Skip to main content

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

लेखक वाल्मिक यांनी बुधवार, 06/07/2016 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

वाचने 15438
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या ओलसर, कपाटात असलेल्या करकरीत वाळलेल्या, अश्या गंजीफ्रॉक अन जॉकीच्या चड्यांचा हिशोब मांडतो, घरी गेल्यावर भजी मिळतील का बोल ती शक्यता तपासतो अन मग सगळे गणित जमत आले तर(च) पावसाची मजा घेतो

आमची उघडून डोक्यावर धरतो.छपराखाली असलो तरी.मग मोबाइल काढून मिपाचा खफ उघडून बघतो कोणी आहे का.

=))

कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे कार्य लयात आले? ब्वॉर्र्र्र्र्र.. पण पावसात कसे अडकले? :)) तसेही कार्यं लयात आली की घड्याळ बघूच नये.

लगेच आजुबाजुच्या दुकानातुन हेल्मेट खरेदी करतो.

In reply to by अभ्या..

आमच्या एका मित्राने त्यातल्या टॅग लाइनसकट म्हणून दाखवलं होतं एका अंताक्षरी मध्ये.... खिखिखि खुखुखु वगैरे पासून ट्ठो सगळे प्रकार ऐकले.