✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Sun, 07/24/2016 - 08:35
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. कवीला मूक्ती भेटली काय, न भेटली काय कवीला स्वप्नात जगायची जन्मजात सवयच हाय मी तरी वास्तव जगात जगून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेतून सामाजिक प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या कवींना अजिबात काय कळतच नसतं. कविता पेनड्राइव्ह मधे भरुन पुस्तक काढीन म्हणतो, मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेशी प्रतारणा करुन कथा लिहिता येते, कवितेशी इमान राखणारे घरात कुढत बसतात, कवीचे नाव फक्त संदर्भापुरते घ्यायचे, काम झाले की वार्‍यावर सोडायचे पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ 'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

प्रतिक्रिया द्या
22097 वाचन

💬 प्रतिसाद (67)

मिपा असो की कवीची कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 09:37 नवीन
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. कोणतीही कविता असो, लेख असो, माणूस असो, नवरा असो की बायको असो, की मिपा असो ते कोणाचंही पूर्णपणे समाधान करू शकत नाही. ;) आपलं माझ्या रचनेने समाधान झालं नाही, आपणास उच्च आनंद मिळाला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आपल्याला माझ्या लेखनातून आनंद देण्याचा नक्की प्रयत्न करीन. असाच लोभ आणि आशीर्वाद असू द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. :) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

झ्याक

बाबा योगिराज
Sun, 07/24/2016 - 22:38 नवीन
आवड्यास. सर आवाज द्या. पयली कोप्पी माह्याकडूनच. . . एक अती अवांतर गोष्ट, आता सरच कॉपीच्या बाता करू रायले म्हणल्यावर... (पळ भौ) बाबा योगीराज
  • Log in or register to post comments

एक नंबर !!

नीलमोहर
Sun, 07/24/2016 - 23:11 नवीन
भारी लिहीलेत सर, पण त्यामुळे घोळ झाला ना, एवढी छान कविता पाहून आम्हालाबी एक सोडून दोन कविता लिहाव्या लागल्या.
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 23:17 नवीन
दोन्ही वाचल्या. (एकावर ज़रा अवांतर केलं सॉरी हं) खरं तर एकच विडंबन करायला हवं होतं. दोन्ही चांगल्या जमल्या. पण मग वाचकांचा फोकस कमी होतो. शुभेच्छा. आणि प्रतिसादाबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

धाग्याचा खरडफळा स्वतः कवीच

सालस
Mon, 07/25/2016 - 11:30 नवीन
धाग्याचा खरडफळा स्वतः कवीच करताना प्रथमच पाहिला गडे.
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 11:36 नवीन
हो ना ! काय करू हौस कशी असते. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

अच्च जालं तर

सालस
Mon, 07/25/2016 - 12:16 नवीन
अच्च जालं तर
  • Log in or register to post comments

लेच्च मणोरंजक

पैसा
Mon, 07/25/2016 - 12:17 नवीन
लैच्च मणोरंजक!
  • Log in or register to post comments

पै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 13:04 नवीन
Thank u.... प्रतिसाद हार्टली नै आला हं पण (राग आलाय तुमचा) च्यायला, एक तर मी काव्य प्रकारात पडत नै, अन भरवशाच्या मिपकारांनी असा तुटक प्रतिसाद दिल्यावर लिहाव वाटतं नाही. ;) दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आभार..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/26/2016 - 08:37 नवीन
विड़ंबन आवडल्याचं आवर्जून लिहिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रतिसादांनी लिहीण्याचा उत्साह वाढतो आणि आनंदही वाटतो. विडंबनावर प्रतिसाद लिहायचं सोडून अवांतर प्रतिसाद दिले त्यांचेही आभार, त्यांच्यामुळेही लिहीण्याची खुमखुमी वाढली आहे. मिपा वाचकांचेही आभार. मिपा संपादक, व्यवस्थापन यांचेही आभार त्यांनी मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली. मी आपल्या ऋणातच राहु इच्छितो. कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आभार मानायचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चहापानाची व्यवस्था कुठे केली

सतिश गावडे
Tue, 07/26/2016 - 09:49 नवीन
चहापानाची व्यवस्था कुठे केली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्याच्यानंतर वाचनमात्र होणार

अभ्या..
Tue, 07/26/2016 - 09:52 नवीन
ह्याच्यानंतर वाचनमात्र होणार का? का चालतील प्रतिसाद अवांतर प्रतिसाद वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

O no

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/26/2016 - 11:08 नवीन
एकदा आभार मानल्यावर पुन्हा माइक वर सूचना द्यायचं म्हटलं की मला जीवावर येत. पण धन्या आणि तुम्ही माझे मित्र म्हणून पुन्हा एकदा सूचना देतो. संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच. मुगाचा शिरा मिळणार नाही. अवांतर प्रतिसाद देणा-या मिपाकरांना वरील मेनूसोबत महालक्ष्मीच्या कहाणी आणि आरतीची पुस्तकं देण्यात येतील. ;) ता.क. : बाकीचं वाट्सपवर बोलू. संजय क्षीरसागर ओळखीचे असतील तर मिपावर प्रा.डॉ. आपली वाट पाहात आहेत असा निरोप द्या प्लीज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे

सतिश गावडे
Tue, 07/26/2016 - 11:33 नवीन
संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच.
तिथे मसाला दुध छान मिळते. आणि रस्त्याच्या कडेला बसून बाजूने वाहने भरधाव जात असताना मसाला दुध पिण्याची मजा काही औरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन घोटानी भागतं? विशेष आहे!

रातराणी
Wed, 07/27/2016 - 00:25 नवीन
दोन घोटानी भागतं? विशेष आहे!
  • Log in or register to post comments

नशा कॉफीत असती तर नाचला असला

सतिश गावडे
Wed, 07/27/2016 - 09:28 नवीन
नशा कॉफीत असती तर नाचला असला प्याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

आवडलं. मस्तच...

अमितदादा
Wed, 07/27/2016 - 01:55 नवीन
आवडलं. मस्तच...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा