे सरकारचं काम आहे. आणि सरकारला जाब विचारायला सनातनचे वकील आहेत. सनातनकडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. तुम्हीही सनातनची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ. ९. दाभोलकरांच्या न्यासाने गेले कित्येक वर्षे धर्मादाय आयुक्तांकडे हिशोब सादर केलेले नाहीत. यास आरोप म्हणावं की वस्तुस्थिती? >>> हिशेब सादर न करणे हे चूक आहे, पण तो फ्राॅड कशावरून? पुराव्याशिवाय आरोप करणं हे चूक आहे. जी गोष्ट उघड फ्रॉड आहे तिला आजून कसले पुरावे द्यायचे?>>> उघड फ्राॅड? कसं काय? आणि पुरावे न देता असा गंभीर आरोप करणं हे कायद्यानुसार बदनामी (defamation) होऊ शकतं. पुरावे नसल्यामुळे तुमच्या या विधानाला विश्वासार्ह म्हणता येत नाही. - आपला विनम्र बोका-ए-आझम

In reply to by बोका-ए-आझम

=)) ....कडून जाब विचारण्याबद्दल पैसे मिळणार असतील तर जाब विचारु. फुकटात काहीही काम करु नये. तुम्हीही ....ची ही भलावण पैसे मिळाल्याशिवाय करत नका जाऊ. =)) @ गापै पोटभरून हसल्या बद्दल माफ करा, बोकानी सर्व चर्चांमध्ये भलावण करणार्‍यांसाठी सॉलीड्ड फॉर्मॅट दिलाय. @ रिकाम्या जागा भरण्यासाठी किती नाव आठवताहेत :) बोका तुमच्या वाक्याचा फॉर्मॅट कॉपीराईट मुक्त करा लै वेळा पुन्हा पुन्हा वापरण्यासार्खा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

. 'उघड उघड फ्रॉड' ही एक गंमतच म्हणायला हवी, शिवाय, सनातन लक्षावधी लोकांना मूर्ख वाटत नाही म्हणून तिला काही म्हणू नका असे म्हणले तर , लक्षावधी लोकांना दार-उल-उलूमची कन्सेप्ट सुद्धा मूर्ख वाटत नाही, मग काय करायचे? कोणालाच काहीच बोलायचे नाही काय? होऊ दे हब्बेदुलास तिच्यायला नाहीका??

माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल अतीव आदर दाटून आला आहे. मात्र ही खरंच श्रीगुरुजींची विचारसरणी आहे की त्यांचं सनातन प्रभातवाल्यांसोबत जोरात वाजलं असावं अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. ;)

In reply to by सतिश गावडे

प्रवक्त्यांना खेचू नये ;) कैका असेना त्यांच्या बाजूने भूमिका शक्य तेवढी रचनात्मक आणि पॉलीटीकल पण राईट ठेवत असतात, त्यासाठी मराठीआंजावर त्यांची (श्रीगुरुजींची) मुख्यप्रवक्तेपदी नेमणूक करण्यास आमचे अनुमोदन आहे. :)

In reply to by माहितगार

आज माहितगार ह्यांच्या आयडीवरून कोणी दुसरेच कॉमेंटते आहे असे भासते! चक्क त्रिविया अन चर्चेचे बादशाह सलामत हलक्याफुलक्या कॉमेंट्स अन तंगडी ओढत आहेत =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

थोडं थांबुन तरी प्रतिक्रिया द्यायची होती असा माझा मत आहे आणि ते प्रत्येकाला पटलेच पाहिजे असे नाही. कसोटी प्रेक्षक नाखु

In reply to by सतिश गावडे

करेक्ट हेच मुद्दे वर्तकांऐवजी भाजप प्रवक्त्याकडून आले असते तर त्याच मुद्द्यांचे जोरदार समर्थन झाले असते. इतकं विचित्र वाटत होतं वाचताना.. गुरुजींचा प्रतिसाद आहे की अंनिसच्या कोणाचा हेच कळत नव्हतं.. :-)

In reply to by बाळ सप्रे

इतकं विचित्र वाटत होतं वाचताना.. गुरुजींचा प्रतिसाद आहे की अंनिसच्या कोणाचा हेच कळत नव्हतं.. :-)
का ब्रे, किमान थेअरॉटीकली सनातनची अधिकृत भूमिका शास्त्र आणि तर्काधारीत असणे अभिप्रेत असताना, त्यांचा विरोधाभास होत असेल आणि गुरुजी प्वाईंट आऊट करत असतील तर काय चुकले यात अंनिस कुठून टपकली म्हणतो आम्ही. सर्वात चांगली गोष्ट भाजपा सनातन संस्थेला आंदण गेलेली नाही आणि त्यांचे सर्व वर्तन शास्त्र आणि तर्काला धरून नाही हा संदेश प्रवक्त्यांनी दिलेला दिसतो :)