✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

ब
बोका-ए-आझम यांनी
Sun, 07/03/2016 - 23:42  ·  लेख
लेख
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
समाज
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
69054 वाचन

💬 प्रतिसाद (220)

प्रतिक्रिया

अपेक्षेपेक्षा फारच जोरात

पिलीयन रायडर
Mon, 07/04/2016 - 19:39 नवीन
अपेक्षेपेक्षा फारच जोरात झालेला दिसतोय कट्टा!! होलसेलमध्ये खुप मिपाकर पहायला मिळाले!
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 19:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आवरा !! =)) =))

सूड
Mon, 07/04/2016 - 19:53 नवीन
आवरा !! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

ठ्ठो !

सस्नेह
Tue, 07/05/2016 - 17:15 नवीन
आवराच्च कुणीतरी या नीमोला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एकदम ठोSSSSठो . ROFL

माझीही शॅम्पेन
Mon, 07/04/2016 - 19:54 नवीन
एकदम ठोSSSSठो . ROFL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

अगगागागा =))

प्रचेतस
Mon, 07/04/2016 - 19:58 नवीन
अगगागागा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आरारा...लै म्हन्जे लैच...तू

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 20:02 नवीन
आरारा...लै म्हन्जे लैच...तू भेटच आता =)) बाकी फोटोशॉप चांग्ले जम्ते तुला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

टका-टक!

आदूबाळ
Mon, 07/04/2016 - 20:20 नवीन
टका-टक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

चान चान!

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 20:32 नवीन
चान चान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

जबरा फोटू.

त्रिवेणी
Mon, 07/04/2016 - 20:33 नवीन
जबरा फोटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आयला या कधी आलेल्या कट्ट्याला?

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 21:01 नवीन
फटूग्राफरला कशा दिसल्या नाहीत म्हणतो मी?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

च्यायला, टक्याचे भोंडल्यातला

अभ्या..
Mon, 07/04/2016 - 23:34 नवीन
च्यायला, टक्याचे भोंडल्यातला हत्ती हे नामाभिदान खरे आहे म्हणा कि. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

खतरनाक!

कवितानागेश
Tue, 07/05/2016 - 00:46 नवीन
बेस्ट फोटो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आग्गागागागागा!

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/05/2016 - 08:15 नवीन
आग्गागागागागा! Image removed. टक्कूमक्कूशोनूSsssssssss Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

हा हा..

ब़जरबट्टू
Tue, 07/05/2016 - 08:54 नवीन
जबरा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

हसून हसून फुटले!!!!

जिन्गल बेल
Tue, 07/05/2016 - 09:38 नवीन
हसून हसून फुटले!!!! :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

=)))))) अरारारा

अजया
Mon, 07/04/2016 - 20:06 नवीन
=)))))) अरारारा
  • Log in or register to post comments

आमचा उल्लेख झाला हे कळुन बरे

शान्तिप्रिय
Mon, 07/04/2016 - 20:08 नवीन
आमचा उल्लेख झाला हे कळुन बरे वाट्ले ट का जबरदस्त! भेटतोच आता कधितरी एकेकाला ! पुढच्या महाकट्ट्याला नक्की येतो. असे वाटते की आता तहहयात नवी मुंबई हेच मिपा महाकट्ट्याचे ठिकाण असावे.
  • Log in or register to post comments

भारीय................यापेक्षा

रेवती
Mon, 07/04/2016 - 22:35 नवीन
भारीय................यापेक्षा जास्त बोलत नाही.
  • Log in or register to post comments

वारल्या गेलो आहे फोटो पाहून.....

माम्लेदारचा पन्खा
Mon, 07/04/2016 - 23:23 नवीन
कोणाची ही क्रिएटीव्हिटी ? सलाम !
  • Log in or register to post comments

टकाचा शेवटचा फोटो कहर. डांगे

खटपट्या
Tue, 07/05/2016 - 01:33 नवीन
टकाचा शेवटचा फोटो कहर. डांगे सरांचे दर्शन झाले.
  • Log in or register to post comments

कोणाचं काहीही होवो, कट्ट्याला

कंजूस
Tue, 07/05/2016 - 06:03 नवीन
कोणाचं काहीही होवो, कट्ट्याला हवे असलेले साम्पल मिळाले आणि टक्क्याने आपले मार्क्स वाढवून घेतले । । बाकी भाउबिजेला_मिळालेल्या_कापडाच्या_डिझाइनचे_शर्टस किती दिवस वापरणार हा मुग्गा?
  • Log in or register to post comments

उसातून आणलेला शर्ट आहे तो

टवाळ कार्टा
Tue, 07/05/2016 - 10:45 नवीन
उसातून आणलेला शर्ट आहे तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ओके, म्हणून उसाला इतके कोल्हे

सूड
Tue, 07/05/2016 - 14:41 नवीन
ओके, म्हणून उसाला इतके कोल्हे लागलेत का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मांजरी आहेत त्या...बोक्याच्या

टवाळ कार्टा
Tue, 07/05/2016 - 14:42 नवीन
मांजरी आहेत त्या...बोक्याच्या कट्ट्याला आलेल्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मस्तच झाला महाकट्टा!!!

भुमी
Tue, 07/05/2016 - 10:27 नवीन
विपा, बोका-ए-आझम, अजया यांनी उत्तम आयोजन केले होते. मिपाकरांच्या लक्षणिय उपस्थितीमुळे कट्टा संस्मरणिय ठरला.
  • Log in or register to post comments

एकदम जंक्शन कट्टा !

सस्नेह
Tue, 07/05/2016 - 17:13 नवीन
फोटो बघून मजा आली ! पण बऱ्याच मिपाकरांची नावे समजली नाहीत. असो. भावी कोल्हापूर कट्ट्याला हजरी लावतील तेव्हा प्रत्यक्षच पाहीन म्हणते :)
  • Log in or register to post comments

केलात तर मागच्या वेळी केली

सूड
Tue, 07/05/2016 - 17:28 नवीन
केलात तर मागच्या वेळी केली होतीत तिथेच जेवणाची सोय झाली तर बघा, मसूराच्या भाजीची चव अजून लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ज ह ब ह री!!

चांदणे संदीप
Tue, 07/05/2016 - 18:43 नवीन
टका रॉक्स!! बरच काही मिसल्या गेले आहे! :( नेक्स्ट महाकट्टा आयोजित/प्रायोजितच करीन म्हण्तो! सान्द्य
  • Log in or register to post comments

ज ह ब ह री!!

चांदणे संदीप
Tue, 07/05/2016 - 18:43 नवीन
टका रॉक्स!! बरच काही मिसल्या गेले आहे! :( नेक्स्ट महाकट्टा आयोजित/प्रायोजितच करीन म्हण्तो! सान्द्य
  • Log in or register to post comments

ही सान्दय, होऊ अरे उ? आल इस

धनंजय माने
Tue, 07/05/2016 - 18:53 नवीन
ही सान्दय, होऊ अरे उ? आल इस वेल नो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ही

चांदणे संदीप
Tue, 07/05/2016 - 18:58 नवीन
इ मी फिने, थँक यौ! होव अरे यौ? लॉन्ग तिने नो सी!! सान्द्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

में तू फिने. नो सी कॉज़ अस ऑफ़

धनंजय माने
Tue, 07/05/2016 - 19:04 नवीन
में तू फिने. नो सी कॉज़ अस ऑफ़ नाउ अ बी अ बी अ बी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ससुरे तुमको दसीयन बार बोले

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 07/05/2016 - 20:35 नवीन
ससुरे तुमको दसीयन बार बोले रहे, ऊ मुगलसराय स्टेशन के बाहेर का भांग मत खाया करो! हल्ला मचाने लागते हाओ भाईबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

वोही वाला गांजा का भाईबा.

धनंजय माने
Tue, 07/05/2016 - 21:25 नवीन
वोही वाला गांजा का भाईबा. अबै आदत लग गया है तो लग गया है, का कर सकते है बताइये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अध्यात्मिक वाटतंय का ?

खटपट्या
Tue, 07/05/2016 - 21:41 नवीन
अध्यात्मिक वाटतंय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

एकदम ट्रान्स.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 11:23 नवीन
एकदम ट्रान्स. आता स्वतःची स्वतः काही थिअरी बनवायची, चार glorified फोटो काढायचे आणि करायचं सुरु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA

नूतन सावंत
Wed, 07/06/2016 - 14:28 नवीन
मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत. वाशी,नवी मुंबई कट्ट्याचे जोरदार वारे व्हायला लागले आणि पावसाला जोर चढायला लागला.कोण कसे येणार ठरायला लागलं.उल्काने मला फोन करून आपण सोबत जाऊ असे सांगितलेले.बोरीवलीहून वाशी बसने जाऊ किंवा ड्रायव्हर मिळाला तर गाडीने जाऊ.एकतर पाऊस आणि मला सोबत न्यायची होती हिरव्या गुलाबाची रोपे.ती रोपे छत्री,पाण्याची बाटली सावरत बोरिवलीपर्यंत धोधो कोसळणाऱ्या पावसात रिक्षा किंवा बसने जाणे म्हणजे निघाल्या निघाल्या सचैल स्नान घडणार होते.म्हणून गाडीचालकाचा शोध अपरिहार्य ,तो सापडलाही,पण त्याला पण तीन दिवसांची ऑफर आल्याने त्याला एका दिवसासाठी अडकवून ठेवणे योग्य वाटले नाही.मग ओला कॅबच्या नादाला पहिल्यांदाच लागायचे ठरले.उल्काने आदल्याच दिवशी मुलाला बरे नाही म्हणून येऊ शकत नसल्याचे कळवलेले. सकाळी ओला कॅब बोलावून निघाले.कांदिवलीला पोचले तर उल्काचा फोन,”अग तू केव्हा निघणार?”माझे लोकेशन सांगितल्यावर, तिने कुठे घेऊन पाणी साचलंय का?पाऊस कितपत पडतोय वगैरे हवामानाचा अंदाज घेऊन मी उशिरा येईन असा,निरोप दिला..रविवार असल्याने ट्रॅफिक नसल्याने मी तासाभरात म्हणजे ११ वाजताच NMSA ला पोहोचले.तिथे पोचल्यावर लक्षात आलं, ”मी पयली.”(हाहाहा). रिसेप्शन काऊंटरवर चौकशी केलीत्यांनी पहिल्या मजल्यावर जा असे सांगितले.पण तिथेच लॉबीमध्ये बसले.इतक्यात यजमान पतीपत्नी आले.ते रिसेप्शन काऊंटरवर बोलत होते,पण ओळख नव्हतीच.थोड्यावेळाने ते उभयता माझ्याजवळ येऊन विचारपूस करू लागले.मिपाकर हा पासवर्ड घातल्याबरोबर लॉगिन झाले.मिपाधर्माप्रमाणे ओळख नाहीय असे वाटलेच नाही. आम्ही बोलत असतानाच प्रचेतस,सगा आणि गणामास्तर(यांना पूर्वी पहिले नव्हते पण काही कट्ट्यांच्या वृतान्तातील फोटोंमुळे चेहरा ओळखीचा वाटत होता.)आले.वल्लीच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे लगेच लक्षात आले,कि हे पिंचीकर.वल्ली यानेकी प्रचेतस आणि सागा यांना मागच्या पुणे कट्ट्याला भेटले होतेच.त्यांचे काही मुंबईकरांकडे लक्ष नव्हते.मीच पाटील पतीपात्नीना हे पिंचीकर असल्याचे सांगितले.आम्ही त्याच्याकडे जाईपर्यंत त्यांनी कंजूसकाकांना फोन लावून ते पोचल्याचे सांगितले.आम्हा तिघांची नजर चुकवून ते पहिल्या मजल्यावर पोहोचलेले.काय करणार? आम्ही तिघेही त्यांना भेटलोच नव्हतो. इतक्यात पुणेकर आणि रसायनीकर,बोईसरकर,ठाणेकर,सानपाडाकर,पनवेलकर मिपाकर येऊन पोचल्या आणि पोचले.आणखी .काही मिपाकरही आले. त्यांची ओळख नव्हती पण त्याने काही बिघडले नाही.आणि आम्ही त्या अवाढव्य रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला.बघता बघता कोरम पूर्ण झाला.बसण्यासाठी यूटाईपमध्ये टेबले लावण्याची मागणी व्यवस्थापकांनी फेटाळून लावली.मंडळी त्याचे काही वाटून न घेता पटापट खुर्च्या पकडून बसली सुद्धा. पुणेकर आणि ठाणेकरांनी आणलेला खाऊ उघडून खायला सुरुवात केली आणि तिथले व्यवस्थापक धावून आले.”ये खाना आप नाही खा सकते.”त्यांनी फतवा काढला.पण मिपाकर कसले?शिबिआयच्या आप्प्याची चव मांडीवर डबा ठेऊन घेत होते.टकाने सुरळीच्या वाड्या आणल्या होत्या तर सगाने चितळ्यांची बाकरवडी आणलेली.त्याही हळूहळू संपल्या असत्या.पण विलास पाटील साहेबांनी त्यांच्यातर्फे सगळ्यांसाठी मंचाव सूपची ऑर्डर दिल्मुळे त्या लपवण्यात आल्या.(सगा,एक पाकीट माझ्याकडे आलाय बरं का. पुढच्यावेळी पण आणा बरंका आणि टका,अशावेळी गोड आणायचं ना राव.’ऐतिहासिक’ कट्टा होता.) इथून पुढे गप्पा ,गप्पा आणि फक्त गप्पाच.सूप घेतल्यावर सगळे अर्ध वर्तुळात उभे राहून फोटोसेशन आणि ओळखीचा कार्यक्रम पार पाडला.स्वीटटॉकर आणि अजया यांनी तेवढ्या गडबडीत डोके जागेवर ठेऊन सर्वांच्या जेवणाची ऑर्डर दिली आणि व्यवस्थापकांच चेहरा हसरा होऊन जीव भांड्यात पडला.एव्हाना काहीजण (कंजूस काकांमुळे कळलं की त्यला सोनेरी धान्यपेय म्हणतात.) घेत खुलू लागले होते. इथून पुढे किसन शिंदेंचा हा प्रतिसाद वाचावा. तिथून पुढे ;-आदितीजोशी त्याच्या एका मैत्रीणीला घेऊन उरणहून आल्या.तीनच्या सुमाराला उल्का आली.तोपर्यंत जेवण संपत आले होते.त्याची भरपाई तिने दोन कुल्फी खाऊन केली. गप्पा मारत मारत सगळे निघालो.व्यवस्थापकांनी सगळे व्यवस्थित झाले का?जेवण आवडले का?इत्यादी व्यावसायिक चौकशा केल्या.इतक्या सुंदर सोहळ्याला गालबोट म्हणून तुम्ही फिन्गरबोल दिले नाहीत याची तक्रार करण्यात आली.पुन्हा बाहेर पायऱ्यांवर फोटोसेशन झाले.गप्पा चालूच होत्या.मुविनी टकाच्या लग्नाचे फारच मनावर घेतलेले दिसले.गॅरी ट्रुमन येणार म्हणून अजून थोडावेळ थांबायचे ठरले. पुणेकर आणि पिंचीकर,सानापाडाकर, पनवेलकर निघाले. चहा मिळेल का?, अशी विचारणा कोणीतरी केली.एव्हाना मूवी आमन्त्रिताच्या भूमिकेतून आयोजकाच्या भूमिकेत शिरलेले होते.(जाणकारांनी कारण ओळखले असेलच).(मुविह.घ्या.,)”कोणाकोणाला हवाय चहा ?’’त्यांनी विचारणा केली.पटापटा हात वर झाले.कोणीतरी शंका काढली,”पण मिळेल का?”आयोजकाच्या भूमिकेत शिरलेले मुवि,”मी आहे ना?चला माझ्याबरोबर म्ह्णत CLOSED चा बोर्ड लागलेले दार ढकलतत रेस्टॉरंटमध्ये शिरले.त्यामागून सगळे मिपाकर आणि सगळ्यात शेवटी पाटील पतीपत्नी.पेमेंट काऊंटरवर कॅशियरबरोबर हिशेब पाहत असलेला व्यवस्थापक आ वासून पाहताच राहिलेला. पुन्हा गप्पा सुरूच होत्या,चहा आला,गॅरीभाऊसुद्धा आले. त्याच्याबद्दल ते एखाद्या स्कॉलरसारखे दिसत असतील ह् अटकळ खरी ठरल्याचे पाहून आनंद वाटला.पुन्हा ओळखपरेड होऊन समारंभ आटोपता घेण्यात आला.उरलेल्या चौदाजणांचा आवाजही चाळीसजणांएवढाच होता हे नमूद करणे आवश्यक आहे.निघताना व्यवस्थापकांनीपुन्हा एकदा,” व्यवस्था कशी वाटली?” हे विचारताना,”आपका कौनसा ग्रुप?’हेही विचारले ,तेव्हा आजच्या पाहुण्यामध्ये निम्मे एकमेकांना पाहिल्यान्दा भेटले होते आणि पाटील पतीपात्नीना सगळेच पाहिलांदा भेटले होते , हे ऐकून पुन्हा आ वसाला. मग मात्र तिथून आम्ही सगळेच निघालो आणि कट्टा सुफळ संपन्न झाला. अवांतर:-श्री विलास पाटील यांना असोशिएशनच्या व्यवस्थापने नोटीस दिली पाहिजे असे तिथल्या कर्मचाऱ्यांचे मत उघडपणे दिसून येत होते.
  • Log in or register to post comments

मस्त सविस्तर वृत्तांत.

उल्का
Wed, 07/06/2016 - 16:25 नवीन
मस्त सविस्तर वृत्तांत.
मिपाकर हा पासवर्ड घातल्याबरोबर लॉगिन झाले. मिपाधर्माप्रमाणे ओळख नाहीय असे वाटलेच नाही.
अगदी खरं. हा वृत्तांत वाचून रविवार महाकट्टा डोळ्यासमोर आला. एक दुरुस्ती - मी दोन नाही दीडच कुल्फी खाल्ली गं. हो, उगीच सगळे खादाड समजतील ना. :प =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

मी

अदि
गुरुवार, 07/07/2016 - 19:49 नवीन
इतक्यात प्रतिसाद लिहिणारच नव्ह्ते मुळी.. आम्ही उशिरा येउन लवकर गेलो तरी काय झालं, बोका सरांनी आमचा फोटो टाकायला हवा होता.. :( :( :P ;) सुरन्गी तै, अदिती जोशी नाही, अदिती पाटील म्हात्रे. आणि ती माझी बहिण होती.. :) :D...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

अहो दिलाय तुमचा फोटो अजयातैंना!

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/07/2016 - 19:59 नवीन
त्यांच्या हातून राहून गेला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

लग्नात येऊन सुद्धा अल्बम

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 21:08 नवीन
लग्नात येऊन सुद्धा अल्बम मध्ये नसल्यावर काय दुक्ख होतं ते यांना काय ठाऊक ;) (सगळ्या पार्ट्यांनी हलकं घेऊन लवकरात लवकर करवलीचा रुसवा काढावा. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

लग्नात येऊन सुद्धा अल्बम

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 21:08 नवीन
लग्नात येऊन सुद्धा अल्बम मध्ये नसल्यावर काय दुक्ख होतं ते यांना काय ठाऊक ;) (सगळ्या पार्ट्यांनी हलकं घेऊन लवकरात लवकर करवलीचा रुसवा काढावा. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

रुसु नको बाई! राहून गेला एवढया फोटोत तुझा फोटो!

अजया
Fri, 07/08/2016 - 09:59 नवीन
Image removed. अदि- काळा ड्रेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

कान पकडून आय माय स्वारी बरंका

नूतन सावंत
Sat, 07/09/2016 - 14:42 नवीन
कान पकडून आय माय स्वारी बरंका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि

अप्रतिम

सविता००१
Wed, 07/06/2016 - 16:18 नवीन
वृत्तांत, कट्टा आणि फोटोज. जबराट
  • Log in or register to post comments

चांगला लिहिलाय वृतान्त

कंजूस
Wed, 07/06/2016 - 16:28 नवीन
चांगला लिहिलाय वृतान्त सुरन्गी.मिपाकरांचा हा पहिलाच महाकट्टा झाला म्हणून सगळे अतिउत्साहात होते.तसा एक वार्षिक कट्टा करण्याचा प्रयत्न कशेळे येथे मागच्या वर्षी झाला होता.ती जागा एवढी दूर रानात असूनही २६ जण जमलेले.त्याअगोदर घारापुरी लेण्यासाठीही २८ जण होते.शहरांमध्ये जागेची अडचण होत आहे आणि महागही होत आहेत.हॅाटेलात घरून/बाहेरून आणलेले पदार्थ खाऊ देत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवलेच पाहिजे.उगाच बोलून घेण्यात काय मजा? पुढच्या वेळेस अशा जागा निवडायला हव्यात अथवा हे टाळायला हवे.
  • Log in or register to post comments

=)))

अजया
Wed, 07/06/2016 - 16:43 नवीन
=))) माझ्या डोळ्यासमोर कुल्फीमागुन कुल्फी हादडणारी उल्का आलीच!!!
  • Log in or register to post comments

हाहाहा

उल्का
Wed, 07/06/2016 - 16:52 नवीन
=)) =)) तुझा एक वाटा व शिबीआय चा एक वाटा जास्तीचा खाल्ला. टुक टुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

दोनशे करा आता! जवळ आलंय.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 17:36 नवीन
दोनशे करा आता! जवळ आलंय. आणि ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतंय का? खर्च किती आला होता? (जेवण/ स्टार्टर/ सोनेरी पेय) किती मेंबर कमीत कमी लागतात टेबल बुक करायला?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा