✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रीत

न
नीलमोहर यांनी
Tue, 05/17/2016 - 14:37  ·  लेख
लेख
1
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा, ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी, तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी, ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी, एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण. दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं, एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं. ' वाट होते जरी तुझी माझी वेगळी, सोबतीची तरी आस सांग का लागली, जीव तुटतो का असा रे.. सांग ना तुझ्याविना, तुझ्याविना..' आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी... मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली, मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला. तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला.. ' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..' जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं, काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा.. तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा. ' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..' आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं. ' कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू..' तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची. त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती. ' गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा, तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..' आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा. 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली, मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..' त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती, ' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..' अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले. मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली, 'प्रचू डार्लिंग !!' अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली.. क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले. 'बदलुन गेलया सारं, पिरतीचं सुटलया वारं, अल्लड भांबावयाला, बिल्लोरी पाखरू न्यारं, आलं मनातलं ह्या व्हटामंदी, अन मनासंगं मन जुळलं जी..' ............................................................................................. preet ............................................................................................. क्रमश: * कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती. ** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल, कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही. मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात. अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात. .............................................................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
31096 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

कोण लेखिका?

अभ्या..
Tue, 05/17/2016 - 17:48 नवीन
कोण लेखिका? ती अवखळ मुग्ध कलिका नाहीच का मग?
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

प्रचू डार्लिंग वाचून फुटलो =)

टवाळ कार्टा
Tue, 05/17/2016 - 17:44 नवीन
प्रचू डार्लिंग वाचून फुटलो =)) अता ते तुम्हच्या चाहत्यांच्या लिश्टात स्थाण मागतील

चाहत्यांच्या लिश्टात नव्हे.

सतिश गावडे
Tue, 05/17/2016 - 18:52 नवीन
चाहत्यांच्या लिश्टात नव्हे. यादीत.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आमच बरंच खोड्काम/खोदकाम वाचवल

रातराणी
Tue, 05/17/2016 - 18:19 नवीन
आमच बरंच खोड्काम/खोदकाम वाचवल. आता अपडेट पण येऊ दया नियमित. ;)

अपडेट कशाला?

पैसा
Tue, 05/17/2016 - 19:26 नवीन
ती काय "पसंत आहे मुलगी" शिरियल आहे का?
↩ प्रतिसाद: रातराणी

अंहं !

सस्नेह
Tue, 05/17/2016 - 19:29 नवीन
पसंत आहे 'मुलगा' :)
↩ प्रतिसाद: पैसा

मेले मेले!

पैसा
Tue, 05/17/2016 - 19:35 नवीन
त्या मुग्धा घोडेला शोधून आणा कोणीतरी. =))
↩ प्रतिसाद: सस्नेह

ती तर आलीय की लगेच चेंबूरच्या

प्रचेतस
Tue, 05/17/2016 - 19:45 नवीन
ती तर आलीय की लगेच चेंबूरच्या अनिलाच्या नावाने टिळा लावून.
↩ प्रतिसाद: पैसा

अरारारा!

पैसा
Tue, 05/17/2016 - 20:01 नवीन
राँग नंबर लागला तर! =))
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुरु व्हायच्या आधीच संपली का

रातराणी
Wed, 05/18/2016 - 00:15 नवीन
सुरु व्हायच्या आधीच संपली का कहाणी... :)
↩ प्रतिसाद: पैसा

लोल .. काय पण निमो चे धागे:)

स्रुजा
Tue, 05/17/2016 - 19:42 नवीन
लोल .. काय पण निमो चे धागे:) फाइंडिंग निमो खरंच मिशन म्हणायचं की आता ;) बादवे,
लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला..
एकुटवाण्या राऊळात जास्त फिट्ट होईल ;)

एकुटवाण्या राऊळात जास्त फिट्ट

यशोधरा
Tue, 05/17/2016 - 19:48 नवीन
एकुटवाण्या राऊळात जास्त फिट्ट होईल ;)
ह्याला बोलतेत स्टोरीका डिट्टेलिंग!
↩ प्रतिसाद: स्रुजा

50

जेपी
Tue, 05/17/2016 - 20:34 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्तीला काहीच न देता सत्कार करण्यात येत आहे. -शुभेच्छुक-: जेपी आणी तमाम सर्टीफाईड साधेभोळे कार्यकर्ते

अहाहा !

गौरी लेले
Tue, 05/17/2016 - 22:10 नवीन
अहाहा ! कित्ती सुंदर अन भावविभोर लिहिले आहेस निमो ! खूपच सुरेख !! अवांतर : लोकांना प्रचू डार्लिंग वर हसू आल , पण मला तर ह्यावरून तू डु आयडी असल्याचा संशय ठाम झाला आहे. तरीही / त्यामुळेच पुढील भागाच्या प्रतीक्षेत ...

हंगामा है क्यु बरपा ?

मारवा
Tue, 05/17/2016 - 22:55 नवीन
अरे प्रेमात पडण नविन का ते आहे ? संस्थळावर प्रेमात पडण भले असेल पण प्रेमात पडण ही तर जुनीच बीमारी आहे ना मग एवढा गदारोळ कशाला मी म्हणतो? अशाने निरागसता लाजुन बुजुन जाते प्रेम कोमेजुन जात बाकी प्रचु कोण हा प्रश्न शिल्ल्क राहतोच. सुंदर भावुक निवेदन आवडल

बाकी प्रचु कोण हा प्रश्न

किसन शिंदे
Wed, 05/18/2016 - 08:04 नवीन
बाकी प्रचु कोण हा प्रश्न शिल्ल्क राहतोच
प्रचेतस!!
↩ प्रतिसाद: मारवा

ते लेण्यांवर,मंदिरांवर,

सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 08:07 नवीन
ते लेण्यांवर,मंदिरांवर, गधेगाळावर आणि आंदर मावळातील गर्द हिरवाईवर छान छान लिहीतात ते प्रचेतस का?
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

बहुदा

किसन शिंदे
Wed, 05/18/2016 - 08:15 नवीन
बहुदा
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हं...

विटेकर
Wed, 05/18/2016 - 09:13 नवीन
...आलं लक्षात ! एकूण असे आहे तर ! असू दे , माझ्या आणि विटुकाकूच्या शुभेच्छा ! बाकी नील , प्रीतला चांगला मोहर आला आहे आता गोमटी फळे लागू देत ! काय ?

फळं कसली

पैसा
Wed, 05/18/2016 - 11:10 नवीन
फळं कसली कर्माची! =))
↩ प्रतिसाद: विटेकर

=))

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 11:41 नवीन
=))
↩ प्रतिसाद: पैसा

विटेकर भौ !पण हे अस काही नसेल तर नकळत मोठा अन्याय होइल.

मारवा
Wed, 05/18/2016 - 10:38 नवीन
पण हे अस काही नसेल नुसतीच आपली कल्पना असेल तर मोठा अन्याय होइल. थोड मॅटर स्पष्ट होइपर्यंत शुभेच्छा देण घाईच होइल कदाचित. आग दोनो तरफ बराबर लगी है की एकीकडे च लागलीय की मुळात आग लागलीच नाही व आपली वाचकांची फॅन्टसीच पेटलीय अजुन कळायला मार्ग नाही सस्पेन्स च आहे. अस सस्पेन्स मध्ये शुभेछा त्याही थेट फळा पर्यंत म्हणजे जरा घाई होतेय धुरावरुन अंदाज बाधणारा धिरोदत्त मारवा

हो हो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/18/2016 - 11:05 नवीन
थोडं दिवस वाट पाहू...! प्रचुने काही ख़ास रिप्लाय नै दिला अजून ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: मारवा

Congrats on expressing the

mahesh d
Wed, 05/18/2016 - 11:12 नवीन
Congrats on expressing the love, hope your love life begins at the earliest you both enjoy the life to the fullest.

अरेरे !!

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 11:12 नवीन
इथे 'शूट द मेसेंजर' चा खेळ सुरू झालाय का.. म्हणजे एखादा दूत काही वाईट बातमी/संदेश घेऊन आला तर त्या बातमीसाठी त्यास दोषी ठरवून शिक्षा देतात, पण इथे तर चांगली गोड बातमी होती ;) स्टोरी एवढीच आहे की मा.प्रचेतस सर यांच्या खवमध्ये आणि इतरत्रही 'प्रचू डार्लिंग'चा उल्लेख पहावयास मिळाला, एका मेल आयडीने फिमेल डु-आयडीच्या नावाने दुसर्‍या मेल आयडीस असे काही म्हणावे याची फार गंमत वाटली, त्या दोन शब्दांवरून हा एवढा कारभार सुचला, मग त्यावरून प्रचेतस सरांना थोडे छळावे म्हटले. आधी खरडच लिहायची होती पण लिहीतांना ते मारूतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेले, त्यात गाणीही अ‍ॅड झाली. हे सर्व एका गंमतीशीर धाग्याचे मटेरिअल होऊ शकेल असे वाटले म्हणून हा धागाप्रपंच. हा सर्व प्रकार खेळीमेळीतच केला गेला आहे, त्यास जास्त गंभीरपणे न घेता, व्यक्तिगत होऊ न देता त्याच स्पिरीटमध्ये घेतल्यास जास्त बरे होईल. लेखनविषय-मौजमजा, लेखनविषय-सद्भावना आहेत हे पुन्हा एकदा नमूद करेन :)

बरं बरं.

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 11:29 नवीन
बरं बरं. पुढचा भाग लिहायला कधी घेताय?
↩ प्रतिसाद: नीलमोहर

लगेच पुढचा भाग यायला ती काय

रातराणी
Wed, 05/18/2016 - 11:37 नवीन
लगेच पुढचा भाग यायला ती काय सिरेल आहे का? (असं मी नाही पैसातै म्हणाल्यात वरती.)
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आणि हो,

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 11:24 नवीन
प्रतिसादांसाठी कोणाचेही आभार मानण्यात येणार नाहीयेत कारण बर्‍याच प्रतिक्रियांतून निव्वळ काड्या टाकणे आणि अर्थाचा अनर्थ करणे या दोनच गोष्टी साध्य झाल्यात :p लेखामागील उदात्त हेतू आख्ख्या होल मिपामधील एकमेव श्री.संदीपजी चांदणे यांना समजलाय आणि त्यांनी त्यानुसार रेलेव्ह्न्ट प्रतिसाद दिलाय हेही विशेष. (अजूनही कोणाला कळले नसेल तर वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा या जोडीची आहे :) जोड्या जुळवणे मंडळाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना आणि माझ्या आयडीबद्दल शंका घेणार्‍या सर्वांना ल्ल्ल्ल्ल्लूलूलूऊऊऊऊ !!!!

बै बै मला तर अगदी भरूनच आलं

रातराणी
Wed, 05/18/2016 - 11:32 नवीन
बै बै मला तर अगदी भरूनच आलं बाई.
↩ प्रतिसाद: नीलमोहर

उगी उगी. डोळे पुसा.

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 11:41 नवीन
उगी उगी. डोळे पुसा.
↩ प्रतिसाद: रातराणी

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/18/2016 - 11:43 नवीन
छ्या, मुड़च गेला. उदात्त हेतू वगैरे असू द्या हो, खेळ तुमचा होतो पण एखादा जीवानीशी जाईल त्याचं काय ? प्रचु कालपासून झोपले नाहीत म्हणतात... (हलकेच घ्या ) :) एकदा आपण वरिजनल आयडी आहात, याचा शोध लागला पाहिजे, मग आम्ही डोले मिटायला मोकळे. म्हणजे तुम्ही मला, नाना चेंगट वाटता, कधी प-या तर नसेल असे वाटते, पण तुम्ही निमो आहात हे वाटतच नाही. देवाची शप्पथ :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: नीलमोहर

वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 12:00 नवीन
वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा या जोडीची आहे
बास, बास ! हा एकच ढिस्क्लेमर धाग्यात टाकला असता तर ? पण नै, मग शंभर कसे होणार =))
↩ प्रतिसाद: नीलमोहर

ओ ताई काय तुम्ही पण,

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 12:13 नवीन
थोडं सटल ठेवायचं होतं हो सगळं, असं डायरेक्ट एखादीचं नाव कसं घ्यायचं, उगा लाजरी बुजरी असेल तर बिचारी? म्हणून तर इतक्या सगळ्या हिंट्स दिल्या होत्या, पण एवढ्या सूज्ञ मिपाकरांसमोर वाटी चमचा घेऊन बसावे लागेल हे मला काय माहिती ;)
↩ प्रतिसाद: सस्नेह

लय दुरुन आलोया... लेणी फिरून

सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 11:34 नवीन
लय दुरुन आलोया... लेणी फिरून आलोया...

झिंगाट नै झिम्माड झिम्माड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/18/2016 - 11:45 नवीन
म्हणा....! -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

न करून हिम्मत, दर्पणाशी

रातराणी
Wed, 05/18/2016 - 11:48 नवीन
न करून हिम्मत, दर्पणाशी ब्रेकअप केलंया सम्द्या मिपात, म्या लै हुशार, डार्लिंग बनलूया झाल झिंग झिंग झिंगाट :)
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दर्पणाशी ब्रेकप? नो वे.

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 11:50 नवीन
दर्पणाशी ब्रेकप? नो वे.
↩ प्रतिसाद: रातराणी

दोन दोन जीएफ. फसाल हो फसाल.

रातराणी
Wed, 05/18/2016 - 11:54 नवीन
दोन दोन जीएफ. फसाल हो फसाल. मुग्धाच जौन दया. त्या दर्पणसुंदरीला कळलं तर लेण्यात बोलवून तुम्हाला कोंडून निघून जाईल स्वर्गात. मग बसा हरी हरी करत =))
↩ प्रतिसाद: प्रचेतस

च्च!

यशोधरा
Wed, 05/18/2016 - 11:57 नवीन
हरी हरी नई काय, दर्पणा दर्पणा!
↩ प्रतिसाद: रातराणी

=))

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 12:00 नवीन
=))
↩ प्रतिसाद: यशोधरा

दर्पणा

नाखु
Wed, 05/18/2016 - 12:09 नवीन
एक जागेवर अचल असल्याने तिची काहीच फिकीर नाही आणि तक्रार सुद्दा !! अता फिरणारी (आणि फिरवणारीहीच्या) काय काय अपेक्षा आहेत ते बुवांना (कदाचित) माहीत असेल. बाकी या धाग्य्वर स्पा-बुवा जोडी न आल्याचे आस्चर्य वाटले बाकीचा साक्षीदार नाखु
↩ प्रतिसाद: प्रचेतस

??

वपाडाव
Wed, 05/18/2016 - 12:24 नवीन
जोडीने दर्शनाला गेले असावेत काय??...
↩ प्रतिसाद: नाखु

अहो,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/18/2016 - 12:11 नवीन
अहो, वर आलेले लेखनातीलविचार काल्पनिक आहेत, गंभीर नका होऊ हं तुम्ही प्लीज. प्रचु डार्लिंग सॉरी प्रचेतस काळजी घ्या....! :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बसं का सर?

प्रचेतस
Wed, 05/18/2016 - 12:28 नवीन
बसं का सर?
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दरुस्ती

वपाडाव
Fri, 05/20/2016 - 10:05 नवीन
सर, वरच्या प्रतिसादात दोन जोड्या असल्याने तुम्हाला असले प्रश्न उद्भवले असावेत. पण मी स्पा-बुवा जोडीबद्दल बोलत होतो हे नमुद करावयचे राहुन गेले. गैरसमज नसावा
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय चाललं आहे नेमकं?

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 11:35 नवीन
काय चाललं आहे नेमकं? जोड्या काय, डार्लिंग काय, मोहोर काय, मेसेंजर काय? मैं कहा हूँ?

रविना

वपाडाव
Wed, 05/18/2016 - 12:22 नवीन
रविना जरा टिलु को दवाइ पिलाना...
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

जब तक टिलु

नाखु
Wed, 05/18/2016 - 12:34 नवीन
ठीक नही होता आप यहांपेही रहना.
↩ प्रतिसाद: वपाडाव

दवाई नहीं डंडे मारणे पडते है

रातराणी
Wed, 05/18/2016 - 12:39 नवीन
दवाई नहीं डंडे मारणे पडते है ऐसे मरीजको ;) ( भिडेसर हल्के घ्या. रहावल नाही अगदीच)
↩ प्रतिसाद: वपाडाव

संस्थळाची लायकी त्याचे सदस्य

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 12:59 नवीन
संस्थळाची लायकी त्याचे सदस्य ठरवतात असं नुकतंच याच संस्थळावर वाचलं आहे. असो!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा