Skip to main content

ताज्या घडामोडी - १

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 14/07/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

वाचने 77373
प्रतिक्रिया 388

प्रतिक्रिया

In reply to by चंपाबाई

रच्याकने, हरितपत्र ≠ पारपत्र आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.thequint.com/india/2016/03/16/lalit-modi-is-now-a-citizen-of… The Republic of Malta, an archipelago in the central Mediterranean between Sicily and the North African coast, is known for historic sites. As per the law of the land, a person can get Malta citizenship by making investments in the country. The Malta Individual Investor Programme rules provide for affluent persons of impeccable standing and repute to be naturalised and to receive Maltese citizenship on the basis of a contribution to and investment in Malta. इस्ट इंडिया कंपनी स्थापन करुन दुसर्‍या देशात व्यापार करा व पैसे मिळवा . त्यापेक्षा नवा मॉडर्न ऑप्शन चांगला आहे. त्या देशात फ्रॉड करुन पैसे घेउन येणार्‍या माणसाला सिटिजनशिप द्या व ते पैसे गुंतवुन घ्या. छान

In reply to by मार्मिक गोडसे

दुनियेतील अनेक विकसीत देशात असली स्कीम सुरू असते. त्यात अजिबात काही नवीन नाही. 'नवीन' आता फक्त मोदी सरकार आहे, तेव्हा चंपाबाईंना ते सगळे नव्याने दिसत आहे. चालायचंच !

In reply to by श्रीगुरुजी

हे अनेक वर्ष पासून चालू आहे माझ्या एका मित्राने - ज्याची भारतात ऐक सॉफ्टवेर कंपनी होती - जी त्याला विकावी लागली - अशा तर्हेने अमेरिकन नागरिकत्व घेतले आहे यात तुम्हाला पैसे आदीकृतरित्या न्यावे लागतात , तसेच बऱ्यापैकी टॅक्स पडतो . आणि यात ग्रीन कार्ड नाही ( जे दुय्यम नागरिकत्व असते ) तर नागरिकत्व मिळते ..

बहुचर्चित, वादग्रस्त व प्रलंबित 'वस्तू व सेवा कर' विधेयक पुढील आठवड्यात राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. या विधेयकाने नक्की काय व किती फरक पडणार आहे खुदा जाने. http://www.thehindu.com/news/national/with-congress-on-board-gst-bill-m…

In reply to by श्रीगुरुजी

जीएसटी संदर्भात लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेले खालील दोन लेख वाचनीय आहेत .. http://www.loksatta.com/lekha-news/parliament-might-pass-gst-bill-in-mo… http://www.loksatta.com/lekha-news/all-about-gst-bill-1272100/

सागरमाला प्रोजेक्ट ! सागरमाला प्रोजेक्टची आखणी झाली बाजपेयी काळात. तेंव्हा भगवी भुतावळ गप्प होती. मग बाजपेयी बुडले व काँग्रेस आले... त्याच प्रोजेक्टला भुतावळीने विरोध केला.... आमच्या रामाच्या सेतूला हे भोक पाडणार म्हणुन. आता पुन्हा तोच प्रोजेक्ट . पुन्हा भाजपा. आता पुन्हा मोदीभक्त गाणी म्हणताहेत ! सेतूला भोक पाडणार नाहीत का ? किती वेळा यू टर्न ?

जरी हा धागा ताज्या घडामोडी साठी असला तरी ज्यांना कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यकथा वाचायच्या असतील त्यांच्यासाठी खालील लिंका.... http://www.thebetterindia.com/62903/kargil-hero-neikezhakuo-kenguruse/ http://www.thebetterindia.com/62995/kargil-hero-sonam-wangchuk/ http://www.thebetterindia.com/62850/kargil-hero-kambampati-nachiketa/

आ. न,, शांताराम कागाळे .

ab स्थळ : जे डब्ल्यु मेरियट हॉटेल, एअरपोर्ट रोड .... २८ जुलै २०१६ .... जागतिक हेपॅटायटिस दिन ... दिवसभर हेपॅटायटिस , त्याचे प्रकार , लक्षणे, प्रतिबंध , उपचार , त्याची किंमत , शासनाने लक्ष द्यायची गरज , इजिप्तसारख्या देशात राबवले गेलेले नॅशनल प्रॉग्रॅम इ इ इ चर्चासत्रे झडली. संध्याकाळच्या सेशनमध्ये खास अतिथींचे आगमन झाले. त्यांनी दहा मिनिटाचे भाषण दिले. एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान पोटाला इजा झाल्याने इमर्जेन्सी सर्जरी करावी लागली. त्यादरम्यान पन्नासपेक्षाही जास्त बाटल्या रक्त व प्लेटलेट्स ट्रान्स्फुज करावे लागले. त्याना त्याद्यावारे हेपॅटायटिस बी चे संक्रमण झाले. पुढे बराच काळ तो रोग सुप्तावस्थेतच राहिला. नंतर जेंव्हा त्याचे आस्तित्व समजले , तेंव्हा जवळजवळ ७० % लिव्हर , सिर्होसिस होऊन खराब झाले असल्याचे समजले. पण माणुस १० % लिव्हर टिशुवर जगू शकतो, त्यामुळे आजही ते व्यवस्थीत आहेत. abb abc1 ________________________________________________________________________________ दुसर्‍या दिवशी पेप्रात आले होते. http://indianexpress.com/article/india/india-news-india/amitabh-bachcha… Megastar Amitabh Bachchan, who is surviving only on 25 per cent of his liver as the rest has been damaged by the deadly Hepatitis B virus, on Thursday called for higher budget spend to prevent the fatal disease. “Hepatitis B hit me accidentally. After the accident on the sets of ‘Coolie’ (1983), I was infused with the blood of about 200 donors and 60 bottles of blood were injected into my system,” Bachchan told an event on the World Hepatitis Day here this evening. कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यानी केले होते.

In reply to by चंपाबाई

तुम्ही घेतलेल्या पहिल्या फोटोमधे उजव्या कोपर्यात कावलेला दिसणारा उपट सुंभ कोण आहे? निदान फोटोच्या बेळेस तरी बाजुला करावा ना ???

In reply to by इरसाल

त्या चंपाबाईं नाहीत ते भम्पकबुवा आहेत. एका ठिकाणी मी "करतो" "जातो" असे प्रतिसाद दिले आहेत. केदार दीक्षित साहेबांच्या एका धाग्यावर आमच्या "बायकोने" पदार्थ छान केला अशी तारीफ. आता चंपा"बाई" असतील अन त्यांची बायको असेल तर ते LGBT का काय मध्ये जातील ना? म्हणून म्हणतो ते भंपक बुवा आहेत ( जामोप्या, हितेश, मोगा अशा अनेक डू आय डी घेऊन झाल्या). परत नवीन नाव घेऊन लोचटासारखे येतातच.

In reply to by सुबोध खरे

परत नवीन नाव घेऊन लोचटासारखे येतातच.
जसे मनोजकुमार, भारतभूषण, प्रदीपकुमार इ.चे सुद्धा फॅन असायचे, तसा मिपावर यांचा सुद्धा फॅन क्लब आहे बरकां.

काल पर्रिकर पुण्यातल्या एका कार्यक्रमात म्हणटले की देशविरोधी बोलणाऱ्याना धडा शिकवायला पाहिजे तर या गोष्टीवर सुध्दा राहुल गांधीना आक्षेप, नक्की यात आक्षेप घेण्यासारख काय आहे?

In reply to by धनावडे

आमीर खानच्या बायकोला हा देश सुरक्षित वाटत नव्हता, तर ते दोघे देशद्रोही ठरले. अंबानीच्या बायकोला सुरक्षितता वाटत नव्हती, तर तिला मात्र झेड सिक्युरिटी मिळाली.

चंपाबाई, शासनाकडे अर्ज केला असता तर अमीरखानच्या बायकोस पोलीस संरक्षण मिळालं असतं की. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की अमीरखान आणि त्याची बायको देशद्रोही आहेत असं भारत शासनाचं वा न्यायालयाचं अधिकृत मत नाहीये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ते देशद्रोही नाहीत, असे शासनाचे वा न्यायालयाचे अधिकृत मत नाही, तर 'त्याना' धडा शिकवण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरं, समजा कुणी देशद्रोही असेलच, तर त्याला धडा शिकवायचा कायदेशीर अधिकार कुणाला आहे? बीजेपीला / पर्रिकर्राना?

In reply to by चंपाबाई

पर्रिकरांचं अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे.

In reply to by अनुप ढेरे

बेजबाबदार वक्तव्य आमीरने केलंय.

In reply to by चंपाबाई

देशविरोधी विधानं केली आहेत असं म्हटलंय. याचा अर्थ देशद्रोह केला असा होत नाही. मजा म्हणजे आमीरला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि पर्रीकरांना नाही? बरं, आमीरच्या चांगल्या कामाबद्दल (पाणी फाउंडेशन) त्याचा सत्कार भाजपच्याच सरकारने केला. तेव्हा नव्हतं वाटतं असुरक्षित वातावरण?

In reply to by बोका-ए-आझम

उच्च-पदस्थ नेत्यांकडून अशी बेजबाबदार वक्तव्य विजिलँटे हिंसेला प्रोत्साहन देत असतात. या वक्तव्याचा परिणाम म्हणून चित्रपट हिंसेने बंद पाडणे, काळे फासणे हे प्रकार होणार. याची जबाबदारी कोणाची? वर परत म्हणणार की आमिरने जे वक्तव्य केलं त्याचं काय? अमिर खानची जबाबदारी पर्रिकरांइतकीच आहे काय? बर समजा त्याने तारतम्य सोडून वक्तव्य केलं तर संरक्षण मंत्र्यांनीपण जबाबदारी सोडून बोलायचं?

In reply to by धनावडे

धडा देणारे कोण नक्की? एवढं धोकादायक बोलला असेल अमिर खान तर करावा सरकारने खटला दाखल. रितसर कोर्टात प्रूव करावं तसं? उगाच विजिलँते लोकांना का प्रोत्साहन द्यायचं? आत्ता स्वघोषित गौ-रक्षक काय धुमाकूळ घालतायत ते दिसतं आहेच.

In reply to by अनुप ढेरे

सहमत। आमिर खान बोलला ते चूक पण जे पर्रीकर बोलले ते गरजेचं न्हवत. हिंसक गो रक्षक लोकांकडून होणाऱ्या हल्याबाबत मात्र पर्रीकर किंवा इतर मंत्री नेमकेपणानं बोलत नाहीत हे खटकत. हि लोकांवर भाजपाचा किंवा मोदींचा वचक आहे की नाही याबाबत शंका यायला लागलीय.

In reply to by अमितदादा

असं अजिबात नाही. मुळात Intolerance हे काही असंतुष्ट लोकांनी चालू केलेलं fad होतं. त्यात मुळातच विरोधाभास होता. जे लोक intolerance म्हणून आरडाओरडा करत होते (आमीरसकट) ते हे सोयीस्कररीत्या विसरले होते की जर देशात खरंच intolerance असता तर त्यांना असं स्पष्टपणे आणि उघडपणे बोलता आलं असतं का? आज जम्मू आणि काश्मीरमध्ये ' मुलींनो, सायकल चालवलीत तर सायकलसकट जाळून टाकू ' अशी पत्रकं अतिरेक्यांनी लावलेली आहेत. हा intolerance आहे, पण याबद्दल कुठल्याही स्वघोषित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याने आवाज उठवलेला नाही. (संदर्भ: एबीपी माझा). त्यामुळे असा selective आवाज उठवणं हा दांभिकपणा आहे, आणि तो उघडकीस आणला पाहिजे. पर्रीकरांनी तो आणला. त्यात काहीही बेजबाबदारपणा नाही. जसं सरकारच्या चुकीचं माप सरकारच्या पदरात घातलंच पाहिजे तसं सरकारमधल्या एका मंत्र्यानं केलं. शिवाय आमीरचे चित्रपट वगैरे बंद पाडणं असले प्रकार पूर्वी झाले होते, नाही असं नाही. पण पर्रीकरांच्या या अशा वक्तव्यामुळे असं होईल हे speculation आहे. पी.के. वर लोकांनी टीका केली, पण तो बंद वगैरे पाडला नाही. तेव्हा intolerance असल्याचं आमीरला जाणवलं नाही. हा दांभिकपणा आहे आणि तो उघडकीला आणला पाहिजे.

In reply to by बोका-ए-आझम

मुळात हा intollerance आपल्या देशात फार पूर्वीपासून ह्या ना त्या रुपात अस्तित्वात आहे हि वास्तुस्तिथी आहे, फक्त मोदी सत्तेत आल्यानंतर हे intollerance अचानक सुरु झालं हा खोटा अप्रचार आहे. मात्र मोदी सत्तेत आल्यापासून हिंदू radical लोकांची दांभिकता वाढत चालीय हि दुखरी बाजू आहे। आता याला लोक असा प्रत्यिउत्तर देतील कि मुस्लिम radical लोक काय बोलतात हे का पाहत नाही, पण आपण हे विचारत घ्यायला हवं कि मुस्लिम radical लोकामुळं त्या धर्माची हि अवस्था आहे तशी अवस्था हिंदू धर्माची होऊन द्यायची आहे का हा मूळ प्रश्न आहे. हिंदू लोकामध्ये खूप लोक tollerant आहेत पण साध्याच सरकार हे त्यांना पूरक अशी भूमिका घेताना दिसत नाही. बर फक्त एका चुकी मुळे आमिर खान देशद्रोही कसा ठरतो हे कळत नाही. कालच काश्मीर च्या मुख्यमंत्री मुफ्ती अशा बोल्या कि आतंकवादी वाणी ला सेकंड चान्स दिला असता तो जर तेथे आहे हे माहित असत तर, मग का नाही भाजप न त्याना सुनावलं किंवा पाठिंबा काडून घेतला. हे सेलेक्टिव्ह outrage नाही का. पर्रीकारांनी आमिर ऐवजी गो राक्षकाकडून होणाऱ्या हत्या बद्दल मत व्यक्त केलं असत तर बरं झालं असत कारण ते काही साधे सुधे मंत्री नाहीत मोदी सरकार मधील ज्या ठराविक लोकांबद्दल जनसामान्यांना आदर आहेत त्यातील ते एक आहेत. आमिर खान कडून चूक झाली,चुका होऊ शकतात कायदा त्याच काम करेल, आणि चुकीला माफी नसायला भारत काय दगडी चाळ नाही.

In reply to by अमितदादा

“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet,” he said.

In reply to by चंपाबाई

चंपाबाई पण चुकतात? ;))

In reply to by अमितदादा

याच्याशी सहमत. साक्षी महाराज, साध्वी प्राची आणि भाजपमधले इतर गणंग एकेकाळी वाट्टेल ते बडबडत होते आणि बिहारमध्ये पराभव झाल्यावर त्यांच्या वाचाळपणाला चाप बसलेला आहे. अशा लोकांचं वाचाळत्व अजिबात क्षम्य नाही पण असले वाचाळवीर प्रत्येक पक्षात आहेत. मीडिया भाजपचे वाचाळवीर असतील तर जे आकांडतांडव करते ते इतर पक्षांच्या बाबतीत करत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याचा भाजप सत्तेवर येण्याशी काहीही संबंध नाही. आधीही भाजप नेत्यांच्या विधानांचा विपर्यास केला गेलेला आहे. पर्रीकरांनी आमीरच्या विधानाचा समाचार घेतला हे माझ्या मते योग्यच केलं. आमीरसाठी देशद्रोही असा शब्द त्यांनी वापरलेला नाही पण intolerance वर त्याने selective मत दिलं आणि तो दांभिकपणा होता. मुळात liberals आणि डावे हे विरोधी मतांच्या बाबतीत जितके intolerant असतात तितकं intolerant कुणीही नसतं.

In reply to by बोका-ए-आझम

अमीर ची चूक होती हे मान्यच आहे. बाकी लिबरल आणि डाव्यांच्याबाबत तुमचं मत शत प्रतिशत बरोबर आहे।

In reply to by चंपाबाई

बरोबर आहे चंपाबाई. परंतु एक वैयक्तिक संवाद सार्वजनिक करण हा आमिरचा दोष आहे। तसेच बायकोच्या आडून त्याने निशाणा साधला अस हि वाटत. आणि किरण वर हि लोकांनी टीका केली होती परंतु तिचा प्रोफेशनल आणि सार्वजनिक जीवनात वावर कमी असल्याने लोकांनी अमीर वर तोफ डागली. बाकी हे माझे वैयक्तिक मत आहे तुमचे वेगळे असू शकते.

In reply to by अमितदादा

बायकोचे स्टेटमेंट त्याने जसेच्या तसे सांगितले. समजा त्याची बायको बोल्ली असती ... खाविंद , हिंदुस्तान बहोत प्यारा देश है ! आणि हे स्टेटमेंट त्याने सार्वजनिक केले असते , तर तुम्ही बोलला असता की वैयक्तिक वाक्य सार्वजनिक का केले म्हणुन ? वाक्य सार्वजनिक करताना ते भाजपा सेना पर्रिकर आठवले यांच्या आवडीनुसार करायचे का ?

In reply to by चंपाबाई

चंपाबाई, पप्पू चावलाय का तुम्हाला? काय उघड करावं आणि काय झाकून ठेवावं एव्हढंही तुम्हाला कळंत नाही! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा हा. गामाजी हेच मी सांगत होतो की चांगली वैयक्तिक गोष्ट उघड केली तर कुणाला बोचनार नाही हीच जर वाईट गोष्ट असेल तर लोकांना बोचनारच एव्हडा कॉमन सेन्स आमिर ला हवा होता. चंपाबाई आमिर का चुकीचा वाटतो याची खालील करणे 1. ह्या देशात दंगलीत मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना, आतंकी हल्ल्यात मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना तसेच इतर अन्यायग्रस्त लोकांना हा देश सोडून जावं वाटत नाही, ते कायद्यावर विश्वास ठेवून जगातयात आणि लडतायत. आणि मग ह्या खाविंदांच्या केसाला हि धक्का लागला नाही आणि भविष्यात लागणार हि नाही त्यांनी देश सोडून जायची भाषा का करायची। हे अमीर ने बायकोला समजून सांगाय हवे होते किंवा नंतर मीडिया पुढे सांगाय हवे होते. हे चुकल. 2. आमिर चे हि ह्या देशावर प्रेम आहे आणि त्याला सुपरस्टार ह्याच देशाने केला आहे तेंव्हा टोकाची भूमिका घेऊन देश सोडून जावे ह्या बायकोच्या वाक्याला प्रतिवाद न करणे हे चुकीचेच. चंपाबाई तुम्हाला ह्या विषयावर प्रतिवाद करत बसणार नाही कारण ना त्यानं तुमचं मत बदलणार आहे ना माझं.

In reply to by गामा पैलवान

हा हा. गामाजी हेच मी सांगत होतो की चांगली वैयक्तिक गोष्ट उघड केली तर कुणाला बोचनार नाही हीच जर वाईट गोष्ट असेल तर लोकांना बोचनारच एव्हडा कॉमन सेन्स आमिर ला हवा होता. चंपाबाई आमिर का चुकीचा वाटतो याची खालील करणे 1. ह्या देशात दंगलीत मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना, आतंकी हल्ल्यात मेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना तसेच इतर अन्यायग्रस्त लोकांना हा देश सोडून जावं वाटत नाही, ते कायद्यावर विश्वास ठेवून जगातयात आणि लडतायत. आणि मग ह्या खाविंदांच्या केसाला हि धक्का लागला नाही आणि भविष्यात लागणार हि नाही त्यांनी देश सोडून जायची भाषा का करायची। हे अमीर ने बायकोला समजून सांगाय हवे होते किंवा नंतर मीडिया पुढे सांगाय हवे होते. हे चुकल. 2. आमिर चे हि ह्या देशावर प्रेम आहे आणि त्याला सुपरस्टार ह्याच देशाने केला आहे तेंव्हा टोकाची भूमिका घेऊन देश सोडून जावे ह्या बायकोच्या वाक्याला प्रतिवाद न करणे हे चुकीचेच. चंपाबाई तुम्हाला ह्या विषयावर प्रतिवाद करत बसणार नाही कारण ना त्यानं तुमचं मत बदलणार आहे ना माझं.

In reply to by अमितदादा

टिर्रीकरानी शेपूट घातले. आता बोलतात की मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. गुर्जींच्या स्टुडंटचं अजुन नावच नाय ठरलं तर ते कसला धडा शिकवणार यावर आपण का काथ्याकूट करायचा ?

In reply to by मुक्त विहारि

ती कविता आठवली. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. ..... टिर्री काय अन पर्री काय .... नावात काय आहे ? लोकं नाव न घेताच धडा शिकवतात !

In reply to by धनावडे

राहुल गांधी ना सध्या तरी कोण गांभीर्याने घेत नाही। ते नेहमी भाजपच्या विरोधी भूमिका घेतात मग ती बरोबर असो चूक असो खरी असो खोटी असो. मला राहुल गांधींच्या बातम्याया सुद्धा वाचायचा कंटाळा येतो, बालकथा वाटतात।

In reply to by अमितदादा

विरोधी पक्ष विरोधीच भूमिका घेणार, त्यात नवल ते काय? भाजपनेही ज्या मुद्द्यावरून कधीकाळी काँग्रेसच्या निर्णयांचा विरोध केला आहे तेच मुद्दे आता स्वतः रेटत आहेतच, अशा तर्हेने राहुल गांधीना गंभीरतेने घेणाऱ्यांची गम्मत वाटते,

In reply to by संदीप डांगे

बरोबर आहे। परंतु सोनिया गांधी च्या शब्दांना असणार वलय राहुल गांधी न नाहीये हे फक्त त्यांच्या विरोधकामुळे नाही तर त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे आहे. एक उदाहारण, जीएसटी ला एकेकाळी मोदी नि ठाम विरोध केलेला पण तो राज्यांच्या अधिकाराला बाधा येते असे कारण म्हणून आता तेच हे पुढे रेटत आहेत, पण त्यांनी दिलेलं कारण पटण्यासारखं होत आणि त्याकाळी सोशल मीडिया एव्हडा ऍक्टिव्ह नव्हता। आता मात्र राहुल गांधी जीएसटी ची टॅक्स कॅप 18% ठेवून ते घटनेत टाकावी अशी निर्बुद्द मागणी करतात हा विरोध लोकांना पटत नाही, तसेच ज्यांनी हे विधेयक आणले तेच विरोध करतात हे हि पटत नाही.

In reply to by अमितदादा

एक उदाहारण, जीएसटी ला एकेकाळी मोदी नि ठाम विरोध केलेला पण तो राज्यांच्या अधिकाराला बाधा येते असे कारण म्हणून आता तेच हे पुढे रेटत आहेत,
दोन मुद्द्यांवर अपप्रचार सुरू आहे. (१) जीएसटीला काँग्रेस राजवटीत फक्त मोदींनी विरोध केला होता आणि (२) आता जीएसटी आणताना मोदींनी यू टर्न घेतला आहे. काँग्रेस राजवटीत जीएसटीला फक्त गुजरात या भाजपशासित राज्याने विरोध केला नव्हता. त्यावेळी जीएसटीला भाजपशासित राज्यांप्रमाणेच भाजप सत्तेवर नसलेल्या किमान ५ वेगवेगळ्या राज्यांनी जीएसटीला विरोध केला होता. त्यातील ३ राज्यात काँग्रेस सत्तेवर होती व उर्वरीत २ राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर होते. जीएसटीला विरोध करणार्‍या राज्यांमध्ये गुजरातप्रमाणे हरयाना, महाराष्ट्र, तामिळनाडू, ओरिसा अशा अनेक राज्यांचा समावेश होता. In October 2013 also, a report in The Hindu quoted the Jammu and Kashmir Finance Minister (who also served as GST Empowered Committee Chairman) as saying this: Most of the states…majority of the states have opposed bringing petroleum products and liquor in GST framework. They want to keep (the two items) out of GST, मात्र त्यावेळी जीएसटीला ज्यांचा विरोध होता त्यांचा उल्लेख करताना फक्त गुजरात व मोदींचेच नाव घेणे हा शुद्ध अपप्रचार आहे. त्यावेळी जीएसटीमधील अनेक तरतुदींना अनेक राज्यांचा विरोध होता.त्या तरतुदी म्हणजे, 1. Keeping Petroleum out of GST ambit 2. Keeping Alcohol out of GST ambit 3. Keeping Entry Tax out of GST ambit 4. Some sort of guarantee from Centre for potential revenue loss यातील बर्‍याचशा मागण्या नवीन जीएसटी विधेयकामध्ये समाविष्ट केल्यामुळे आता हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त राज्यांनी न मागताच खालील फायदा नवीन विधेयकात दिला आहे. The power to states of levying additional 1% tax levy, for maximum 2 years, to help augment state revenues. त्यामुळे मोदींनी या विधेयकावर यू टर्न घेतला किंवा ज्या मोदींनी या विधेयकाला विरोध केला तेच मोदी आता हे विधेयक पुढे रेटत आहेत हा सुद्धा शुद्ध अपप्रचार आहे. बर्‍याचशा राज्यांच्या मागण्या नवीन विधेयकात समाविष्ट करून मोदींनी या विधेयकावर जवळपास सर्वसंमती घडवून आणली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

The power to states of levying additional 1% tax levy, for maximum 2 years, to help augment state revenues.
याबाबत अभ्यास वाढवा. दिशाभूल करू नका. हे कलम काढण्यात आलेलं आहे. http://www.thehindu.com/business/cabinet-drops-1-additional-tax-from-gs…

In reply to by चंपाबाई

आमिर खानने अतुलनीय भारत जाहिरात करायला भारत सरकारकडून पैका घेतला होता, तेव्हा तो कधीच असं म्हनला नव्हता की ये तुमारा पैसा हराम का हाई, आपुन सिरफ ईमान की रोटी खाता हाई। पैसे खाऊन ढेकर दिल्यावर आमिरला शहानपन सूचले

रन फॉर रिओ च्या कार्यक्रमात पण पंतप्रधानांनी प्रचारकी मोडमध्येच राहिले. बिटरगावच्या क्रीकेट टुर्लामेंटच्या बक्षीस समारंभातपण विरोधकांचे डिपॉझिट जप्तं होइल वगैरे बोललं जातं .. तसंच हे पण..

विदर्भावरुन विधीमंडळात विवाद, शिवसेनेने राजदंड उचलला ! मुख्यमंत्रीसाहेब, जोक नको, 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्र घडलाय : राणे '106 हुतात्म्यांचा पुळका आज कॉंग्रेसला आलेला पाहून, कॉंग्रेसची खरच किव वाटली. संयुक्त महाराष्ट्र आदोंलन कर्त्यांवर बेछूट गोळ्या चालविण्याचे आदेश पोलीसांना देणारा तात्कालिन मुख्यमंत्री कॉंग्रेजचाच होता हे राणे आज विसरलेले दिसतायत.