Skip to main content

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 08/05/2016 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

वाचने 108227
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

ते लेखनसापेक्ष आहे. लेखन उत्कृष्ट असेल तर कितीही मोठा भाग असेल तरीही वाचकांना कंटाळवाणे वाटणार नाही. मात्र लेखनातच दम नसेल तर लेख लहान काय किंवा मोठा काय..

माझा प्रश्नः जुनी हार्ड डिस्क आहे.चार वर्षे पडून आहे- त्यातले फोटू, आणि अन्य माहिती यू एस बी द्वारे लॅप्टॉप वर घ्यायची आहे. जालावर १५-२० डॉलर्सचे काही उपकरण दाखवत आहेत, ते वापरून थेट पोर्टेबल हार्ड डिस्क करू शकतो म्हणे. हे कुणी केले आहे का?

In reply to by खेडूत

पुण्यात ४००-५०० रुपयांमध्ये युएसबी कन्वर्टर मिळतो. त्यात आयडीई, साटा ५" व लॅपटॉपची साटा ३.५" हार्डडिस्क जोडून युएसबीने संगणकाला जोडता येते.

In reply to by तुषार काळभोर

वरती इंचातली साईज अनुक्रमे ३.५ व २.५ इंच आहे.

In reply to by खेडूत

जुन्या हार्डड्राईव्हला एक्स्टर्नल ड्राईव्ह म्हणून कन्वर्ट करा कींवा पाय सारखे उपकरण वापरून नॅस मधे रुपांतर करा. जर जुनी ड्राईव्ह फार मोठी नसेल तर पहीला पर्याय सोपा आणी मस्त.

In reply to by आनंदी गोपाळ

मी स्वतः हि वापरून बघितली आहे... येथे पहा. दुकानात ३००, ४०० देण्यापेक्षा हे स्वस्तात मस्त.

In reply to by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)

अमेझॉन लिंकबद्दल धन्यवाद! माझी जुनी डिस्क साटा न निघता पाटा निघाली. तिच्यासाठी लागणारी बॉक्स पॉवरसप्लायसह ६०० रुपयांत मिळाली.

In reply to by जेपी

तुम्हाला स्वतःला हे करायचे असेल तर तुमच्याकडे VCR असायला हवा १) VCR मधे ती कॅसेट पळवा, VCR च output (RF असावं असं मला वाटतय) computer ला जोडलेल्या TV Tuner card la द्या . TV tuner card च्या मदतीने computer वर ते विडीओ साठवा नंतर pen drive / dvd मध्ये टाकू शकता २) बाजारात VCR cassete वरुन dvd बनवणारे व्यावसायिक सापडू शकतील. अर्थात हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाणार आणि दर वाढत जातील हे गृहीत धरा. जुने मोठे फोटो लॅब्स, विडिओ शूटींग करणारे, टीवी VCR चे ग्रे मार्केट (उदा: पिंपरी) अशा ठिकाणी/या लोकांच्या मदतीने शोधल्यास असे व्यावसायिक सापडतील.

In reply to by जेपी

अजुन शोधाशोध करा, थोडी घासाघीस करुन बघा, पण महत्वाचे विडिओ असतील तर फार लांबणीवर नका टाकू.

स्वारगेट बस स्थानकापासून चितळे बंधू मिठाईवाले दुकानापर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे. कोल्हापुर स्थानकापासुन रंकाळा तलावापर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे. दादर स्थानकापासुन शिवाजी पार्कपर्यंत जायला मार्गदर्शन हवे आहे. बायको माहेरी गेली आहे. वरणभाताचा कुकर लावायला मदत हवी आहे. शर्टाचे बटण तुटले आहे. सुईत दोरा ओवायला मदत हवी आहे. मुलीची गृहपाठाची वही घरातच हरवली आहे. शोधायला, अर्थातच, मदत हवी आहे. मिपाकर या शंकांचे निरसन करतील याची खात्री आहे. मिपावर येणारे पुढील धागे :) मिपाच्या सध्याच्या प्रथेप्रमाणे प्रत्येकासाठी वेगळा एकोळी धागा काढू का?

In reply to by भाते

स्वारगेटला पोलीस चौकी आहे. तिथे जाऊन चितळेंच्या दुकानात मोठी ऑर्डर द्यायची आहे. आपण मला दुकानात नेउन सोडल्यास कमिशन देऊ असे सांगावे. स्वतःच्या गाडीने सोडतील. नंतर पाव किलो पेढे घ्यावेत आणि त्याचे एक टक्का कमिशन द्यावे. बसचा खर्च अधिक मारदर्शन फी यापेक्षा ते स्वस्तच पडल्याचे लक्षात येईल. या सल्ल्याचे रूपये दोनशे पाठवून द्यावेत ही नम्र विनंती. तशी आमची फीज करोडो मधे असते, परंतु प्रश्नांचे स्वरूप पाहून आकारली आहे. धन्यवाद.

एक नवीन कथा लिहण्याकरिता स्त्रीवंध्यत्वाविषयी काही माहीती हवी आहे. कथेतील तपशील चुकू नयेत म्हणून जाणकाराकडून अप्लसे मार्गदर्शन हवे आहे. कुणी आहे का ?

In reply to by तर्राट जोकर

नाही हो.. खरेच कथा लिहायची आहे. कथानक मनात तयार आहे पण तपशीलात चूक नको म्हणून केवळ थोडं ताडून घ्यायचं आहे.

In reply to by एकुलता एक डॉन

बहुधा सकाळ च्या मुक्तपीठाबद्दल विचारताय? थेट चौकशी करा: संपादकः Contact No. – +91 20 24405500 Fax No. - +91 20 24450583 Email – webeditor@esakal.com

In reply to by एकुलता एक डॉन

पिवळ्या रंगाच पासपास म्हणून एक प्रॉडक्ट आहे, त्यात सुपारी ऐवजी खजुराचे तुकडे आणि पानमसाला असतो, त्याने सुटते सवय. नंतर तेही बंद होते. तंबाकू पण सवय असेल तर मुशकील आहे.

In reply to by अभ्या..

त्याने तंबाखू सुटायला मदत होते असं ऐकलेलं आहे. कृपया ते वापरण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि मुश्किल आहे, पण अशक्य नाही हे लक्षात ठेवावे. एखादी सवय हा आपला problem आहे आणि ती सोडावीशी वाटते आहे - ही ती सवय कायमची सोडण्याच्या प्रक्रियेतली सर्वात महत्वाची पायरी असते हे लक्षात ठेवावे.

majhe manlele bhau ,20 varshe मोठे आहेत ,त्यांना द्याचे आहे गुटखा सुटावे mhanun

भायखळा राणीच्या बागेत एक झाड आहे.बारापंधरा फुट उंच आहे.याची पाने थेट चुना लावून तंबाखू चघळल्याची चव देतात.परंतू तंबाखू नव्हे. झाडाच्या पानांचे काही अरेबिक देशांत व्यसन वाढल्यावर तिकडे ब्यान केले आहे.

नुकतीच तुनळीवर हि शॉर्ट फिल्म बघितली. ०९:४६ ला भारताच्या तिरंग्यावर इंग्रजीत लिखाण केलेले पाहिले. हे मनाला न पटल्यामुळे विकीवर इथे शोध घेतला. स्पष्टीकरण ५ (एफ) मध्ये लिहिल्याप्रमाणे तिरंग्यावर लिखाण करणे हा तिरंग्याचा अपमान आहे. भारतीय नागरिक म्हणुन मी याच्याविरुद्ध कोणाकडे किंवा कुठे तक्रार करू शकतो?

घरी नवीन वॉटर प्युरीफायर घेतला आहे. त्याची TDS लेव्हल कंपनीच्या माणसाने ३०-३५ इतकी ठेवली आहे. इतकी कमी लेव्हल पिण्याच्या पाण्यासाठी योग्य आहे का ? याबाबतीत जालावर अधिकृत माहिती कुठे मिळाली नाही. काही लोकांचे म्हणणे आहे की ती कमीतकमी १५० असावी. कृपया कुणाला अधिकृत माहिती असल्यास किंवा लिंक असल्यास द्या.

In reply to by सस्नेह

माझ्यामते TDS कमी असणं चांगलंच आहे. Corporation कडून देण्यात येणार्या पाण्याची TDS कमीच असते. नदीच्या वाहत्या पाण्याची ही कमी असावी बहूधा.

In reply to by सस्नेह

याच क्षेत्रात काम करत असल्यामुळे सांगू शकतो. TDS लेव्हल १५० पर्यन्त असेल तरी शरीराला काहीही अपाय होत नाही. उलट ३५-४० इतक्या कमी TDS लेव्हलचे पाणी पिउन आपण आपल्या पोटाला तशीच सवय लाऊन ठेवतो. मग बाहेरचे पाणी चालत नाही अशी परिस्थिती येते. शक्य असल्यास TDS लेव्हल १०० पर्यन्त ठेवा. तुमच्या घरी जर महानगर पालिकेचे पाणी येत असेल तर प्युरीफायरची गरज नाही. बोअरचे पाणी असेल तर प्युरीफायर लावावा. खरं सांगायचं तर पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार TDS नव्हे तर TSS (Total suspended solid ) या मुळे होतात. पण तस कमी करणारे घरगुती प्युरीफायर माझ्या माहितीप्रमाणे बाजारात उपलब्ध नाही.

In reply to by चिनार

पाणी नगरपालिकेचे आहे. या दिवसात तरी स्वच्छ नसतेच. TDS लेव्हल कमी असल्यामुळे पोटाला सवय लागणे याशिवाय आणखी काही दुष्परिणाम होतात का ? म्हणजे शरीरात सॉल्ट इनटेक कमी होणे वगैरे ?

TSS साध्या तलम कपड्याने सुद्धा गाळून वेगळे करता येतात वा तुरटी वापरून !!!!! आजार हे पाण्यातील रोगकारक जीवाणू नि विषाणु मुळे होतात. सर्व पुरिफ़िएर मध्ये ultra filtration असते. ज्याने TSS सुद्धा वेगळे होतात ..

आजकाल बरेच वाचण्यात येत आहे कि पालेभाज्या गटाराच्या पाण्यात उगवतात ,कीटक नाशके टाकून फळे पिकवतात ,टरबूज साठी अनैसर्गिक रसायने वापरतात निदान पुण्यात फळे व भाज्या कुठे मिळतील जे व्यवस्थित पिकवलॆल असेल ?

TDS नि hardness या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुख्यतः body salt balance हा sodium नि chloride वर अवलंबून असतो. Salt Intake वर filtered पाणी प्यायल्याने काही दुष्परिणाम होत नाही.

In reply to by विअर्ड विक्स

कमी TDS चे पाणी पिऊन सवय झाल्याने नंतर कधीतरी बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग आला तर काही त्रास होऊ शकतो का ?

चिनार ने बरोबर सांगितलंय.ती सोय वापरा पण अतिरेक नको. टिडिएस ची लेवल ५० करा.पाणी मचूळ वाटत नसेल तर ७५ करा नाहीतर मचूळ लागेपर्यंत वाढवा आणि तो आकडा पाहा.मचूळ लागणार नाही इतकेच खाली सेटिंग करा.त्याने पाण्याचा फ्लो वाढेल आणि कार्टिज फार लवकर बदलावी लागणार नाही.

नवी मुंबई (किंवा मुलुंड, ठाणे) येथे आयुर्वेदिक उपचार (पंचकर्म वगैरे ) मिळण्याची सोय कुठे आहे. मला वाटते कि स्वस्त पासून अतिशय महाग अश्या सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे प्रामाणिक ते भोंदू असेही सर्व प्रकारचे पर्याय असतील :-) कदाचित काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या तर्फे सुद्धा काही उपचार उपलब्ध असतील. तर ज्यांना याबद्दल माहिती आहे त्यांनी कृपया येथे द्यावी अशी विनंती.

नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील नारायणगावात दिर्घकाळ वास्तव्यासाठी फ्लॅट भाड्याने हवा आहे. मिपाकरांच्या ओळखीत कोणाचा फ्लॅट असेल तर कृपया मदत करावी. मला वारंवार मिसळपाव संस्थळाला भेट देणे शक्य होणार नाही त्यामुळे माझ्या फोन वर संपर्क केला तर योग्य होईल. माझा क्रमांक ९५५ २६ ९९ ३३३. खूप खूप धन्यवाद! - संदीप डांगे

In reply to by जेपी

आपलं घर नावाची संस्था आहे डोणजे, सिंहगड पायथ्याशी. तेथे खेळणी, कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य व मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तु देऊ शकाल. त्यांना फोन केलात तर त्यांची गाडी सामान घ्यायला येते.

In reply to by एकुलता एक डॉन

कॅन्सर पेशंटसाठी विग मोफत देणार्‍या चॅरिटीचा पत्ता कोणीतरी दिला होता. नाटकासाठी हवा असेल तर मॅकड्रपमध्ये मिळेल. तुळशीबागेत राम मंदिराजवळ काही गंगावनांची दुकानं आहेत. तिथे खास अलका कुबल स्टैल विग मिळतात.

फोबिया चित्रपट पाहिला का कुणी ? थोडक्यात समीक्षण (चांगला, बरा, वाईट ई) सांगता येईल का ?

अकुकाकांचे लिखाण लेख/चारोळी/कविता/कादंबरी/ललित लेखन/कथा यापैकी किंवा याशिवाय अस्तित्वात असलेल्या कोणत्या साहित्यप्रकारात येतं ? -- अज्ञानी पामर चिनार

In reply to by आनन्दा

देवळे/देव स्वयंभू असतात त्या प्रमाणे ते साहीत्यही स्व्ययंभूपणाने दशांगुळे व्यापुन उरले आहे कसलया प्रकाराच्या कक्षेत बसवून त्याचे अवमुल्यन करू नये... अखिल याचक वेधकवाचक रेचकपाचक भेदकजाचक महासंघांकडून खुलासा निवेदन...... माहीती संकलक नाखु