Skip to main content

लाल इश्क (मराठी चित्रपट परीक्षण)

लेखक समीर_happy go lucky यांनी मंगळवार, 31/05/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथितयश हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आपल्या मराठीत एक निर्माता म्हणून आले असून "लाल इश्क" हा त्यांनी निर्मित केलेला पहिला मराठी चित्रपट. एका मराठी चित्रपटात दोन नायिका आणि गाणे नसतील तर फक्त कहाणीच्या भरवशावर तो तग धरू शकेल काय?? उत्तर आहे होय, जर अनुभव गाठीशी असेल तर बाहेरच्या भाषेतील निर्माताही मराठीत येउन व्यवस्थित सगळं manage करू शकतो........ क अभिनेता आणि त्याची आधीची अर्धवट प्रेमकथा आणि कथेत दुसर्या नायिकेचे आगमन आणि या दोन्ही प्रेमकथांचा वेगवेगळा अन शेवटी एकत्र शेवट अशी एक वेगळीच कहाणी चित्रपटात बघायला मिळते.कहाणीची सुरवातच इतकी जोरदार कि खून अन त्याचा शोध घेणारा पोलिस अधिकारी. मग हि कथा प्रेमकहाणी भोवती दोन कोनानी फिरल्यावर सरतेशेवटी त्या खुनाचा झालेला उलगडा. वास्तविक बघता या कहाणीला दोन नायिका असूनही एक थ्रिलर कहाणी म्हणून मोजणे जास्त संयुक्तिक ठरेल !! पण तरीही पूर्णत: थ्रिलर म्हणता येणार नाही कारण कथेची विविधांगी उठाठेव. खून-खुनाचा हेतू-खुनाची प्रक्रिया-खुनाचा शोध अन खुनाचा उलगडा अन शेवटच्या काही मिनिटात समजलेले खुनाचे कारण असल्या विविध कोनानी फिरणारी कहाणी आपण थ्रिलर या संकल्पनेतच मांडायला हवी.ते काहीही असो एका बाहेरच्या निर्मात्याने मराठीत येउन एक छानशी कहाणी उत्कृष्टरीत्या सादर केलेली आहे. सुपरस्टार स्वप्नील जोशीने साकारलेला चित्रपट अभिनेता यश पटवर्धन आणि दोन नायिका १. अंजना सुखानी आणि समिधा गुरु आणि सोबतच जयंत वाडकर एका महत्वाच्या भूमिकेत/खलनायकाच्या भूमिकेत. स्वप्नील जोशीने आजवर एक romantic मराठी हिरो अशी आपली प्रतिमा निर्माण केली आहे पण त्याच्या romantic नसलेल्या अभिनय क्षमतेला वाव देणारी कलाकृती म्हणून भविष्यात लाल इश्क चे नाव घेतले जाइल. अंजना सुखानी हि हिंदी अभिनेत्री खरे पाहता पण मराठीची तयारी तिच्याकडून दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी चांगली करवून घेतलेली आहे हे बरेचदा जाणवते. पण हशा पिकावते समिधा गुरु तिच्या "बाबू" संबोधण्याच्या पद्धतीने. हे "बाबू" संबोधन इनक्लुड कार्यासाठी दिग्दर्शकाचा हेतू काहीही असो पण झालंय ते हास्यास्पद. दोन्ही अभिनेत्र्यांच्या अभिनयातील कमतरतेबद्दल बरेच विशद करता येईल पण सध्या त्यांचे सौंदर्य अन स्वप्नील जोशीचा अभिनय हीच अभिनयाची खासियत. एक मराठी सिनेमा, एक त्रिकोणी प्रेमकथा आणि उल्लेखनीय नसलेले संगीत अशी एक कथा म्हणजे लाल इश्क. दोनच गाणे आणि त्यातीलही "चांद मातला" हे जरा सुश्राव्य गाणे आणि बाकी सगळाच ठणठणगोपाळ. अर्थात तशी कथेचीच मागणी त्यामुळे सुसह्य. संजय लीला भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्य दिव्य सेट्स-वजनदार संवाद-उत्तम संगीत आणि शानदार पटकथा असे एक इम्प्रेशन त्याने सोडलेले आहे. पण यावेळेस सगळे व्यवस्थित जुळून आलेले असले तरी संगीताची अनुपस्थिती आणि मंदावलेली पटकथा याने बोर्या वाजवलेला आहे. मी चित्रपटाला दोन २ * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा. -समीर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7908
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सुपरस्टार स्वप्नील जोशीकडून खुप अपेक्षा आहेत. त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे. (असं तोच कुठल्यातरी मुलाखतीत म्हणाला होता.) अप्रतिम चित्रपट परीक्षण. पुपशे.

In reply to by सतिश गावडे

मी तर उलटं ऐकलं होतं. शाहरुख आणि काजोलची जोडी ही हिंदीतली स्वप्निल आणि मुक्ताची जोडी आहे. ;)

लाल इष्क नावाचा मराठी चित्रपट आहे आणि तो प्रदर्शित झाला आहे आणि तो आपण बघावा अशी प्रेरणा आपल्याला नेमकी का झाली???

In reply to by रमेश भिडे

https://www.youtube.com/watch?v=bD1gepaUZms हे राम लीला मधील गाणे अन त्याचे भन्साळीचे संगीत त्यातल्या डीपीला पदुकोणच्या expressions सकट मला आवडले होते. संगीताची इस्माईल दरबारची छाप हा विषय संगीताची समज नसल्यामुळे मी बाजूला ठेवतो पण गाणे आवडले होते अन फक्त या टायटल मुले बघितला

सुपरस्टार स्वप्नील? शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा? एके दिवशी बस मध्ये याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.

In reply to by सतिश पाटील

सुपरस्टार स्वप्नील? शाहरुख खानला कॉपी करण्याव्यतिरीक्त आणखी काय करतो हा?
सहमत, "तो आओ ना फिर" वगैरे हिंदी डायलाॅग त्याच्या तोंडी शोभत नाहीत,
याचा तू हि रे नावाचा सिनेमा अक्षरश सहन केला.
असहमत, तू हि रे मला चांगला वाटला.

In reply to by सतिश पाटील

स्वप्नील शाहरुखला कॉपी करतो यावर सहमत. शिवाय त्याचे मराठी उच्चार काही वेळा खटकतात (संदर्भ : मितवा)

In reply to by सतिश पाटील

असहमत स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे आणि हो http://www.misalpav.com/node/३३०२५ या लिंक वर तू हि रे चे मी केलेले परीक्षण तुम्ही बघू शकता वाटल्यास [संधी आहे तर ad करून घेतो ;)]

In reply to by shvinayakruti

हे "आओ ना फिर" काय प्रकरण आहे? सुपरस्टार स्वजो जेव्हा फार फार वर्षांपूर्वी कृष्णा मालिकेतील कृष्णा होता तेव्हा तो पेन्द्याला "आओ ना फिर" म्हणत असे का?

हा सिनेमा दणकून आपटणार आहे असं मला वाटतं.

सुपरस्टार स्वप्नील जोशीने
स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत.

स्वप्नील जोशी जर सुपरस्टार असेल तर सनीकाकू लिओन सात्विकतेचं मूर्तीमंत उदाहरण आहेत. अगागा मेलो :)

असहमत स्वप्नील जोशी एक चांगला अभिनेता आहे आणि हो http://www.misalpav.com/node/३३०२५ या लिंक वर तू हि रे चे मी केलेले परीक्षण तुम्ही बघू शकता वाटल्यास [संधी आहे तर ad करून घेतो ;)]

त्याची आणि मुक्ता बर्वेची जोडी मराठीतील शाहरुख काजोलची जोडी आहे. आणि सई सोबतची जोडी शाहरूख-प्रियांका .. मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल अर्थात, शाहरूख असणे म्हणजे काही भारी आहे की नाही यावर हे कौतुक आहे की नाही हे अवलंबून आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

मराठीत शाहरूखच्या जवळ जाणारा तोच आहे हे मात्र मान्य करावेच लागेल
मान्य. पण असं स्थान (म्हणजे आघाडीचा रोमँटिक नायक) त्याने शाहरुखची थेट नक्कल (हावभाव, देहबोली) न करता मिळवलं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. बाकी इकडे शाहरुखची अधोगती चालू आहे... फॅन अगदीच फसला आहे, चेन्नई एक्स्प्रेस हिट झाला पण होता अगदीच टुकार.

In reply to by किसन शिंदे

जस लोकांनी स्वप्नीलला "आप्लं" म्हणलय्म तस यांना पण आपल म्हणा की !!! एक चतुरस्त्र, अष्टपैलु,साक्षेपी,लालीत्यसम्राट्,भाषाप्रभू, मिपाप्रसिद्ध सिनेपरिक्षकास असे दूर नका लोटु. मिपा वाचक नाखु