Skip to main content

मदत हवी

विकासकाकडून होणाऱ्या अरेरावीबद्दल

लेखक उमेश मुरुमकार यांनी मंगळवार, 17/07/2018 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मला तुमची मदत हवी आहे. मी आणि माझी बायको फार आनंदी होतो कारण माझं-तिचं , आमचं हक्काचं घर मिळणार होतं. थोडा थोडा पैसे वाचवून, सोनं गहाण ठेवून, उसने वारी पैसे घेऊन आम्ही केशवनगर ,मुंढवा येथे 'संचेती असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड' विकासकाचा चा 'बेलकॅसल' मध्ये ऑगस्ट २०१६ ला फ्लॅट बुक केला. सेल्स टीम ने फ्लॅट डिसेंबर २०१७ ला देतो असे खोटे आश्वासन देऊन आमच्याकडून मार्च २०१७ पर्यंत डाउन पेमेन्ट, सर्विस टॅक्स , व्याट घेऊन अग्रीमेंट मध्ये मार्च २०१८ लिहिले. पुढच्या दोन महिन्यात इमारत ७५ टक्के बांधली आहे म्हणून बँक काढून आणखी ७५% रक्कम घेतली इथपर्यंत सगळं ठीक होतं.

दोहा कतार संपर्क करावा. नॉट अर्जन्ट

लेखक कापूसकोन्ड्या यांनी सोमवार, 21/09/2015 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरानो सप्रेम नमस्कार, मला खात्री आहे. दोहा कतार इथे कोणीतरी मिपाकर असणारच याची. मला तिन महिन्या साठी दोहा कतार येथे ऑफर आली आहे. ऑक्टोबर २ तारखेलां मी निघणार आहे. गुगल बाबा च्या क्रुपेने सर्व माहिती काढली आहे. कंपनी ने राहण्याची सोय केली आहे. जनरल माहिती आहे. जिसिसि मध्ये काम करण्याचा अनुभव पण आहे. पण तरिही काही टिप्स असतील तर द्याव्यात. कोणी मिपाकर दोहा इथे रहात असाल तर कृपया व्य.नी. करावा. तुमचा फोन नं.इमेल आय डी कळवला तर सोयीचे होइल. आपण काय कट्टेकरी नाही पण जमलं तर एखादा कट्टा पण करता येइल. धन्यवाद.

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २

लेखक किणकिनाट यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
धाग्याच्या आधीच्या भागात प्रतिसाद शंभरहून जास्त झाल्याने नवीन भाग सुरु करत आहोत - आधीचा भाग वाचनमात्र करतो आहोत. यापुढील चर्चा इथे चालू रहावी. संपादक मंडळ.