Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/14/2016 - 20:26
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.
  • Log in or register to post comments
  • 77242 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/14/2016 - 20:37

Permalink

धाग्याची सुरुवात खालील

धाग्याची सुरुवात खालील बातमीने करीत आहे. उत्तर प्रदेशात शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार उत्तर प्रदेश मध्ये जानेवारी-फेब्रुवारी २०१७ या महिन्यात विधानसभेची निवडणुक आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजिस्ट म्हणून नेमणुक केली आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यास काँगेसला मोठा फायदा होईल असे त्यांनी सुचविले आहे. परंतु काँग्रेस अजूनही राहुल किंवा प्रियांका यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यास उत्सुक नाही. काँग्रेसने कोणालाही पुढे केले तरी काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २०२ जागा मिळणे अशक्य आहे. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष होणे सुद्धा अशक्य आहे. मागील ३ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे ४०३ पैकी २५, २२ व २८ इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या. अलिकडच्या काळात २००९ मधील लोकसभा निवडणुकीत ८० पैकी २० जागा ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉम्ग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या. प्रियांकाचे नाव पुढे करून जर पुन्हा एकदा दारूण पराभव झाला (असेच होण्याची शक्यता सर्वाधिक आहे) तर पदार्पणात शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाप्रमाणे प्रियांकावर पदार्पणातच अपयशाचा शिक्का बसेल. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा राहुल गांधींनी आपल्या खांद्यावर घेऊन सुद्धा काँग्रेसला फक्त २८ जागा मिळाल्या होत्या. अमेठी व रायबरेली लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात प्रियांकाने जोरदार प्रचार करूनसुद्धा कॉंग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत प्रियांकाचे नाव पुढे केले तरी काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणूनच बळीचा बकरा या न्यायाने काँग्रेसने शीला दिक्षित यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायचे ठरविले आहे. शीला दिक्षित ब्राह्मण असल्याने उ.प्र. मधील १०% अधिक असलेली ब्राह्मण मते आपल्याकडे वळतील असा काँग्रेसचा भोळा आशावाद आहे. अर्थात शीला दिक्षित केवळ लग्नानंतर ब्राह्मण झाल्या आहेत. लग्नापूर्वी त्या खत्री समाजातल्या होत्या हे आता माध्यमातून येईलच. त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांमुळे डागळलेली आहे. त्यामुळे त्यांना पुढे करूनही फार फायदा होणार नाही. जर काँग्रेसची परिस्थिती सुधारली तर श्रेय प्रियांकाच्या प्रचाराला व जर काँग्रेसचा पुन्हा एकदा दारूण पराभव झाला तर दोष शीला दिक्षितांच्या माथी असेच काँग्रेसचे धोरण असणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on गुरुवार, 07/14/2016 - 20:44

Permalink

विनाशकाले विपरीतबुद्धी..

विनाशकाले विपरीतबुद्धी.. दुसरं काय?.... स्वतःच्या हाताने स्वतःच्या सरणाची व्यवस्था लावणे हा काँग्रेसचा पण दिसत आहे अशात...
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 07/14/2016 - 21:05

Permalink

उत्तर प्रदेशात शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देऊन

काँग्रेसने ब्राम्हण उमेदवार देणार ही अटकळ बरोबर ठरवलेली आहे. शीला दीक्षित यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने भाजपच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे असं मला वाटतंय. हा काँग्रेसचा नकारात्मक पवित्रा आहे पण एका म्हणीनुसार ' नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ' असं काँग्रेसचं धोरण आहे, विशेषतः दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून. गुरुजी - शीला दीक्षित या माहेरहून खत्री समाजाच्या आहेत याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सोनिया गांधींच्या जन्माने विदेशी असण्याचा मुद्दा कोणालाही फायदेशीर ठरला नव्हता. उलट उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ब्राम्हण बहू हा काँग्रेसचा मुद्दा असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 07/14/2016 - 21:16

In reply to उत्तर प्रदेशात शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देऊन by बोका-ए-आझम

Permalink

सपचे अखिलेश यादव, बसपच्या

सपचे अखिलेश यादव, बसपच्या मायावती आणि आता काँग्रेसच्या शीला दिक्षित. फक्त भाजपने अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप यावेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल असे वाटत नाही कारण भाजपकडे मायावती व अखिलेश यांच्या तुलनेत तगडा उमेदवार नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जर तगडा असेल तरच आधी त्याचे नाव जाहीर करून फायदा असतो. अन्यथा तोटा होण्याचीच शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on गुरुवार, 07/14/2016 - 21:09

Permalink

पंकजा आणि मुख्यमंत्री

पंकजा आणि मुख्यमंत्री यांच्यात असंमजस्य
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on गुरुवार, 07/14/2016 - 21:40

Permalink

मोदी सरकार पुन्हा तोंडावर आपटले

"अरूणाचल मध्ये काँग्रेस सरकार बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य" --------सुप्रिम कोर्ट _____________________________________ अखलाक च्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी!!! प्राण्यांमध्ये भेदभाव नकोच,गायीचे मांस बाळगले म्हणून लोकांनी मारले. मुळात कोणत्याच प्राण्याचे मांस खाऊ नये. आणि आता त्याच्या कुटूंबियांना छळत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on गुरुवार, 07/14/2016 - 21:42

In reply to मोदी सरकार पुन्हा तोंडावर आपटले by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

http://m.maharashtratimes.com

http://m.maharashtratimes.com/nation/court-orders-fir-for-cow-slaughter-against-family-of-akhlaq-who-was-lynched-in-dadri/articleshow/53212463.cms
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Fri, 07/15/2016 - 08:18

In reply to मोदी सरकार पुन्हा तोंडावर आपटले by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

..

गाय मारल्याच्या कथित आरोपाबद्दल एफ आय आर होणार. माणसाचा खून करणार्‍यांचे काय होणार म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 07/15/2016 - 17:49

In reply to .. by चंपाबाई

Permalink

उत्तर प्रदेशात गौवध बंदी

उत्तर प्रदेशात गौवध बंदी कायदा आहे. त्यानुसार कार्रवाई होणारच. बाकी तिथे कुणी मारायला गेले नव्हते, कुणाही जवळ तलवारी किंवा कट्टे इत्यादी नव्हते. तो जर मेला नसता तर गौ. हत्याची FIR तेंव्हाच दायर झाली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Fri, 07/15/2016 - 18:08

In reply to उत्तर प्रदेशात गौवध बंदी by विवेकपटाईत

Permalink

..

तलवार कट्टा न घेता जाणे हे निर्दोषत्वाचे लक्षण का ? वा वा ! फोरेन्सिकच्या बुकात ३०२ व ३०४ आय पी सी पुन्हा पहावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/14/2016 - 21:56

Permalink

हे एक काम मस्त झाले.....

हे एक काम मस्त झाले..... (अर्थात, वरील प्रतिसाद धागाकर्त्याला आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on गुरुवार, 07/14/2016 - 22:51

Permalink

' तीन लाखांपेक्षा रोख व्यवहारांवर बंदी आणा '

काळ्या पैसा शोधण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी ) तीन लाख रुपयांवरील रोख व्यवहारांवर बंदी आणण्याची शिफारस केली आहे . शिवाय, एखाद्या व्यक्तीकडे 15 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवण्यास मनाई करण्याचीही शिफारस केली आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 07/15/2016 - 07:41

Permalink

फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील

फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील डे परेड पाहायला आलेल्या गर्दीवर ट्रक चढवून एक दहशतवादी हल्ला झाला आहे, ट्रक मध्ये ग्रेनेड आणि इतर स्वयंचलित हत्यारे सापडली आहेत, राष्ट्राध्यक्ष फ्रांझवा ओलांद ह्यांनी इमर्जन्सी अजून पुढे पर्यंत सुरु ठेवायचे सूतोवाच केले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 07/15/2016 - 07:43

In reply to फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

सदर हल्ल्यात ८० निष्पाप

सदर हल्ल्यात ८० निष्पाप लोकांनी प्राण गमावले असून इतर १०० लोकं जखमी झाल्याचे वृत्त कळते
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 07/16/2016 - 20:42

In reply to फ्रांसच्या नीस गावी बॅस्टील by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बळी पडलेल्या लोकांमधे लहान

बळी पडलेल्या लोकांमधे लहान मुलांचा समावेश बराच होता. बिचारे मुलं fire works बघायला आली असतील:( या अतिरेक्यांचा पापाचा घडा आहे का अक्षय पात्र काही कळेना ....भरतच नाहीये:(
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 07/15/2016 - 10:35

Permalink

अस्थानी विनोद

ह्या भीषण प्रसंग घडल्यावर लोकसत्तामधे अशी बातमी होती की फ्रान्समधे ट्रक अपघातात ७६ ठार! (आता ती काढून टाकली आहे) ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 07/15/2016 - 17:56

In reply to अस्थानी विनोद by हुप्प्या

Permalink

ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून.....

....हे भयंकर घडले असेल." छे हो. उलट ती लोकच ट्र्कच्या मार्गा-मध्ये आली असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Fri, 07/15/2016 - 20:51

In reply to अस्थानी विनोद by हुप्प्या

Permalink

आवडले

फुरोगामी नै सुधारणार!!
  • Log in or register to post comments

Submitted by बोलबोलेरो on Fri, 07/15/2016 - 11:55

Permalink

हहपुवा

"ट्रक अपघातात ७६ लोक कसे मरतील अशी शंका कशी आली नाही? घातपात असल्याची खात्रीच पटायला हवी होती. असो. पण कुणी केला असेल हा हल्ला? कर्मठ ब्राह्मण? हिंदू सनातनी? की महायान वा हीनयान वाले बौद्ध लोक? का श्वेतांबर वा दिगंबर जैन? शीख अतिरेकी? का कडवे नास्तिक? की हे कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांमधले लफडे आहे? काही कळत नाही. इतकी हिंसक मानसिकता कुठल्या गटाकडे आहे हे सुचतच नाही बुवा! कदाचित ट्रक ड्रायव्हर लोकांच्या युनियनमधल्या वैमनस्यातून हे भयंकर घडले असेल." उत्तम उपहास! हहपुवा. फ्रान्सच्या निसमधील हत्याकांडाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली! परंतु यातून युरोप काही शिकणार का? की परत एखादा "अयलान कुर्दी" झाल्यानंतर भावनिक अविचार करायला प्रवृत्त होणार? दुवा http://qz.com/554555/france-has-doubled-down-on-its-promise-to-syrian-refugees-after-the-paris-attacks/
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on Fri, 07/15/2016 - 20:55

In reply to हहपुवा by बोलबोलेरो

Permalink

शालजोडी

शालजोडीतली मारलीच पण ज्यांना मारली ते कधीच विचार करणार नाही असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by आकाश कंदील on Fri, 07/15/2016 - 12:19

Permalink

.

कसले शालजोडीतले मारता राव तुम्ही
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 07/15/2016 - 16:23

Permalink

गोल्डमॅन दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या- सकाळ पेपर मधून

Image removed. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरी-चिंचवड येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या घरात घुसून चार ते पाच जणांनी अपहरण करून नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरी येथील राहत्या घरातून फुगे यांना चार ते पाच जणांनी बळजबरीने बाहेर काढले, अशी माहिती त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी पोलिसांना दिली. दिघीच्या भारतमातानगरमध्ये रात्री बाराच्या सुमारास फुगे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. तसेच दगड घालून डोक्‍याचा चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले. घटना स्थळावर पोलिसांना कोयता मिळाला आहे. पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व फुगे यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची शोधपथके रवाना झाली असून पहाटेपर्यंत तरी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दिघी येथील भारतमाता नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्थिक वादातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोन्याचा शर्ट तयार केल्याने फुगे जगभर गाजले होते. फुगे हे खासगी सावकारीचा व्यवसाय करीत असत. भोसरी येथे वक्रतुंड चिटफंड फंडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून तसेच व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी हल्लेखोरांबरोबर फुगे यांचे पैशांवरून भांडण झाले होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Fri, 07/15/2016 - 20:55

In reply to गोल्डमॅन दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या- सकाळ पेपर मधून by शिद

Permalink

...

कलियुग सुरु होण्यापुर्बी कलिने जनमेजयाकडे आश्रयाची याचना केली होती. त्याने कलिला सोन्यात रहायला सांगितले होते. अंगभर सोने घालुन राजकारण करताना अपमृत्यू झाल्याचे हे दुसरे उदाहरण. ... इति श्री हिंदु पुराणम.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 07/15/2016 - 17:56

Permalink

संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,

संस्कृत भाषेला अच्छे दिन आले,

कालच रात्री आठ वाजता बाबा रामदेवांचे प्रवचन ऐकत होतो. पुढील १० वर्षांत १००० जवळ आचार्यकुलम् उघडण्याचा त्यांचा विचार आहे. (सध्या १ कार्यरत २०१३ पासून, ९ निर्माणाधीन). या शिवाय काही हजार संस्कृत ग्रंथांचे (जुन्या पांडूलिपींचे डीजीटीलाईजेशन करायचे आहे). (याच महिन्यात १३ जुनी पुस्तके प्रकाशित केली आहे) २०,०००हून जास्त संस्कृत शिक्षक/विद्वानांची गरज त्यांना भासणार आहे. १२वी नंतर संस्कृत भाषा शिकायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Fri, 07/15/2016 - 18:10

In reply to संस्कृत भाषेला अच्छे दिन आले, by विवेकपटाईत

Permalink

...

रामदेवबाबाची ऑर्डर संपलि की काय करायचे ? रामरक्षेचे क्लास का ?
  • Log in or register to post comments

Submitted by जयन्त बा शिम्पि on Fri, 07/15/2016 - 18:53

Permalink

ताज्या घडामोडी - १

तेरा जुनी पुस्तके प्रकाशित झाली आहेत , त्यांची लिंक कोणी देईल काय येथे ?
  • Log in or register to post comments

Submitted by दुर्गविहारी on Fri, 07/15/2016 - 19:34

Permalink

छान धागा.

छान धागा. रोज अपडेट मिळत राहतील.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 07/15/2016 - 23:16

Permalink

Fuel prices reduced

This is the second reduction in rates this month. Petrol price was cut by 89 paise a litre and diesel by 49 paise on July 1. Petrol price was on Friday cut by Rs. 2.25 a litre and diesel by 42 paise a litre, the second reduction in rates this month on global cues.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sat, 07/16/2016 - 07:42

Permalink

झकिर नाइक पुढील वर्षापर्यन्त भारतात येणार नाही.

चला तयार झालेली गरम खिचड़ी थंड करून पुढच्या वर्षी गरम करून खाऊ, पण ताजेपणाची मजा नाही येणार!
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Sat, 07/16/2016 - 08:28

In reply to झकिर नाइक पुढील वर्षापर्यन्त भारतात येणार नाही. by भंकस बाबा

Permalink

खरं आहे तुमचं म्हणणं,

खरं आहे तुमचं म्हणणं, पण तुम्हाला कधी स्वधर्माची चिकित्सा करताना पाहिलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 07/17/2016 - 10:26

In reply to खरं आहे तुमचं म्हणणं, by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

खालिमुंडी ,

टक्केवारी द्या ना स्वधर्माची चिकिस्या करायला, आपण नक्की करु, कशाला मी आमच्या घरात पितृपक्ष, नागपंचमी अशा प्रथा हट्टाने बंद केल्या आहेत. देवळात जाणे बंद केले आहे, आता तुम्ही एक मशिद दाखवा की ज्यात भोंगे वाजत नाहीत, मंदिरे मी दाखवायला तयार आहे. हां सर्वधर्मसम्भाव सोडा, हिन्दुमधील पुष्कळानी कट्टरवाद सोडला आहे. मुस्लिमानी सोडला असला तरि जाहिर करण्याचे धाडस फार् कमी लोकांनी केले आहे. रच्याकने झाक्याचे प्रवचन फ़ॉर द चेंज कॉमेडी शो म्हणुन बघायला हरकत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Sun, 07/17/2016 - 18:19

In reply to खालिमुंडी , by भंकस बाबा

Permalink

खरं आहे,

खरं आहे, मुस्लिम धर्मात कट्टरतावाद अधिक आहे, ते कधीही धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करीत नाहीत,त्यामानाने हिंदू आणि ख्रिश्चनांच्यात नास्तिकता जास्त आहे.देवाविरूद्ध बोलणे हाच जगन्य अपराध आहे असे मानतात ते.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sun, 07/17/2016 - 19:32

In reply to खालिमुंडी , by भंकस बाबा

Permalink

...

एकदा दत्तगुरु मॉर्निंग वॉकला चालले होते... समोरुन एक मिरवणुक वाद्ये वाजवत जात होती.. पण रस्त्याच्या कडेला बसलेला एक चांभार एकाग्रतेने त्याचे काम करत होता. त्याला तो कोलाहल ऐकु येत नव्हता. दत्तगुरुनी त्याला आपल्या गुरुस्थानी मानले. तात्पर्य : हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा असुनही मशिदीचे भोंगे ऐकू येत असतील तर आपली एकाग्रता कमी पडत आहे... कृप्या एकाग्रता व श्रद्धा वाढवावी. होमवर्क : दत्ताने केलेले इतर २३ गुरु कोणते ?
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sun, 07/17/2016 - 19:46

In reply to ... by चंपाबाई

Permalink

दुरुस्ती

त्या कथेत तो लोहार आहे ... एकाग्रतेने बाणाला धार लावत असतो
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 07/17/2016 - 20:27

In reply to ... by चंपाबाई

Permalink

मग जरा आमच्या मुलांना,

एकाग्रतेने मशिदिचा भोंगा वाजत असताना अभ्यास कसा करावा हे शिकवा, आमच्या घरातील आबालवृद्धाना सकाळी पाच वाजता भोंगा वाजल्यावर साखरझोप न मोड़ता स्थितप्रज्ञ रहायला शिकवा,
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Sun, 07/17/2016 - 20:58

In reply to मग जरा आमच्या मुलांना, by भंकस बाबा

Permalink

भोंगा किती वेळ वाजतो ओ.

भोंगा किती वेळ वाजतो ओ. सकाळी दोन मिनटं,आणि पाच वाजता दोन मिनटं! झालं कि, पारायणे आठवडाभर चालतात भोंगे लावून ते चालतं का?? आणि किती पारायणे/कार्यक्रम होतात,,,तुकाराम बीज,रामनवमी,गणेश चतुर्थी,रामदास नवमी,एकादशी,संकष्टी,षष्ठी,हनुमान जयंती,काकड आरती,फाकड आरती,गोंधळ,शिमगा,धुळवड,रंगपंचमी,म्हसोबा,खंडोबा, ज्योतिबा,मरगूबाई,यल्लमा,इइइइइ आणि शिमग्याला तर किती ते ध्वनीप्रदूषण?? कोणी मेलं नसलं तरीही ठ्ठो ठ्ठो ?? कशाला फुक्कटचा पुरोगामित्वाचा आव आणताय?
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Sun, 07/17/2016 - 23:16

In reply to भोंगा किती वेळ वाजतो ओ. by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

जा ना पाकिस्तान मधी

जा ना पाकिस्तान मधी
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Mon, 07/18/2016 - 06:53

In reply to जा ना पाकिस्तान मधी by लालगरूड

Permalink

तुम्हीच जा ना नेपाळमध्ये

तुम्हीच जा ना नेपाळमध्ये
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Mon, 07/18/2016 - 01:51

In reply to भोंगा किती वेळ वाजतो ओ. by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

दोन मिनिटे,

अहो आजकाल मदरशावर देखिल भोंगे लावुन लाखो सलाम घातले जातात, ते पण सकाळच्या पारी, तुम्ही फारच त्रासलेले दिसताय, कानाजवळ एक भोंगा ठेऊन वाजवा , बहिरेपणा आला की सगळे त्रास दूर होतील, बायको बड़बडु देत की सासरा बोम्ब ठोकु दे
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Mon, 07/18/2016 - 06:55

In reply to दोन मिनिटे, by भंकस बाबा

Permalink

अच्च जालं तलं...

अच्च जालं तलं... आपले ठेवावे झाकून दुसर्याचे दाखवावे काढून
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Mon, 07/18/2016 - 22:32

In reply to अच्च जालं तलं... by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

मिर्ची योग्य जागी लागली आहे तर!

कीत्ति डु आईडी घेऊन काम करणार तुम्ही?
  • Log in or register to post comments

Submitted by viraj thale on Sat, 07/16/2016 - 08:42

Permalink

काश्मीर

काश्मीरमध्ये चकमकित मारला गेलेला आतंकवादी बुरहान वाणी पकिस्तान कडून हुतात्मा म्हणून घोषित .
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Sat, 07/16/2016 - 08:55

Permalink

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशपरीक्षा

NEET च्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय देताना राज्यांना त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घ्यायला परवानगी दिली. ९ मे या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने NEET ही एकमेव वैद्यकीय प्रवेश परीक्षा असेल असं जाहीर केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. २४ मे या दिवशी केंद्र शासनाने एक वटहुकूम काढून राज्यांनाही त्यांच्या वैद्यकीय प्रवेशपरीक्षा घेण्याची परवानगी दिली. काही राज्यांनी त्यांच्या प्रवेशपरीक्षा ९ मेच्या आधीच घेतलेल्या असल्यामुळे हा इतर राज्यांवर अन्याय होईल अशी भूमिका केंद्राने घेतली. केंद्र सरकारच्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक आदेश (stay) आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला गेला. आणि आता त्या वटहुकूमावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने राज्यांचा स्वतःच्या परीक्षा असण्याचा मार्ग सुकर केलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 07/16/2016 - 11:23

Permalink

टर्कीत अयशस्वी लष्करी उठाव,

टर्कीत अयशस्वी लष्करी उठाव, ४२ ठार http://www.maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/turkish-military-attempted-coup/articleshow/53235735.cms
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 07/16/2016 - 20:25

In reply to टर्कीत अयशस्वी लष्करी उठाव, by श्रीगुरुजी

Permalink

आता मृतांची संख्या 170 वर

आता मृतांची संख्या 170 वर गेलीय:(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 07/16/2016 - 11:27

Permalink

नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल

नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल तुरुंगाबाहेर
देशद्रोहाच्या आरोपाखाली ९ महिने तुरूंगात राहून जामीनावर सुटल्यानंतरसुद्धा अजूनही हार्दिकची खुमखुमी कायम आहे. त्याला ६ महिने गुजरातबाहेर रहावे लागणार आहे. देशद्रोहाचा आरोप अजूनही कायम आहे. द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का? _________________________________________________________________________________ पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याची नऊ महिन्यांच्या कारावासानंतर येथील लाजपूर तुरुंगातून सुटका झाली. यावेळी हे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, मला ‘५६ इंचांची छाती’ नको असून माझ्या समुदायाचे अधिकार हवे आहेत, असा टोला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारला. पाटीदार समुदायाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे या मागणीसाठीचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेल्या हार्दिक (२२) याने सांगितले. पाटीदार समाज ज्यांना आपलेच भाईबंद असल्याचे मानतो, त्या कुर्मी समुदायाला सहभागी करून हा लढा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे संकेतही त्याने दिले. हार्दिकविरुद्धचे देशद्रोहाचे दोन गुन्हे आणि पाटीदार आंदोलनादरम्यान विसानगर येथील आमदाराच्या कार्यालयातील हिंसाचाराचे एक प्रकरण यामध्ये हार्दिकला जामीन मंजूर करून गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. येत्या सहा महिन्यांसाठी हार्दिकने गुजरातबाहेर राहावे, अशी अट न्यायालयाने घातली होती. या अटीनुसार, हा तरुण नेता येत्या सहा महिन्यांसाठी राजस्थानच्या उदयपूर शहरात राहील, असे त्याच्या वकिलाने स्थानिक न्यायालयाला सांगितले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/hardik-patel-released-from-jail-1268273/
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Sat, 07/16/2016 - 20:29

In reply to नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल by श्रीगुरुजी

Permalink

ऑ

द्वितीय श्रेणीत बी. कॉम. पास झालेल्या हार्दिकला गुणवत्तेवर होणारा अन्याय या विषयावर बोलायचा अधिकार तरी आहे का?
ऑ तसं तर काहींनी मंत्री होण्याचा पण नैतिक अधिकार नाही.आणि मंत्रीपद देण्याचा पण.
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sat, 07/16/2016 - 21:19

In reply to नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल by श्रीगुरुजी

Permalink

...

द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?
  • Log in or register to post comments

Submitted by चंपाबाई on Sat, 07/16/2016 - 22:02

In reply to नऊ महिन्यांनंतर हार्दिक पटेल by श्रीगुरुजी

Permalink

...

द्वितिय श्रेणीतील असली तरी निदान खरी डिग्री आहे. डिग्रीचे कागद गायब , रविवारी मिळालेली डिग्री .. असे चावट प्रकार नाहीत. . .. एका बडबड्या बाईंना नुकतेच मंत्रीमंडळातुन बाजुला ढकलले. त्यांची डिग्री बिए की बिकॉम ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 07/16/2016 - 15:08

Permalink

पाकिस्तानची पूनम पांडे

पाकिस्तानची पूनम पांडे http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4615728673501636712&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160716&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%20%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com