✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लाल इश्क (मराठी चित्रपट परीक्षण)

स
समीर_happy go lucky यांनी
Tue, 05/31/2016 - 22:00  ·  लेख
लेख
प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........ क अभिनेता आणि त्याची आधीची अर्धवट प्रेमकथा आणि कथेत दुसर्या नायिकेचे आगमन आणि या दोन्ही प्रेमकथांचा वेगवेगळा अन शेवटी एकत्र शेवट अशी एक वेगळीच कहाणी चित्रपटात बघायला मिळते.कहाणीची सुरवातच इतकी जोरदार कि खून अन त्याचा शोध घेणारा पोलिस अधिकारी. मग हि कथा प्रेमकहाणी भोवती दोन कोनानी फिरल्यावर सरतेशेवटी त्या खुनाचा झालेला उलगडा. वास्तविक बघता या कहाणीला दोन नायिका असूनही एक थ्रिलर कहाणी म्हणून मोजणे जास्त संयुक्तिक ठरेल !! पण तरीही पूर्णत: थ्रिलर म्हणता येणार नाही कारण कथेची विविधांगी उठाठेव. खून-खुनाचा हेतू-खुनाची प्रक्रिया-खुनाचा शोध अन खुनाचा उलगडा अन शेवटच्या काही मिनिटात समजलेले खुनाचे कारण असल्या विविध कोनानी फिरणारी कहाणी आपण थ्रिलर या संकल्पनेतच मांडायला हवी.ते काहीही असो एका बाहेरच्या निर्मात्याने मराठीत येउन एक छानशी कहाणी उत्कृष्टरीत्या सादर केलेली आहे. सुपरस्टार स्वप्नील जोशीने साकारलेला चित्रपट अभिनेता यश पटवर्धन आणि दोन नायिका १. अंजना सुखानी आणि समिधा गुरु आणि सोबतच जयंत वाडकर एका महत्वाच्या भूमिकेत/खलनायकाच्या भूमिकेत. स्वप्नील जोशीने आजवर एक romantic मराठी हिरो अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे पण त्याच्या romantic नसलेल्या अभिनय क्षमतेला वाव देणारी कलाकृती म्हणून भविष्यात लाल इश्क चे नाव घेतले जाइल. अंजना सुखानी हि हिंदी अभिनेत्री खरे पाहता पण मराठीची तयारी तिच्याकडून दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चांगली करवून घेतलेली आहे हे बरेचदा जाणवते. पण हशा पिकावते समिधा गुरु तिच्या "बाबू" संबोधण्याच्या पद्धतीने. हे "बाबू" संबोधन इनक्लुड कार्यासाठी दिग्दर्शकाचा हेतू काहीही असो पण झालंय ते हास्यास्पद. दोन्ही अभिनेत्र्यांच्या अभिनयातील कमतरतेबद्दल बरेच विशद करता येईल पण सध्या त्यांचे सौंदर्य अन स्वप्नील जोशीचा अभिनय हीच अभिनयाची खासियत. एक मराठी सिनेमा, एक त्रिकोणी प्रेमकथा आणि उल्लेखनीय नसलेले संगीत अशी एक कथा म्हणजे लाल इश्क. दोनच गाणे आणि त्यातीलही "चांद मातला" हे जरा सुश्राव्य गाणे आणि बाकी सगळाच ठणठणगोपाळ. अर्थात तशी कथेचीच मागणी त्यामुळे सुसह्य. संजय लीला भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्य दिव्य सेट्स-वजनदार संवाद-उत्तम संगीत आणि शानदार पटकथा असे एक इम्प्रेशन त्याने सोडलेले आहे. पण यावेळेस सगळे व्यवस्थित जुळून आलेले असले तरी संगीताची अनुपस्थिती आणि मंदावलेली पटकथा याने बोर्या वाजवलेला आहे. मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
7862 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 05/31/2016 - 22:31 नवीन
स्वप्निलमध्ये पोटेंशियल आहे चांगल्या ॲक्टरचे ,त्याने जरा हटके भुमिका करायल्या हव्यात.
  • Log in or register to post comments

होय...

सतिश गावडे
Tue, 05/31/2016 - 22:42 नवीन
सुपरस्टार स्वप्नील जोशीकडून खुप अपेक्षा आहेत. त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे. (असं तोच कुठल्यातरी मुलाखतीत म्हणाला होता.) अप्रतिम चित्रपट परीक्षण. पुपशे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

पुपशे??

समीर_happy go lucky
Tue, 05/31/2016 - 22:47 नवीन
पुपशे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गलतीसे मिश्टेक हो गया. ते

सतिश गावडे
Tue, 05/31/2016 - 22:51 नवीन
गलतीसे मिश्टेक हो गया. ते "पुपशु" म्हणजेच पुढील परीक्षणास शुभेच्छा असं लिहायचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky

हो?

बोका-ए-आझम
Wed, 06/01/2016 - 01:12 नवीन
मी तर उलटं ऐकलं होतं. शाहरुख आणि काजोलची जोडी ही हिंदीतली स्वप्निल आणि मुक्ताची जोडी आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट

रमेश भिडे
Wed, 06/01/2016 - 01:20 नवीन
लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट आहे आणि तो प्रदर्शित झाला आहे आणि तो आपण बघावा अशी प्रेरणा आपल्याला नेमकी का झाली???
  • Log in or register to post comments

https://www.youtube.com/watch

समीर_happy go lucky
Wed, 06/01/2016 - 22:03 नवीन
https://www.youtube.com/watch?v=bD1gepaUZms हे राम लीला मधील गाणे अन त्याचे भन्साळीचे संगीत त्यातल्या डीपीला पदुकोणच्या expressions सकट मला आवडले होते. संगीताची इस्माईल दरबारची छाप हा विषय संगीताची समज नसल्यामुळे मी बाजूला ठेवतो पण गाणे आवडले होते अन फक्त या टायटल मुले बघितला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

सुपरस्टार स्वप्नील?

सतिश पाटील
Wed, 06/01/2016 - 11:41 नवीन
सुपरस्टार स्वप्नील? शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा? एके दिवशी बस मध्ये याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.
  • Log in or register to post comments

सुपरस्टार स्वप्नील?

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 06/01/2016 - 12:20 नवीन
सुपरस्टार स्वप्नील? शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा?
सहमत, "तो आओ ना फिर" वगैरे हिंदी डायलाॅग त्याच्या तोंडी शोभत नाहीत,
याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.
असहमत, तू हि रे मला चांगला वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

+१११

अनिरुद्ध प्रभू
Wed, 06/01/2016 - 14:28 नवीन
सहन केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

स्वप्नील शाहरुखला कॉपी करतो

मराठी कथालेखक
Wed, 06/01/2016 - 16:11 नवीन
स्वप्नील शाहरुखला कॉपी करतो यावर सहमत. शिवाय त्याचे मराठी उच्चार काही वेळा खटकतात (संदर्भ : मितवा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

असहमत स्वप्नील जोशी एक चांगला

समीर_happy go lucky
Wed, 06/01/2016 - 22:05 नवीन
असहमत स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे आणि हो http://www.misalpav.com/node/३३०२५ या लिंक वर तू हि रे चे मी केलेले परीक्षण तुम्ही बघू शकता वाटल्यास [संधी आहे तर ad करून घेतो ;)]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

"तो आओ ना फिर" इतकं घाण वाटत

गौतमी
Wed, 06/01/2016 - 14:20 नवीन
"तो आओ ना फिर" इतकं घाण वाटत ते ऐकताना...... ब्यॉक.........
  • Log in or register to post comments

मला पण खुप घाण वाटत ते. आओ ना

shvinayakruti
Wed, 06/01/2016 - 19:19 नवीन
मला पण खुप घाण वाटत ते. आओ ना फिर, लोकांना का आवडत देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौतमी

हे "आओ ना फिर" काय प्रकरण आहे

सतिश गावडे
Wed, 06/01/2016 - 21:34 नवीन
हे "आओ ना फिर" काय प्रकरण आहे? सुपरस्टार स्वजो जेव्हा फार फार वर्षांपूर्वी कृष्णा मालिकेतील कृष्णा होता तेव्हा तो पेन्द्याला "आओ ना फिर" म्हणत असे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shvinayakruti

फ्लॉप

आदिजोशी
Wed, 06/01/2016 - 14:23 नवीन
हा सिनेमा दणकून आपटणार आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments

सुपरस्टार स्वप्नील जोशीने

सूड
Wed, 06/01/2016 - 14:38 नवीन
सुपरस्टार स्वप्नील जोशीने
स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा ख्याख्याख्या

shvinayakruti
Wed, 06/01/2016 - 19:20 नवीन
हाहाहाहा ख्याख्याख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

:-)

NiluMP
Wed, 06/01/2016 - 21:29 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ऋन्मेष फ्रोम मायबोली?

परिंदा
Wed, 06/01/2016 - 15:19 नवीन
स्वजो ला सुपरस्टार म्हणण्याचे धैर्य फक्त याच माणसाकडे आहे.
  • Log in or register to post comments

स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 06/01/2016 - 16:15 नवीन
स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत. अगागा मेलो :)
  • Log in or register to post comments

असहमत स्वप्नील जोशी एक चांगला

समीर_happy go lucky
Wed, 06/01/2016 - 21:57 नवीन
असहमत स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे आणि हो http://www.misalpav.com/node/३३०२५ या लिंक वर तू हि रे चे मी केलेले परीक्षण तुम्ही बघू शकता वाटल्यास [संधी आहे तर ad करून घेतो ;)]
  • Log in or register to post comments

त्याची आणि मुक्ता बर्वेची

तुमचा अभिषेक
Wed, 06/01/2016 - 22:33 नवीन
त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे. आणि सई सोबतची जोडी शाहरूख-प्रियांका .. मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल अर्थात, शाहरूख असणे म्हणजे काही भारी आहे की नाही यावर हे कौतुक आहे की नाही हे अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments

मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/02/2016 - 11:19 नवीन
मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल
मान्य. पण असं स्थान (म्हणजे आघाडीचा रोमँटिक नायक) त्याने शाहरुखची थेट नक्कल (हावभाव, देहबोली) न करता मिळवलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. बाकी इकडे शाहरुखची अधोगती चालू आहे... फॅन अगदीच फसला आहे, चेन्नई एक्स्प्रेस हिट झाला पण होता अगदीच टुकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

समीरराव नेम्कं किती बड्डे केक

किसन शिंदे
Wed, 06/01/2016 - 23:36 नवीन
समीरराव नेम्कं किती बड्डे केक कापलं म्हनं तुम्ही?
  • Log in or register to post comments

किसनभौ

नाखु
गुरुवार, 06/02/2016 - 09:01 नवीन
जस लोकांनी स्वप्नीलला "आप्लं" म्हणलय्म तस यांना पण आपल म्हणा की !!! एक चतुरस्त्र, अष्टपैलु,साक्षेपी,लालीत्यसम्राट्,भाषाप्रभू, मिपाप्रसिद्ध सिनेपरिक्षकास असे दूर नका लोटु. मिपा वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काय बघतोय मी हे. संत

मृत्युन्जय
Fri, 06/03/2016 - 20:14 नवीन
काय बघतोय मी हे. संत किसनदेवांकडुन ही कमेंट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

एक, का हो?? तुमच्यात जास्ती

समीर_happy go lucky
Sat, 06/04/2016 - 20:32 नवीन
एक, का हो?? तुमच्यात जास्ती कापतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मराठीतला शारूक

अकिलिज
Fri, 06/03/2016 - 20:12 नवीन
म्हणजे स्वप्निल जोशीचंही वय झालंय का आता ?
  • Log in or register to post comments

स्वप्नील जोशी ३५ वर्षाचा आहे

सुजल
Sun, 06/05/2016 - 05:03 नवीन
स्वप्नील जोशी ३५ वर्षाचा आहे :)
  • Log in or register to post comments

महागुरूं सारखा स्वजो ही

palambar
Sun, 06/05/2016 - 18:30 नवीन
महागुरूं सारखा स्वजो ही डोक्यात जायला लागलाय.त्यांचाच शिष्य तो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा