
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा,
ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी,
तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी,
ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी,
एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण.
दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं,
एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं.
'
वाट होते जरी तुझी माझी वेगळी,
सोबतीची तरी आस सांग का लागली,
जीव तुटतो का असा रे.. सांग ना
तुझ्याविना, तुझ्याविना..'
आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी...
मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली,
मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला.
तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला..
'
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,
ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..'
जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं,
काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा..
तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा.
'
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..'
आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं.
'
कोण होतास तू,
काय झालास तू
अरे वेड्या कसा
वाया गेलास तू..'
तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची.
त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती.
'
गडी अंगानं उभा नि आडवा,
त्याच्या रूपात गावरान गोडवा,
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा,
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..'
आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा.
'
अंगात माझिया भिनलाय ढोलिया,
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली,
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..'
त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती,
'
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग,
बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..'
अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले.
मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली,
'प्रचू डार्लिंग !!'
अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली..
क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले.
'
बदलुन गेलया सारं,
पिरतीचं सुटलया वारं,
अल्लड भांबावयाला,
बिल्लोरी पाखरू न्यारं,
आलं मनातलं ह्या व्हटामंदी,
अन मनासंगं मन जुळलं जी..'
.............................................................................................

.............................................................................................
क्रमश:
* कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती.
** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल,
कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही.
मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात.
अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात.
.............................................................................................
In reply to =)) by प्रचेतस
दर्पणा
In reply to दर्पणा by नाखु
??
In reply to दर्पणाशी ब्रेकप? नो वे. by प्रचेतस
अहो,
In reply to अहो, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बसं का सर?
In reply to अहो, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दरुस्ती
काय चाललं आहे नेमकं?
In reply to काय चाललं आहे नेमकं? by रमेश भिडे
रविना
In reply to रविना by वपाडाव
जब तक टिलु
In reply to रविना by वपाडाव
दवाई नहीं डंडे मारणे पडते है
संस्थळाची लायकी त्याचे सदस्य
In reply to संस्थळाची लायकी त्याचे सदस्य by रमेश भिडे
रागावू नका ओ काका. कधीतरी
In reply to रागावू नका ओ काका. कधीतरी by रातराणी
मग तुम्ही का शिंगं मोडून
In reply to मग तुम्ही का शिंगं मोडून by रमेश भिडे
झाले शंभर. टाटा बाय बाय! :)
In reply to झाले शंभर. टाटा बाय बाय! :) by रातराणी
हा हलकटपणा आहे राणे!
In reply to हा हलकटपणा आहे राणे! by रमेश भिडे
हा हलकटपणा आहे? मग तुम्ही
In reply to हा हलकटपणा आहे? मग तुम्ही by रातराणी
हळू बोला हळू!
In reply to हळू बोला हळू! by रमेश भिडे
चला मिपावीरहो सुसज्ज व्हा उठा
In reply to हळू बोला हळू! by रमेश भिडे
अगदी अगदी, हेच म्हणते मी,
In reply to हा हलकटपणा आहे राणे! by रमेश भिडे
आयडी चुकला का?
In reply to आयडी चुकला का? by पैसा
अशी ही बनवाबनवी
In reply to अशी ही बनवाबनवी by रमेश भिडे
धनंजय माने
In reply to झाले शंभर. टाटा बाय बाय! :) by रातराणी
पळतेस कुठं ? सत्कार कोण करणार
In reply to पळतेस कुठं ? सत्कार कोण करणार by सस्नेह
ते काम जेपींच आहे. तस्मात
In reply to ते काम जेपींच आहे. तस्मात by रातराणी
म्हणजे ?
In reply to म्हणजे ? by सस्नेह
...
In reply to ... by नीलमोहर
काय हे ?
In reply to काय हे ? by सस्नेह
घाला काय तो गोंधळ एकदाचा,
In reply to ... by नीलमोहर
दचकले ना!
In reply to दचकले ना! by पैसा
=))))))
In reply to दचकले ना! by पैसा
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
()
In reply to म्हणजे ? by सस्नेह
ह्या ह्या ह्या नीमो बघ बाई
आम्हाला ही काल्पनिक श्टोरी
धागा शतकाबद्दल
In reply to धागा शतकाबद्दल by नाखु
सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या
In reply to सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या by अभ्या..
अरे देवा
In reply to अरे देवा by नाखु
तेच ना. मी कुठुन आले हित्ते
In reply to सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या by अभ्या..
मी हे काम करत नाही नाखु आणि
छ्ह्या !
In reply to छ्ह्या ! by विटेकर
>> पोरांचा खेळ होतो पण
In reply to >> पोरांचा खेळ होतो पण by सतिश गावडे
दु दु सगा सर तुम्ही
In reply to >> पोरांचा खेळ होतो पण by सतिश गावडे
@पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा
अजुन वेळ गेली नाही..
In reply to अजुन वेळ गेली नाही.. by जेपी
आता उरले सत्कारापुरता )जेपी
लै भारी !!!
हे काही बरे नाही केलेत...
माताय, चित्र कुणी टाकलं वर?
In reply to माताय, चित्र कुणी टाकलं वर? by प्रचेतस
\o/ \o/ \o/
In reply to \o/ \o/ \o/ by चांदणे संदीप
लावून ताडी
In reply to लावून ताडी by अभ्या..
नै नै अभ्या, असं नाही कराचं,
In reply to नै नै अभ्या, असं नाही कराचं, by नीलमोहर
कशाला उगाच ते, नायिका एकटीच
In reply to कशाला उगाच ते, नायिका एकटीच by प्रचेतस
ते कैतरी आत्मरन्जन आत्मकुंथन
In reply to ते कैतरी आत्मरन्जन आत्मकुंथन by अभ्या..
ते फक्त बुवांचं असतं.
In reply to कशाला उगाच ते, नायिका एकटीच by प्रचेतस
होक्का !
In reply to होक्का ! by नीलमोहर
हा ना. नुसती बुलेट चलवून काय
In reply to होक्का ! by नीलमोहर
नक्की का?
In reply to नक्की का? by प्रचेतस
अरेरे,
In reply to अरेरे, by नीलमोहर
=))
In reply to =)) by प्रचेतस
तेच तर,
In reply to तेच तर, by नीलमोहर
=)). असोच्च असो.
In reply to कशाला उगाच ते, नायिका एकटीच by प्रचेतस
नायक बस णार आहे का पन चित्रात
In reply to नै नै अभ्या, असं नाही कराचं, by नीलमोहर
डोळे उघडा
In reply to डोळे उघडा by पैसा
मला तर ती हातात आरसा घेतलेली
In reply to मला तर ती हातात आरसा घेतलेली by प्रचेतस
मला वेगळाच डौट्ट यायला लागलाय आता...
In reply to मला वेगळाच डौट्ट यायला लागलाय आता... by चांदणे संदीप
नीमो हा बिरूटे सरांचा आयडी
In reply to नीमो हा बिरूटे सरांचा आयडी by भोळा भाबडा
हम्म. भोळे भाबडे नाहीत म्हणा
In reply to हम्म. भोळे भाबडे नाहीत म्हणा by अभ्या..
+१
In reply to मला वेगळाच डौट्ट यायला लागलाय आता... by चांदणे संदीप
कसली गोडुली गँग आहे हि.
In reply to मला तर ती हातात आरसा घेतलेली by प्रचेतस
खिखिखि!
In reply to खिखिखि! by पैसा
=)) लोलबंध
बाकी काही असो, चित्र भारी रे
In reply to बाकी काही असो, चित्र भारी रे by सस्नेह
चित्रातील कन्येच्या हाती आरसा
In reply to चित्रातील कन्येच्या हाती आरसा by सतिश गावडे
तो आरसा आहे ??
In reply to तो आरसा आहे ?? by सस्नेह
त्याला काय हेडफोन जोडता का
In reply to त्याला काय हेडफोन जोडता का by अभ्या..
का ब्ल्यू टूथ स्टेथो आहे?
In reply to का ब्ल्यू टूथ स्टेथो आहे? by अभ्या..
ते हेडफोन जमलं नसेल ओ
असा सगऴा प्रकार झाला तर!
आरसा तर अमच्या गाडीलाबी
2000 करायचे आता. थांबू नका.