Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 08:35
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. कवीला मूक्ती भेटली काय, न भेटली काय कवीला स्वप्नात जगायची जन्मजात सवयच हाय मी तरी वास्तव जगात जगून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेतून सामाजिक प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या कवींना अजिबात काय कळतच नसतं. कविता पेनड्राइव्ह मधे भरुन पुस्तक काढीन म्हणतो, मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेशी प्रतारणा करुन कथा लिहिता येते, कवितेशी इमान राखणारे घरात कुढत बसतात, कवीचे नाव फक्त संदर्भापुरते घ्यायचे, काम झाले की वार्‍यावर सोडायचे पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ 'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/25/2016 - 09:37

In reply to गावडे सरांनी by नाखु

Permalink

मिपा असो की कवीची कविता.

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. कोणतीही कविता असो, लेख असो, माणूस असो, नवरा असो की बायको असो, की मिपा असो ते कोणाचंही पूर्णपणे समाधान करू शकत नाही. ;) आपलं माझ्या रचनेने समाधान झालं नाही, आपणास उच्च आनंद मिळाला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आपल्याला माझ्या लेखनातून आनंद देण्याचा नक्की प्रयत्न करीन. असाच लोभ आणि आशीर्वाद असू द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. :) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा योगिराज on Sun, 07/24/2016 - 22:38

Permalink

झ्याक

आवड्यास. सर आवाज द्या. पयली कोप्पी माह्याकडूनच. . . एक अती अवांतर गोष्ट, आता सरच कॉपीच्या बाता करू रायले म्हणल्यावर... (पळ भौ) बाबा योगीराज
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Sun, 07/24/2016 - 23:11

Permalink

एक नंबर !!

भारी लिहीलेत सर, पण त्यामुळे घोळ झाला ना, एवढी छान कविता पाहून आम्हालाबी एक सोडून दोन कविता लिहाव्या लागल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 07/24/2016 - 23:17

In reply to एक नंबर !! by नीलमोहर

Permalink

=))

दोन्ही वाचल्या. (एकावर ज़रा अवांतर केलं सॉरी हं) खरं तर एकच विडंबन करायला हवं होतं. दोन्ही चांगल्या जमल्या. पण मग वाचकांचा फोकस कमी होतो. शुभेच्छा. आणि प्रतिसादाबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सालस on Mon, 07/25/2016 - 11:30

Permalink

धाग्याचा खरडफळा स्वतः कवीच

धाग्याचा खरडफळा स्वतः कवीच करताना प्रथमच पाहिला गडे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/25/2016 - 11:36

In reply to धाग्याचा खरडफळा स्वतः कवीच by सालस

Permalink

=))

हो ना ! काय करू हौस कशी असते. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सालस on Mon, 07/25/2016 - 12:16

Permalink

अच्च जालं तर

अच्च जालं तर
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 07/25/2016 - 12:17

Permalink

लेच्च मणोरंजक

लैच्च मणोरंजक!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/25/2016 - 13:04

In reply to लेच्च मणोरंजक by पैसा

Permalink

पै

Thank u.... प्रतिसाद हार्टली नै आला हं पण (राग आलाय तुमचा) च्यायला, एक तर मी काव्य प्रकारात पडत नै, अन भरवशाच्या मिपकारांनी असा तुटक प्रतिसाद दिल्यावर लिहाव वाटतं नाही. ;) दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 07/26/2016 - 08:37

Permalink

आभार..

विड़ंबन आवडल्याचं आवर्जून लिहिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रतिसादांनी लिहीण्याचा उत्साह वाढतो आणि आनंदही वाटतो. विडंबनावर प्रतिसाद लिहायचं सोडून अवांतर प्रतिसाद दिले त्यांचेही आभार, त्यांच्यामुळेही लिहीण्याची खुमखुमी वाढली आहे. मिपा वाचकांचेही आभार. मिपा संपादक, व्यवस्थापन यांचेही आभार त्यांनी मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली. मी आपल्या ऋणातच राहु इच्छितो. कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आभार मानायचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 07/26/2016 - 09:49

In reply to आभार.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

चहापानाची व्यवस्था कुठे केली

चहापानाची व्यवस्था कुठे केली आहे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 07/26/2016 - 09:52

In reply to आभार.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

ह्याच्यानंतर वाचनमात्र होणार

ह्याच्यानंतर वाचनमात्र होणार का? का चालतील प्रतिसाद अवांतर प्रतिसाद वगैरे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 07/26/2016 - 11:08

In reply to ह्याच्यानंतर वाचनमात्र होणार by अभ्या..

Permalink

O no

एकदा आभार मानल्यावर पुन्हा माइक वर सूचना द्यायचं म्हटलं की मला जीवावर येत. पण धन्या आणि तुम्ही माझे मित्र म्हणून पुन्हा एकदा सूचना देतो. संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच. मुगाचा शिरा मिळणार नाही. अवांतर प्रतिसाद देणा-या मिपाकरांना वरील मेनूसोबत महालक्ष्मीच्या कहाणी आणि आरतीची पुस्तकं देण्यात येतील. ;) ता.क. : बाकीचं वाट्सपवर बोलू. संजय क्षीरसागर ओळखीचे असतील तर मिपावर प्रा.डॉ. आपली वाट पाहात आहेत असा निरोप द्या प्लीज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 07/26/2016 - 11:33

In reply to O no by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे

संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच.
तिथे मसाला दुध छान मिळते. आणि रस्त्याच्या कडेला बसून बाजूने वाहने भरधाव जात असताना मसाला दुध पिण्याची मजा काही औरच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 07/27/2016 - 00:25

Permalink

दोन घोटानी भागतं? विशेष आहे!

दोन घोटानी भागतं? विशेष आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 07/27/2016 - 09:28

In reply to दोन घोटानी भागतं? विशेष आहे! by रातराणी

Permalink

नशा कॉफीत असती तर नाचला असला

नशा कॉफीत असती तर नाचला असला प्याला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमितदादा on Wed, 07/27/2016 - 01:55

Permalink

आवडलं. मस्तच...

आवडलं. मस्तच...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 22097 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com