Skip to main content

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/06/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. *********************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29619
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

सचित्र वृत्तांताशिवाय कट्टा झाला असे समजण्यात येणार नाही! :) -(आद्यईस्ट्कोस्ट्कट्टेकरी)रंगा

येयला नक्कीच आवडले असते पण तुर्तास खूपच व्यस्त आहे. त्याव्यतिरीक्त रविवारी एम आय टी त आंतर्राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामधे सहभागी आहे. ह्या योगायोगामुळे कट्ट्याला येण्याचा योग नाही! ;) मात्र रंगाजींनी ;) वर सांगितल्याप्रमाणे सचित्र वृत्तांत येउंद्यात!

In reply to by खटपट्या

आता ही मेली १९ तारीख काही येत नाही ना.. बावळट सारखं १२,१३,१४,१५,१६... अशा तारखा आधी जाऊ द्याव्या लागतील आणि मग येणार म्हणे १९... ;)

मजा करा लेको! शिकरण खा! मटार उसळ खा! - टिंग्या

मला ७ तास एकट्याने गाडी चालवण्याचा प्रचंड कंटाळा येतो. व्हर्जिनिया, DC या परिसरातून कोणी कट्टयासाठी येणार आहे का? वाटेत तेवढीच सोबत होईल. असल्यास कृपया व्यनिमध्ये नंबर कळवावा.

समजा मी इथे भारतीय लोकांना "मिसळपाव?" असं विचारायला गेले तर "नही चाहिये.. आगे जाओ" असं म्हणतील का??!!

In reply to by आदूबाळ

हा हा हा!! खरं वाटणार नाही पण आज मी वामा लोकांनाही भेटलेय. इतकंच नाही तर सदस्य नसलेल्या पण मिपा वाचणार्‍या लोकांनाही!!

आजच्या जर्सी सिटी मिपाकट्ट्याला 'सक्रिय सदस्य मिपाकर', 'वामा सदस्य मिपाकर', 'मिपा वाचणारे पण सदस्य नसणारे मिपाकर' आणि 'मिपाचे नावही माहीत नसलेली मराठी मंडळी' अश्या अनेक मंडळींनी हजेरी लावून प्रचंड बहार आणली ! तेव्हा कट्टा जोरदार झाला हे सांगणे म्हणजे द्विरुक्तीच होईल, नाही का ? एक मिपाकर मावळा चक्क एकट्याने ७ तासांची (चारचाकी) घोडदौड करून कट्ट्याला पूर्णवेळ हजेरी लाऊन परत जोमाने तितकीच मोठी घोडदौड करत परतीला लागला आहे. आता बोला ! इतक्या मोठ्या उत्साहाने आणि सहृदयतेने कट्ट्याला हजेरी लावणार्‍या सर्व जणांचे धन्यवाद मानायला माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत ! लै म्हंजे लैच मजा आली !!! पिरातै आपल्या खास शैलीत लवकरच सचित्र वृत्तांत टाकणार आहेत. तेव्हा... लोगो, दिल थामके इंतजार करो !

In reply to by राघवेंद्र

मी बसलो तुमच्या फोनची वाट पाहात. :( -दिलीप बिरुटे

In reply to by राघवेंद्र

सरळ सरळ कट मारला म्हणा की, आमच्या डॉक्टरांना म्हणाला असता तर ते तरी बोललो असते. कट्टा कितीही चांगला झालेला असला तरी वृत्तांताला प्रतिसाद देणार नै. ढुंकूनसुद्धा पाहणार नाही, किती लोकांनी धागा वाचला ते सुद्धा पाहणार नै. :( खूद पुकारेगी मंजिल तो ठअर जाऊंगा.... वरना मुसाफिर खुद्दार हु यू ही गुजर जाऊंगा. -दिलीप बिरुटे (नाकाच्या शेंड्यावर राग असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कृपया इतके रागावू नका प्राडॉ :( कट्टा इतका मस्त रंगला त्यामुळे त्यांच्या लक्षात राहीले नाही यावर विश्वास ठेवा, मी साक्षीदार आहे ! :)