✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आठवतेय का?

र — रातराणी, Wed, 07/06/2016 - 13:37
आठवतेय का? पावसातली पहिली भेट धुक्याची दुलई पांघरूण लपुन बसलेली वाट आणि तोल जाता जाता तू हाती घेतलेला हात ओल्या गवताळ मातीचा थंड हुळहुळता स्पर्श आणि भिजल्या पापण्यात तुझ्या श्वासांची ऊब मला उगीच असलेली घरी जायची घाई आणि तुझ्या आर्जवात शहारलेली जाईजुई डोळ्यांनीच दिलेघेतलेले कितीतरी मुके निरोप आणि परतीच्या वाटेवर हरवलेली दोन मनं आठवतेय ना? पावसातली पहिली भेट

प्रतिक्रिया द्या
7193 वाचन

💬 प्रतिसाद (38)

:)

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 14:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments

:)

चांदणे संदीप
Wed, 07/06/2016 - 14:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
Wed, 07/06/2016 - 15:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments

..

नाखु
Wed, 07/06/2016 - 15:13 नवीन
..
  • Log in or register to post comments

अत्यंत अप्रतिम अशी कविता आहे,

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 15:39 नवीन
अत्यंत अप्रतिम अशी कविता आहे, आशयघनता तर इतकी आहे की मी तर प्रत्येक शब्दाच्या प्रेमात पडलोय, म्हणजे कसंय की मराठी सारस्वताच्या दरबारात सादर केलेल्या ह्या काव्यरचनेने जे अभूतपूर्व असे मापदंड तयार झालेले आहेत त्या मापदंडांनी उरलेल्या सार्‍या स्वयंघोषित नवकविंना मजबूत मार देउन त्यांच्याकडून ह्याच तोडीची एखादी तरी ओळ लिहिल्याशिवाय मराठी काव्याच्या दरबारात पुनः पाउल ठेवण्याची बंदी करायला पाहिजे. धुक्याची दुलई, हुळहुळता स्पर्श, शहारलेली जाइजुई, मुके निरोप अशा ज्या अनवट कल्पनांचा स्वयंघोषित कवयित्रीने (सौ. बिरुटे सर) अलवार वापर केलेला आहे त्याला दडप्या पोह्यावर पेरलेल्या कोथिंबिरीशिवाय दुसरी उपमा सुचत नाही. दुसरी उपमा असो की तिसरा उपमा, रवा भाजताना जो खरपूस सुवास किचनभर व्यापून उरतो त्याच पध्दतीने ह्या काव्यरचनेचा काव्यगंध मिपाभर घुमत आहे. . (सगळ्यांच्या स्मायल्यांचे प्रतिसाद बघून बोअर झाले म्हणून एवढे खरडण्यात आलेले आहे. त्या स्मायल्याप्रमाणेच हाही प्रतिसाद हिजहायनेस रातराणी हलकेच घेतील एवढे बोलून मी भाषण संपवतो. धन्यवाद. जय सगळे,)
  • Log in or register to post comments

अरे अभ्या स्पष्ट लिहित जा रे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 15:55 नवीन
सौ.बिरुटे सर चा लॉंग फॉर्म सौजन्य बिरुटे सर असं स्पष्ट लिहित जा भो. :( बाकी कवितेवरील भाष्य अप्रतिम. अभ्या कवितेतील दोन ओळी ज़रा उलगडुन दाखवता का प्लीज - "डोळ्यांनीच दिले घेतलेले कितीतरी मुके" हे डोळ्यांनी ''मुके''कसे घेतात. की कविता समजण्यात माझा काही घोळ होत आहे. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सर निरोप पण घ्या की!

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 15:58 नवीन
सर निरोप पण घ्या की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सॉरी बरका सर, मनापासून माफी

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 15:59 नवीन
सॉरी बरका सर, मनापासून माफी मागतो मी. बाकी डोळ्यांचे मुके ट्रॅडिशनल मुक्याप्रमाणेच असावेत असे वाटते, बुबळे बाहेर आले नाहीत म्हणजे बरे (कोणाचा घेतलाय ते बघायला बरका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 16:30 नवीन
>>>>>बुबळे बाहेर आले नाहीत म्हणजे बरे... =)) अभ्या, ओठांनी डोळ्याचं घेतलेलं चुंबन हे प्रेमाचं प्रतीक असतं. डोळ्यांनी घेतलेलं चुंबन कशाचं प्रतिक मानलं पाहिजे ? "उसने कहा था मेरे सिवा किसी से मोहब्बत ना करना.... बस फिर क्या था मोहब्बत की नजर से हमने खुद को भी नहीं देखा...." -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आहाहाहा, क्या नजाकत, क्या

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 23:41 नवीन
आहाहाहा, क्या नजाकत, क्या आशिकी.. . डोळ्यांनी घेतलेलं चुंबन हे माझ्या मते अस्सल रसिक मनाचे प्रतीक असावे. प्रेमाचे रसग्रहण ओठ करू शकतील हो पण दीदार ए यार जो चीझ है, अहाहा..... ती डोळ्यांची भाषा समजायचे म्हणजे खायचे काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 15:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या लका तुझ्या कीबोर्डला

रातराणी
Wed, 07/06/2016 - 16:30 नवीन
अभ्या लका तुझ्या कीबोर्डला काही हाड. :) आपण सगळे प्रतिसाद हलकेचं घेतो. डोळ्यांनी मुके न घेता येणाऱ्या सर्वानी आर्चीकडे शिकवणी लावावी. निरोप घ्यायचं मग शिकवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वर :) असं केलेले सगळे

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 15:56 नवीन
वर :) असं केलेले सगळे दुदुदुदु लोक आहेत. :)
  • Log in or register to post comments

=))))

अजया
Wed, 07/06/2016 - 15:57 नवीन
=)))) अभ्याजींचा प्रतिसाद कवितेचं रसग्रहण कसे करावे याचा वस्तुपाठच!
  • Log in or register to post comments

सध्ध्या चेकाळलय ते

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 16:02 नवीन
सध्ध्या चेकाळलय ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

गप्पे, आज बुधवार हाय.

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 16:07 नवीन
गप्पे, आज बुधवार हाय. साप्ताहिक सुट्टीचा हापिसात बसलोय. गिर्हाईक नाही. मग करावे लागते काहीतरी असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुमच्यात कोण 'तो' आहे का नाही

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 16:14 नवीन
तुमच्यात कोण 'तो' आहे का नाही? 'ते' टक्या, 'ते' अभ्या??? काय चाललंय काय??? (तो फळा ती शाळा ते मास्तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

'ते' कसं असतंय म्हैते का

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 16:26 नवीन
'ते' कसं असतंय म्हैते का प्यार्‍या, आदरार्थी टोपनणाव हाय ते, जसे 'ते अभ्या' हे प्रेमाने प्लस आदराने मिळणारे संबोधन आहे. तुला त्याची सवय नाही आणि मिळनारही नाही तेव्हा सोड इचार. गप्प राव्ह हाय त्या आयडीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

खिक्क्क!

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 16:36 नवीन
खिक्क्क! एक इचारलं तर धा सांगायलंय. उगा हानायलंय. आसु दे आसु दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खिक्क्क!

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 16:36 नवीन
खिक्क्क! एक इचारलं तर धा सांगायलंय. उगा हानायलंय. आसु दे आसु दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्या प्रतिसादासाठी मा.

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 16:06 नवीन
ह्या प्रतिसादासाठी मा. अजयाताईचा कट्टयाचे आमंतरण परहस्ते पाठवल्याचा गुन्हा माफ करण्यात आला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

बस का अभ्या :-/

अजया
Wed, 07/06/2016 - 16:27 नवीन
बस का अभ्या :-/
  • Log in or register to post comments

छान पावसाळी कविता.

प्रचेतस
Wed, 07/06/2016 - 16:34 नवीन
छान पावसाळी कविता. अभ्याच्या प्रतिसादानं हहपुवा झाली.
  • Log in or register to post comments

अभ्याजीं ??

कपिलमुनी
Wed, 07/06/2016 - 16:57 नवीन
Image removed. आजकल तो बिस्कीटको भी पारले जी केहना पडता है
  • Log in or register to post comments

कपिल पा जी, आपके जी मे काड्या

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 17:05 नवीन
कपिल पा जी, आपके जी मे काड्या करनेका बहोत जी कर रहा है. ;) . बादवे कप्प्या लका पार्टी दे की. (ह्या रातराणीच्या कवितेचा न्हाय दिवसभरात खरडफळा केला तर नावाचा अभ्याजी नाही ;) ओ तुम्ही परत एकदा दुस्सरी टाका हो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आणि मग खरडफळ्याचं काय करणार

रातराणी
Wed, 07/06/2016 - 17:12 नवीन
आणि मग खरडफळ्याचं काय करणार हैस रे लिंबूटिन्बु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हायला टक्याच वाटला मला.

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 17:16 नवीन
हायला टक्याच वाटला मला. खरडफळ्याला लिंबू बांधायचेय आता. नजर लागली कुणाची तरी. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

टक्याकडेचं असतील बघ लिंब. एक

रातराणी
Wed, 07/06/2016 - 17:30 नवीन
टक्याकडेचं असतील बघ लिंब. एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू म्हणत होत्या म्हणे काही ललना कट्ट्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ललना???

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 17:43 नवीन
ललना??? त्या पूर्वी जेम्स बॉण्ड च्या पिक्चरच्या झैरातीत लिहायचे तसल्या ललना आलेल्या कट्ट्याला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हो आहेत...मिर्ची आणि लिंब..

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 17:48 नवीन
हो आहेत...मिर्ची आणि लिंब...एकत्रच...कोणाला हवीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

बकरी ईद ला वेळ आहे अजून.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 17:51 नवीन
बकरी ईद ला वेळ आहे अजून. आत्ताच कापाकापी नको. आत्ता आहे ती रमजान ईद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपण तेव्हाच कापू हं तुला =))

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 18:02 नवीन
आपण तेव्हाच कापू हं तुला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

बघ रे टक्या, जरा जपून.

अभ्या..
Wed, 07/06/2016 - 18:19 नवीन
बघ रे टक्या, जरा जपून. ते काही प्राणी निषिद्ध वगैरे असतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जे म्हणतं तेच असतं.

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 18:40 नवीन
जे म्हणतं तेच असतं. लुलुलुलुलु वगैरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पेटतंय आता युद्ध!

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 17:17 नवीन
पेटतंय आता युद्ध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

छान आहे कविता

जगप्रवासी
Wed, 07/06/2016 - 18:09 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments

अरे अरे

चांदणे संदीप
Wed, 07/06/2016 - 18:55 नवीन
लैच्च धुरळा उडला हिथे... =))
  • Log in or register to post comments

चांगले प्रतिसाद देणाऱ्या

रातराणी
Wed, 07/06/2016 - 23:18 नवीन
चांगले प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार आणि दंगा करणाऱ्या सर्वांना :) :) :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा