Skip to main content

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/06/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. *********************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29613
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

लंबूसारखेच विचारते. किती दिवस मुक्काम आहे? भेटायचे म्हटल्यास कुठे? न्यूयॉर्कमध्ये येता जाता वाहतुकीच्या मुरांब्याचा विचार करावा लागेल. जर्सी व न्यू यॉर्मधील मंडळी काही कल्पना देऊ शकतील असे वाटते. माझ्या घरापासून साधारण साडेतीन तास लागतात (वाहतुक सुरळीत असल्यास).

जर्सी सिटी मध्ये करुया का? Exchange place च्या आसपास

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा! (पश्चिम किनार्‍यावर फेरी असल्यास नक्की कळवणे, कॅलिफोर्नियास्थित मेंब्रांना जमवून एक कट्टा आयोजित करता येईल.)

In reply to by विकास

"एकदा आमच्या नागपुरला येवुन जा ना संत्र्याच्या सिझनला, काय मस्त संत्रे खाउ वाळ्या गिळ्याचे तट्टे लाउन पडलेले राहु आरामात " :)) न्युयॉर्क कट्ट्याला शुभेच्छा.

मी न्यूयॉर्क शहरातच राहतो. भेटायला आवडेल.

सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद ! @ येडा अण्णा : Exchange Place, जर्सी सिटी नक्की जमेल. तेवढीच 'पश्चिम' वॉल स्ट्रीटचीही भेट होईल ;) मी मॅनहॅटन मध्ये आहे. PATH ने हडसनमाईच्या पल्याडला येईन :) @ लंबूटांग, जुइ, रेवती, वाचक आणि नंदन : अजून दोन एक महिने इथे आहे. न्यू हेवन (CT) पर्यंत फेरी मारून झाली. पण, न्युयॉर्कपासून खूप लांबचा बेत सद्या केलेला नाही. काही ठरल्यास नक्की कळवेन.

कट्ट्याला भरभरुन शुभेच्छा. सचित्र वृत्तांत येउ दे.

Exchange Place /Newport Mall (खादाडी साठी) चांगली जागा आहे. रविवारी जुन १२ ला ११ वाजता करायचा का?? मी Edison वरुन येऊ शकेल.

In reply to by राघवेंद्र

Exchange Place /Newport Mall (खादाडी साठी) चांगली जागा आहे. रविवारी जुन १२ ला ११ वाजता करायचा का?? मला जमेल.

In reply to by येडा अण्णा

धन्यवाद ! १२ च्या रविवारी दु ३ वाजता महाराष्ट्र मंडळाने आयोजीत केलेल्या "सेल्फी" नाटकाला जायचे आहे. तेव्हा तो दिवस जरा कठीण आहे. पण इतर रविवार अजून तरी मोकळे आहेत.

In reply to by बाळ सप्रे

सप्रे साहेब, त्या ऑफिसातील न्यूज शॉप मधील सकाळचे पोहे, दुपारची वेज बिर्याणी व चारचा समोसा आणि चहा अजून मिस करत आहे. सध्या जर्सी सिटी पासून दूर काम करत आहे.

In reply to by अभ्या..

जर्सी सिटी, गुजराती लोकांनी मस्त भारतीय केली आहे. नवरात्रामध्ये रस्त्यामध्येच गरबा, गल्लो गल्ली मंदिरे आणि बरेच काही ….

कुठल्या विकांताला ठरवताय ते नक्की करा म्हणजे मी येऊ शकेन की नाही ते सांगते. न्यु हेवन जवळ केला तर अती उत्तम. पुण्यात असताना बर्याच वेळा मनात असूनही कट्ट्याला उपस्थिती लावता आली नाही. निदान अम्रिकेत तरी जमतय का ते बघू.

In reply to by सही रे सई

न्यु हेवनला महिन्याभरात परत फेरी होईल. तिकडे लोक जमवा, तिकडेही कट्टा करू हाकानाका :)

वर जुई यांनी म्हटल्याप्रमाणेच, मिड्वेस्टात येणार असाल तर जरूर कळवा. नक्की कट्टा करू येथे!

कट्ट्याला शुभेच्छा ! न्युयॉर्क ला यायला आम्ही कधी ही तयार असतो पण सध्या देश सोडुन जायला सरकारची परवानगी नाही. म्हणजे ते जा म्हणतात पण परत येऊ देणार नाहीत त्यामुळे दुरुन च शुभेच्छा.

मंडळी, १९ चा रविवार कसा वाटतो. आताच नक्की केला तर सगळ्यांना तो कट्ट्यासाठी मोकळा ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

या कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!! सचित्र वृत्तांताची प्रतिक्षा राहील.

न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो. कट्टयास येण्यास उत्सुक. १९ ला ठरल्यास नक्की कळवा.

न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो. कट्टयास येण्यास उत्सुक. १९ ला ठरल्यास नक्की कळवा.

न्यूयॉर्क शहरापासून दक्षिणेला केवळ ७ तासांवर राहतो. कट्टयास येण्यास उत्सुक. १९ ला ठरल्यास नक्की कळवा.

In reply to by सुनील

आता फुल ना फुलाची पाकळी म्हणुन काही तरी मिळेलच की, असं काय ते

१५ जून च्या दरम्यान ४ वीक साठी फिलाडेल्फिया येथे यायचे आहे...Comcast Tower पासून जवळ च्या area मध्ये राहण्याची जागा (sharing or hostel type) शोधतोय.....जवळपास असणाऱ्या मिपाकारांकडून मार्गदर्शन मिळाल्यास चांगलेच...काही पर्याय सुचवावेत ही विनंती ....

१९-जुन- २०१६ रोजी सकाळी ११ वाजता Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ भेटूया. हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) इस्ट कोस्ट मधील सर्व मिपाकर रोमातून (Read Only Mode ) बाहेर येउन भेटायला या.

In reply to by येडा अण्णा

मीपण (शक्य झाल्यास कुटुंबा सोबत) येतो

कट्ट्याला येऊ शकणार नाही जून १९ला पण कामाच्या एखाद्या दिवशी लन्च कट्टा करू शकतो. @पिलियन रायडर - आलात का अमेरिकेत? @राघव८२ --पोह्यांबद्दल ऐकले आहे, नक्की कुठे मिळतात? मी जर्सी सिटीहून लांब राहतो त्यामुळे माहिती नाही. ---------------------- बाय दि वे - जाहिरात जाहिरात! :) check out www.hidden-gems.org. This is a music group that I'm part of, a non-profit organization. Check 'KALP' show tribute to (Kalyanji-Anandji, Laxmikant-Pyarelal) This is a fundraiser for non-profit organization 'Save Indian Farmers'. ------- कार्यक्रमाला जरूर या :)

बॉस्टन मधे आहे. सध्या तरी कठीण दिसतय पण ऐन वेळी जमलच तर यायचा प्रयत्न केला जाईल :-) कट्ट्याला शुभेच्छा!!!

राघव८२ यांनी लिहिल्याप्रमाणेच... ************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ. कार्यक्रम : हवामान चांगले असेल तर Newport Green Park मध्ये कट्टा करू (हवामानाने साथ दिली नाही तर पर्यायी जागी बसू, पण गप्पा मारूच) आणि नंतर जेवायला Newport Mall Food Court मध्ये. :) मी सहकुटुंब येत आहे. ज्यांना शक्य आहे ते सर्व सहकुटुंब येऊ शकले तर कट्ट्याची मजा द्विगुणित होईल. ************************************

न्यू हेवनास कट्टा होईल तेंव्हा निदान कळवून ठेवा. मला ते ठिकाण दोन तासाच्या ड्राईव्हने गाठता येईल. आणि आता तुमचा कार्यक्रम वाचून ईनो घेते.

In reply to by रेवती

न्यु हेवनला जायचा कार्यक्रम ठरला की जरूर कळवेन. बहुतेक ४ जुलैच्या मोठ्या वीकांतात ती फेरी होईल.

व्वा !!! कट्याला शुभेच्छा. औरंगाबादपासून इतक्या दूर ड्रायव्हिंग करत येणे शक्य नाही. तेव्हा कट्टा इंजॉय करा. ;) राघव ८२, कट्टा वर्णन तपशीलवार येऊ द्या. म्हणजे आज कट्टा म्हणून रात्री पासून कट्याचा विचार डोक्यात सुरु झाला. वेळेपूर्वीच पहाटे जाग आली. सुमीला (सुमिचं वय एक वर्ष) आंघोळ घालतांनाही कट्याला कोण कोण येणार हाच विचार सुरु होता. खायला काय घेऊ, कपडे कोणते नेसू सॉरी कपडे कोणते घालावेत... पासून ते एकदा परत घरी पोहोचलो इथपर्यन्त. :) जगभर कट्टे व्हावेत ही एक कट्टर मिपाकर म्हणून इच्छा. पुन्हा एकदा राघव ८२ आणि समस्त कट्टयाकरांना शुभेच्छा...! राघव मी तुम्हाला फोन करतो। :) तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे, -दिलीप बिरुटे

कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा व्रुत्तांत जरुर लिहा. जुलै किंवा ओगस्ट मधे मी एक दिवस वेळ काढुन नवि मुंबईला कामासाठी येणार आहे. तेव्हा कळवतो. नवी मूंबई, कल्याण भागातील मिपाकराना भेटण्याची इच्छा आहे. पाहु कसे होते ते. मी आधी किमान ४-५ दिवस व्यनि करुन कळवेन.

नॅमॅस्टे . कट्ट्याला शुभेच्छा

१९ चे नक्की जमेल कि नाही सांगता येत नाहीये, मी न्युयॉर्क पासून थोडं लांब राहते. ऐन वेळी जमल तर यायचा प्रयत्न करेन. कट्ट्याला शुभेच्छा !!! Newport mall मध्ये चाट खायला विसरू नका ! :)

In reply to by प्रियान

मिपाकर असून दूर आहे हे कारण पटल नाही. जे होईन ते होईन कट्ट्याला पोहोचलंच पाहिजे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता तर यायलाच पाहिजे. प्राडॉ सर स्वागताध्यक्ष म्हणजे काय विचारता, कट्टास्थली पिवळ्या गुलाबाचा गुच्छ घेऊन उभे असतील पहा. यायचेच हं. सर मी पळालो.

टेक्सासचा दौरा नाही का डॉक्टरसाहेब? डलास / ह्यूस्टन / ऑस्टीन / सॅन अ‍ॅन्टॉनिओ / कॉर्पस क्रिस्ती?

In reply to by स्पार्टाकस

धन्यवाद ! तुम्हाला भेटायला नक्कीच आवडले असते. पण, सद्यातरी पूर्व किनार्‍यापासून दूरचा बेत नाही.

रविवारचे हवामान छान आहे. संपूर्ण दिवस सूर्यप्रकाश आहे . त्यामुळे सहकुटुंब इस्ट कोस्टकर जरुर कट्याला या. येत असलेले सदस्य - डॉ सुहास म्हात्रे पिलीयन रायडर येडा अण्णा मिहिर राघव८२ तळ्यात-मळ्यात असलेले सदस्य - damn संदीप चित्रे अंतु बर्वा प्रियान