Skip to main content

कसे करावे?

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 26/07/2016 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोडी मदत हवी आहे. ............... म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अ‍ॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अ‍ॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अ‍ॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते. ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे. ................ आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्‍या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे. तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्‍याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे? काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अ‍ॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्‍या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे? . काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन. आगाऊ धन्यवाद.

वाचने 32399
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शंका- ज्या ठिकाणी फेज वन फेज टू अशा पद्धतीने काम होते तेथे गृहनिर्माण संस्था निर्माण होण्यास ५ ते ६ वर्षाचा कालावधी मधे जाउ शकतो. अशा वेळी नॉमिनेशन कसे करायचे ? माहिती- मृत्यू पत्रात जेंव्हा केंव्हा आपण एखादा हक्क प्रदान करीत असतो. त्या संबधी निसंदिग्ध स्वरूपात लिहिले पाहिजे. उदा. मुदत पावती असेल तर तिचा क्र. वा एखाद्या गाळा असेल तर त्याचा सर्वे क्रमांक वगैरे. अर्थात माझ्या मृत्यूचे वेळी माझे नावावर कायद्याने असलेली सर्व स्थावर जंगम असा उल्लेख कमीतकमी हवाच !

In reply to by चौकटराजा

१. निर्वेधपणे आपल्या नावावर असल्याशिवाय (उदा : सोसायतीतील सदनिकेचे शेअर सर्टीफिकेट ताब्यात असल्याशिवाय) कोणत्याही मालमत्तेचे नॉमिनेशन करता येत नाही. ज्या गोष्टीचे आपण निर्वेध मालक नाही, ती गोष्ट दुसर्‍याला कशी देवू शकू ? २. मृत्युपत्रात मालमत्तेचा जितका मोघम संदर्भ तितकी नंतर समस्या उभी राहण्याची सहाजिकच जास्त शक्यता असते. (अ) जेथे जरूर आहे तेथे पक्के असलेले आकडे जरूर लिहावेत (उदा : अमुक अमुकला माझ्या अमुक बँकेतल्या अमुक खातेक्रमांकातील पैश्यांपैकी / अमुक एफडी पैकी रु १० लाख देण्यात यावे). (आ) मात्र जेथे मालमत्तेची किंमत कालमानाप्रमाणे बदलत असणार आहे तेथे प्रत्येक वारसाच्या नावाबरोबर त्याला दिलेल्या मालमत्तेचे फक्त योग्य वर्णन पुरेसे आहे (उदा : अकाउंट क्रमांक; मुदत पावतीचा क्रमांक; सोसायटीचे नाव, पत्ता व फ्लॅट क्रमांक; जमिनीच्या सातबार्‍यावरील सर्वे क्रमांक-हिस्सा क्रमांक, इ वर्णन; वगैरे). थोडक्यात म्हणजे मालमत्तेचा प्रत्येक भाग (आयटेम) त्या वर्णनावरून खात्रीने ठरवता आला तर नंतरचे वादविवाद टळतील. एकच आयटेम अनेक वारसदारांना विभागून द्यायचा असला तर चल किंमत असलेल्या आयटमची विभागणी टक्केवारीने आणि/किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पण सुस्पष्टपणे करावी (उदा : 'अ' ला ३० टक्के व 'ब' ला ७० टक्के; किंवा 'अ', 'ब' व 'क' यांना समान विभागणी करून; किंवा 'अ' ला ३ लाख रुपये व उरलेले सर्व 'ब' ला; इ)

मिसळपाव को आपकी जरूरत हाय, आता तुम्हाला शंभर वर्षांचे आयुष्य तसेही मिळालेय, ते कसे जगायचे याचं प्लॅनिंग करा :) ते आर्थिक आणि इतरही गोष्टींचे नियोजन करावेच, जाणकार लोक माहिती देत आहेतच, पण असे विचार जास्त करू नयेत, म्हणजे घाबरवायचं वगैरे नाही, पण एखाद्या गोष्टीचा सारखा विचार केल्यास ती प्रत्यक्षात उतरण्याचे चान्सेस असतात याचा अनुभव घेतलाय, त्यामुळे अस नकारात्मक विचार शक्यतो करू नये. स्वप्नावरून मीही गेल्याच आठवड्यात पडलेलं स्वप्न सांगेन, मी आणि माझी लाडकी भाची माझ्या आजोळच्या वाड्यात, बाहेरच्या खोलीत झोपलोय ( ह्या वाड्यात आम्ही अगदी वर्षातून एकदा वगैरे गेलो तर जातो, एरवी नाही, मात्र बरंचसं बालपण तिथे गेलंय, खूप कडू गोड आठवणी आहेत) तर मी मध्येच पाणी प्यायला आतल्या खोलीत येते, तिथे जिना आहे, वर गेले की स्वयंपाकघर. वर जातंच होते तेवढ्यात पिल्लूचा बोलण्याचा आवाज आला, आत गेले तर ती नाहीच तिथे... खाली मीच झोपलेय... उशीवर माझेच केस वगैरे पसरलेत, त्या झोपलेल्या माझ्याकडे पाहतांना पोटात पडलेला खड्डा आणि हृदयाचा चुकलेला ठोका तेव्हा 'जाणवला' ही होता, तसे स्वतःकडे पाहतांनाच, काय होतंय ते समजून घेत असतांनाच जाग आली. विचित्र होतं ते फार. अशी भारी भारी स्वप्नं पहिल्यापासूनच पडतात, एक तर आगीत वगैरे अडकलेले असते, नाहीतर समोर वाघ-बीघ असतात, अगदी गोळीबार ही अनुभवलाय :) त्यात बहुतेकदा कुणी जवळची व्यक्ति आणि मी संकटात असते, प्रत्यक्षातील भीती स्वप्नात खरी होऊन येत असावी बहुधा, सब-कॉन्शिअस माईंड फार अ‍ॅक्टिव्ह असेल तर होत असावं असं.

In reply to by नीलमोहर

स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव डेंजर असतो, स्वप्नातच शक्य आहे ते. एकदा तरी प्रत्यक्षात तसे घडावे अशी फार इच्छा आहे.

In reply to by अभ्या..

हादरवून टाकणारा अनुभव होता ना तो, वाईट.. मला सगळ्यात जास्त प्रश्न पडतो, तो म्हणजे आपण गेल्यानंतर काय होईल.. म्हणजे पुढे काय ? पण असा विचार आला की आजूबाजूचं जग असं डोळ्यांसमोर गोल गोल फिरायला लागतं, मग तो विचार डोक्यातून काढावाच लागतो, मात्र याचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता फार आहे.

In reply to by रातराणी

लग्न करा म्हणजे स्वप्न पडणे बंद होईल...किंवा पडला तरी नंतर आठवणार नाही... बाकी स्वप्न म्हणजे आपण अनुभवलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टींचा अंतर्मनाने केलेला remix शांत झोपेचा अभाव असला कि साधारणपणे स्वप्न पडतात...डोक्याला मस्त तेल मालिश करून झोपा या धाग्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली...धन्यवाद

ही अशी स्वप्ने पडल्याने, काही होत नाही. बर्‍याचदा स्वप्नात माझा कडेलोट झाला आहे किंवा आकाशातून कोसळलो आहे. तेंव्हा बिंधास्त रहा. मस्त खानेका, थोडा पिने का और भरपूर चित्र बनाने का.

कायदेशीर बाबींंची माहीती जाणकारांंनी दिलेली आहेच एक सुचवू का ? सगळी कामबिमंं बाजूला सारा आणि ४-५ दिवस आई वडीलांंच्या घरी रहायला जा मस्त आईच्या हातचंं गरमागरम जेवा आईच्या मांंडीवर डोक ठेवून झोपा ,वडीलांंशी गप्पा मारा घरच्यांच्या सहवासात मन प्रसन्न होईल .मनावरचा ताण कमी होईल

In reply to by _मनश्री_

ये तो अब रोनेकी बात हो गयी मॅडमजी. जाना तो है... पण आई सारखी विश्रांती जगात कुठे नाही हे अगदी खरे. तिचा माझया डोक्यावरून हात फिरला तरी कदाचित मला मानसोपचाराची गरज भासणार नाहीये.

In reply to by अभ्या..

>>> ये तो अब रोनेकी बात हो गयी मॅडमजी. त्याला का लाजावं मग??? बिन्धास्त रडावं माण्सानं. येक पर्सनल विचारु का???? कस्लं काय भंग बिंग झाला नाहि ना?

In reply to by अभ्या..

आलं
न्हाय लेटेस्टमधी. ;)
अति अवांतर : मृत्युंजयचा सल्ला जबरदस्त आहेच पण त्यात "लवकर लग्न कर" असा नसल्याची किंचित ऊणीव भासते.. अता पुर्ण झाला.. गारसल्ला नाखु

मूळ लेख आणी सर्व प्रतिसाद वाचून निशब्द झालेलो आहे. अनेक प्रतिसादातून आवश्यक ती व्यावहारिक माहिती उत्तम प्रकारे दिलेलीच आहे, ती सर्वांसाठीच मननीय आणि करणीय आहे. आई-वडिलांना कमित कमी त्रास होईल, अशी सोय करून ठेवणे केंव्हाही चांगलेच. मी स्वतः पासष्ठाव्या वर्षी सुद्धा अद्याप असली काहीही व्यवस्था केलेली नाही ... आळस. आणि का कुणास ठाऊक, आपण ८५ वर्षे जगणार आहोत असे उगीचच वाटत असते, त्यामुळे "काय घाई आहे, करू कधितरी" हा विचार. भविष्याविषयी स्वप्ने मला तरी कधी पडलेली नाहीत, पण त्या त्या काळी असलेल्या परिस्थितीची अतिशय सांकेतिक अशी स्वप्ने बरेचदा पडलेली आहेत, आणि त्यातून स्वतःपुरते मार्गदर्शनही मिळालेले आहे. तुझ्या स्वप्नातही " तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात." हा एक महत्वाचा संकेत आहे, त्यामुळे आवश्यक ती व्यावहारिक व्यवस्था करून निश्चिंत रहावे. अद्याप केला नसल्यास एकदा 'विपश्यना' चा दहा दिवसाचा कोर्स करून घ्यावा. मार्कस ओरेलियस यांनी म्हट्ल्याप्रमाणे "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !"

In reply to by चित्रगुप्त

मार्कस ओरेलियस यांनी म्हट्ल्याप्रमाणे "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !" ------------------- क्या बात है....

In reply to by वेदांत

अहो, त्यांनी आपला प्रश्न विचारला आहे त्यावर त्यांना उपाय सांगायच्या ऐवजी काळाच्या पटलावर आपण एक ठिपका कसलं सांगताय? आपल्या डॉक्टरकडे एखादा रुग्ण ( किंवा आपणच) पोटात गोळा आहे किंवा हाड मोडले म्हणून गेलात आणि त्यानि आपल्याला "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका" असा सल्ला दिला तर काय वाटेल. अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा. जिथे तिथे "अध्यात्म" आणू नका. धाग्याचा विषय काय आणि त्यावर असा प्रतिसाद देणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे.

In reply to by सुबोध खरे

संपादित कृपया व्यक्तिगत टीकाटिपणी टाळावी. - संपादक

In reply to by सुबोध खरे

अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा. जिथे तिथे "अध्यात्म" आणू नका. धाग्याचा विषय काय आणि त्यावर असा प्रतिसाद देणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे.
परत एकदा अतिषय विनम्रपणे सांगतोय डॉक्टर , तुम्हाला माझी मते पटतात की पटत नाहीत हा माझ्यालेखी महत्वाचा मुद्दा नाही. पण मी काय प्रतिसाद द्यायचा अन काय द्यायचा नाही हे आपण मला शिकवु नये. कोणालाच शिकवु नये. इथे प्रत्येक जण आपापले विचार बाळगायला आणि अभिव्यक्त करायला स्वतंत्र आहे. मी तुम्हाला किंव्वा अभ्याला माझा प्रतिसाद वाचा अन त्यावर आपले मत नोंदवा अशी सक्ती केलीली नाही. आपण माझे सर्वच्या सर्व लेखन फाट्यावर मारायला रिकामे आहात. रादर तसे करावे अशी नम्र विनंती आहे. जर आपण खाजवुन खरुज काढणार असाल तर प्रत्युत्तर देणे ही माझी आगतिकता असेल! भले मग आयडी उडाला तरी बेहत्तर ! तसेही आजकाल प्रवोक करणार्‍याचा आय्डी उडवायचे सोडुन प्रत्युत्तर देणार्‍याचा आयडी उडवायची फॅशन आहे ! अभ्या, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व ! बाकी काल ह्याच विषयावर जरा अजुन चिंतन करत होतो तेव्हा मार्कस ऑरेलियस ची आठवण आली , तो तर रोमन साम्राज्याचा सम्राट होता , तेही अत्यंत भरभाटीच्या काळातला . पण तसे असुनही नॉर्दन फ्रंटीयर्स वर जर्मॅनिक ट्राईब्स विरोधात चाललेल्या युद्धात स्वतः जातीने सामील होता. मृत्युची तलवार तर त्याच्याही डोक्यावर लटकत होती ! शिवाय आपल्या पाठीमागे हे येवढे विशाल महान रोमन साम्राज्य कमोडस सारख्या नालायक माणासाच्या हातात जाणार हेही स्पष्ट दिसत होते ! पण तरीही तो माणुस , जो की एक अत्यंत प्रजाहितदक्ष राजा आहे तो , आता काय करु अन माझ्यामागे काय होईल अन राज्य कोणाला देवु अन ह्या चिंतनात गढुन गेलेला दिसत नाही, आपण मेल्यानंतर दुनियेचे काय होइल ह्याची आपल्याला पर्वा नाही , नकोच , रादर जिवंत आहोत तोवर कसे मस्त आनंदात समाधानात जगु शकु ह्याचा विचार करु , तो काय म्हणतो पहा: Be content with what you are and wish not change ; nor dread your last day, nor long for it ! marcus

सगळी कामबिमंं बाजूला सारा आणि ४-५ दिवस आई वडीलांंच्या घरी रहायला जा मस्त आईच्या हातचंं गरमागरम जेवा आईच्या मांंडीवर डोक ठेवून झोपा ,वडीलांंशी गप्पा मारा घरच्यांच्या सहवासात मन प्रसन्न होईल .मनावरचा ताण कमी होईल
अगदी अगदी. हे कराच अभ्यासेठ. यातून नक्कीच उभारी मिळेल, आणि विशेषतः त्यांना खूपच चांगले वाटेल.

रिअल लाईफ मध्ये जगताना कधी कधी असं वाटतं या क्षणाचं आपण आधी स्वप्न पाहिले आहे आणि सर्व त्याप्रमाने होत आहे. कुणाला असा अनुभव आहे का? मला खूप आहे.

स्वत:चे मरण स्वप्नात दिसणे लाभदायक असते, असे मी ऐकून आहे. खरे खोटे देव जाणे. पण खरे असेल तर फ़ायदाच होईल नुकसान होणार नाही. त्यामुळे तनावमुक्त व्हावे, असे माझे मत. अवांतर : माझ्याकवितावर द्यावयाचे प्रतिसाद मला मेल करून ठेवा. तुमच्या पश्चातही मी तुमचे प्रतिसाद माझ्या कवितांवर प्रकाशित करत राहीन, ये वादा रहा. ;)

"पिलीयन रायडर - Tue, 26/07/2016 - 21:48 नवीन उत्तम प्रतिसाद! इच्छापत्र (काहींना मृत्युपत्र हा शब्द आवडत नाही) कधीही करता येते. त्यात आपल्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचा उल्लेख हवा. मला घरासंदर्भात एक प्रश्न आहे- - -" // नॅामिनी हा फक्त तात्पुरता मालमत्ता मालक होतो आणि ही सोय ब्यान्क आणि घरसह संस्थेसाठी केलेली आहे.खरा वारसदार आल्यावर नॅामिनीने सर्व हक्क त्याच्याकडे द्यायचे असतात. आणखी उत्तर बाकी आहे.मला वाटतं यासाठी वेगळा धागा काढून ठेवलात तर बरं होईल.

नुकतेच्च वाटसॉपवर एक पोस्ट वाचली. पोस्ट फॅब्रिकेटेड वाटली पण त्यातून मिळालेला संदेश डोळे उघडणारा होता. टेकी नवरा व सी ए बायको. सुखी संसार पण मूल नाही असा. एके दिवशी ३३ व्या वर्षी अपघातात तो मोटारसायकलवरून मरतो. लॅपटोप मोबाईल मधे सारे पासव्रर्ड ई असतात त्यातला एकही बायकोला माहीत नसतो. लॅपटोप चा पासवर्ड महिन्यातून एकदा बदलण्याचा नियम . त्यामुळे ती महा कटकटीच्या फेर्‍यात सापडते. ऑफिसात अत्यंत शिस्त बद्ध असलेली ती घरी मात्र उद्या बघू वृतीची असते. अशात नॉमिनेशन करायला त्याना वेळच मिळालेला नसतो. घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरे...... असा सर्व मामला.

In reply to by चौकटराजा

घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरे
यासाठी आपले काही झाल्यास मागच्यांना त्रास होउ नये म्हणून लायबीलीटी कव्हर करणारी गुंतवणूक करुन ठेवावी...

अभ्या, हेल्मेट घालतोस ना? आता एक चिलखत पण घे! ते स्वप्न खरे होईल असे मानून तयारी करण्यापेक्षा दुसरे चांगले स्वप्न बघायला सुरुवात कर. चांगला १०० वर्षांचा म्हातारा झालायस, तरी दात मजबूत आहेत. भोवती मुले, बाळे, नातवंडे, पतवंडे आहेत, मोठ्ठा उद्योग धंदा होता, तो मुलांमध्ये वाटून देऊन तू निवांतपणे मिसळपाव वर टवाळक्या करतोयस!....... अजून रंगव स्वप्न तुला हवे तेवढे.... आणि रोज तेच बघ. :)

अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू जवानाने मन मजबूत ठेवून दु:स्वप्नांना टेंपोत बसवून फाट्यावर सोडावे आणि जग जिंकायला निघावे असे वाटते. मात्र, त्याचबरोबर संपत्तीच्याबाबतीत जे उपयोगी सल्ले मिपाकरांनी दिले आहेत त्यावरही विचार करणे जरूरीचे आहे. ती घाबरट्पणाने नाही तर व्यावहारीक चातुर्य म्हणून करायची गोष्ट आहे. ते उपाय विम्यासारखे असतात. मरण्यासाठी कोणी विमा काढत नाही, तर आपल्या मागे राहणार्‍यांचा विचार त्यामागे असतो. तोच विचार संपत्तीचा लेखाजोखा लिखित स्वरूपात ठेवणे, मृत्युपत्र करणे, नॉमिनी नेमणे, इ पर्यायांमागे असतो. या उपायांमुळे आपल्यामागे आपली संपत्ती बेवारस न राहता अथवा चुकीच्या हाती न पडता, ती आपल्याला हवे असलेल्या योग्य व्यक्तींच्या हाती "विनासायास" जाते. सर्वांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे हीच सदिच्छा आहे. पण इथून केव्हा जाणार हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळे अशी व्यवस्था (अगोदर केली नसल्यास) करायला सर्वोत्तम वेळ "आत्ता" हीच असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

येस एक्काकाका, चिंता नाहीच, त्यात अडकतो आहे असेही नाही पण विनासायास त्यांना मिळावे काहीतरी हि प्रामाणिक भावना. बस्स. माझ्यामुळे कदाचित त्यांनी त्रास भोगलाय. मला जाणीव आहे. माझे चुकून काही बरेवाईट झाले तर त्यांना अधिक त्रास होईल ह्याची कल्पना आहे पण आयुष्याच्या वजाबाकीत त्यांच्यासाठी मी मायनस राहीलो असे नको व्हायला.

किंचित पैसा खर्च करायची तयारी असेल तर ही एक वेबसाइट पण नजरेखालून घालावी. चार्जेस तिथेच खाली दिलेले आहेत. महाराष्ट्र एक्झिक्युटर एन्ड ट्रस्टी कं. लि.

In reply to by असंका

हेच लिहायला आलो होतो. माझा वैयक्तिक अनुभव फार चांगला आहे. संभाव्य कौटुंबिक कटकटी / वादावादी झाल्या नाहीत कारण महा० एक्झि० ट्रस्टींची पारदर्शकता.

In reply to by आदूबाळ

आदुबाळ - शक्य झाल्यास वैयक्तीक माहीती सोडुन जास्तीची माहीती द्या. मला स्वताला असे काहीतरी करुन ठेवण्यात रस आहे. ट्रस्ट हा प्रकार नक्की कसा चालतो काहीच माहीती नाही. पाश्चिमात्य देशात हा खुपच कॉमन प्रकार असावा असे गोष्टी सिनेमातुन दिसते. भारतात पहाण्यात नाही.

In reply to by गंम्बा

ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा प्रयत्न करतो. आणि पूर्ण स्टोरी लिहितो. ---- सन ९६-९७ सालची गोष्ट असेल. जवळच्या नात्यातली एक वृद्ध व्यक्ती. एका दुर्धर आजाराचं नुकतंच निदान झालं होतं. जिवाला इमिजिएट धोका नसला तरी हळूहळू प्रकृती बिघडत जाणार हे निश्चित होतं. जवळच्या एका हितचिंतकाने लगेच मृत्युपत्र करायला सुचवलं. (कारण मृत्युपत्र करताना व्यक्ती कायद्याच्या नजरेत "ऑफ अ सेन माईंड" लागते, आणि त्या आजारामुळे सॅनिटी कमीकमी होत जाणार हे स्पष्ट होतं.) त्या वृद्ध व्यक्तीकडे फारशी प्रॉपर्टी नव्हती. भाड्याचं घर रीडिव्हेलप होऊन झालेला फ्लॅट, पेन्शनच्या उरलेल्या पैशाच्या केलेल्या एफड्या, कुठचेतरी लटकलेले अ‍ॅरियर्स वगैरे. सामान्यतः अशा वेळी काही वाद व्हायला नको, पण त्या वृद्ध व्यक्तीचे वारसदार लैच कटकटे, दुराभिमानी, इगोइस्टिक वगैरे होते. हे माहीत असल्याने त्या वृद्ध व्यक्तीने काही जबाबदार नातेवाईकांना मृत्युपत्राचा एक्झिक्युटर व्हायची गळ घातली. (एक्झिक्युटर म्हणजे मृत्युपत्रात लिहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडवण्याची जबाबदारी दिलेला माणूस.) पण झालं असं - वृद्ध व्यक्तीच्या हिशोबात ते जबाबदार नातेवाईक तरूण असले, तरी प्रत्यक्षात ते पंचेचाळिशीच्या आसपासचे होते. काहीतरी होऊन ते वृद्ध व्यक्तीच्या आधीच टपकले तर काय घ्या? बरं, नाही टपकले, तरी एक्झिक्युटर होणं - विशेषतः नात्यातल्या व्यक्तीचा - हे वैतागाचं, मानसिक श्रमाचं काम असतं. त्यातून वारसदार म्हणजे... तर एकाने महाराष्ट्र एक्झिक्युटर ट्रस्टीजचा पर्याय सुचवला. वाटलं की एवढी छोटी इस्टेट असल्याने ते ही जबाबदारी घेतील का? चौकशी करता ते हो म्हणाले, त्यांच्या सर्व्हिस अ‍ॅग्रीमेंटवर सह्या झाल्या. मग त्यांच्याकडून एक माणूस येऊन मृत्युपत्रात कोणाला काय, कसं, किती द्यायचं आहे ते वृद्ध व्यक्तीला विचारून त्याच्या नोट्स काढून घेऊन गेला. मग प्रत्यक्ष मृत्युपत्र ड्राफ्ट केलं, ते त्या वारसदारांना दाखवलं. (हे करणं खरं तर आवश्यक नसतं, पण या केसमध्ये वृद्ध व्यक्तीनेच ही सूचना केली होती.) एक मूळप्रत त्यांनी ठेवून घेतली. सन २०१५ मध्ये वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. हे एक्झिक्युटर ट्रस्टींना कळवताच त्यांनी बँक अकाऊंट, एफड्या, सोनं वगैरे ताब्यात घेतलं. फ्लॅटवरचं नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. वारसदारांची एक मीटिंग घेऊन मृत्युपत्र मोठ्याने वाचून दाखवलं. त्यात घडायच्या त्या नाट्यमय घटना घडल्याच - एका वारसदाराचं म्हणणं होतं की वृद्ध व्यक्तीने मला क्ष द्यायचं ठरवलं होतं आणि तुम्ही य म्हणताय. दुसर्‍या वारसदाराला त्या काळी निरीच्छतेचा टेंपररी झटका आल्याने त्यांनी सर्व हक्क सोडून दिले होते. नंतरच्या वीस वर्षांत (१९९६-२०१५) झटका ओसरला होता, आणि आपल्याला काही मिळावं ही इच्छा जागृत झाली होती. तिसर्‍या वारसदाराकडे वृद्ध व्यक्तीचे बरेच अ‍ॅसेट होते आणि तो बराच काळ शहराबाहेर असे. एक्झिक्युटर ट्रस्टींनी सगळं अत्यंत थंडपणे हाताळलं. वारसदार एक आणि दोनला त्यांना ड्राफ्ट विल वाचायला दिलं तेव्हा अ‍ॅकनॉलेजमेंट घेतली होती ती दाखवली. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता हे पटवून त्यांचं तोंड बंद केलं. तिसर्‍या वारसदाराच्या गावी जाऊन अ‍ॅसेट ताब्यात घेतले. वारसदार एकला पैसे नको होते, पण वृद्ध व्यक्तीची आठवण म्हणून विशिष्ट वस्तू हवी होती. या सगळ्या खाचाखळग्यांतून त्यांनी योग्य प्रकारे त्यांचं काम केलं. तात्पर्य असं, की जिथे मृत्युपत्रामुळे डोक्याला शॉट लागायची शक्यता असते, तेव्हा एक्झिक्युटर ट्रस्टींकडे नक्की जावं.

In reply to by आदूबाळ

हि माहिती पूर्ण वाचली. खूप चांगली सेवा आहे हि. ह्याबद्दल बिलकुल माहिती नव्हती. अशी सेवा कुणी फर्म अथवा संस्था प्रॉपरली रेट वगैरे ओपन करून देत असेल असेही वाटले नव्हते. मला ते विल वगैरे गोष्टी बडे लोग बडी बाते वाटायचे. हे मात्र आपल्या महाराष्ट्र बँकेकडून आहे म्हणजे भारीच. कारण रिलेशन मेन्टेन केले तर महाबँकेसारखे लोक जगात भारी बँकर सारखी सेवा देतात याचा अनुभव आहे. हि माहिती बर्याच जणांना पुरवली जाईल.

In reply to by आदूबाळ

खूपच चांगली माहिती मिळाली एकाच प्रश्न. ह्या व्यक्तीने बर्याच लोकांना मृत्युपत्राबद्दल सांगितले होते. पण सहसा असे होत नसावे. म्हणजे जर मी आणि नवरा मृत्युपत्र केल्यानंतर गचकलो आणि कुणाला कल्पनाच नसेल कि मृत्युपत्र केलेले आहे तर? किंवा माहीत असलेल्या लोकांनी वेळेत एक्झिक्युटर ला कळवले नाही तर काय होण्याची शक्यता आहे? एक नक्की की ही एक्झिक्युटर ची माहिती खूप उपयुक्त आहे. सहा महिन्यांपूर्वी स्वर्गवास झालेल्या माझया नातेवाईकांच्या फॅमिली ला किती त्रास सहन करावा लागतो आहे ते पाहून मी सुद्धा हा विचार सुरू केलाच होता. आम्ही पुढल्या दहा वर्षात वर पोचलो तरी आमची मुले अज्ञान असणार. अश्या वेळी काही वेगळी व्यवस्था करून ठेवता येईल का? मुलांचे शिक्षण नीट होऊन नंतर आमच्या इच्छे प्रमाणे त्यांना संपत्ती मिळेल असे काहीतरी हवे आहे.

In reply to by झकास

पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला ठाऊक नाही. सदर वृद्ध व्यक्तीचं पेन्शन महाबँकेतच येत असे, आणि पेन्शन खातं दर वर्षी एकदा माणूस हयात असल्याची खातरजमा करतातच. त्यामुळे एक्झि० ट्रस्टींनी वेगळी भानगड ठेवली नव्हती. (ही फ्लेग्झीबीलिटी मला आवडली. नाहीतर नियमावर बोट ठेवून आणखी एक कागदी घोडा बनवणं त्यांना सहज शक्य होतं.) वारसदार अज्ञान असेल तर तो सज्ञान होईपर्यंत ते ट्रस्टी राहतात.

In reply to by असंका

धन्यवाद असंका. मी ह्याच गोष्टीच्या शोधात ह्या धाग्यावर सारखा येत होतो. इच्छापत्र करा, माहीती देऊन ठेवा हे सर्व ठीक आहे. पण असे ट्रस्टी आणि एक्झीक्युटर असणे गरजेचे आहे.

अश्या प्रकारची ठराविक वेळेला पडणारी स्वप्ने म्हणजे ब्लॅडर फुल्ल झाल्याची निशाणि असु शकते. मेंदु अश्याप्र्कारचे धक्का दायक स्वप्न पाडुन उठवण्याचा प्रयत्न करु शकतो. तु ३ किंवा ४वाजता उठुन मोकळा होउन ये. मग बघ स्वप्न पडतय का ते?

In reply to by आनंद

हेचि फळ काय मम चिंतनाला. असो, डोन्ट माईंड आनंद पण माझा मेंदू ब्लॅडर फुल्ल चा मेसेज असा क्रिप्टिक कधी देत नाही. सरळ मेसेज येतो आणि मी उठून रिकामा होऊन परत झोपतो. (च्यामारी वाघाचा मेसेज आठवला) ;)

श्री अभ्याशेठ यांना एक मोठ्ठा आरसा ( ते दिसू शकतील असा व्यायाम्शाळे सारखा),रात्री झोपताना वाचण्यासाठी चांदोबाचे जुने अंक व काही सिंड्रेला समान परिकथा पुस्तके,एक नवरत्न तेलाचा बाटली आणि आगामी कट्ट्याला पुर्णवेळ हजर राहण्याचे आवतान देऊन करण्यात येत आहे.
अध्य्क्ष : मनाचा थांग पेश्शल आदरणीय गावडे मास्तर प्रमुख पाहुणे : विश्वात भाव ओतणारे जग्नमित्र कवी लोकप्रिय साहित्यीक श्री रा रा आत्मुदा चारोळीवाले. इतर मान्यवर : या वयातही गुलाबी बाणा जपणारे बिरुटे सर,भटकंतीवाले वल्ली महोदय्,आद्य पोपाचार्य गिरिजा,जाग्यावर टांगा पलटीफेम वप्याडाव
आपले नम्र. नाखु,चौरा पिंपरीचिंचवडकर यशोमैया संचालित अभ्या फॅन क्लब किसनदेव स्म्चालीत अभ्या चाहता संघ ठाणे डोंबवलीसह अद्या यांचा बेळगाव निपाणी चिकोडी,अथनी हुबळी सह सत्कार संघ

स्वप्नांना काहिही अर्थ नसतो. इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. बाकी आर्थिक व्यवहार घरच्यांना माहिती करुन देणे वगैरे कायम करत रहावे (स्वप्नाच्या ट्रीगरची गरज नाही)जेव्हा जेव्हा काही नवी गुंतवणूक कराल तेव्हा. खरतर त्यांच्याशी सल्लामसलतीनेच करावे व्यवहार म्हणजे वेगळी माहिती करून देण्याचीही गरज नाही. बाकी स्वप्नातील घटना वगैरे वापरून आणि वर तुमचा मालमसाला घालून मस्तपैकी लेख लिहा इथे.. :-)

झोपेतली स्वप्ने झोपेतली " च " असतात अभ्या , हो , जागेपणी पडलेली / बघितलेली स्वप्ने पूर्ण होत नसतील तर मात्र काही तरी केलं पाहिजे . बाकी नको एवढा विचार करू . Enjoy the work you do.. make sure you earn enough for it. give your parents and wife/ would be wife enough to be happy. and leave everything else to the monk ;)

भारतात हा विषय कितपत चर्चिला जातो की नाही हे माहिती नाही पण medical directive and medical power of attorney हाही एक महत्वाचा विषय आहे. डॉक्टर मंडळी यावर पण लिहा किंवा एक वेगळा धागा काढा. अतुल गावंडेचं "Being Mortal" हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

मला अंधश्रद्धाळू समजाल, पण भावा माझ्या नोकरीत अश्या अश्या गोष्टी पाहिल्यात का माझा भरोसा बसला, कधीही पहाडावर चढाईच्या अगोदर आम्ही पर्वतराज नगारु (स्थानिक भाषेत)ची पूजा केल्याशिवाय म्हणूनच चढत नाही, तर.... कसे करावे? शनिवारी मस्त अंघोळ कर, जुन्या चपला पायात घाल, नव्या पिशवीत घे, एक नारळ घे, फुलं उगाअसल्यास घे, तेल अन अख्खे उडीद न विसरता घे,अन तडक आपला गरिबांचा वाली हनुमान पकड, करायचे काहीच खास नाही मनापासून भीमरूपी महारुद्रा किंवा चालीसा म्हण एकदाच, दंडवत घाल नारळ वाढव, खाऊ नकोस सोबत घे, तेल उडीद देवास वहा, बाहेर पडलास का जुन्या चपला तिथेच सोड अन बदली म्हणून आणलेल्या चपला घाल, दोन बाजूला दोन भकले फेकून दे नारळाची, अन जा कामाला बिनधास्त! किंवा बेस्ट, आईकडून मीठमिरची ओवाळून घे गड्या! त्यासारखे कवचच नाही :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, मनातला धसका हा प्रकार मानासिकच आहे, ह्या उपायाने मनोबल वाढत असेल तर हे पण करीन. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असे उपाय माझी आई ज्या काळजीपोटी करते त्याच काळजीने तू सांगितलं म्हणून अवश्य करिन. जय बजरंगबली.

In reply to by अभ्या..

सगळा खेळच मानसिक असतोय गड्या, आम्ही पर्वताची पूजा करतो खरे पण वेळेला जर avalanch आलेच तर काय उपडणार आम्ही? (हिमालयातले उगा बारके avalanch सुद्धा काहीशे टन बर्फ आणते खाली) बारक्यातल्या बारक्या avalanch मध्येही सापडलो तर पावणे सहा फुट (१७५ सेमी) चा बाप्या क्षणात जीबुलानी फुटबॉलच्या आकाराचा होऊ शकतो, पण तरीही पूजा होतेच रे, अन मिळते ते मनोबलच,माझी पोरे भोळी असतात रे ग्रामीण भागातली भारताच्या कानाकोपऱ्यातली, त्यांना आसरा वाटतो त्या फडफडत्या दिव्याचा, अन खोटे कश्याला बोलू लगा मी साहेब असलो तरी मी बी गावठीच! मला पण आसरा वाटतोच, ह्यात वरतीच लिहायचे राहिले खरे पण ह्याला उगा पूजा नजर वगैरे नको पाहू तर एक मानसिक समाधान म्हणून पाहा हे अध्याहृत आहेच :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एक नंबर. कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण..... मलातरी तेल आणि उडीदाचा जबरदस्त फायदा झाला आहे. आजी कडून मीठमिरची ओवाळून घेतलेस तर फार उत्तम. बजरंगबली की जय. ह्याचा फायदा झाला तर व्यनि केलस तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

तेल घरुन घेउन जा. नाहीतर मंदीरातून बाहेर पडणारे तेल बाटल्यात भरून तीथेच विकायला बसलेले असतात. :) रुइच्या पानांच्या हाराचेही तेच. आमचा क्लास मंदीरासमोर असल्यामुळे ही गंमत बघायला मिळायची. कोणा गरीबाचे पोट भरत असेल मारुती रायामुळे...

In reply to by मुक्त विहारि

कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण.
हो ना , पाहुया आता खरे डॉक्टर काय म्हणतात ते .. औचित्यभौचित्यभंग वगैरे वगैरे... आता कळेल की त्यांचे स्कोरसेटलिंग केवळ आमच्यापुरतेच मर्यादित आहे की सार्वत्रिक सार्वजनीन आहे ते !!

In reply to by मुक्त विहारि

मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल वापरून पहा तेल, उडीद, नायतर आजीकडून दृष्ट सगळं मानसिकच असतं .. :-)

In reply to by बाळ सप्रे

डू.आय.डी. हा जर मानसिक विभ्रम असता, आणि त्यांचा प्रश्र्न जर फक्त माझ्यापुरताच मर्यादित असता, तर गोष्ट वेगळी होती आणि आहे आणि असेल. डू.आय.डी. ही मिपाला लागलेली कीड आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. बादवे, तुम्हाला डूआयडींच्या बद्दल काळजी वाटते, हे वाचून कौतूक वाटले.... असो, आपल्या सारख्या डू.आय.डींच्या पाठीराख्याला उप-प्रतिसादांचा खेळ खेळण्या इतका आम्हाला वेळ नाही.... हा ह्या धाग्यावर आमचा, आपल्याला शेवटचा प्रतिसाद.

In reply to by मुक्त विहारि

डु आयडी मानसिक विभ्रम नव्हे हो.. करुन घेतलेला त्रास मानसिक असतो.. सगळे करून घेतात का?? म्हणून मानसिक म्हटलं. एवढ्यावरून तुम्ही तर डु आयडींचा पाठीराखा वगैरे ठरवून स्वर्ग सुतावरून गाठलात.. असो _/\_

अभ्या..मस्त खा, प्या आणि मज्जा करा. मज्जानू लाईफ. जास्त विचार नका करू. बाकी, हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. बरीच उपयुक्त व नविन माहीती मिळाली. वाचनखूण साठवली आहे.

बरेच दिवस हा धागा पाहतोय, वाचतोय, तुला नक्की काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नव्हतं. शेवटी दोन ओळी मनात आल्या त्या देतोय खाली तुझसे बिछडने के ख्वाब आते है, नींद से भरी गहरी रात में, सुना है तू सोच रहा है, जाते जाते क्या दे जाऊं मेरे हात में | जिंदा है तू, सांस ले रहा है, दुनिया है मेरी तेरी मुलाकात में, सचमें बता, क्या रख्खा है, जेवर, मकान, पैसे और कागजात में | अभ्या, लगा... ठणठणीत तंदुरुस्त र्‍हा. हे स्वप्न पडण्याचं कारण शोध. कोणत्या तरी भयंकर प्रेशरखाली अशी स्वप्नं पडणं कॉमन आहे. ते टेन्शन समोर दिसत नाही, बॅक ऑफ द माइन्ड तयार होतं. बीन देअर, डन दॅट!!

स्वप्न वाइट असले की प्रतक्षात चांगल्रे होते व वाइस वर्सा. असे ऐकले आहे.