मालेगाव स्फोट आणि पुराव्याचा अभाव
ही बातमी दोन-तीन दिवस जुनी होऊनसुद्धा मिपावर त्याबाबत काहीही चर्चा घडलेली नाही. वाट पाहायचा कंटाळा आला, म्हणून स्वतःच धागा चालू करावा असा विचार केला. २००८ मध्ये मालेगावमध्ये एका मशिदीत झालेल्या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाला. त्या संदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली. त्याच सुमारास घडलेल्या समझोता एक्सप्रेस बाँबस्फोटाच्या संदर्भातले आरोपही पुरोहित आणि स्वामी असीमानंद यांच्यावर ठेवण्यात आले.२०११ मध्ये Special Investigative Team कडून हा तपास NIA कडे हस्तांतरीत करण्यात आला. पण NIA लाही या लोकांविरूद्ध पुरावे सापडलेले नाहीत.
हे जेव्हा नुकतंच जाहीर झालं तेव्हा गदारोळ माजला.राजकारण तापलं. एकाही मानवी हक्कांसाठी तत्पर असलेल्या संघटनेने ८ वर्षे जामिनाशिवाय एखाद्याला डांबून ठेवणे ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे असं म्हटलेलं नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातले दोन प्रमुख पक्ष एकमेकांवर करत असलेले आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून दिसणारी दोघाही पक्षांची राजकीय अपरिपक्वता.
यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. रंगीत दहशतवादी नावाचा धागा हुप्प्या यांनी काढला होता. हे त्याचंच extension समजायला हरकत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कंटाळा आला. तस्मात पास
एकाही मानवी हक्कांसाठी तत्पर
एकाही मानवी हक्कांसाठी तत्पर असलेल्या संघटनेने ८ वर्षे जामिनाशिवाय एखाद्याला डांबून ठेवणे ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे असं म्हटलेलं नाही.या मुद्द्यावर पुर्णपणे सहमत आहे. पुराव्याअभावी जर आज मुक्तता होत आहे तर इतकी वर्षे जी वाया गेली त्याला कोण जबाबदार आहे? हा प्रश्न इथेही प्रज्ञा ठाकुर यांच्या संदर्भात उपस्थित व्हायला हवा होता पण तसे काही झालेले दिसत नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे मला या केसची विस्तृत माहीती नाही मात्र प्रथमदर्शनी तरी ही एका सरकारी तपास संस्थेने दुसर्^या तपास संस्थेने लावलेले आरोप व पुरावे खारीज करण अस इथे झालेल आहे. सर्वच सरकारी तपाससंस्था या सरकारच्या हातच बाहुल असतात या गृहीतकाच्या आधारावर बघितले असता मग इथे सत्य नेमक काय आहे समजायला मार्ग नाही. म्हणजे मागच्या कॉग्रेस संचालित संस्थेने चुकीचे आरोप/पुरावे ठेवले की सध्याच्या भाजपा संचलित संस्थेने योग्य आरोप/पुरावे चुकीचे ठरविले हे ठरविणे प्रथमदर्शनी तरी अवघड दिसते. ही केस कोर्टात येऊन त्यावर खल होउन मग कुठल्याही एका बाजुने निकाल आला असता तर आपण सत्याच्या अधिक जवळ पोहोचलो असतो असे वाटते. केसची सखोल माहीती नसल्याने तुर्तास याहुन अधिक निष्कर्ष काढणे अवघड आहे.अमेरिकेत असा नियम आहे
माझ्यामते या निमित्ताने पोटा
प्रचंड सहमत
'पोटा'तर याहून भीषण होता!
०१. भारतात तसा ९०दिवसांचा
मोकामधला एक अजून मुद्दा
सत्य सर्वांना माहितीये....
मिपाबरील टाॅप टेन रजकारणीय
.
टॉप टेन कोण हे आधी स्पष्ट करा
रंगीत दहशतवाद या धाग्यावर
एक राहिलंच
गायब,
२६ अप्रिल ला ९ लोकांना एनआयए
धर्मांध आयडी?
http://indianexpress.com
अहो ते धर्मांध आयडींबद्दल
नाही
नाही मृत्युंजय.
अगदी हेच म्हणायचं आहे.
तसं पाहता मिपा वैयक्तिक मतं
ते अधिकारी सक्षम होते कि नाही
१० वर्षानंतरही आपण अगदी
सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्था
मला वाटतं गल्लत होतेय.
मला तेच म्हणायचंय.
त्यातल्या एकाला
तजो साहेब,
म्हणजे सध्याचे सरकार तपास आणि
अजुन एक खिळा,
सलमान ला पण निर्दोष सोडलेच कि
अवांतर - सलमान खानला निर्दोष
आपण स्वतः सलमानच्या अपघाताच्या वेळी नव्हतो
सत्य हे न्यायालयात सिद्ध झालं
संधी गमावली...
सलमान तुम्हाला दोषी वाटणं आणि
नको तिथे नाक खुपसण्याऐवजी
सलमान दोषी आहेच.
बोका शेट
डाॅक
न्यायव्यवस्थेवरचा विश्वास
गा.पै.
बोका शेठ
न्यायालयात केस कशी उभी राहते
डाॅक
बोका शेट
डाॅक
..