Skip to main content

प्रीत

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 17/05/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
1
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा, ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी, तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी, ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी, एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण. दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं, एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं. ' वाट होते जरी तुझी माझी वेगळी, सोबतीची तरी आस सांग का लागली, जीव तुटतो का असा रे.. सांग ना तुझ्याविना, तुझ्याविना..' आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी... मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली, मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला. तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला.. ' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..' जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं, काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा.. तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा. ' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..' आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं. ' कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू..' तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची. त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती. ' गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा, तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..' आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा. 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली, मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..' त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती, ' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..' अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले. मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली, 'प्रचू डार्लिंग !!' अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली.. क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले. 'बदलुन गेलया सारं, पिरतीचं सुटलया वारं, अल्लड भांबावयाला, बिल्लोरी पाखरू न्यारं, आलं मनातलं ह्या व्हटामंदी, अन मनासंगं मन जुळलं जी..' ............................................................................................. preet ............................................................................................. क्रमश: * कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती. ** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल, कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही. मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात. अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात. .............................................................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31449
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

पण हे अस काही नसेल नुसतीच आपली कल्पना असेल तर मोठा अन्याय होइल. थोड मॅटर स्पष्ट होइपर्यंत शुभेच्छा देण घाईच होइल कदाचित. आग दोनो तरफ बराबर लगी है की एकीकडे च लागलीय की मुळात आग लागलीच नाही व आपली वाचकांची फॅन्टसीच पेटलीय अजुन कळायला मार्ग नाही सस्पेन्स च आहे. अस सस्पेन्स मध्ये शुभेछा त्याही थेट फळा पर्यंत म्हणजे जरा घाई होतेय धुरावरुन अंदाज बाधणारा धिरोदत्त मारवा

Congrats on expressing the love, hope your love life begins at the earliest you both enjoy the life to the fullest.

इथे 'शूट द मेसेंजर' चा खेळ सुरू झालाय का.. म्हणजे एखादा दूत काही वाईट बातमी/संदेश घेऊन आला तर त्या बातमीसाठी त्यास दोषी ठरवून शिक्षा देतात, पण इथे तर चांगली गोड बातमी होती ;) स्टोरी एवढीच आहे की मा.प्रचेतस सर यांच्या खवमध्ये आणि इतरत्रही 'प्रचू डार्लिंग'चा उल्लेख पहावयास मिळाला, एका मेल आयडीने फिमेल डु-आयडीच्या नावाने दुसर्‍या मेल आयडीस असे काही म्हणावे याची फार गंमत वाटली, त्या दोन शब्दांवरून हा एवढा कारभार सुचला, मग त्यावरून प्रचेतस सरांना थोडे छळावे म्हटले. आधी खरडच लिहायची होती पण लिहीतांना ते मारूतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेले, त्यात गाणीही अ‍ॅड झाली. हे सर्व एका गंमतीशीर धाग्याचे मटेरिअल होऊ शकेल असे वाटले म्हणून हा धागाप्रपंच. हा सर्व प्रकार खेळीमेळीतच केला गेला आहे, त्यास जास्त गंभीरपणे न घेता, व्यक्तिगत होऊ न देता त्याच स्पिरीटमध्ये घेतल्यास जास्त बरे होईल. लेखनविषय-मौजमजा, लेखनविषय-सद्भावना आहेत हे पुन्हा एकदा नमूद करेन :)

In reply to by नीलमोहर

बरं बरं. पुढचा भाग लिहायला कधी घेताय?

प्रतिसादांसाठी कोणाचेही आभार मानण्यात येणार नाहीयेत कारण बर्‍याच प्रतिक्रियांतून निव्वळ काड्या टाकणे आणि अर्थाचा अनर्थ करणे या दोनच गोष्टी साध्य झाल्यात :p लेखामागील उदात्त हेतू आख्ख्या होल मिपामधील एकमेव श्री.संदीपजी चांदणे यांना समजलाय आणि त्यांनी त्यानुसार रेलेव्ह्न्ट प्रतिसाद दिलाय हेही विशेष. (अजूनही कोणाला कळले नसेल तर वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा या जोडीची आहे :) जोड्या जुळवणे मंडळाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना आणि माझ्या आयडीबद्दल शंका घेणार्‍या सर्वांना ल्ल्ल्ल्ल्लूलूलूऊऊऊऊ !!!!

In reply to by नीलमोहर

छ्या, मुड़च गेला. उदात्त हेतू वगैरे असू द्या हो, खेळ तुमचा होतो पण एखादा जीवानीशी जाईल त्याचं काय ? प्रचु कालपासून झोपले नाहीत म्हणतात... (हलकेच घ्या ) :) एकदा आपण वरिजनल आयडी आहात, याचा शोध लागला पाहिजे, मग आम्ही डोले मिटायला मोकळे. म्हणजे तुम्ही मला, नाना चेंगट वाटता, कधी प-या तर नसेल असे वाटते, पण तुम्ही निमो आहात हे वाटतच नाही. देवाची शप्पथ :) -दिलीप बिरुटे

In reply to by नीलमोहर

वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा या जोडीची आहे
बास, बास ! हा एकच ढिस्क्लेमर धाग्यात टाकला असता तर ? पण नै, मग शंभर कसे होणार =))

In reply to by सस्नेह

थोडं सटल ठेवायचं होतं हो सगळं, असं डायरेक्ट एखादीचं नाव कसं घ्यायचं, उगा लाजरी बुजरी असेल तर बिचारी? म्हणून तर इतक्या सगळ्या हिंट्स दिल्या होत्या, पण एवढ्या सूज्ञ मिपाकरांसमोर वाटी चमचा घेऊन बसावे लागेल हे मला काय माहिती ;)

In reply to by सतिश गावडे

न करून हिम्मत, दर्पणाशी ब्रेकअप केलंया सम्द्या मिपात, म्या लै हुशार, डार्लिंग बनलूया झाल झिंग झिंग झिंगाट :)

In reply to by प्रचेतस

दोन दोन जीएफ. फसाल हो फसाल. मुग्धाच जौन दया. त्या दर्पणसुंदरीला कळलं तर लेण्यात बोलवून तुम्हाला कोंडून निघून जाईल स्वर्गात. मग बसा हरी हरी करत =))

In reply to by यशोधरा

=))

In reply to by प्रचेतस

एक जागेवर अचल असल्याने तिची काहीच फिकीर नाही आणि तक्रार सुद्दा !! अता फिरणारी (आणि फिरवणारीहीच्या) काय काय अपेक्षा आहेत ते बुवांना (कदाचित) माहीत असेल. बाकी या धाग्य्वर स्पा-बुवा जोडी न आल्याचे आस्चर्य वाटले बाकीचा साक्षीदार नाखु

In reply to by नाखु

जोडीने दर्शनाला गेले असावेत काय??...

In reply to by प्रचेतस

अहो, वर आलेले लेखनातीलविचार काल्पनिक आहेत, गंभीर नका होऊ हं तुम्ही प्लीज. प्रचु डार्लिंग सॉरी प्रचेतस काळजी घ्या....! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बसं का सर?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, वरच्या प्रतिसादात दोन जोड्या असल्याने तुम्हाला असले प्रश्न उद्भवले असावेत. पण मी स्पा-बुवा जोडीबद्दल बोलत होतो हे नमुद करावयचे राहुन गेले. गैरसमज नसावा

काय चाललं आहे नेमकं? जोड्या काय, डार्लिंग काय, मोहोर काय, मेसेंजर काय? मैं कहा हूँ?

In reply to by वपाडाव

ठीक नही होता आप यहांपेही रहना.

In reply to by रातराणी

मग तुम्ही का शिंगं मोडून घुसताय वासरांमध्ये??? पोरांना करु दे दंगा. आणि कोण लहान आहे इथं मुळात म्हणतो मी?

In reply to by रमेश भिडे

चला मिपावीरहो सुसज्ज व्हा उठा चला! माझे डोळे उघडले तुम्ही काका. माझ्या काही करण्याने संस्थळाची लायकी उंचावेल असं आपल्यासारख्या सन्माननीय सदस्याला वाटतं यातच सर्व काही आलं. ;)

In reply to by पैसा

तो विश्वास सरपोतदार नावाच्या character च्या तोंडचा संवाद आहे. ते राणी ऐवजी राणे मुद्दाम म्हटलं आहे. माने राणे यमक जुळवायला. आयडी चुकला का कशाबद्दल?

In reply to by सस्नेह

"Et tu, Brute?"

In reply to by नीलमोहर

आताच वरती भिडेकाकांनी उंच उंच कामं करा म्हणून सांगितलाय आणि तुम्ही शिव्या देताय ? हर हर... (किती करायचेत आता ? दोनशे ? दे सुपारी )

In reply to by सस्नेह

किती करायचे ते करा, मी नको म्हणून का ते व्हायचे राहणारेत. उंच उंच कामं करत उंची वाढली पण तब्येत बारीक राहिली, म्हणून तो नाद सोडून दिला ;)

In reply to by नीलमोहर

मी चुकून Birute वाचले आणि जाम दचकले! हर हर!

In reply to by पैसा

मी पण बिरुटेच वाचलं होतं. =)) निमोने वेडं केलं राव पब्लिकला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी बरं, item song एकही नव्हतं ह्यात... नैतर शिव शिव...

आम्हाला ही काल्पनिक श्टोरी आवडली आहे याची नोंद घ्यावी.प्रचूची खवं आम्ही वाचत असतो आणि तिकडे दुर्लक्ष करत आलोय.आता त्यांना झोप येत नसे असं कित्येकांना वाटून गेलं ( सर) परंतू प्रचूला उशाशी धोंडा घेतला तरी झोप येते.मुग्ध बालिकांच्या तसबिरी त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर आहेत पण त्यांच्या ध्यानाचा भंग करू शकत नाहीत. # काही महिन्यांपुर्वी ऐसीवर अशीच काही प्रेमपत्रे प्रसिद्ध होत होती." प्रटुल्याची वीणा." लेखक पीडी वीणा. वाचून पाहा.

धाग्यातील नायकाचा खालील गाण्याच्या चित्रफीती देऊन भाजे येथील लेण्यात रा रा रा पोपशास्त्री यांचे हस्ते व धागालेखिका प्रमु़ख पाहुणे यांचे उपस्थीतीत करणेत येईल. सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या+प्रीमो) देतील्,टक्या हात+डोळे पुसायचे रुमाल(फक्त ७ नग) प्रायोजीत करीत आहे.वल्ली मित्रमंडळाकडून बांबुची/चटईची हॅट दिली जाईल. अखिल मिपा सचीव जेपी संस्थापित टका संचालित सत्कार महामंडळ (पुणे महानगर शाखा) गाणे क्रं १ गाणे क्रं २ गाणे क्रं ३ गाणे क्रं ३ साहीत्य संपादकांनी विनंती गाणी दृश्य्स्वरूपात रुपांतरीत करावीत.

In reply to by नाखु

सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या+प्रीमो) देतील्
आँ.... प्रीमो कधी करायली हे? . आणि @ नाखुन्स असले आयजी बायजी उदार शिलेदार चलणार नाही बरका. आधीच सांगून ठेवतो.

नुस्ता टारगट्पणा चालला आहे ! मजा गेली ! पोरांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो

In reply to by विटेकर

>> पोरांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो हे "पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा जीव जातो" असं असायला हवं होतं का?

अजुन वेळ गेली नाही.. धाग्याचे प्रयोजन काय हे सांगावे.. (आता उरले सत्कारापुरता )जेपी

आता मुग्धाच्या ह्या खोडीने हितेश,उद्दाम, सचिन, नाना नेफळे, माई, ग्रेट थिंकर. दादा (द)रेकर ह्यांना काय वाटेल?

In reply to by चांदणे संदीप

लावून ताडी आक्ख टमरेल ओतून आलोया सोडून गाडी विसरून किल्ली पळत आलोया भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंगाट भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंगाट भिंग भिंग भिंग भिंग भिंग

In reply to by अभ्या..

कथा जोडीची आहे किनई, मग नायिकेचे एकटीचेच का चित्त्तर? नायकही हवा होता त्यात, त्यास हवे तर बदामाच्या दुसर्‍या बाजूस उभे करायचे होते.. चित्त्तर लई भारी हां पण :)