Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 08/05/2016 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

वाचने 108252
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

आयुर्वेदिक उपचार:/ अगम्य केरला आयुर्वेदिक उपचार माटुंगा पोलिस स्टेशनच्या मागे ( किंग्ज सर्कल रे स्टे ला उतरुन जाता येईल.) २) सायन रे स्टे बाहेर चर्चच्या नंतर आयुर्वेद कॅालेज चे बाह्य उपचार दवाखाना आहे.तुमच्या रोगावर औषध देतात.त्यांना गरज वाटल्यास पंचकर्म सुचवतात.

काही चुकीचे , विचित्र शब्द वापरण्याची मिपावर प्रथा आहे. अशा प्रकारे भाषेत नसलेले मराठीला इंग्लिशचा तडका दिलेले वगैरे शब्द वापरले जावू नये असे मला वाटते म्हणून मी हे आवाहन करत आहे. (बाकी ज्याचा त्याचा प्रश्न) १) लोक्स २) अ‍ॅडवणे (अजून आठवतील / सापडतील तसे लिहीन) धन्यवाद

In reply to by मराठी कथालेखक

भाषा प्रवाही असते दादा. आपण कितीही काहीही म्हटलं तरी भाषेचं स्वरूप बदलत जाणारच. रच्याकने [ ;) ] तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला "तडका" मराठी मानलाच की नाही?

In reply to by आदूबाळ

शब्द निदान कोणत्या तरी एका भाषेतला असावा "तडका" मूळ मराठी नसेल पण निदान हिंदी तरी आहे ना. अ‍ॅडवले म्हणण्या ऐवजी "अ‍ॅड केले" म्हंटले तरी चालू शकेल. बाकी कीबोर्डला कळफलक किंवा अ‍ॅक्सिलरेटरला गतीवर्धक असेच म्हंटले पाहिजे असा आग्रह मी धरत नाहीये. भाषा प्रवाही असते हे मान्य केले तरी मग कुणी काहीही नवीन शब्दांची भर घालत गेलेत तर ती भाषा कळण्यापलीकडे होईल. झका तयरका ?

In reply to by आदूबाळ

तुम्ही "फोडणी" ऐवजी दिलेला "तडका" मराठी मानलाच की नाही?
बाकी मराठीत (म्हणजे मराठी बोलणार्‍यांच्या संवादात) फोडणी आणि तडका हे दोन्हीही शब्द वापरले जातात आणि माझ्यामते त्या दोन्हीत काहीसा फरक आहे. स्वयंपाकनिपुणांनी अधिक प्रकाश टाकायला हरकत नाही.

'वाटा जागलेल्या' हे काही महिन्यांपुर्वी प्रसिद्ध झालेले एक स्वतंत्र (चित्रपटबाह्य) मराठी गाणे. आधुनिक पद्धतीचा संगीतसाज आणि साधे सोपे, शुद्ध मराठी शब्द (हिंदी , इंग्लिशची भेसळ नाही) असलेले हे गाणे माझ्या मते आवर्जुन दखल घ्यावे असे आहे. मात्र 9x झकासच्या पलीकडे ते फारसे पोहोचले असे वाटत नाही म्हणून इथे मिपाकरांना या गाण्याबद्दल सांगावेसे वाटले. https://www.youtube.com/watch?v=urUrqusXwR8

'आंब्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ' ह्यावर एक लेखमाला सुरु करावी अशी विनंती मी संपादक मंडळाला करतो. असे केल्यास मिपा खऱ्या अर्थाने 'मोहरून' येईल.

थांबा थोडे आता बाठ्याचे वेफर्स,भाजी,मिश्र लोणचे,उपवासाचे पदार्थ,कांतीसुधारक उटणे येत आहे.तोपर्यंत धुतलेल्या कोयींची कढी ,रसम प्या.उन्हाळ्यासाठी हितकारक.

US undergraduate engineering ला मुलांना पाठवणे कितपत योग्य अयोग्य कोणी सांगू शकाल का मिपाकरांनो.

In reply to by अजया

undergraduate engineering ला पाठवून मुलांना फारसा फायदा होत नाही. कारण तुम्ही जेंव्हा MASTERS करता तेंव्हा तुमची पदवी कुठल्या महाविद्यालयातील आहे याचा शष्प फरक पडत नाही. तेथे पाठविणारे SAT चे क्लास वाले "अचाट आणी अफाट" चढवून सांगतात. वार्षिक १०-१२ लाख खर्च दोन वर्षे करा मग शिष्यवृत्ती मिळेल.सगळे पुढचे शिक्षण फुकट होईल ई ई. मी पण त्याक्षणी हुरळून गेलो होतो. मग थंड डोक्याने विचार केला आणी माझ्या अनेक निवासी आणी अनिवासी मित्रांशिया चर्चा करण्यात आली तेंव्हा यातील मिथ्या भाग लक्षात आला.शिष्यवृत्ती १०० मध्ये फारतर एखाद्या मुलाला मिळते. शिक्षणाचा एक कोटी रुपयापर्यंत खर्च येतो आणी त्याचा पुढच्या आयुष्यात फारसा काहीही उपयोग होत नाही असे अनेक मित्रांनी स्वच्छ आणी स्पष्ट शब्दात सांगितले.

In reply to by सुबोध खरे

हो.मलाही दोन्ही प्रकारचे सल्ले मिळत आहेत.अजून सॅट क्लासला नाही जाऊन आले.ते असेच चढवून सांगतील कल्पना आहे.

In reply to by अजया

खरे साहेबांना अनुमोदन. undergrad भारतात करून masters साठी अमेरिकेला पाठवणे उत्तम. जर भारतात undergrad साठी चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही म्हणून SAT चा विचार करत असाल तर तसे अजिबात नको. उगाच खर्च करून खड्डयात पडाल. भारतात undergrad शिक्षण चांगले आहे. मुंबई पुणे ह्यासारख्या विद्यापीठांचा syllabus सुद्धा चांगला आहे. म्हणजे, भारतात undergrad केले म्हणून अमेरिकेत masters करताना काही disadvantage होतो असे नाही.

In reply to by असंका

Computer ( WIndows, MAC ई) किंवा मोबाईलची screen जशीच्या तशी TV वर पाहता यावी , सोबत आवाजही ऐकता यावा यासाठीचे एक छोटे उपकरण. ते टीव्हीला जोडले जाते, मग घरातील WiFi चा उपयोग करुन (मला वाटतय router नसेल तर मोबाईलच्या hotspot नेहि जोडता येत असावं) याचा साधा सरळ उपयोग असा की समजा तुम्ही मोबाइलवर एक विडीओ बघत आहात पण तुम्हाला तो मोठ्या स्क्रीनवर बघायचा आहे तर त्याकरिता पेन ड्राईव मध्ये वगैरे कॉपी करत बसण्याची गरज नाही. तुम्ही तो मोबाईलवर चालवायचा आणि स्क्रीन कास्ट करुन मोठ्या स्क्रीनवर बघायचा. तुमच्या टीवीला HDMI port असणे गरजेचे ते नसेल तरी योग्य ते adapter लावून तुम्ही हे उपकरण वापरु शकता. तुमचा टिवी पेन ड्राईव्ह सपोर्ट करत नसेल तरी या उपकरणामुळे तुम्हाला टीव्ही लगेच अपग्रेड करायची घाई करण्याची गरज नाही हा नेमका फायदा ...

In reply to by मराठी कथालेखक

टीवी नवीन आहे..फोन / टेब जुना झालाय. एच एम एल सपोर्ट नैये म्हणे. मग क्रोम कास्ट घ्यावा की एच एम एल सपोर्ट वाला फोनच नवीन घ्यावा...आपल्याला काय वाटतं?

In reply to by असंका

MHL support वाले मोबाइल फारसे नाहीयेत असं मला वाटतं. तुम्हाला फोन तसाही बदलायचाच असेल तर तुम्ही MHL support वाला घेवू शकता. बाकी तुमची गरज नेमकी काय आहे ? युट्युब वगैरेवरुन तुम्हाला टीवीवर विडीओ बघायचे आहेत का ? यासाठी MHL support वाला फोन किंवा chrome cast सारखं उपकरण घ्याव लागेल. (Chrome cast सध्या ebay वर १९९९ ल दिसत आहे, हा खर्च तुम्हाला फार जास्त वाटत नसेल तर बिनधास्त घेवून टाका) एकूणातच MHL support वाला फोन पेक्षा मी chrome cast आधी सुचवेन कारण याने तुम्ही pc वरुनही स्क्रीन टीवीवर कास्ट करु शकता. की save केलेले mp4 वगैरे विडीओ टीवीवर बघायचे आहेत ? हे तुम्ही प्रेन ड्राईव्ह किंवा मोबाईल टीवी ला थेट जोडूनही करु शकता. हो पण टीवी अनेक formats नीट दाखवत नसेल तर मात्र पुन्हा वरचेच पर्याय शिल्लक राहतात.

In reply to by मराठी कथालेखक

मी तर सरळ केबल टीवी च्या सेट टॉप बॉक्स ला ऑप्शन म्हणून बघत होतो. यू ट्युब लावलं की काम झालं.

sinus infection चा त्रास मला गेल्या महिन्यापासुन होत आहे. अ‍ॅलोपेथीक उपचार घेत आहे पण लवकर बरा होत नाहिये. यावर काही घरगुती उपचार आहेत का? आयुर्वेदिक उपचार कोणी घेतले आहेत का?

In reply to by मोहनराव

नियमित वाफ घेणे, झेपेल तसा व्यायाम करणे, पाठीचे आणि गळ्याचे थंडीपासून रक्षण करणे (थंड गोष्टींना पाठ टेकून बसू नका, एसी मध्ये तसेच थंड हवेतून बाइकवरुन जाताना वगैरे गळ्याबोवती मफलर लपेटा) बाकी थोडा थोडा ओवा खूप वेळ चावून खाण्याची सवय चांगली. पण वाफ सगळ्यात महत्वाची असे मला वाटते, अगदी अ‍ॅलोपथीचे डॉक्टर पण वाफ घेण्याचा सल्ला देतातच.

PGD ERP course SAP coep college one year full time ,Is it useful forBcom studen? kindly guide. thank you.

In reply to by आदूबाळ

मोबाईल मधल्या ब्लुटुथ चे नाव प्रत्यंचा ठेवले होते याची आठवण झाली.

२- BHK, काठे गल्ली, द्वारका, नासिक १२०५, बिल्ट अप , ४ वर्ष पाचवा मजला, रोड टच, नाशिक – पुणे हायवे पासून ५ मीन. पुण्यात शिफ्ट झाल्याने विकत आहे. संपर्क – ९१६८८७७८०६

In reply to by palambar

जयपूर-जैसलमेर जास्त चांगला. उंटवाले फार फसवतात त्यामुळे निट स्पष्ट भाव करूनच उंटावर बसा. हॉटेलमध्ये देखील इलेक्ट्रिसिटी वाचविण्यासाठी एसीचे टेम्परेचर वाढवून ठेवतात.बाकी जैसलमेर एकदम सुंदर, खास करून किल्ला आणि वाळवंट.

In reply to by palambar

वाळवंटाचे दर्शन आणि अनुभव तुम्हाला जैसलमेर ला होइल. जयपुर उदयपुर हा बर्‍यापैकी ( तुलनात्मक ) हिरवा भाग आहे.

काळातली गाणी बघत होतो. तेव्हा कोरीओग्राफी मध्ये इतकी प्रगती नव्हती झालेली. म्हणजे टेरेन्स, वैभवी मर्चेन्ट,इ. सारखे दिग्गज बॉलिवुड च्या कोरीओग्राफ्री मध्ये उतरण्याच्या क्रांतीपुर्व कालातील कोरीओग्राफी. हा फारच विनोदी प्रकार होता असे लक्षात आले. इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते. दिवाना चित्रपटातला रुषी कपुर च दिव्या भारती बरोबरच गाणं यातला रुषी व मागचे सर्व. तु शायर है मै तेरी शायरी मध्ये माधुरीला साथ देणारे मागचे सर्व बहोत मनोरंजन है ही गाणी बघावी एकदा.

In reply to by मारवा

'सपने साजन के' मधील जॅकी श्रॉफ व डिंपल वर चित्रीत 'कभी भुला कभी याद किया'

In reply to by मारवा

" सारी के फॉल सा " हे गाणे पाहावे. यात महिला extra चेहरा न दाखवता पूर्ण गाण्यासाठी एकच स्टेप करतात , तरीसुद्धा या गाण्यातील नृत्य दिग्दर्शन फारच वेगळे नि अनोखे वाटते , ना कुठे इकडून तिकडे धावाधाव न जोडीने P.T. चे वर्ग

इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते.खरंय =)) थक्क करून टाकणारी choreagraphy असायची आणि हीरो- हीरोइन चे कपडे, हेअर स्टाइल पाहून पब्लिक पूर्णपणे कोमात!!! शाहरूख आणि काजोल चं ये काली काली आखें..

In reply to by पद्मावति

आरारारा! शारुख ची दोन्ही पाय वेगळे असलेली पॅण्ट! या आणि मध्येच अन्नू मलिकचं किंचाळणं! मैं मिला, तू मिली!

राजस्थान तसा खूप मोठा आहे पाहाण्यासाठी.नक्की काय पाहायचे आहे आणि टुअर/ स्वत: पाहाणार यावर अवलंबून आहे खर्च.शिवाय काही मधली अंतरे २०० किमी आहेत.महाल एकापाठोपाठ एक पाहून कंटाळा येऊ शकतो.हत्त्यारं,चिलखतं,अंबाय्रा,शिकारचित्रे,फोटो,वस्तुसंग्रह आणि प्रत्येक राजाचा इतिहास.

premasathi कमिंग सून हा चित्रपाट सौ ना पाहायचा आहे .कसा बघता येईल

In reply to by एकुलता एक डॉन

'फक्त मराठी' या वाहिनीवर बरेच वेगवेगळे , अनेकदा अजिबात माहित नसलेलेही चित्रपट दाखवतात. त्यामुळे यावाहिनीचे वेळापत्रक बघत रहा. हा चित्रपट तिथे मिळू शकेल

मित्रहो, मला कोकणात एक पॉलीहाउस उभारायचे आहे. त्यात मसाले पदार्थ इत्यादीची लागवद करायचीआहे. फ़ार भांडवल नसल्याने, ग्रीन शेड नेट आणी बांबु वापरुन वापरुन उभे करायचे आहे. पॉली हाउस बद्दल कुणाला माहीती असल्यास अवश्य सांगावी.

बजेट : रु १०,००० पर्यंत प्रकार : शक्यतो २.१ (४.१ ही चालेल) पण मुख्य भागाचा आकार फार मोठा नको नाहितर ठेवण्याची अडचण होईल. हवेच : FM, USB, AUX, Remote , TV / Set top box शी सजह connection होणे. FM चा दर्जा चांगला असावा, बाकी आवाजाचा दर्जा चांगला असावा, वाद्यांचे आवाज तसेच मानवी स्वर अगदी सुस्पष्ट ऐकू यावे असल्यास चांगले : Bluetooth , LCD screen , Equalizer , preset equalizer, bass/treble control कोणतेही ब्रँड चालेल पण दर्जा चांगला हवा, टिकावू हवे. अतिरिक्त माहिती : दिवाणखान्याची मापे (१८ फुट x ११ फूट ) मी जालावर शोधलेली काही उत्पादने १) फिलिप्स MMS4040F/94 यास bluetooth नाही. फ्लिपकार्ट तसेच , स्नॅपडिल वरील गुणांकन (ratings) खूप चांगले आहेत. २) फिलिप्स MMS4545B/94 , हे जवळपास वरच्यासारखेच आहे पण यात Bluetooth आहे. पण फ्लिपकार्ट स्नॅपडिल वरील गुणांकन तितकेसे आकर्षक नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये विजय सेल्स वा क्रोमा ई दुकानांत ह्या उत्पादनांची प्रात्यक्षिके बघण्यास ( म्हणजे ऐकण्यास) मिळू शकतील काय ? अजून इतर उत्पादनांचा शोध चालू आहेच. तरी मिपाकरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

बाल शिवबा (animated movie by Rane Prakashan) आणि बाजी प्रभु देशपांडे या चित्रपटांची प्रगती काय? Anybody know

In reply to by एकुलता एक डॉन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चॅरिटी विभागाकडे चौकशी करा. खूप रुग्णांना मदत होताना प्रत्यक्ष पाहिलं आहे. अ‍ॅनेक्स बिल्डिंगच्या तळमजल्यावर आहे. तिथेच आँकोलॉजी विभागही आहे. (डॉ० केळकरांची ओपीडीसुद्धा.)

माझी नोकरी बदलल्याने पुणे येथे नवीन जागा शोधत आहे (भाड्याने). नवीन नोकरी पुणे हिंजेवाडी phase १ ला आहे. जाणकार मिपाकरांनी राहण्यायोग्य परिसराबद्दल माहिती द्यावी ही विनंती. मी, बायको आणि १ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. पुण्याबद्दल काहीही माहीत नसल्यामुळे माहिती साठी विनंती. /उमेश (८७६७४६८७६८)

In reply to by उमेश पाटील

कोलते पाटील यांचं Life Republic इथे बघा (मी स्वतः अजून ही सोसायटी बघितलेली नाही) फेज १ पसून जवळ आणि भाडे कमी आहेत आणि अनेक सुखसोयी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड दूर वाटेल पण वरचेवर शहरात जायचं नसल्यास याचा विचार करु शकता. तुमची पत्नी नोकरी करत नाही हे गृहीत धरुन सल्ला दिला, त्या नोकरी करत असतील तर मात्र आधी त्यांची सोय बघणे योग्य होईल.

माहिती साठी आभारी आहे, पत्नी नॊकरी करत नाही त्यामुळे जास्त अडचण नाही . अजून माहिती काढतो

लाईफ रिपब्लीक लांब आहे खूप. वाकड मध्ये किंवा पिंपरी चिंचवड ला बघा. तुम्हाला इतर्ही सगळे सोयिचे पडेल.

multipurpose इलेकट्रीक kettle घ्यावयाची आहे. कोणत्या ब्रॅण्डची चांगली असते ? काही अनुभव ? नुसते पाणी उकळवणे नव्हे तर मॅगी ,ओट्स , दूध तापवणे ही कामेसुद्धा त्यात व्हावीत अशी अपेक्षा आहे. क्षमता - ०. ५ ते १. ० ली. बजेट १५०० वा थोडे अधिक

पावसाळ्यात साखर, मीठ इ. पदार्थ डब्यातच ओलसर होतात. ते ओलसर होऊ नयेत यासाठी काय करावे?