Skip to main content

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!

वाचने 69452
प्रतिक्रिया 220

प्रतिक्रिया

मस्त!!! फोटो पाहिलेतच, आता ओळख परेड होउ दे!

सलाम साहेब..सलाम!! खरोखरच महाकट्टा झालेला दिसतोय ! फोटोसाठी धीर धरलेला आहे...

ओ बोक्याभौ आमचं मीरारोड विसरले बघा तुम्ही.नि आपलं शिवाजीपार्कपण विसरले.ते आधी समाविष्ट करा.बाकी फुरसदीत.

चिंचवडहून मी, गणामास्तर आणि गावडे सर निघालो ते ८ वाजता. धुव्वांधार पाऊस चालू होता. घाटात वातावरण अगदी तुफ्फान होतं. चोहोंबाजूंनी ढगांनी वेढून घेतलं होतं. धबधबे अक्षरश: कोसळत होते, ओहोळ फ़ुफ़ाटलेले होते. लोणावळ्यात एके ठिकाणी मिसळ खायला थांबलो तो एक वेगळाच किस्सा. :) साडेआकाराच्या आसपास वाशीत पोहोचलो. NMSAच्या आवारात येताच कंजूसकाका येताना दिसले. रिसेप्शनपाशीच श्री व सौ पाटील व सुरंगीताईंची भेट झाली. पाटलांबरोबर NMSA हिंडून पाहिलं. खूप छान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते. एकेक कट्टेकरी हळूहळू येत गेले मग काय गप्पांना बहार नुसता. प्रासदादाला जवळपास ३ वर्षांनी भेटून खूप आनंद झाला. पुण्यातली चांगली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करू लागलेल्या पिंगूची भेट झाली. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कंजूस काकांसोबत लवकरच विसापूर भटकंतीचा बेत ठरला. अजया, बोकेश, टका आणि श्री. विकास पाटील ह्यांचे नेटक्या आयोजनाबद्दल ख़ास कौतुक आणि आभार्स. बऱ्याच सदस्यांशी पहिल्यांदाच भेट झाली. एकूणातच मिपाकर्स - यु मेड माय डे. :)

In reply to by प्रचेतस

लोणावला सोडल्यावर गनामास्तरने अचानक गाडी उजवीकडे एका छोट्या रस्त्यात टाकली. आम्ही इकडे कुठे चाललो आहोत असे विचारले तर म्हणाला, चला तर. पाचेक मिनिटांचा एक चढ चढल्यावर आम्हाला दिसली asdf आम्ही तिथे मागवली asdf मिसळ इतकी अफलातून होती की आम्ही त्यांना म्हटले की तो आधीचा छोटा फलक तुमच्या मिसळीला न्याय देत नाही. मग त्यांनी आम्हाला मोठा बोर्ड दाखवला असदफ

In reply to by सतिश गावडे

कालच टी व्ही वर पुण्यातला पाउस दाखवला त्यात सिंहगड रोडला " पांडूची मिसळ " असा बोर्ड पाहिला !

सर्व हौशी फटूग्राफरांनी क्लिकवलेले फटू इथे लवकर पेष्टवावेत ज ही णम्र विणंती!

चाsssळीस मिपाकर ?! फारच जंगी कट्टा झालेला दिसतोय असावा... "दिसतोय" असे फोटो पाहिल्यावर म्हणण्यात येईल ! ;) :)

. डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री . . डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे . डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे . . . . . . गॅरीभौ आले एकदाचे!(दरवाजापाशी) . . अनाहिता आणि लाडोबा! . फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

In reply to by अजया

आवडलाच पण हा शेवटातला फोटो खास.. लाडोबा पळण्याच्या तयारीत असल्याचा अविर्भाव का ब्रे घेतला असावा? नेमकी त्या दिवशी मुलाची आंतरशालेय स्पर्धा असल्याने (आणण्याची सोडण्याची जबाबदारी असलेने येता आले नाही) तरीही अत्यंत मोकळ्या मनाने रा रा वल्ली,सगा आणि गणामास्तराम्नी येताना धावती भेट घेतली व कट्टा जोरर्दार झाल्याचे कालच कळविले. यशस्वी कट्ट्याबद्दल दोडोबासहीत सर्व स्वय्म्सेवकांचे अभिनंदन. अवघा हल्कल्लोळ करावा मिसळपाव धर्म जागवावा हेच खरे ! वाचकांची पत्रे मधून नाखु

In reply to by अजया

फोटोंतील व्यक्तींची नावे त्या-त्या फोटोखालीच दिल्यास बरे पडेल. मोबाईलवर सारखं वर जा - खाली ये असं स्क्रोल करावं लागतं.

In reply to by एस

>>>> कंजूसकाकांनी दिलेल्या फोटोंतील क्रम व तुमचा क्रम यात थोडी सांगड लागत नाहीये. नका लागू देऊ सांगड आणि क्रम, सोडून द्या. कट्टा झाला, छान झाला किस्सा खतम :) -दिलीप बिरुटे

इथे पुन्हा देतोय फोटो- फोटो- फोटो पहिला ओळखपरेड उजवीकडून आइडीनावे बोका-ए-आझम, वि पा विलास पाटील, निशदे, किसन शिंदे, विमे, प्रास, प्रणव जोशी, कोमल (विपाकन्या), सौ० (मामलेदारचा पंखा), (१), (२), (३), (४) आणि चि० २ ) ओळखपरेड फोटो दुसरा ओळखपरेड () चिरंजीवसह पासून डावीकडे सौ पाटील, त्रिवेणी, शिबिआइ, (४), स्वीट टॅाकरीण, स्वीट टॅाकर, मस्त कलंदर आणि हातात मोबाइल असलेल्या अजया. ३ ) ओळखपरेड फोटो तिसरा ओळखपरेड मोबाइलने फोटो काढणाय्रा अजया पासून डावीकडे सुरंगी, फोटो काढणारे 'माझीही शॅम्पेन, हेमन्त वाघे, टवाळ कार्टा, डॅा सुबोध खरे(कोकाकोला घेतलेले), संदीप डांगे, प्रचेतस(=वल्ली निळा टी शर्टमध्ये), सतीश गावडे, मुक्तविहारि(मुवि), मामलेदारचा पंखा. ४ ) निघण्याअगोदर ५ ) निघण्याअगोदर ६ ) छत्री धरलेली चि० निलापी ७ ) शेवट गोड तर सर्वच गोड- चहा घेतल्यावर. खरे( डॅाक्टरेट) क्लिंटन ( मागे उभे लाल टीशर्टात ) सांगितल्याप्रमाणे आले आणि खरे डॅाक्टर कुठेत विचारलं तेव्हा हास्यकल्लोळ.

मिपाकरांची लक्षणीय उपस्थिती. खऱ्या अर्थाने महाकट्टा. बोका ए आझम आणि अजयाचे अभिनंदन. काय काय गप्पा झाल्या, माझ्याशी मैत्री करशील का, असे व्य नि कोणा कोणाला आले, वगैरे चर्चा झाल्या की नाही ? एक आयडी मेला की पुन्हा दुस-या आयडीने वर तोंड करून प्रतिसाद देणा-याबद्दल काही चर्चा झाली की नाही. बाकी, फोटोत धन्या, वल्ली, अजया, माऊ, डॉ. सुबोध,प्रास, निखिल, मस्त कलंदर, इतकेच ओळखता आलेत. बाकीच्यांचाही परिचय व्हावा.हरकत नसेल तर ! -दिलीप बिरुटे

फोटो क्र.१ डावीकडून-लि माऊ,सुरन्गी,मस्त कलंदर,अजया,स्वीट टॉकर आणि टॉकरीण बाई,मीराताई,मीता,त्रिवेणी,सौ पाटील्,आरोही,भुमी,कविता१९७८,स्नेहश्री फोटो क्र ३ डावीकडून-मुवि,कंजूस,मामलेदारचा पंखा,सगा,गणा मास्तर,प्रचेतस,संदिप डांगे,डॉ खरे,टका,माझीही शँपेन,हेमन्त वाघे फोटो क्र,४ डावीकडून-प्रणव जोशी,प्रास,विमे,किसन शिंदे,निखिल देशपांडे

निदान पुढील ३-४ वर्षे मी डोंबोलीत नसेन. त्यामुळे ह्या कट्ट्याला उपस्थित राहणार होतोच. सकाळी सौ.मुविंकडे काही विद्यार्थी जर्मन शिकायला येणार असल्याने, सौ. मुविंना येता आले नाही.

कसलो कट्टो झालो आसा, वाह!!!! क्या बात.... एकदम झकास........ (जावक व्हया होता.......)

कट्टा दणक्यात झालेला दिसतोय. नवे-जुने-आजी-माजी-भावी मिपाकर एकत्र पाहून मस्त वाटलं.

In reply to by नंदन

असेच म्ह्नणतो जे बात विमे ला पाहून ब्रे वाटले

डॉ सुबोध खरे व अजया रॉक ! काहीनी खरे यांच्याकडे "मेंटेन" साठी शिकवणी लावावी.

कट्ट्याला उपस्थित मिपाकरांशिवाय जे तिथे चर्चेत होते ते मिपाकर- डॅा बिरुटे, पैसातै, नीलकांत, प्रशांत, आत्मबंध ( गुरुजी/बुवा/अत्रुप्त आत्मा), नुलकरकाका, स्पा ( मन्या/स्टीव राजा/स्पान्डुरंग ), दीपककुवेत, दमामि, यशो{धरा}, प्यारे१/धनंजय माने/सर्व नावे, दादा दरेकर/सर्व नावे, प्रमोद देर्देकर, पियुशा, अभ्या टिंबटिंब, चौकटराजा, ब्याटमन, नादखुळा ( पिंचिंवार्तापत्र ), आदूबाळ, विनोद१८, ग्रेटथिंकर, शान्तिप्रिय

In reply to by कंजूस

अरे वा. आम्ही चर्चेत होतो म्हणा की. दोन चार डूआयडी वगळता सार्‍या भारी माणसात आमची गणना झाली हे काय कमी. भारी भारी. कट्ट्याचा काउंट वाढलायच मग. ;)

In reply to by कंजूस

म्हणजे आम्हीही कट्टयाला उपस्थित होतोच म्हणावं लागेल. काय काय चर्चा झाली, ते पण सांगा भो....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॅाक्टरांना मनापासून यायचे होते पण औरंगाबाद फारच लांब पडले. अभ्याला भेटायला जायचेच आहे ( बदामि ट्रिपच्या निमित्ताने - वल्ली आणि ग्यांग).

In reply to by कंजूस

जल्ला आमी इकडची काडी तिकडं कर्रीत नै , नी आमची आठवण कस्ली काढतांव. पन आठैन काढल्याबद्दल सर्वांस्नी राम राम बरंका !

लै भारी फोटू! आगोबानी टि शर्ट बदललेला पाहूण आणंद जाहला! ;) टक्कूमक्कूशोनू चा अनाहितां समवेत फोटू पण भारी!

जंगी मिपा कट्ट्याबद्दल सर्वांचेच आभार.फोटू आवडले. थोडा वेळ का होईना सर्वांना भेटता आले याचा आनंद आहे.

जबरदस्त मिपा महाकट्टा! 'अनाहिता आणि लाडोबा' छान फोटो. डांगेसरांनी कट्टावृत्तांत लिहिल्यास वाचायला आवडेल.

आयोजकांना सलाम! असे अनेक महाकट्टे करायची सुबुद्धी त्यांना वरचेवर होवो. :) सर्व फोटो भारी आले आहेत. कट्टा दणक्यात झाला. सर्वांचे आभार! रच्याकने मी ह्या कट्ट्याला गेले होते का? असा प्रश्न माझा मलाच पडला आहे. त्याचे उत्तर म्हणून इथेच एक खुसखुशीत अतिरंजित धमाल मिनिवृत्तांत लिहायचा मानस आहे. आयोजकांची हरकत नाही ना?

In reply to by टवाळ कार्टा

कार्टा, आपली काल भेट होऊनही 'नंतरचे नंतर बघू' अशी धमकी? (आश्चर्यकारक घाबरल्याची स्मायली) आता मी कसे लिहू? :प :द

In reply to by उल्का

आर्र...असा कसा उल्टा अर्थ घेता...नंतरचे नंतर म्हन्जे....आधी लिहा...कोणी आक्षेप घेतलाच तर त्याला फाट्यावर मारायचे =))