✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रीत

न
नीलमोहर यांनी
Tue, 05/17/2016 - 14:37  ·  लेख
लेख
1
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा, ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी, तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी, ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी, एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण. दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं, एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं. ' वाट होते जरी तुझी माझी वेगळी, सोबतीची तरी आस सांग का लागली, जीव तुटतो का असा रे.. सांग ना तुझ्याविना, तुझ्याविना..' आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी... मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली, मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला. तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला.. ' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..' जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं, काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा.. तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा. ' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..' आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं. ' कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू..' तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची. त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती. ' गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा, तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..' आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा. 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली, मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..' त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती, ' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..' अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले. मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली, 'प्रचू डार्लिंग !!' अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली.. क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले. 'बदलुन गेलया सारं, पिरतीचं सुटलया वारं, अल्लड भांबावयाला, बिल्लोरी पाखरू न्यारं, आलं मनातलं ह्या व्हटामंदी, अन मनासंगं मन जुळलं जी..' ............................................................................................. preet ............................................................................................. क्रमश: * कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती. ** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल, कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही. मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात. अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात. .............................................................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
31096 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

प्रचू डर्लिंग वाचले आन

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 14:42 नवीन
प्रचू डर्लिंग वाचले आन फाट्ट्ट्टकन फुटलो अगागागागागागा. ही स्टोरी सैराट ला मागे पाडणार. मागे पाडण्यात आम्ही सोता हातभार लावणार हे सातवाहनकालीन लेण्याच्या काळ्या दगडावर राजेश चुन्याने काढलेले बदामी डिझाइन समजा.

अभ्या (प्रिन्स) दादा

तुषार काळभोर
Tue, 05/17/2016 - 16:47 नवीन
बघतोय्स काय, मुजरा कर!! -आबा पैलवान
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्या 'प्रिन्स' ???

सस्नेह
Tue, 05/17/2016 - 16:51 नवीन
अभ्या 'प्रिन्स' ??? मेले मेले =))
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अग्गाअग्ग्ग्गाआग्ग्ग मेले

पियुशा
Wed, 05/18/2016 - 11:12 नवीन
अग्गाअग्ग्ग्गाआग्ग्ग मेले वाचुन मेले बुवा ननतर आता वल्ली चा नम्बेर का ;) काय चुपा रुस्तुम निघालस बे तु ;) मला तर दर्या खोर्या तुन जोडीने विर ग ळ शोधनारा वल्ली समोर आला ;) सैराट पार्ट - २ ;) असो आमच्या दादाच्या लगनाला यायच ह ! (पळ ते आता )
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

भारी लिहीले आहे !!

सतिश गावडे
Tue, 05/17/2016 - 14:44 नवीन
>>तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी, इथेच अंदाज आला होता. रच्याकने, ती फुले स्ट्रॉबेरीचे क्रॉस सेक्शन आहे का?

क्रमश: का? छान छान!

रमेश भिडे
Tue, 05/17/2016 - 14:54 नवीन
क्रमश: का? छान छान!

=))

सस्नेह
Tue, 05/17/2016 - 14:59 नवीन
=))

नक्की कुणाचा आहे ब्वाॅ आयडी?

किसन शिंदे
Tue, 05/17/2016 - 15:02 नवीन
नक्की कुणाचा आहे ब्वाॅ आयडी?

गपे उगी. स्टोरीत किसनू जानू

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 15:06 नवीन
गपे उगी. स्टोरीत किसनू जानू बी येईल. वाच कि लिवलय तेवढं.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

'प्रचू डार्लिंग !!' =)) =)) =

गणामास्तर
Tue, 05/17/2016 - 15:15 नवीन
'प्रचू डार्लिंग !!' =)) =)) =)) दर्पणसुंदरीचे मनोगत म्हणायचे काय हे ? ;)

मास्तुरे

मी-सौरभ
Wed, 05/18/2016 - 19:13 नवीन
जिवंत सुंदर्‍या आपल्या कथानायकाला भाव देत नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ??
↩ प्रतिसाद: गणामास्तर

अजिबात तसे काही म्हणायचे

गणामास्तर
गुरुवार, 05/19/2016 - 10:32 नवीन
अजिबात तसे काही म्हणायचे नाहीये. एक डाव त्यांचे चाहत्यांचे जग बघा किती मोठे आहे ते. राजा ला राण्या कितीही असल्या तरी पट्टराणी ती पट्टराणीचं हो शेवटी ;)
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

भारीय....

चांदणे संदीप
Tue, 05/17/2016 - 15:18 नवीन
ते 'सारी कायनात' का काय भेटवायला शर्थीचे प्रयत्न करते म्हणतात....ते....त्यातल्या कायनात नामे कंपनीचे येमप्लॉयी आहात काय तुम्ही?? ;) Sandy

प्रचू डार्लिंग?

बोका-ए-आझम
Tue, 05/17/2016 - 15:57 नवीन
या ' मुग्ध ' बालिकेच्या आयचा घो!

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 16:01 नवीन
=))

तरी म्हणत होतो, या आयडीपासून, सॉरी, डु आयडीपासून सावध राहा.

या लेखिकेचं लेखन इतर महिला लेखिकांपेक्षा वेगळंच होतं, आणि ते वाचक म्हणून आवडतही होतं. छान, कसं जमतं हो तुम्हाला हे ? -दिलीप बिरुटे

ते सगळं खरं,

सस्नेह
Tue, 05/17/2016 - 16:12 नवीन
पण कथानायक कुठे आहे ?

आप महान हो!

एस
Tue, 05/17/2016 - 16:14 नवीन
आप महान हो!

आपल्याला नीमोवर कधीच भरोसा

पिलीयन रायडर
Tue, 05/17/2016 - 16:16 नवीन
आपल्याला नीमोवर कधीच भरोसा नव्हता. आज आपला डौट जाहीर करते. कोण बरं गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रचु डार्लिंग??!! आम्हाला पण समजावुन सांगा की. खोदकाम कुठं करायचं हे तरी सांगा.

खोदकाम ??

हेमन्त वाघे
Wed, 05/18/2016 - 08:40 नवीन
द्वर्थि प्रतिसाद नकोत !
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

=))

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 16:20 नवीन
=))

मेलो मेलो =))

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 16:20 नवीन
मेलो मेलो =)) कसं काय सुचतं हो तुम्हाला हे असं?

नीमो, कळेल न कळेल अशी हलकेच

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 17:04 नवीन
नीमो, कळेल न कळेल अशी हलकेच तक्रार करत असाव्यात बरं! लक्षात घ्या जरा..
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 17:06 नवीन
=))
↩ प्रतिसाद: यशोधरा

भारी हं...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 17:25 नवीन
=)) दृष्टीकोन आवडला. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: यशोधरा

धागालेखिका धागा टाकून कुठे

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 17:32 नवीन
धागालेखिका धागा टाकून कुठे गायब झाल्या?
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही पण निघायच्या बेतात

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 17:36 नवीन
तुम्ही पण निघायच्या बेतात आहात का? ;)
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आम्ही इथेच हौत.

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 17:36 नवीन
आम्ही इथेच हौत.
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रचेतस तुम्ही धीराने घ्या.

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 17:39 नवीन
प्रचेतस तुम्ही धीराने घ्या. काय नसतं इशेष. म्हणजे कसय ना ते. की भिडायचे डायरेक्ट ओ. कोण चिडवले तर चिडवू दे. काय भोके पडत नसतात अंगाला. आपण टिच्चून राह्यचं. . (अजून काय राह्यलं का?) ;)
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ख्याक....=))

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 17:40 नवीन
ख्याक....=))
↩ प्रतिसाद: अभ्या..

शोधायला गेल्या असतील अजून

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 17:38 नवीन
शोधायला गेल्या असतील अजून कोणी काय म्हणते का तुम्हांला ते! =))
↩ प्रतिसाद: प्रचेतस

येतील ना ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 17:43 नवीन
या आयडीतुन दुस-या आयडीत प्रवेश घ्यायला सॉरी आपल्या वास्तव जीवनातून मिपावरील आभासी जीवनात यायचं म्हटलं तर वेळच लागतो ना ! -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आपकू कयसे पता? भागोऽऽऽ!!

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 17:44 नवीन
आपकू कयसे पता? भागोऽऽऽ!!
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 18:00 नवीन
अहो, असं करू नका. आत्ता पर्यन्त ५० लोकांना वाट्सपवर वीचारुन झालं "आपण प्रीत धाग्याचे लेखक आहात का म्हणून ?" उत्तरात कोणी ' लोल ' म्हटलं, 'कोणी चपला हाना सर आता' 'असं काय करताय सर, असे मह्नलं ! कोणी म्हणलं, ' डोक्यावर गार पाणी ओता सर' पण, लेखकाचा काय पत्ता नाय लागला ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: यशोधरा

पण तुम्हाला का म्हणे उत्सुकता

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 18:08 नवीन
पण तुम्हाला का म्हणे उत्सुकता? =))
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मयतरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 18:43 नवीन
दुसरं काय ? :) (आपलं ठरलंय ना, अडचणीत आणनारे प्रश्न मुख्य धाग्यावर विचारायचे नाहीत म्हणून...) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: यशोधरा

म्हणजे तुम्ही "मज्यशी मयतरी

सतिश गावडे
Tue, 05/17/2016 - 18:51 नवीन
म्हणजे तुम्ही "मज्यशी मयतरी कर्नर क?" असा प्रश्न विचारला आणि तोंडघशी पडलात का?
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै नै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 19:27 नवीन
मिपा इतिहासात आणि जाल इतिहासात माझी मैत्री कोणी नाकारली नाही, आमचं प्रपोजल कधीच फेल गेलं नाही. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अगदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 20:00 नवीन
निमोने सुद्धा माझ्या मैत्रीचा रिस्पेक्ट केला आहे. :) --दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हंजी काय केलय?

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 20:06 नवीन
म्हंजी काय केलय?
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खिक्क !!

स्रुजा
Tue, 05/17/2016 - 20:11 नवीन
खिक्क !!
↩ प्रतिसाद: यशोधरा

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/17/2016 - 20:48 नवीन
यशोधरा, आपली मैत्री संपली. मी आत्ता थेट हिमालयात जात आहे, तिथे हिमालयाच्या प्रेमात पडतो पण ही माणसं नको बस. प्रशांत/ निलकांत माझा आयडी डिलीट करावा ही नम्र विनंती. ;) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: यशोधरा

सर जरा धमकी तरी बदला, किती

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 20:51 नवीन
सर जरा धमकी तरी बदला, किती दिवस ती दोस्ती संपल्याची धमकी वापरनारेत? ;) विडंबन टाकेन, खव मध्ये छळेन, खफवर मापं काढेन, प्रतिसाद उडवेन्/देणार नाही असल्या तरी प्रॅक्टीकल धमक्या द्या.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यार में गिरो नहीं प्रा डॉ,

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 20:57 नवीन
प्यार में गिरो नहीं प्रा डॉ, उठो, ऋसे इन लोवे!! ~कुठल्या तरी सिनेमात होतं.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राहू द्या सर,

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 12:18 नवीन
'मी आत्ता थेट हिमालयात जात आहे' - हे वाचून आर्चीचं 'मी हितनं थेट शेतात जाणार आहे, एकटीच जाणार आहे' इइ. आठवलं ;)
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठ्ठो!!!

तुषार काळभोर
Wed, 05/18/2016 - 13:05 नवीन
< >
↩ प्रतिसाद: नीलमोहर

आग्गाग्गा!!!

यशोधरा
Wed, 05/18/2016 - 13:07 नवीन
आग्गाग्गा!!!
↩ प्रतिसाद: नीलमोहर

भारी हं ! कसं जमतं गं....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/18/2016 - 13:31 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: नीलमोहर

प्रचू तुच सांग आता कसे सुचते

मृत्युन्जय
गुरुवार, 05/19/2016 - 11:45 नवीन
प्रचू तुच सांग आता कसे सुचते ते
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुढच्या

नाखु
Tue, 05/17/2016 - 16:25 नवीन
भागात ही दोन गाणी स्माविष्ट असावीत असावे अशी आग्रही मागणी पिंचि भाव विश्व चक्री पारायणी संघातर्फे करण्यात येत आहे. मागणी एक मागणी दोन पुढच्या भागाच्य प्रतिक्षेत्,या धाग्यास अभ्याच्या चितरांची जोड मिळाली तर आवडेल. नितवाचक नाखु पिंचिवाला आणि सदस्य हिरवे-पारवे कंपनी

एवढंच जर असतं तर सरळ प्रचू

किसन शिंदे
Tue, 05/17/2016 - 17:43 नवीन
एवढंच जर असतं तर सरळ प्रचू डार्लिंगचा फोन नंबर मिळवून त्याला व्हाॅट्सअप म्हणा, किंवा फोन करून ”आय लव्ह यू" बोलणं पण जमलं असतं. उगा एवढा मोठा गोग्गोड लेख लिहीण्याचीही गरज नव्हती. दाल में कुछ नही सगळी डाळच काळीये हे आज १००% समोर आले. असो, पुढील घडामोडींसाठी लेखिकेला शुभेच्छा!
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा