✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125475 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

वर दिलेले वाच.का तुझ्या

अजया
गुरुवार, 07/14/2016 - 22:50 नवीन
वर दिलेले वाच.का तुझ्या कांदेपोह्याला प्ले बॅक द्यायला येऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एग्झ्यॅक्ट काय प्रश्न

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/14/2016 - 22:54 नवीन
एग्झ्यॅक्ट काय प्रश्न विचारायचे ते सांगा की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

=))

सूड
गुरुवार, 07/14/2016 - 23:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तू गप रे....इतके सल्ले

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/14/2016 - 23:05 नवीन
तू गप रे....इतके सल्ले देणार्यांपैकी कोणाला खरोखर उपयोगी माहिती देता येते का ते बघतो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूडजींशी सहमत!

अजया
गुरुवार, 07/14/2016 - 23:14 नवीन
ते सल्लेच उपयोगी माहिती आहे हे ही कळेना आणि म्हणे माझं लग्न करा =)))) दुसरा काहीतरी टाइमपास कर जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मि मुलीला काय प्रश्न

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/14/2016 - 23:33 नवीन
मि मुलीला काय प्रश्न विचारायचे ते विचारतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

टका..

चिनार
Fri, 07/15/2016 - 15:54 नवीन
टका.. चार वर्ष झाले हा धागा काढून, अजून तुला मुलीला काय प्रश्न विचारायचे हे सुद्धा कळले नाही ????? तुला एक प्रेमळ सल्ला देतो..., असा समज की तू लाख चांगले प्रश्न विचारलेस आणि मुलीने तुला हवे ते उत्तर दिले जवळजवळ सगळ्याच प्रश्नांचे. पण ती धडधडीत खोटं बोलत असली तर ?? कसं ओळखणार ?? (अर्थात हे उलट पण होऊ शकते म्हणजे तू सुद्धा खोटं बोलू शकतोस. आता कोणी कशाला खोटं बोलेल असे बाळबोध प्रश्न तुला पडत नसतील अशी आशा करतो. या प्रश्नोत्तरांनी काहीही होत नाही. संवाद होणं महत्त्वाचं. अर्धा-पाऊणतास एखाद्याशी बोलल्यावर बऱ्याच गोष्टी क्लियर होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट

स्रुजा
गुरुवार, 07/14/2016 - 23:55 नवीन
तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट फीलिंग वर हे अवलंबुन असणार आहे. तू तुझ्या आई बाबांना नीट ओळखतोस. काही स्वभाव विशेष लपत नाहीत. तिला ही तूच पहिल्यांदा घरात नीट ओळखणार आहेस, सो हे तू कसं हाताळतोस त्यावर अवलंबुन राहिल. कांपोहे च्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारणार तू यावर? हे सगळं आफटर मॅथ आहे आणि ते तुझ्या आतापर्यंत च्या व्यक्तिमत्वावर आणि तिच्या ही व्यक्तिमत्वावर अवलंबुन राहणार आहे. एक मात्र सल्ला मला पटला नाही, पियु म्हणते ते खरं आहे की आई बाबांच्या अपेक्षा पण जुळल्या पाहिजेत पण ते सोयीस्कर असलं तरी रेलेव्हंट असेल च असं नाही. आज काल अनेक जण बाहेर च राहतात, नोकरी निमित्ताने देशा बाहेर किंवा शहराबाहेर वगैरे. रोजचं एकत्र राहणं नसलं की बर्‍याच गोष्टी इर-रेलेव्हंट होऊन जातात. शेवटी संसार मुला-मुलीला करायचा आहे त्यामुळे नवरा बायको ला दोघांनी नोकरी करणं गरजेचं वाटत असेल तर आईबाबांच्या विरुद्ध मताला थोडं बदलता आलं पाहिजे. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. कुणाला घरगुती मुलगी हवी असते कुणाला बाहेर चं सगळं बरोबरीने हँडल करणारी हवी असते. मुलींच्या ही वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आणि आता लग्नाला बरीच वर्षं झाल्यावर सांगते, जोडीदाराकडुनच्या अपेक्षा बदलत राहतात. वयानुसार, परिस्थितीनुसार दोघांच्या प्राधान्यक्रमात एकत्र फरक पडु शकतो आणि कधी ते दोघं मिळुन ठरवतात की आता एकानेच नोकरी करु किंवा आता देश सोड्न बाहेर बघु नोकरी किंवा बास झालं भारतात परत जाऊ वगैरे. दोघांनी एकमेकांना ही मुभा दिली आणि कपल म्हणुन जी काही परिस्थिती आहे ती अ‍ॅड्जस्ट केली की झालं. या बाबतीत दोघांचा भावनांक सारखा हवा. आई बाबांना (दोघांच्या) तेवढं समजावुन सांगता आलं पाहिजे. आपल्या मस्ट हॅव अपेक्षा कोणत्या आणि नाईस टु हॅव कोणत्या हे कळायला पाहिजे आणि कोणत्या अपेक्षा कुठल्या विभागात टाकायच्या त्या आधी कळायला पाहिजे. आणि ते लग्न करणार्याला इतर कुणाहीपेक्षा जास्त कळतं, अगदी आपल्या पालकांपेक्षा पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रतिसाद पटला, तरी टका यांचा

खटपट्या
Fri, 07/15/2016 - 00:57 नवीन
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला. की मुलीला पहाण्याच्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारावेत? माझ्या मते मुलगी पहाणे या कार्यक्रमात मुलगा आणि मुलगी या दोघांना स्कोप फारच कमी असतो. खरं तर हा कार्यक्रम बाकीच्या लोकांसाठीच असतो. मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशी आहे हे बाकीचे बघून घेतात. जर फीजीकल पसंती झाली असेल आणि बाकीच्या अपेक्षा जुळत असतील तर मुलगा आणि मुलीने सरळ बाहेर भेटूनच आपापसात अपेक्षांबद्द्ल चर्चा करावी. अशा बाहेरच्या भेटीत मुलगी आणि मुलगा नि:संकोचपणे बोलू शकतात. आता अशा भेटीत काय प्रश्न विचारवे असे विचाराल तर, तीच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, तीच्या करीअरबद्द्ल तीचे काय विचार आहेत, वेगळे रहाण्याबद्दल काय विचार आहेत, खाण्यापिण्याच्या आवडी, तीचे मित्रमंड्ळ, तीचे आवडते विषय, आवडते कार्यक्रम, तीला फावला वेळ (तुम्ही दीलात तर) कसा घालवासा वाटतो, बाकीच्या बाबबतीच जसे की राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट जगत, सोशल मीडीया याबाबतीत तीची काही ठाम मते आहेत का, तीला वाचायला काय आवडते असे प्रश्न विचारुन तुम्ही तीच्या व्यक्तीमत्वाबद्द्ल जाणून घेउ शकता कींवा कमीतकमी अंदाज बांधू शकता. शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा प्रयत्न केलात तरी दोघांना प्रचंड अ‍ॅडजस्ट करावेच लागते हे ध्यानात असुद्या. स्वभाव रोजच्या सवयी, वैयक्तीक स्वच्छता, दैनंदीन खर्च, एकमेकांना वेळ देणे, दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर राखणे, इगो सांभाळाणे हे बाकीचे कळीचे मुद्दे असतातच. शेवटी मुलगी तीचे घर सोडून संपूर्ण अपरीचीत लोकांबरोबर रहायला येणार असते हे ध्यानात घेउन आपण अ‍ॅडजस्ट झालो तर बर्‍याच गोष्टी सुरळीत होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

प्रतिसाद पटला, तरी टका यांचा

स्रुजा
Fri, 07/15/2016 - 01:24 नवीन
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला.
अजया आणि इतरांच्या सल्ल्यावर तो तपशील विचारत होता म्हणुन त्या अनुषंगाने माझा प्रतिसाद लिहीला की या तपशीलात वेळेआधी आणि नवरा बायको सोडुन इतरांना सल्ले देणं शक्य नसतं, त्यांनी शक्य केलं तरी त्या सल्ल्याच्या मर्यादा ओळ्खुन असाव्यात नवरा बायको ने. हे एक, दुसरं असं की बघण्याच्या कार्यक्रमात समोर आलेलं फिनिश्ड प्रॉडक्ट नसतं. वेळोवेळी माणसं प्रगल्भ होत राहतात, एकमेकांच्या साथीने बदलतात , एकमेकांच्या आवडी निवडी जोपासतात, अंगीकारतात त्यामुळे त्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे महत्त्वाचं आहे. माझ्या मते व्यक्ती खुल्या मनाने बदल स्विकारु शकते का, नैतिक बैठक पक्की आहे का, वैचारीक बैठक पक्की आहे का आणि आहेत ते गुण आपल्याला पुरक आहेत का हे नीट बघुन घ्यावं. बाकी शिक्षण, जात-पात, रंग- रुप, वय, कौटुंबिक जडण घडण हे आधी बघुन च पुढे पाऊल टाकलेले असते त्यामुळे पुढच्या गोष्टी महत्त्वाच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा

स्रुजा
Fri, 07/15/2016 - 01:26 नवीन
शेवटी कीतीही अनुरुप शोधण्याचा प्रयत्न केलात तरी दोघांना प्रचंड अ‍ॅडजस्ट करावेच लागते हे ध्यानात असुद्या. स्वभाव रोजच्या सवयी, वैयक्तीक स्वच्छता, दैनंदीन खर्च, एकमेकांना वेळ देणे, दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर राखणे, इगो सांभाळाणे हे बाकीचे कळीचे मुद्दे असतातच. शेवटी मुलगी तीचे घर सोडून संपूर्ण अपरीचीत लोकांबरोबर रहायला येणार असते हे ध्यानात घेउन आपण अ‍ॅडजस्ट झालो तर बर्‍याच गोष्टी सुरळीत होतात.
हे अगदी मान्य, फक्त याला मी अ‍ॅडजस्ट होणं मानत नाही, हेच माझ्या मते एकमेकांबरोबर प्रगल्भ होणं ( ग्रो वुइथ ईच आदर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

जाऊ दे टक्या तु आपली

प्रमोद देर्देकर
Fri, 07/15/2016 - 09:15 नवीन
जाऊ दे टक्या तु आपली भीष्मप्रतिज्ञा घे बघु... कसा. उगा डोक्याला शॉट नको आयुष्यभर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

प्रतिसाद पटला, तरी टका यांचा

टवाळ कार्टा
Fri, 07/15/2016 - 11:49 नवीन
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा प्रश्न अनुत्तरीतच राहीला. की मुलीला पहाण्याच्या कार्यक्रमात काय प्रश्न विचारावेत?
जे सरळपणे विचारले त्याचे उत्तर सरळ आले तर तो फाउल धरत असतील माजघरात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

तुलाच कुणाला, काय, कसा प्रश्न

अभ्या..
Fri, 07/15/2016 - 15:23 नवीन
तुलाच कुणाला, काय, कसा प्रश्न विचारायचा कळत नाही अन दुसर्‍याला कशाला दोष देतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे म्हणजे आता भरवताय ना मग

सूड
Fri, 07/15/2016 - 15:32 नवीन
हे म्हणजे आता भरवताय ना मग चघळून पण द्या मी फक्त घशाखाली ढकलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगदी अगदी!

अजया
Fri, 07/15/2016 - 15:56 नवीन
अगदी अगदी! याला छापिल प्रश्नांची यादी हवीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नाही देता येत?

टवाळ कार्टा
Fri, 07/15/2016 - 16:27 नवीन
नाही देता येत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

समजा इथे कोणी प्रश्नावली दिली

मोदक
Fri, 07/15/2016 - 18:31 नवीन
समजा इथे कोणी प्रश्नावली दिली तरी ती वाचण्यासाठी, समजण्यासाठी आणि त्या प्रमाणे प्रश्न विचारण्यासाठीही तुला मदत लागेलच. त्याचे वेगळे धागे काढणार की इथेच गाडी गाडी खेळणार आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

पैसा
Fri, 07/15/2016 - 18:58 नवीन
=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ठ्ठो =))))) परफेक्ट!

अजया
Fri, 07/15/2016 - 19:25 नवीन
ठ्ठो =))))) परफेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

घ्या! एवढं सगळं रामायण झालं

स्रुजा
Fri, 07/15/2016 - 19:03 नवीन
घ्या! एवढं सगळं रामायण झालं आणि म्हणे सीता कुणाचा बाप? ( सीता बाई होती हे पण नाही कळलं रे कर्मा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी कधी दाखवायचा कार्यक्रम

पिलीयन रायडर
Fri, 07/15/2016 - 19:13 नवीन
मी कधी दाखवायचा कार्यक्रम पाहिलेला नाही. पण इतरांचे अनुभव ऐकुन झालेले मत.. मुली बघणे म्हणजे हातात ५० प्रश्नांची प्रिंटाउट घेऊन मुलाखत घेतल्या सारखे प्रश्न विचारायचे नसतात हे तरी तुला माहिती असेलच. गप्पा मारायच्या असतात.. बोलण्या बोलण्यातुन साधारण माहिती आणि मतं जाणुन घ्यायची असतात. तसंही लग्नाआधी ४-५ वेळा भेटुन गप्पा मारल्या तरी जन्मभराची माहिती मिळत नसते. क्लिक व्हायला पाहिजे बास. माणुस.. त्याची मतं.. स्वभाव.. सवयी तशाही काळानुरुप बदलत असतात. मी तुझ्याजागी असते तर आवडी निवडी विचारल्या असत्या. त्यातुन पुढे मग आयुष्यात काय करायला आवडेल हे विचारलं असतं. माझ्यासाठी धार्मिक मतं जाणुन घेणं महत्वाचं आहे, कारण मी नास्तिक आहे. माझ्यासाठी त्या व्यक्तिची स्त्रियांविषयक मतं जाणुन घेणंसुद्धा खुप महत्वाचं आहे. जसं की मला घरकाम, मुल सांभाळणे इ मुद्दे फक्त स्त्रीचीच जवाबदारी आहेत असं वाटत नाही. तेव्हा ह्यात माझ्या खांद्याला खांदा लावुन मदत करणारा नवरा मला हवा होता. मी लग्ना नंतर नाव बदलले नाही, मला तो चर्चेचाही मुद्दा वाटत नाही. पण तरीही हे आधीच मान्य असणारा नवरा हवा होता. माझ्या घरच्यांना दिली जाणारी वागणुक हा माझ्यासाठी कळीचा मुद्दा होता. "मुलीकडचे" म्हणुन कायम पडती बाजु वगैरे काही कुणी घेणार नाही हे आधीच स्पष्ट करणे आवश्यक असते. माझ्या सासरी बरीच विरुद्ध मते आहेत. पण तरी नवरा चार बाबतीत तडजोडीला तयार होता तर चार गोष्टीत त्याला माझ्याकडुन तडजोड अपेक्षित होती. जसं की गणपती-गौरी मध्ये पुढाकार. किंवा काही आर्थिक मुद्दे. त्यानी मला त्यांची कल्पना आधीच दिली. मलाही ते मान्य होतं. ह्या व्यतिरिक्त पगाराची विभागणी - आर्थिक व्यवहार हा एक कळीचा मुद्दा असतो. तो बोलला गेलाच पाहिजे हे माझे मत. आयुष्यात दोघांचे गोल्स काय, कोण किती अ‍ॅम्बिशियस आहे ह्याची एकमेकांना कल्पना दिली पाहिजे. पुढे जाऊन मुलीचे आई वडील मुलीकडेच येऊन रहाणार असतील तर मुलाचे त्यावर मत काय हे आधीच मुलीला माहिती हवे. ज्याला हे मान्य नाही अशा माणसाला मी तरी बाकी ५६ गोष्टी असुनही नकार दिला असता. किंवा जिला नवर्‍याचे आई वडील सांभाळणं मान्य नाही तिला माझ्या नवर्‍याने नकार दिला असता. काहींना नोकरी निमित्त फिरावे लागते. समजा उद्या तू लंडनलाच स्थायिक झालास तर स्वतःची नोकरी सोडुन यायची तयारी असलेली मुलगी तुला बघावी लागेल. किंवा मुलगी मोठ्या पदावर असेल तर तुझ्या नोकरीत तडजोडीची तुझी तयारी आहे का हे ही बघावे लागेल. म्हणजे बघ आवडी निवडी, धार्मिक मतं, पालकांची जबाबदारी आणि अपेक्षा, घरकाम- स्वयंपाक, नोकरी, आर्थिक मुद्दे, मुल आणि त्याचे संगोपन असे काही महत्वाचे मुद्दे काढता येतील. ह्या सर्वांवर तिचे मत जाणुन घेणे आणि आपले तिला सांगणे हे दोन्ही महत्वाचे आहे. अर्थात हे सगळं ठरवायला मला ५ वर्ष मिळाली. तुला त्यामानाने खुप कमी वेळ मिळेल. पण जे अत्यंत महत्वाचे आणि तडजोड न होऊ शकणारे मुद्दे आहेत ते आधीच स्पष्ट केले पाहिजेत. आता तुझ्या आयुष्यात ते मुद्दे काय हे तुलाच माहिती, ते इथे कोण कसं सांगणार? शिवाय इतकं सगळं होऊनही पुन्हा आई-वडील वि. बायको अशी जुंपतेच. जनरेशन गॅप असतोच. तेव्हाही कमीत कमी त्रास होईल ह्या हिशोबाने तुझ्या अपेक्षा आई-वडील आणि बायको सगळ्यांना माहिती हव्यात. तशाच बायकोने सांगितलेल्या अपेक्षा सुद्धा तुझ्या घरच्यांना माहिती हव्यात. नवरा बायकोचेही पटेल्च असे नसते. कारण दाखवायचे कार्यक्रम म्हणजे काही लीगल अ‍ॅग्रीमेंट नाही की "असं कसं? तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हतात दाखवायच्या कर्यक्रमात.. आता मी नाही मान्य करणार" असं आपण म्हणुन शकतो. आयुष्यात जे काही समोर येईल ते मिळुन निभवायची तयारी आहे का हेच सर्वात महत्वाचे. म्हणून माझ्या मते किमान ४-५ भेटी झाल्याशिवाय लग्नाला होकार देउ नये. एका भेटीत तर काहीच फारसे कळणे शक्य नाही. पहिल्याच भेटीत आपण इतके मुद्दे नाही विचारु शकत... विचारु सुद्धा नयेत. आई वडीलांना इन्व्हॉल्व्ह न करुन घेता मुला मुलीने आधी शक्य तेवढे भेटुन - बोलुन घ्यावे आणि त्यात दोघांना काही पॉझिटिव्ह वाटलं तरच मग पालकांना भेटवावं. अर्थात हे माझ्या दिराच्या वेळेस मुली बघुन बघुन माझं मत झालंय. मला आश्चर्य इतकंच वाटतं की मुली बघायला गेले ४ वर्ष झाले सुरवात करुनही तू असे बेसिक प्रश्न का विचारत आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुझ्याकडे भरपूर रिकामा वेळ

मोदक
Fri, 07/15/2016 - 19:17 नवीन
तुझ्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे ते समजले होते. आता पटले सुद्धा. :) (पळा..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

स्वतःच घोडं गंगेत न्हालं

पिलीयन रायडर
Fri, 07/15/2016 - 19:32 नवीन
स्वतःच घोडं गंगेत न्हालं म्हणुन दुसर्‍यांना असं बोलु नये हो मोदक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बयो त्याला प्रश्न दे प्रश्न !

स्रुजा
Fri, 07/15/2016 - 19:26 नवीन
बयो त्याला प्रश्न दे प्रश्न ! आता तो विचारेन सगळं ठिक आहे पण तुमच्या माजघरात आर्थिक धार्मिक अपेक्षांचं काही स्क्रिप्ट असेल की नाही? ते द्या ! एक भेट झाल्यावर पुढची भेट कशी विचारायची तो डायलॉग दे. इथे आपण सगळे काय करायचं ते सल्ले देतोय, आपल्याला कसं करायचं हे माहिती नसल्याने टका चा धागा ४ वर्षं झाली तरी गाजतो आहे. :प मी पण पळते आता. लंडनहुन कॅनडा फार लांब नाही यायचा एखादी दंबुक घेऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी खरंच अपेक्षित प्रश्नसंच

पिलीयन रायडर
Fri, 07/15/2016 - 19:32 नवीन
मी खरंच अपेक्षित प्रश्नसंच लिहावा म्हणते. १. आपले नाव काय? २. आपले वय काय? ३. आपले शिक्षण किती? ४. आपण मिपा सदस्य आहात का? असल्यास टका हा आयडी माहिती आहे का? (हो म्हणल्यास उठुन निघुन जावे!) वगैरे वगैरे............ माजघरात सर्व वयोगटातल्या बाळांसाठी स्पुन फिडींग साठी रेडिमेड मटेरियल मिळेल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आपले नाव नाही गं. ती जुनी

स्रुजा
Fri, 07/15/2016 - 19:39 नवीन
आपले नाव नाही गं. ती जुनी पद्धत आहे. नीट वाच ना त्याचा लेख ..त्याला नवीन पद्धतीने लग्न करायचंय. ४था प्रश्न __________/\________ :) :) :) :) :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

perfecto :)

टवाळ कार्टा
Fri, 07/15/2016 - 19:34 नवीन
perfecto :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अर्ध सहस्त्र प्रतिसादांबद्दल

अजया
Fri, 07/15/2016 - 19:36 नवीन
अर्ध सहस्त्र प्रतिसादांबद्दल टकाला पिरालिखित १लाख अनपेक्षित चा प्रश्नसंच देऊन सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एक यादी तयार आहे.

सूड
Fri, 07/15/2016 - 19:39 नवीन
चि. टक्कूमक्कूशोनुसाठी कन्यकेस विचारावयाच्या प्रश्नांची यादी!! १) आपलं नाव काय? २) आपलं शिक्षण किती? ३) आपणास स्वयंपाक करता येतो का? असल्यास; अ) शाकाहारी की मांसाहारी ब) पारंपारिक की फास्टफूड क) तुमच्याकडे भातात मीठ घालतात का? भात गुरगुट्या लागतो की फडफडीत? आमच्या घरी आंबेमोहरच चालतो, आपणास कोणत्या भाताची सवय आहे? ४) आपण मद्यपान आणि धुम्रपान करता का? असल्यास; अ) आवडता ब्रॅन्ड कोणता? ब) महिन्यातून्/दिवसातून कितीवेळा क) बीअरला आपण दारु मानता का? असल्यास संदर्भासहित स्पष्टिकरण द्या. ५) दाढी वाढवलेली आवडते की कसं? ६) पुरुषांच्या छातीवर केस असावे का? अ) उत्तर हो असल्यास किती असावे? ब) उत्तर नाही असल्यास, छातीवर केस असलेल्या बाप्यांनी काय करावं? ७) आपण दिवसातून कितीवेळा पाणी पिता? ३ ग्लासांपेक्षा कमी पित असाल तर प्रमाण वाढवा किंवा चांगला डिओ वापरा. मघापासून तुमच्या घामाचा दर्प येतो आहे. ८) घर स्वतःचे असल्यास इएमाय कसा वाटून घ्यायचा? ९) महिन्याच्या किराणा मालाचा खर्च कसा वाटून घ्यायचा? १०) पाचतीनदोन, मेंढीकोट, भिकारसावकार यापैकी आवडता खेळ कोणता? इच्छुकांनी आणखी भर घालावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अरे!

पैसा
Fri, 07/15/2016 - 19:47 नवीन
तुम्हाला कोणाला कळले नाहीये. त्याला आता हजारी धाग्याची स्वप्नं पडतायत. म्हणून गाडी गाडी खेळतोय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

टवाळ कार्टा
Fri, 07/15/2016 - 20:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे

गंम्बा
Fri, 07/08/2016 - 17:14 नवीन
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे गुण खरंच असले मुलीत तर चालणार आहेत का ते विचारून घ्या. आमच्याकडे नवर्‍याला हे गुण आवडले होते पण आता लग्नानंतर त्याच्या आयशीबापाशीला चालत नसल्याने मलाच बदलायला सांगतो दरवेळी. 'जब वी मेट' मधली मीत सगळ्यांना प्रेयसी म्हणून हवी असते. पण लग्न केल्यावर तीची अलका कुबल व्हावी अशीच अपेक्षा असते सगळ्यांची (निदान स्वानुभवावरून माझा तरी असाच समज झाला आहे).
+११११११ पियु परी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियू परी

प- रतिसाद

चित्रगुप्त
Wed, 01/02/2013 - 00:54 नवीन
तुम्ही विणत असलेल्या ऑनलाईन धाग्याला लवकरात लवकर योग्य तो रतिसाद मिळो, ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

रतिसाद

बॅटमॅन
Wed, 01/02/2013 - 01:25 नवीन
रतिसाद =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

भारी

टवाळ कार्टा
Sat, 01/05/2013 - 23:23 नवीन
भारी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

नातेवाईकान्काच्या लग्नाला

खटपट्या
Wed, 01/02/2013 - 01:54 नवीन
नातेवाईकान्काच्या लग्नाला जाणे चालू करा. तिकडे जमायचा चान्स जास्त असतो. आणि समोरासमोर बोलताही येत.
  • Log in or register to post comments

आ बैल मुझे मार

काळा पहाड
Wed, 01/02/2013 - 04:01 नवीन
तुमचे वृषभ लग्न असावे असे दिसते. बादवे, तुम्ही कुठल्याही मुलीशी लग्न करा. ती तुमच्या डोक्यावर मिर्‍या वाटणार. फार honest, independent thinker वगैरे बघायला जाऊ नका. आ बैल मुझे मार अशी स्थिती व्हायची.
  • Log in or register to post comments

माझे विचार

श्रीरंग_जोशी
Wed, 01/02/2013 - 06:24 नवीन
या विषयाचा मला शून्य अनुभव असल्याने त्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. पण उमेदीच्या काळात मनासारखे न घडल्याने उद्विग्नता येण्याचे अनुभव मला चांगलेच आहे. अन माझ्या मते उमेदीच्या काळात असे अनुभव मिळणे हि फार उपयुक्त गोष्ट आहे. कारण त्यावेळी त्याचा धैर्याने सामना केल्यास आत्मविश्वास, संयम यासारखे महत्त्वाचे गुण विकसित होतात जे भावी आयुष्यात प्रचंड उपयोगी ठरतात. माझ्या बाबतीत शिक्षण संपता संपता अनेक धक्के बसत होते. विद्यापीठाकडून पुन्हा पुन्हा संदेशच मिळत होता पेपर कसाही सोडवा, उत्तीर्ण होणे गृहीत धरू नका. पदवी मिळवताना संयमाचे अनेक धडे मिळाले. त्यामुळे तिची किंमत नंतर मिळवलेल्या अनेक गोष्टींपेक्षा अधिक वाटते. असाच दुसरा अनुभव म्हणजे मी कमावता झाल्यावर आर्थिक आघाडीवर फारच अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांत वाढल्याने त्या गोष्टीची सवय असली तरी यावेळी केंद्रस्थानी मी होतो. त्यातून मी कमावलेल्या पैशाचा योग्य विनियोग करायला शिकलो. संसार करणे हि याहूनही अधिक उद्विग्न करणारी गोष्ट असू शकते. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी परिस्थितीने आगाऊ प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे आहे असे समजावे व पुढे चालावे. फार उशीर झालेला नसल्यास काही कालावधीकरिता हा उपक्रम पूर्णपणे थांबवावा व राहून गेलेल्या गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. अनेक लोक विवाहानंतर राहून गेलेल्या गोष्टी करण्याची संधी मिळत नसल्याबद्दल तक्रार करत राहतात त्यामुळे नंतर उपरती होण्यापेक्षा संधी समोर असतानाच तिचा लाभ घ्यावा. जोडीदार संशोधनासाठी व भावी आयुष्यासाठी धागाकर्त्यास मनापासून शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

आयला, मेलो!!

पिवळा डांबिस
Wed, 01/02/2013 - 08:59 नवीन
विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, श्रीरंगराव,
या विषयाचा मला शून्य अनुभव असल्याने त्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही.
असं म्हणून झाल्यवर पुढे आणखी जवळजवळ दोनशे शब्द टंकलेत की हो!!!! हे म्हणजे मौनावर दोन तास प्रवचन देण्यासारखंच झालं!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

?

श्रीरंग_जोशी
Wed, 01/02/2013 - 09:16 नवीन
त्या तथाकथित २००(?) शब्दांत त्या विषयावर कुठे काही लिहिले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तेही खरंच!

पिवळा डांबिस
Wed, 01/02/2013 - 10:25 नवीन
हा हा हा! रायटिंग अ मिल्यन अबाउट नथिंग!!! आता तुम्ही लवकरच मिपाचे मॉडरेटर होणार बघा.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

नतमस्तक

नंदन
Wed, 01/02/2013 - 10:53 नवीन
तुमच्या भविष्यवेधी नजरेपुढे नतमस्तक आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हा हा!

Nile
Wed, 01/02/2013 - 20:32 नवीन
तुमच्या भविष्यवेधी नजरेपुढे नतमस्तक आहे
+१. पण, ते जोशी बिचारे "आम्हाला अनुभव नाही" असं म्हणून आम्ही अनुभवेच्छुक आहोत असे सांगत असताना आणि भावी मिसेस जोशी वाचत असण्याची शक्यता असताना, काकांनी त्यांचा असा पोपट करायला नको होता. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

-१

श्रीरंग_जोशी
Wed, 01/02/2013 - 20:40 नवीन
# निळूभाऊ - सदर धागाकर्ता ज्या अनुभवातून जात आहे त्यातून मी कधीच गेलो नाही. याचा अर्थ असा नव्हे की मी अविवाहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आयला

Nile
Wed, 01/02/2013 - 21:59 नवीन
लग्न झालंय ना! मग असं बायकोसमोर घाबरून बोलल्यासारखे "यातला मला शून्य अनुभव आहे" काय म्हणताय? ;-) (ह. घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शून्य अनुभव++

श्रीरंग_जोशी
Wed, 01/02/2013 - 22:27 नवीन
मित्रा सध्या धागाकर्ता जे करत आहे (विविध मार्गांनी जोडीदाराचा शोध घेणे) ते मी कधीच केले नाही मग मला शुन्य अनुभव असणारच ना. बादवे - कांदेपोहे कार्यक्रमात विवाहेच्छुक तरूण म्हणून सहभागी व्हायची हौस मी गेल्या वर्षी नाटकात तशी भूमिका करून भागवली होती ;-). बादवे - तु वि. कि अवि.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

निळुभाउ जाणीवपुर्वक ह्या

वपाडाव
गुरुवार, 01/03/2013 - 15:31 नवीन
निळुभाउ जाणीवपुर्वक ह्या प्रश्नापासुन दुर राहिल्याने त्यांनी सर्व मिसेस. निळुभाउ होण्याइच्छुक तरुणींवर अन्याव केल्या आहे हे न्रीक्षण तीव्रपणे नोंदवुन मी रजा घेतो... -वपाडाव फाटेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ओह्...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/03/2013 - 18:37 नवीन
निळुभाउ यांसी अनेक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हो का!

Nile
Fri, 01/04/2013 - 01:19 नवीन
आम्ही या 'सत्कार्यास' योग्य, तरूण आणि उमदे उमेदवार कुमार वडापाव यांचे नाव पुढे करीत आहोत. तमाम उत्सुक आणि इच्छुक तरूणींने त्यांचा 'लाभ' घ्यावा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा