(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून.
मीबी काय तरी लिहीन म्हणतो.
पांढर्या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो.
मीबी काही तरी लिहिन म्हणतो.
कवितेला रास्त प्रतिसाद
भेटले काय, न भेटले काय
कवीला उपासमारीत
जगायची सवयच हाय
तरीबी मी आपलं जमवून
घेईन म्हणतो.
मीबी काय तरी लिहीन म्हणतो.
कवीला मूक्ती
भेटली काय, न भेटली काय
कवीला स्वप्नात जगायची
जन्मजात सवयच हाय
मी तरी वास्तव जगात जगून
घेईन म्हणतो.
मीबी काय तरी लिहिन म्हणतो.
कवितेतून सामाजिक प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या कवींना अजिबात
काय कळतच नसतं.
कविता पेनड्राइव्ह मधे भरुन
पुस्तक काढीन म्हणतो,
मीबी काय तरी लिहिन म्हणतो.
कवितेशी प्रतारणा करुन
कथा लिहिता येते,
कवितेशी इमान राखणारे
घरात कुढत बसतात,
कवीचे नाव फक्त
संदर्भापुरते घ्यायचे,
काम झाले की
वार्यावर सोडायचे
पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो.
मीबी काय तरी लिहिन म्हणतो.
कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ
'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.
बेक्कार हसलोय राव!
आभार.
मी तितका बेक्कार नाही हो
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे
आवं आमचं कुठंबी कनेक्षन नाही.
मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या
आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे
अच्छा अस व्हय.....!
ते पण दोन दोन प्रतिसाद !
+100
कविता,100%सहमत,स्वतः चाच
सुरंगी तै
बिरूटे सर यू टू????
>>>> स्वतः चाच ढाव्यावर
साताजन्माचं कनेक्शन हाय
जनम जनम का साथ
भारीये
धागा बिरुटेजीन्चा आहे, मी
हे उत्तर मुटेना दिलय
लम्र विनंती
कायेना बिरुटेजी नको खरडवही
ठीक आहे जशी आपली इच्छा !
जशी आज्ञा
माझी सपशेल माघार.
आम्ही पण
मूळ कविता आणी हे विडंबन
कुरकुरित भेंडी आवडली.
औरंगाबादी तडका, कवितेचा भडका.
जमलंय...
मस्तं!
+१११
सर यू टू?????????
आवडले!
छान. आपल्या आस्वादासाठी एक
क्रिप्टीक
९
हाहाहा
यु टू प्रा डॉ ?! ;)
वाह व्वा. जबराट !
दोन घोट ??
विडंबन आवडले
वाहव्वा वाहव्वा......
लै भारी.
दोन घोट कसले पिता म्हणे
कॉफीचे दोन घोट.
तुम्ही पुण्याला या. तुम्हाला
कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली
वाचली 'नसल्याने' असे वाचावे.
तूच आगोबा.. तूच!
गावडे सरांनी
Pagination