✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

त
तर्राट जोकर यांनी
Sun, 05/08/2016 - 23:05  ·  लेख
लेख
ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग. माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे? शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
107834 वाचन

💬 प्रतिसाद (265)

प्रतिक्रिया

धनुष्याला जी दोरी बांधली जाते

चिनार
Fri, 06/10/2016 - 15:32 नवीन
धनुष्याला जी दोरी बांधली जाते त्याला काय म्हणतात ?
  • Log in or register to post comments

प्रत्यंचा.

आदूबाळ
Fri, 06/10/2016 - 15:34 नवीन
प्रत्यंचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

कधी काळी

इरसाल
Tue, 07/12/2016 - 11:17 नवीन
मोबाईल मधल्या ब्लुटुथ चे नाव प्रत्यंचा ठेवले होते याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सदनिका विकणे आहे – नासिक

सिन्नरकर
Sun, 06/12/2016 - 15:31 नवीन
२- BHK, काठे गल्ली, द्वारका, नासिक १२०५, बिल्ट अप , ४ वर्ष पाचवा मजला, रोड टच, नाशिक – पुणे हायवे पासून ५ मीन. पुण्यात शिफ्ट झाल्याने विकत आहे. संपर्क – ९१६८८७७८०६
  • Log in or register to post comments

राजस्थान ट्रिप ला कोणी गेले

palambar
Mon, 06/13/2016 - 16:30 नवीन
राजस्थान ट्रिप ला कोणी गेले आहे का? जयपुर जैसलमेर हा भाग चांगला की जयपुर उदयपुर हा चांगला?
  • Log in or register to post comments

जयपूर-जैसलमेर जास्त चांगला.

सौन्दर्य
Fri, 09/16/2016 - 02:23 नवीन
जयपूर-जैसलमेर जास्त चांगला. उंटवाले फार फसवतात त्यामुळे निट स्पष्ट भाव करूनच उंटावर बसा. हॉटेलमध्ये देखील इलेक्ट्रिसिटी वाचविण्यासाठी एसीचे टेम्परेचर वाढवून ठेवतात.बाकी जैसलमेर एकदम सुंदर, खास करून किल्ला आणि वाळवंट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

वाळवंटाचे दर्शन आणि अनुभव

गंम्बा
Mon, 09/19/2016 - 18:10 नवीन
वाळवंटाचे दर्शन आणि अनुभव तुम्हाला जैसलमेर ला होइल. जयपुर उदयपुर हा बर्‍यापैकी ( तुलनात्मक ) हिरवा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

टीव्ही वर थोडी जुन्या काळातली म्हणजे फार जुन्या नाही

मारवा
Sat, 06/18/2016 - 13:02 नवीन
काळातली गाणी बघत होतो. तेव्हा कोरीओग्राफी मध्ये इतकी प्रगती नव्हती झालेली. म्हणजे टेरेन्स, वैभवी मर्चेन्ट,इ. सारखे दिग्गज बॉलिवुड च्या कोरीओग्राफ्री मध्ये उतरण्याच्या क्रांतीपुर्व कालातील कोरीओग्राफी. हा फारच विनोदी प्रकार होता असे लक्षात आले. इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते. दिवाना चित्रपटातला रुषी कपुर च दिव्या भारती बरोबरच गाणं यातला रुषी व मागचे सर्व. तु शायर है मै तेरी शायरी मध्ये माधुरीला साथ देणारे मागचे सर्व बहोत मनोरंजन है ही गाणी बघावी एकदा.
  • Log in or register to post comments

लगेच आठवलेलं हे एक

तुषार काळभोर
Sat, 06/18/2016 - 17:30 नवीन
'सपने साजन के' मधील जॅकी श्रॉफ व डिंपल वर चित्रीत 'कभी भुला कभी याद किया'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

विषयांतर वाटेल तरीसुद्धा ….

विअर्ड विक्स
Sat, 06/18/2016 - 20:32 नवीन
" सारी के फॉल सा " हे गाणे पाहावे. यात महिला extra चेहरा न दाखवता पूर्ण गाण्यासाठी एकच स्टेप करतात , तरीसुद्धा या गाण्यातील नृत्य दिग्दर्शन फारच वेगळे नि अनोखे वाटते , ना कुठे इकडून तिकडे धावाधाव न जोडीने P.T. चे वर्ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे

पद्मावति
Sat, 06/18/2016 - 18:09 नवीन
इतक जबरदस्त मनोरंजनाच साधन जे होत म्हणजे कोरीओक्रांतीपुर्व कालातील गाणी पाहणे हा मोठा विरंगुळा या लोकांनी हिरावुन नेला असे वाटते.खरंय =)) थक्क करून टाकणारी choreagraphy असायची आणि हीरो- हीरोइन चे कपडे, हेअर स्टाइल पाहून पब्लिक पूर्णपणे कोमात!!! शाहरूख आणि काजोल चं ये काली काली आखें..
  • Log in or register to post comments

शाहरूख आणि काजोल चं ये काली काली आखें..

तुषार काळभोर
Sun, 06/19/2016 - 10:00 नवीन
आरारारा! शारुख ची दोन्ही पाय वेगळे असलेली पॅण्ट! Image removed. आणि मध्येच अन्नू मलिकचं किंचाळणं! मैं मिला, तू मिली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

राजस्थान तसा खूप मोठा आहे

कंजूस
Sat, 06/18/2016 - 18:48 नवीन
राजस्थान तसा खूप मोठा आहे पाहाण्यासाठी.नक्की काय पाहायचे आहे आणि टुअर/ स्वत: पाहाणार यावर अवलंबून आहे खर्च.शिवाय काही मधली अंतरे २०० किमी आहेत.महाल एकापाठोपाठ एक पाहून कंटाळा येऊ शकतो.हत्त्यारं,चिलखतं,अंबाय्रा,शिकारचित्रे,फोटो,वस्तुसंग्रह आणि प्रत्येक राजाचा इतिहास.
  • Log in or register to post comments

premasathi कमिंग सून हा

एकुलता एक डॉन
Wed, 06/29/2016 - 10:51 नवीन
premasathi कमिंग सून हा चित्रपाट सौ ना पाहायचा आहे .कसा बघता येईल
  • Log in or register to post comments

'फक्त मराठी' या वाहिनीवर बरेच

मराठी कथालेखक
Fri, 07/01/2016 - 14:39 नवीन
'फक्त मराठी' या वाहिनीवर बरेच वेगवेगळे , अनेकदा अजिबात माहित नसलेलेही चित्रपट दाखवतात. त्यामुळे यावाहिनीचे वेळापत्रक बघत रहा. हा चित्रपट तिथे मिळू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

ती वाहिनी उपलब्ध नाहीये

एकुलता एक डॉन
Sat, 07/02/2016 - 18:25 नवीन
ती वाहिनी उपलब्ध नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

वकील आहे का कोण मदत हवी आहे।

लालगरूड
Fri, 07/01/2016 - 00:04 नवीन
वकील आहे का कोण मदत हवी आहे।
  • Log in or register to post comments

जोगळेकर म्हणून मिपावर आहेत

एकुलता एक डॉन
Sun, 09/18/2016 - 18:21 नवीन
जोगळेकर म्हणून मिपावर आहेत तसेच lawyersclubindia म्हणून संकेतस्थळ बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

पॉली हॉउस

रघुनाथ.केरकर
Fri, 07/01/2016 - 12:29 नवीन
मित्रहो, मला कोकणात एक पॉलीहाउस उभारायचे आहे. त्यात मसाले पदार्थ इत्यादीची लागवद करायचीआहे. फ़ार भांडवल नसल्याने, ग्रीन शेड नेट आणी बांबु वापरुन वापरुन उभे करायचे आहे. पॉली हाउस बद्दल कुणाला माहीती असल्यास अवश्य सांगावी.
  • Log in or register to post comments

कृपया चांगली म्युजिक सिस्टीम सुचवा

मराठी कथालेखक
Fri, 07/01/2016 - 14:01 नवीन
बजेट : रु १०,००० पर्यंत प्रकार : शक्यतो २.१ (४.१ ही चालेल) पण मुख्य भागाचा आकार फार मोठा नको नाहितर ठेवण्याची अडचण होईल. हवेच : FM, USB, AUX, Remote , TV / Set top box शी सजह connection होणे. FM चा दर्जा चांगला असावा, बाकी आवाजाचा दर्जा चांगला असावा, वाद्यांचे आवाज तसेच मानवी स्वर अगदी सुस्पष्ट ऐकू यावे असल्यास चांगले : Bluetooth , LCD screen , Equalizer , preset equalizer, bass/treble control कोणतेही ब्रँड चालेल पण दर्जा चांगला हवा, टिकावू हवे. अतिरिक्त माहिती : दिवाणखान्याची मापे (१८ फुट x ११ फूट ) मी जालावर शोधलेली काही उत्पादने १) फिलिप्स MMS4040F/94 यास bluetooth नाही. फ्लिपकार्ट तसेच , स्नॅपडिल वरील गुणांकन (ratings) खूप चांगले आहेत. २) फिलिप्स MMS4545B/94 , हे जवळपास वरच्यासारखेच आहे पण यात Bluetooth आहे. पण फ्लिपकार्ट व स्नॅपडिल वरील गुणांकन तितकेसे आकर्षक नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये विजय सेल्स वा क्रोमा ई दुकानांत ह्या उत्पादनांची प्रात्यक्षिके बघण्यास ( म्हणजे ऐकण्यास) मिळू शकतील काय ? अजून इतर उत्पादनांचा शोध चालू आहेच. तरी मिपाकरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

F&D F380X

मराठी कथालेखक
Fri, 07/01/2016 - 17:29 नवीन
F&D F380X याची पण बर्‍यापैकी चर्चा आढळुन येत आहे. कुणाला माहीत आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

बाल शिवबा (animated movie by

NiluMP
Sat, 07/02/2016 - 18:13 नवीन
बाल शिवबा (animated movie by Rane Prakashan) आणि बाजी प्रभु देशपांडे या चित्रपटांची प्रगती काय? Anybody know
  • Log in or register to post comments

पुण्यात कॅन्सर पीडित साठी मदत

एकुलता एक डॉन
Sun, 07/03/2016 - 17:34 नवीन
पुण्यात कॅन्सर पीडित साठी मदत पाहिजे सादर व्यक्ती दारिद्य रेषे वर आहे
  • Log in or register to post comments

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या

आदूबाळ
Tue, 07/12/2016 - 12:15 नवीन
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चॅरिटी विभागाकडे चौकशी करा. खूप रुग्णांना मदत होताना प्रत्यक्ष पाहिलं आहे. अ‍ॅनेक्स बिल्डिंगच्या तळमजल्यावर आहे. तिथेच आँकोलॉजी विभागही आहे. (डॉ० केळकरांची ओपीडीसुद्धा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

पार्किंग मध्ये मुले

एकुलता एक डॉन
गुरुवार, 07/07/2016 - 13:01 नवीन
पार्किंग मध्ये मुले दुचाकीच्या आरसे फिरवतात काय करावे
  • Log in or register to post comments

नोकरी निमित्ताने मुंबईहून पुणे

उमेश पाटील
Mon, 07/11/2016 - 13:06 नवीन
माझी नोकरी बदलल्याने पुणे येथे नवीन जागा शोधत आहे (भाड्याने). नवीन नोकरी पुणे हिंजेवाडी phase १ ला आहे. जाणकार मिपाकरांनी राहण्यायोग्य परिसराबद्दल माहिती द्यावी ही विनंती. मी, बायको आणि १ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. पुण्याबद्दल काहीही माहीत नसल्यामुळे माहिती साठी विनंती. /उमेश (८७६७४६८७६८)
  • Log in or register to post comments

कोलते पाटील यांचं Life Republic

मराठी कथालेखक
Mon, 07/11/2016 - 14:30 नवीन
कोलते पाटील यांचं Life Republic इथे बघा (मी स्वतः अजून ही सोसायटी बघितलेली नाही) फेज १ पसून जवळ आणि भाडे कमी आहेत आणि अनेक सुखसोयी आहेत. पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड दूर वाटेल पण वरचेवर शहरात जायचं नसल्यास याचा विचार करु शकता. तुमची पत्नी नोकरी करत नाही हे गृहीत धरुन सल्ला दिला, त्या नोकरी करत असतील तर मात्र आधी त्यांची सोय बघणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश पाटील

flat pahije ka room?

लालगरूड
Tue, 07/12/2016 - 00:37 नवीन
flat pahije ka room?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश पाटील

फ्लॅट हवा आहे

उमेश पाटील
Tue, 07/12/2016 - 12:42 नवीन
फ्लॅट हवा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

हिंजेवाडी

नाखु
Mon, 07/11/2016 - 14:35 नवीन
नाही हिंजवडी..... बाकी चालू द्या.....
  • Log in or register to post comments

बरं

उमेश पाटील
Mon, 07/11/2016 - 23:26 नवीन
बरं, हिंजवडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

माहिती साठी आभारी

उमेश पाटील
Mon, 07/11/2016 - 23:25 नवीन
माहिती साठी आभारी आहे, पत्नी नॊकरी करत नाही त्यामुळे जास्त अडचण नाही . अजून माहिती काढतो
  • Log in or register to post comments

लाईफ रिपब्लीक लांब आहे खूप.

भक्त प्रल्हाद
Mon, 07/11/2016 - 23:46 नवीन
लाईफ रिपब्लीक लांब आहे खूप. वाकड मध्ये किंवा पिंपरी चिंचवड ला बघा. तुम्हाला इतर्ही सगळे सोयिचे पडेल.
  • Log in or register to post comments

गूगल मॅप ६ किलोमीटर दाखवत आहे

उमेश पाटील
Tue, 07/12/2016 - 10:34 नवीन
गूगल मॅप ६ किलोमीटर दाखवत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भक्त प्रल्हाद

multipurpose इलेकट्रीक kettle

विअर्ड विक्स
Wed, 07/13/2016 - 15:01 नवीन
multipurpose इलेकट्रीक kettle घ्यावयाची आहे. कोणत्या ब्रॅण्डची चांगली असते ? काही अनुभव ? नुसते पाणी उकळवणे नव्हे तर मॅगी ,ओट्स , दूध तापवणे ही कामेसुद्धा त्यात व्हावीत अशी अपेक्षा आहे. क्षमता - ०. ५ ते १. ० ली. बजेट १५०० वा थोडे अधिक
  • Log in or register to post comments

किटलीऐवजी इलेक्ट्रिक कुकर

आदूबाळ
Mon, 07/18/2016 - 13:51 नवीन
किटलीऐवजी इलेक्ट्रिक कुकर घ्या. Image removed. यात पोळ्या सोडून सगळा स्वयंपाक करता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

धन्यवाद.

विअर्ड विक्स
Mon, 07/18/2016 - 23:41 नवीन
धन्यवाद. चांगला पर्याय दिसतोय. निर्णय घेतल्यावर कळवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पावसाळ्यात साखर, मीठ इ.

श्रीगुरुजी
Wed, 07/13/2016 - 15:12 नवीन
पावसाळ्यात साखर, मीठ इ. पदार्थ डब्यातच ओलसर होतात. ते ओलसर होऊ नयेत यासाठी काय करावे?
  • Log in or register to post comments

घट्ट झाकणाचे डबे वापरावेत.

मोदक
Wed, 07/13/2016 - 18:50 नवीन
घट्ट झाकणाचे डबे वापरावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मीठाच्या बरणीत थोडेसे तांदुळ टाकावेत.

समी
Mon, 07/18/2016 - 11:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments

Refrigerator

समी
Mon, 07/18/2016 - 11:22 नवीन
double door refrigerator घ्यायचा आहे साधारण २५००० पर्यंत.... कुठला घ्यावा?
  • Log in or register to post comments

एलजी

सिरुसेरि
Mon, 07/18/2016 - 11:35 नवीन
एलजी
  • Log in or register to post comments

Samsung

नितीन पाठक
गुरुवार, 07/28/2016 - 17:01 नवीन
Samsung चे मॉडेल सुध्दा चांगले आहेत. वीज खर्च कमी येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

धन्यवाद

समी
Mon, 07/18/2016 - 15:41 नवीन
एलजी चे मॉडेल सांगू शकाल का? अजुन काय ऑप्शन आहेत?
  • Log in or register to post comments

माहिती ह्या सदराखाली:

संदीप डांगे
Sat, 07/23/2016 - 20:02 नवीन
वडगाव कांदळी, ता, जुन्नर जिल्हा पुणे येथे एक मजेदार घटना रोज घडते. दोन वेळेला याचा साक्षीदार मीच होतो. ह्यावेळेला रेकॉर्ड केले. जेव्हा मशीदीतून अजान सुरु होते तेव्हा गावातली कुत्री भेसूर आवाजात साथ द्यायला सुरुवात करतात... =)) https://soundcloud.com/sandeep-daange/dogs-barking-while-ajaan
  • Log in or register to post comments

=)))))))

मितभाषी
Sat, 07/23/2016 - 20:14 नवीन
कुत्रे मागच्या जन्मात मुमा असतील. २०% डिस्काउंट कशावर आहे? =))))
  • Log in or register to post comments

ते चुकून आले हो. औषधांवर आहे.

संदीप डांगे
Sat, 07/23/2016 - 20:35 नवीन
ते चुकून आले हो. औषधांवर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

तुम्ही असा उल्लेख कधी वाचलेला आहे का कुठे ?

मारवा
Wed, 07/27/2016 - 14:24 नवीन
तुम्ही कुठल्याही कथा कादंबरीत विशेषतः लेखात वगैरे असा उल्लेख ऐकलेला आहे का ? १- एका गावात एक गरीब शुद्र/वैश्य/क्षत्रिय राहत होता. २- एका गावात एक विद्वान शुद्र्/वैश्य्/क्षत्रिय राहत होता. ३- रत्नागिरीत कोल्हापुरात त्याकाळी एक शुद्र्/वैश्य्/क्षत्रिय कुटुंब राहत असे. ४- त्याकाळी तिथे शुद्र/वैश्य्/क्षत्रियांची चारच घरे संपुर्ण गावात होती.
  • Log in or register to post comments

एक्सटर्नल हार्ड डिस्क क्रॅश

सन्जय गन्धे
गुरुवार, 07/28/2016 - 14:34 नवीन
एक्सटर्नल हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. घरच्या घरी डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे. मुख्य म्हणजे फोटो आणि चांगले जमा केलेले हिंदी आणि इंग्लीश पिक्चर! बेसिक पासून माहिती हवी आहे. मला कंप्यूटरविषयी टेक्निकल माहिती अजिबात नाही.
  • Log in or register to post comments

हार्ड डिस्क खोलून बघा

हेमन्त वाघे
गुरुवार, 07/28/2016 - 22:44 नवीन
हार्ड डिस्क ची अनेकदा केस आणि सर्किट जाते आणि आतली हार्ड डिस्क ठीक असते हार्ड डिस्क चे केसिंग विकत मिळते त्यात ती घालून बघा कधी काडी जुने केसिंग चाकू ने खोळावे लागते किंवा तोडावे लागते . कोठल्या प्रकारची हि हार्ड डिस्क आहे SATA कि PATA ( जुन्या प्रकारची) 2.5 इंच ( छोटी लॅपटॉप ची ) कि 3.5 इंच ( ( डेस्कटॉप ची )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जय गन्धे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा