नमस्कार मंडळी,
थोडी मदत हवी आहे.
...............
म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते.
ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे.
................
आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे.
तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे?
काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे?
.
काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन.
आगाऊ धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
32399
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक शंका व काही माहिती..
In reply to मृत्युपत्रातील / by डॉ सुहास म्हात्रे
१. निर्वेधपणे आपल्या नावावर
In reply to एक शंका व काही माहिती.. by चौकटराजा
ऐसा नहीं सोचनेका बाबा,
स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव
In reply to ऐसा नहीं सोचनेका बाबा, by नीलमोहर
अगदी,
In reply to स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव by अभ्या..
गप लग्न करा आणि आपले जे काही
+ १
In reply to गप लग्न करा आणि आपले जे काही by खटपट्या
मी सगळे पैसे बायकोच्या हातात
In reply to + १ by मुक्त विहारि
आमचे बाबा महाराज म्हणतात....
In reply to मी सगळे पैसे बायकोच्या हातात by खालीमुंडी पाताळधुंडी
+1
In reply to गप लग्न करा आणि आपले जे काही by खटपट्या
++१
In reply to +1 by रातराणी
@ अभ्या..
......
ये तो अब रोनेकी बात हो गयी
In reply to ...... by _मनश्री_
खरच जा ,माँँ की एक जादू की
In reply to ये तो अब रोनेकी बात हो गयी by अभ्या..
>>> ये तो अब रोनेकी बात हो
In reply to ये तो अब रोनेकी बात हो गयी by अभ्या..
ह्याह्या,
In reply to >>> ये तो अब रोनेकी बात हो by उडन खटोला
लक्ष्यात
In reply to ह्याह्या, by अभ्या..
निशब्द.
मार्कस ओरेलियस यांनी
In reply to निशब्द. by चित्रगुप्त
अहो,
In reply to मार्कस ओरेलियस यांनी by वेदांत
संपादित
In reply to अहो, by सुबोध खरे
अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी
In reply to अहो, by सुबोध खरे
हे कराच ताबडतोब.
उत्तम विषय आणि एकापेक्षा एक
रिअल लाईफ मध्ये जगताना कधी
हो हो
In reply to रिअल लाईफ मध्ये जगताना कधी by लालगरूड
देजा वु म्हणत आहात का?
In reply to हो हो by विटेकर
स्वत:चे मरण स्वप्नात दिसणे
"पिलीयन रायडर - Tue, 26/07
नुकतेच वाटस अॅपवर एक पोस्ट
घर घेताना मधे कोणी गचकेल असा
In reply to नुकतेच वाटस अॅपवर एक पोस्ट by चौकटराजा
अरे काय चाललंय?
आमेन !!!
In reply to अरे काय चाललंय? by कवितानागेश
अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू
येस एक्काकाका, चिंता नाहीच,
In reply to अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू by डॉ सुहास म्हात्रे
किंचित पैसा खर्च करायची तयारी
ही बँक ऑफ महाराष्ट्रचीच
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
हेच लिहायला आलो होतो. माझा
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
आदुबाळ - शक्य झाल्यास
In reply to हेच लिहायला आलो होतो. माझा by आदूबाळ
ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा
In reply to आदुबाळ - शक्य झाल्यास by गंम्बा
हि माहिती पूर्ण वाचली. खूप
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
+१.. आदुबाळ यांना धन्यवाद!
In reply to हि माहिती पूर्ण वाचली. खूप by अभ्या..
मनापासुन धन्यवाद आदुबाळ.
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
खूपच चांगली माहिती
In reply to ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा by आदूबाळ
पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला
In reply to खूपच चांगली माहिती by झकास
धन्यवाद असंका. मी ह्याच
In reply to किंचित पैसा खर्च करायची तयारी by असंका
अश्या प्रकारची ठराविक वेळेला
हेचि फळ काय मम चिंतनाला.
In reply to अश्या प्रकारची ठराविक वेळेला by आनंद
धागा शतकाबद्दल
स्वप्नांना काहिही अर्थ नसतो.
झोपेतली स्वप्ने झोपेतली " च "
कं लिव्लय अद्द्या"सर"
In reply to झोपेतली स्वप्ने झोपेतली " च " by अद्द्या
अवांतर प्रतिसाद
भारतात हा विषय कितपत चर्चिला
अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी
बापू,
In reply to अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी by कैलासवासी सोन्याबापु
सगळा खेळच मानसिक असतोय गड्या,
In reply to बापू, by अभ्या..
हे वेग्ळेच आहेत साहेब. मस्त.
In reply to सगळा खेळच मानसिक असतोय गड्या, by कैलासवासी सोन्याबापु
गरिबांचा वाली हनुमान.....
In reply to अभ्या, तू किंवा इतर मित्रमंडळी by कैलासवासी सोन्याबापु
तेल घरुन घेउन जा. नाहीतर
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
तेल घरुन घेउन जा.
In reply to तेल घरुन घेउन जा. नाहीतर by खटपट्या
कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
लोल
In reply to कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु by प्रसाद गोडबोले
मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल
In reply to गरिबांचा वाली हनुमान..... by मुक्त विहारि
सगळं मानसिकच असतं....
In reply to मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल by बाळ सप्रे
डु आयडी मानसिक विभ्रम नव्हे
In reply to सगळं मानसिकच असतं.... by मुक्त विहारि
अभ्या..मस्त खा, प्या आणि
बरेच दिवस हा धागा पाहतोय,
...