✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

ब
बोका-ए-आझम यांनी
Sun, 07/03/2016 - 23:42  ·  लेख
लेख
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
समाज
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
69054 वाचन

💬 प्रतिसाद (220)

प्रतिक्रिया

वाह! क्या बात है! मस्तं

पद्मावति
Sun, 07/03/2016 - 23:47 नवीन
वाह! क्या बात है! मस्तं वृत्तांत.
  • Log in or register to post comments

+१ भारी लिहीलाय वृत्तांत!!!

जव्हेरगंज
Sun, 07/03/2016 - 23:53 नवीन
+१ भारी लिहीलाय वृत्तांत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

फोटो टाका लवकर. नायतर कट्टा

खटपट्या
Mon, 07/04/2016 - 00:37 नवीन
फोटो टाका लवकर. नायतर कट्टा आभासी समजणेत येइल...
  • Log in or register to post comments

विरुभौ,कट्टा म्हणजे आभासी

नूतन सावंत
Mon, 07/04/2016 - 08:28 नवीन
विरुभौ,कट्टा म्हणजे आभासी जगातल्या व्यक्तिरेखा खऱ्याखुर्या असल्याचा अनुभव घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मस्त

महामाया
Mon, 07/04/2016 - 00:41 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

मस्त!!!

पिलीयन रायडर
Mon, 07/04/2016 - 04:09 नवीन
मस्त!!! फोटो पाहिलेतच, आता ओळख परेड होउ दे!
  • Log in or register to post comments

सलाम साहेब..सलाम!!

असंका
Mon, 07/04/2016 - 08:06 नवीन
सलाम साहेब..सलाम!! खरोखरच महाकट्टा झालेला दिसतोय ! फोटोसाठी धीर धरलेला आहे...
  • Log in or register to post comments

ओ बोक्याभौ आमचं मीरारोड

नूतन सावंत
Mon, 07/04/2016 - 08:24 नवीन
ओ बोक्याभौ आमचं मीरारोड विसरले बघा तुम्ही.नि आपलं शिवाजीपार्कपण विसरले.ते आधी समाविष्ट करा.बाकी फुरसदीत.
  • Log in or register to post comments

चिंचवडहून मी, गणामास्तर आणि

प्रचेतस
Mon, 07/04/2016 - 08:25 नवीन
चिंचवडहून मी, गणामास्तर आणि गावडे सर निघालो ते ८ वाजता. धुव्वांधार पाऊस चालू होता. घाटात वातावरण अगदी तुफ्फान होतं. चोहोंबाजूंनी ढगांनी वेढून घेतलं होतं. धबधबे अक्षरश: कोसळत होते, ओहोळ फ़ुफ़ाटलेले होते. लोणावळ्यात एके ठिकाणी मिसळ खायला थांबलो तो एक वेगळाच किस्सा. :) साडेआकाराच्या आसपास वाशीत पोहोचलो. NMSAच्या आवारात येताच कंजूसकाका येताना दिसले. रिसेप्शनपाशीच श्री व सौ पाटील व सुरंगीताईंची भेट झाली. पाटलांबरोबर NMSA हिंडून पाहिलं. खूप छान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते. एकेक कट्टेकरी हळूहळू येत गेले मग काय गप्पांना बहार नुसता. प्रासदादाला जवळपास ३ वर्षांनी भेटून खूप आनंद झाला. पुण्यातली चांगली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करू लागलेल्या पिंगूची भेट झाली. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कंजूस काकांसोबत लवकरच विसापूर भटकंतीचा बेत ठरला. अजया, बोकेश, टका आणि श्री. विकास पाटील ह्यांचे नेटक्या आयोजनाबद्दल ख़ास कौतुक आणि आभार्स. बऱ्याच सदस्यांशी पहिल्यांदाच भेट झाली. एकूणातच मिपाकर्स - यु मेड माय डे. :)
  • Log in or register to post comments

आगोबा आला , पऩ पांडू नै आला.

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/04/2016 - 09:10 नवीन
आगोबा आला , पऩ पांडू नै आला. तरी कट्टा छान झाला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पांडू नै आला म्हणून तुम्हीही

प्रचेतस
Mon, 07/04/2016 - 09:17 नवीन
पांडू नै आला म्हणून तुम्हीही नै आले तरीही कट्टा छान झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/04/2016 - 14:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नेहमीच्या स्मायल्या जौन

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 14:54 नवीन
नेहमीच्या स्मायल्या जौन बाळाच्या स्मायल्या आल्यात असे एक निरिक्षण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आयला हो रे!

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 21:10 नवीन
स्वानंदी स्वानंदी म्हणतात ती हीच काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चुप्रे

बॅटमॅन
Tue, 07/12/2016 - 01:13 नवीन
अच्रत बव्लत कुथ्ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोणावला सोडल्यावर गनामास्तरने

सतिश गावडे
Mon, 07/04/2016 - 10:19 नवीन
लोणावला सोडल्यावर गनामास्तरने अचानक गाडी उजवीकडे एका छोट्या रस्त्यात टाकली. आम्ही इकडे कुठे चाललो आहोत असे विचारले तर म्हणाला, चला तर. पाचेक मिनिटांचा एक चढ चढल्यावर आम्हाला दिसली Image removed. आम्ही तिथे मागवली Image removed. मिसळ इतकी अफलातून होती की आम्ही त्यांना म्हटले की तो आधीचा छोटा फलक तुमच्या मिसळीला न्याय देत नाही. मग त्यांनी आम्हाला मोठा बोर्ड दाखवला Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ह्या हे काहीच नाही

चौकटराजा
Mon, 07/04/2016 - 10:13 नवीन
कालच टी व्ही वर पुण्यातला पाउस दाखवला त्यात सिंहगड रोडला " पांडूची मिसळ " असा बोर्ड पाहिला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

=)) =)) =)) =)) =))

किसन शिंदे
Mon, 07/04/2016 - 10:32 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ठ्ठो आणि ठ्ठो =))

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 10:53 नवीन
ठ्ठो आणि ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पांडूची मिसळच की अजून काही?

बॅटमॅन
Tue, 07/12/2016 - 01:14 नवीन
पांडूची मिसळच की अजून काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

माझी मिसळ केलीत क्काय

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/04/2016 - 11:10 नवीन
माझी मिसळ केलीत क्काय मेल्यांन्नो! Image removed. थांबा अता बघतो एकेकाकडे! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जबरदस्त कट्टा.

शान्तिप्रिय
Mon, 07/04/2016 - 08:33 नवीन
जबरदस्त कट्टा. फोटो ची वाट पाहातोय
  • Log in or register to post comments

कट्ट्याला आलेल्या

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 09:19 नवीन
सर्व हौशी फटूग्राफरांनी क्लिकवलेले फटू इथे लवकर पेष्टवावेत ज ही णम्र विणंती!
  • Log in or register to post comments

चाsssळीस मिपाकर ?! फारच जंगी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/04/2016 - 09:27 नवीन
चाsssळीस मिपाकर ?! फारच जंगी कट्टा झालेला दिसतोय असावा... "दिसतोय" असे फोटो पाहिल्यावर म्हणण्यात येईल ! ;) :)
  • Log in or register to post comments

फोटो!

अजया
Wed, 07/06/2016 - 14:00 नवीन
Image removed. डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री Image removed. Image removed. डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे Image removed. डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. गॅरीभौ आले एकदाचे!(दरवाजापाशी) Image removed. Image removed. अनाहिता आणि लाडोबा! Image removed. फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments

एकूण (साखळी) वृत्तांत

नाखु
Mon, 07/04/2016 - 13:04 नवीन
आवडलाच पण हा शेवटातला फोटो खास.. लाडोबा पळण्याच्या तयारीत असल्याचा अविर्भाव का ब्रे घेतला असावा? नेमकी त्या दिवशी मुलाची आंतरशालेय स्पर्धा असल्याने (आणण्याची सोडण्याची जबाबदारी असलेने येता आले नाही) तरीही अत्यंत मोकळ्या मनाने रा रा वल्ली,सगा आणि गणामास्तराम्नी येताना धावती भेट घेतली व कट्टा जोरर्दार झाल्याचे कालच कळविले. यशस्वी कट्ट्याबद्दल दोडोबासहीत सर्व स्वय्म्सेवकांचे अभिनंदन. अवघा हल्कल्लोळ करावा मिसळपाव धर्म जागवावा हेच खरे ! वाचकांची पत्रे मधून नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

फोटोंतील व्यक्तींची नावे त्या

एस
Wed, 07/06/2016 - 12:34 नवीन
फोटोंतील व्यक्तींची नावे त्या-त्या फोटोखालीच दिल्यास बरे पडेल. मोबाईलवर सारखं वर जा - खाली ये असं स्क्रोल करावं लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

परिचय जमला नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 12:59 नवीन
मलाच फोटो टाकून व्यवस्थित लिहावं लागतं बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खाली कंजूसकाकांनी दिलेल्या

एस
Wed, 07/06/2016 - 16:55 नवीन
खाली कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये. उदा. मीता की शीबीआय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मीताच

अजया
Wed, 07/06/2016 - 17:28 नवीन
मीताच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सोडून द्या ना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/06/2016 - 18:19 नवीन
>>>> कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये. नका लागू देऊ सांगड आणि क्रम, सोडून द्या. कट्टा झाला, छान झाला किस्सा खतम :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मस्त कलंदर या स्त्री आयडी

खटपट्या
Wed, 07/06/2016 - 22:02 नवीन
मस्त कलंदर या स्त्री आयडी आहेत हे माहीत नव्हते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

इथे पुन्हा देतोय फोटो-

कंजूस
Mon, 07/04/2016 - 09:39 नवीन
इथे पुन्हा देतोय फोटो- फोटो- १ ) ओळखपरेड Image removed. फोटो पहिला ओळखपरेड उजवीकडून आइडीनावे बोका-ए-आझम, वि पा विलास पाटील, निशदे, किसन शिंदे, विमे, प्रास, प्रणव जोशी, कोमल (विपाकन्या), सौ० (मामलेदारचा पंखा), (१), (२), (३), (४) आणि चि० २ ) ओळखपरेड Image removed. फोटो दुसरा ओळखपरेड () चिरंजीवसह पासून डावीकडे सौ पाटील, त्रिवेणी, शिबिआइ, (४), स्वीट टॅाकरीण, स्वीट टॅाकर, मस्त कलंदर आणि हातात मोबाइल असलेल्या अजया. ३ ) ओळखपरेड Image removed. फोटो तिसरा ओळखपरेड मोबाइलने फोटो काढणाय्रा अजया पासून डावीकडे सुरंगी, फोटो काढणारे 'माझीही शॅम्पेन, हेमन्त वाघे, टवाळ कार्टा, डॅा सुबोध खरे(कोकाकोला घेतलेले), संदीप डांगे, प्रचेतस(=वल्ली निळा टी शर्टमध्ये), सतीश गावडे, मुक्तविहारि(मुवि), मामलेदारचा पंखा. ४ ) निघण्याअगोदर Image removed. ५ ) निघण्याअगोदर Image removed. ६ ) छत्री धरलेली चि० निलापी Image removed. ७ ) शेवट गोड तर सर्वच गोड- चहा घेतल्यावर. खरे( डॅाक्टरेट) क्लिंटन ( मागे उभे लाल टीशर्टात ) सांगितल्याप्रमाणे आले आणि खरे डॅाक्टर कुठेत विचारलं तेव्हा हास्यकल्लोळ. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/04/2016 - 09:45 नवीन
मिपाकरांची लक्षणीय उपस्थिती. खऱ्या अर्थाने महाकट्टा. बोका ए आझम आणि अजयाचे अभिनंदन. काय काय गप्पा झाल्या, माझ्याशी मैत्री करशील का, असे व्य नि कोणा कोणाला आले, वगैरे चर्चा झाल्या की नाही ? एक आयडी मेला की पुन्हा दुस-या आयडीने वर तोंड करून प्रतिसाद देणा-याबद्दल काही चर्चा झाली की नाही. बाकी, फोटोत धन्या, वल्ली, अजया, माऊ, डॉ. सुबोध,प्रास, निखिल, मस्त कलंदर, इतकेच ओळखता आलेत. बाकीच्यांचाही परिचय व्हावा.हरकत नसेल तर ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आता पूर्ण विश्वास बसला. फारच

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/04/2016 - 09:49 नवीन
आता पूर्ण विश्वास बसला. फारच जंगी भन्नाट कट्टा !! :)
  • Log in or register to post comments

फोटो क्र.१

अजया
Mon, 07/04/2016 - 09:50 नवीन
फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत....

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 09:53 नवीन
निदान पुढील ३-४ वर्षे मी डोंबोलीत नसेन. त्यामुळे ह्या कट्ट्याला उपस्थित राहणार होतोच. सकाळी सौ.मुविंकडे काही विद्यार्थी जर्मन शिकायला येणार असल्याने, सौ. मुविंना येता आले नाही.
  • Log in or register to post comments

मस्तच......

अनिरुद्ध प्रभू
Mon, 07/04/2016 - 09:56 नवीन
कसलो कट्टो झालो आसा, वाह!!!! क्या बात.... एकदम झकास........ (जावक व्हया होता.......)
  • Log in or register to post comments

झक्कास कट्टा...मस्त वृत्तांत...

जिन्गल बेल
Mon, 07/04/2016 - 10:03 नवीन
+1 झक्कास कट्टा...मस्त वृत्तांत... फोटोस पण छान!!! टाका + अनाहिता... फोटो बघून वाईट हसतेय!!! :) ;) ;) अजून detail येऊदेत!!!
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Mon, 07/04/2016 - 10:08 नवीन
कट्टा दणक्यात झालेला दिसतोय. नवे-जुने-आजी-माजी-भावी मिपाकर एकत्र पाहून मस्त वाटलं.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Mon, 07/04/2016 - 11:24 नवीन
असेच म्ह्नणतो जे बात विमे ला पाहून ब्रे वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

तुम्ही कुठे राहिलात?

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 11:43 नवीन
बुवेश आले नाहीत तुम्ही नव्हतात म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुम्ही काय बी म्हना

चौकटराजा
Mon, 07/04/2016 - 10:09 नवीन
डॉ सुबोध खरे व अजया रॉक ! काहीनी खरे यांच्याकडे "मेंटेन" साठी शिकवणी लावावी.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला उपस्थित

कंजूस
Mon, 07/04/2016 - 10:10 नवीन
कट्ट्याला उपस्थित मिपाकरांशिवाय जे तिथे चर्चेत होते ते मिपाकर- डॅा बिरुटे, पैसातै, नीलकांत, प्रशांत, आत्मबंध ( गुरुजी/बुवा/अत्रुप्त आत्मा), नुलकरकाका, स्पा ( मन्या/स्टीव राजा/स्पान्डुरंग ), दीपककुवेत, दमामि, यशो{धरा}, प्यारे१/धनंजय माने/सर्व नावे, दादा दरेकर/सर्व नावे, प्रमोद देर्देकर, पियुशा, अभ्या टिंबटिंब, चौकटराजा, ब्याटमन, नादखुळा ( पिंचिंवार्तापत्र ), आदूबाळ, विनोद१८, ग्रेटथिंकर, शान्तिप्रिय
  • Log in or register to post comments

अरे वा.

अभ्या..
Mon, 07/04/2016 - 14:16 नवीन
अरे वा. आम्ही चर्चेत होतो म्हणा की. दोन चार डूआयडी वगळता सार्‍या भारी माणसात आमची गणना झाली हे काय कमी. भारी भारी. कट्ट्याचा काउंट वाढलायच मग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/04/2016 - 14:28 नवीन
म्हणजे आम्हीही कट्टयाला उपस्थित होतोच म्हणावं लागेल. काय काय चर्चा झाली, ते पण सांगा भो....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

डॅाक्टरांना मनापासून यायचे

कंजूस
Mon, 07/04/2016 - 14:48 नवीन
डॅाक्टरांना मनापासून यायचे होते पण औरंगाबाद फारच लांब पडले. अभ्याला भेटायला जायचेच आहे ( बदामि ट्रिपच्या निमित्ताने - वल्ली आणि ग्यांग).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जल्ला आमी इकडची काडी तिकडं

प्रमोद देर्देकर
Mon, 07/04/2016 - 15:54 नवीन
जल्ला आमी इकडची काडी तिकडं कर्रीत नै , नी आमची आठवण कस्ली काढतांव. पन आठैन काढल्याबद्दल सर्वांस्नी राम राम बरंका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फोटो पाहिले होतेच!वृत्तांत

इशा१२३
Mon, 07/04/2016 - 10:16 नवीन
फोटो पाहिले होतेच!वृत्तांत वाचून मजा आली.अनाहिता आणि टकाभाउ फोटो.वा! वा! सगळेच फोटो छान.
  • Log in or register to post comments

फोटो पाहिले होतेच!वृत्तांत

इशा१२३
Mon, 07/04/2016 - 10:16 नवीन
फोटो पाहिले होतेच!वृत्तांत वाचून मजा आली.अनाहिता आणि टकाभाउ फोटो.वा! वा! सगळेच फोटो छान.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा