प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........
क अभिनेता आणि त्याची आधीची अर्धवट प्रेमकथा आणि कथेत दुसर्या नायिकेचे आगमन आणि या दोन्ही प्रेमकथांचा वेगवेगळा अन शेवटी एकत्र शेवट अशी एक वेगळीच कहाणी चित्रपटात बघायला मिळते.कहाणीची सुरवातच इतकी जोरदार कि खून अन त्याचा शोध घेणारा पोलिस अधिकारी. मग हि कथा प्रेमकहाणी भोवती दोन कोनानी फिरल्यावर सरतेशेवटी त्या खुनाचा झालेला उलगडा. वास्तविक बघता या कहाणीला दोन नायिका असूनही एक थ्रिलर कहाणी म्हणून मोजणे जास्त संयुक्तिक ठरेल !! पण तरीही पूर्णत: थ्रिलर म्हणता येणार नाही कारण कथेची विविधांगी उठाठेव. खून-खुनाचा हेतू-खुनाची प्रक्रिया-खुनाचा शोध अन खुनाचा उलगडा अन शेवटच्या काही मिनिटात समजलेले खुनाचे कारण असल्या विविध कोनानी फिरणारी कहाणी आपण थ्रिलर या संकल्पनेतच मांडायला हवी.ते काहीही असो एका बाहेरच्या निर्मात्याने मराठीत येउन एक छानशी कहाणी उत्कृष्टरीत्या सादर केलेली आहे.
सुपरस्टार स्वप्नील जोशीने साकारलेला चित्रपट अभिनेता यश पटवर्धन आणि दोन नायिका १. अंजना सुखानी आणि समिधा गुरु आणि सोबतच जयंत वाडकर एका महत्वाच्या भूमिकेत/खलनायकाच्या भूमिकेत. स्वप्नील जोशीने आजवर एक romantic मराठी हिरो अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे पण त्याच्या romantic नसलेल्या अभिनय क्षमतेला वाव देणारी कलाकृती म्हणून भविष्यात लाल इश्क चे नाव घेतले जाइल. अंजना सुखानी हि हिंदी अभिनेत्री खरे पाहता पण मराठीची तयारी तिच्याकडून दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चांगली करवून घेतलेली आहे हे बरेचदा जाणवते. पण हशा पिकावते समिधा गुरु तिच्या "बाबू" संबोधण्याच्या पद्धतीने. हे "बाबू" संबोधन इनक्लुड कार्यासाठी दिग्दर्शकाचा हेतू काहीही असो पण झालंय ते हास्यास्पद. दोन्ही अभिनेत्र्यांच्या अभिनयातील कमतरतेबद्दल बरेच विशद करता येईल पण सध्या त्यांचे सौंदर्य अन स्वप्नील जोशीचा अभिनय हीच अभिनयाची खासियत.
एक मराठी सिनेमा, एक त्रिकोणी प्रेमकथा आणि उल्लेखनीय नसलेले संगीत अशी एक कथा म्हणजे लाल इश्क. दोनच गाणे आणि त्यातीलही "चांद मातला" हे जरा सुश्राव्य गाणे आणि बाकी सगळाच ठणठणगोपाळ. अर्थात तशी कथेचीच मागणी त्यामुळे सुसह्य.
संजय लीला भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्य दिव्य सेट्स-वजनदार संवाद-उत्तम संगीत आणि शानदार पटकथा असे एक इम्प्रेशन त्याने सोडलेले आहे. पण यावेळेस सगळे व्यवस्थित जुळून आलेले असले तरी संगीताची अनुपस्थिती आणि मंदावलेली पटकथा याने बोर्या वाजवलेला आहे. मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
वाचने
7908
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे
होय...
In reply to स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
पुपशे??
In reply to होय... by सतिश गावडे
गलतीसे मिश्टेक हो गया. ते
In reply to पुपशे?? by समीर_happy go lucky
हो?
In reply to होय... by सतिश गावडे
लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट
https://www.youtube.com/watch
In reply to लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट by रमेश भिडे
सुपरस्टार स्वप्नील?
सुपरस्टार स्वप्नील?
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
+१११
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
स्वप्नील शाहरुखला कॉपी करतो
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
असहमत स्वप्नील जोशी एक चांगला
In reply to सुपरस्टार स्वप्नील? by सतिश पाटील
"तो आओ ना फिर" इतकं घाण वाटत
मला पण खुप घाण वाटत ते. आओ ना
In reply to "तो आओ ना फिर" इतकं घाण वाटत by गौतमी
हे "आओ ना फिर" काय प्रकरण आहे
In reply to मला पण खुप घाण वाटत ते. आओ ना by shvinayakruti
फ्लॉप
सुपरस्टार स्वप्नील जोशीने
हाहाहाहा ख्याख्याख्या
In reply to सुपरस्टार स्वप्नील जोशीने by सूड
:-)
In reply to सुपरस्टार स्वप्नील जोशीने by सूड
ऋन्मेष फ्रोम मायबोली?
स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्
असहमत स्वप्नील जोशी एक चांगला
त्याची आणि मुक्ता बर्वेची
त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे.आणि सई सोबतची जोडी शाहरूख-प्रियांका .. मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल अर्थात, शाहरूख असणे म्हणजे काही भारी आहे की नाही यावर हे कौतुक आहे की नाही हे अवलंबून आहे.मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा
In reply to त्याची आणि मुक्ता बर्वेची by तुमचा अभिषेक
समीरराव नेम्कं किती बड्डे केक
किसनभौ
In reply to समीरराव नेम्कं किती बड्डे केक by किसन शिंदे
काय बघतोय मी हे. संत
In reply to समीरराव नेम्कं किती बड्डे केक by किसन शिंदे
एक, का हो?? तुमच्यात जास्ती
In reply to समीरराव नेम्कं किती बड्डे केक by किसन शिंदे
मराठीतला शारूक
स्वप्नील जोशी ३५ वर्षाचा आहे
महागुरूं सारखा स्वजो ही