✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

अ
अज्ञात यांनी
Wed, 05/04/2016 - 19:29  ·  लेख
लेख
सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते! दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील… पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला. युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त्या अती-छोट्या रस्त्यांवरच्या अती-प्रचंड ट्राफिक मध्ये मला त्याचं काही ऐकू येत नव्हतं, आई आपली चालवत होती मला डबलसीट घेऊन जमेल तसं, तिला एकटे चालवायला छान जमत असेल हो! पण कोणाला मागे घेऊन चालवणे वेगळी गोष्ट आहे, असो. माझा फोन चालूच होता 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मंदारला सांगत होतो… सिग्नल आला नळ स्टॉप च्या अलीकडचा, आईनी वाहन थांबवले, माझा फोन चालूच, 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मित्राला वारंवार सांगत होतो ते आईने ऐकले आणि वैतागून मला म्हणाली 'अरे, ऐकायला येत नाही तर… पुढे जाऊन बोल!' हे बाजूच्या दुचाकी वीराने ऐकले… तो उत्तरला "अजून कुढे पुढे जाऊ म्याडम?" मी आणि आईने त्या माणसाकडे पाहिले, आणि मी झालेल्या 'गलतफैमिली' वर हसत उत्तर दिले, (हातातला फोन तसाच ठेवत) 'अहो काका, तुम्हाला नाही बोलली ती, ती माझाशी बोलत आहे, मी फोन वर आहे, आणि मला आवाज येत नाही म्हणून 'पुढे जाउन बोल' असं सांगत्ये, तुम्हाला काही बोलली नाही हो ती!' हे ऐकताच मला तो ईसम म्हणतो कसा... 'अरे पण तू चालव की, आईला कशाला त्रास देतोयस!' ह्यावर मी अजून हसून म्हणालो, "अह्हो, सांगावीपासून मीच चालवतोय, मागच्या सिग्नल पासून आई चालावत आहे, तिला मागे बसून घाबरायला होतंय म्हणून!" हे वाक्य संपताच सिग्नल सुटला, आणि तो सिग्नल हिरवा होताच साहेबांनी जो काय पीकअप घेतला ते थेट सायकल लेन मध्ये, जिथे स्टील चे ३ खांब असतात, जीथे फक्त चालणारे किव्वा सायकल वालेच जाऊ शकतात, त्यात त्यांची ती छोटी दुचाकी त्यांच्या विराट कौशल्याने घुसवत साहेब गायब! शेवटी मी नळ स्टॉपवर आईला म्हणालो 'आई मी चालवतो आता गाडी, तू चालवत असशील नीट, पण एकटे चालवणे वेगळे आणि कोणाला मागे बसवून चालवणे वेगळे!' आईला माझा सल्ला पाटला (किंवा तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हता, असं समजा), मग पौड रोड ला लागेपर्यंत त्या 'दुचाकी वीराबद्दल' आम्ही बोलत होतो! बाकी सिग्नल वर ईतकी बडबड फक्त पुणेरीच करू शकतो, आणि त्यात मी ही अर्धा पुणेकर, तो सिग्नल अजून एक मिनटाचा वगैरे असता तर त्या माणसाचे नाव-गाव ही कळाले असते! असो… ह्या सर्व भानगडीत फोन कधी कट झाला त्याकडे लक्षच गेले नाही. पुन्हा कधी (पुण्यात) मागे बसूनही फोन न घेणे हेच ईष्ट! #साशुश्रीके । ०५ मे २०१६
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10188 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा

एस
Wed, 05/04/2016 - 19:46 नवीन
बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा लेखही सिग्नल सुटायच्या आधी टंकून प्रकाशित केला असता! आहात कुठे?
  • Log in or register to post comments

+1111111111

चांदणे संदीप
Wed, 05/04/2016 - 19:51 नवीन
+1111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

असा सगळा प्रकार झाला तर

स्पा
Wed, 05/04/2016 - 19:57 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर
  • Log in or register to post comments

=))

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 21:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हो ना... आणि तो तुम्ही वाचलात

Ea imputo praemitto
Wed, 05/04/2016 - 21:33 नवीन
हो ना... आणि तो तुम्ही वाचलात ही.. आपला वेळ दडवल्या बद्दल क्षमस्त्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्यापेक्षा जिलबी लेख टाकून

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 21:46 नवीन
त्यापेक्षा जिलबी लेख टाकून वेळ दवडू नका! लेख टाकलात तर लोक वाचणारच आणि प्रतिक्रिया देणारच. जर त्या झेपत नसतील तर रतीब टाकूच नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

माझे काम मी केले... तुम्ही

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:00 नवीन
माझे काम मी केले... तुम्ही तुमचे करताय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

थोडक्यात तुम्हांला डबलसीट

यशोधरा
Wed, 05/04/2016 - 20:06 नवीन
थोडक्यात तुम्हांला डबलसीट गाडी चालवता येत नाही तर! डबलसीट घेता येईना, रस्ते वाकडे? :D
  • Log in or register to post comments

रस्ते बरे आहेत हो... गाड्या

Ea imputo praemitto
Wed, 05/04/2016 - 21:30 नवीन
रस्ते बरे आहेत हो... गाड्या वाढल्या साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

यशोधरा नावावरूनच तुम्हाला

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 22:10 नवीन
यशोधरा नावावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे कि त्या साहेब नसून मॅडम आहेत. उगाच घाऊकात सगळ्यांचे अपमान करत सुटू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

समजायला पाहिजे की त्या मॅडम

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 22:11 नवीन
समजायला पाहिजे की त्या मॅडम आहेत. साहेब नाहीत! उगाच घाऊकात सगळ्यांना दुरुत्तरे करत सुटू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

इथनं बाजार उठायला वेळ लागत

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 22:34 नवीन
इथनं बाजार उठायला वेळ लागत नाही. पण नम्रतेने घेतलेत तर अगदी जीवलग दोस्त होतील इथे. बघा तुम्हाला काय पाहिजे इथे. थोडे ईतर लोक्स पण काय लिहितायंत ते वाचा, त्यावर प्रतिसाद द्या, मत मांडा. मग इथले महाडँबिस वाटणारे पण लोक्स मदतीला येतात. मी पण गेलोय यातून. पण उगाच दुरुत्तरे करत सुटू नका. त्याचे परीणाम त्रासदायकच होतात. बाकी अगदी बिनधास्तपणे साॅरी म्हणा. मग बघा सगळे घेतात परत आपल्यात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

त्यांचे जौदे...तुम्ही का इतके

टवाळ कार्टा
Wed, 05/04/2016 - 22:47 नवीन
त्यांचे जौदे...तुम्ही का इतके पेटलायत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

दू दू दू टक्याभाऊ!!! तुम्हाला

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 22:50 नवीन
दू दू दू टक्याभाऊ!!! तुम्हाला मुद्दा समजलेला नाही! तुम्ही भ्रामक म्रमवादाचे बळी आहात! चालु द्या निरर्थक अत्मरंजन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे नक्की मांत्रिक की बुवा..

अस्वस्थामा
गुरुवार, 05/05/2016 - 18:00 नवीन
हे नक्की मांत्रिक की बुवा.. कै कळेना झालंय राव.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

:)

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

आँ अच्चं उत्तल नै द्यायचं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/04/2016 - 22:23 नवीन
आँ अच्चं उत्तल नै द्यायचं शुशुशीके तै!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

ओह सॉरी चुकुन नावाचा अपभ्रंश

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/04/2016 - 22:28 नवीन
ओह सॉरी चुकुन नावाचा अपभ्रंश झाला शीशुशिके...सशु.....डॅमिट....नाव बदला ओ. केवढं अवघडं आहे टायपायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

नाव बदलायला ते काय महीला आहेत

कानडाऊ योगेशु
Wed, 05/04/2016 - 23:37 नवीन
नाव बदलायला ते काय महीला आहेत का? चांगले जनक पुरुष आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कॉपी पेस्ट करा की ओ!

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:09 नवीन
कॉपी पेस्ट करा की ओ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बरं मग?

यशोधरा
Wed, 05/04/2016 - 22:40 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

काही खास नाही

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:10 नवीन
काही खास नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओ ताई, गाड्या वाढल्या तरी

यशोधरा
Wed, 05/04/2016 - 23:19 नवीन
ओ ताई, गाड्या वाढल्या तरी तुम्ही आपल्या रस्त्याने जा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

बाहेरच्या लोकांना पुणेकरांचे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/04/2016 - 23:21 नवीन
बाहेरच्या लोकांना पुणेकरांचे स्किलसेटस कसे जमणारेत अत्मसात करायला? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नै म्हैत :P पुणेकरांबद्दल

यशोधरा
Wed, 05/04/2016 - 23:38 नवीन
नै म्हैत :P पुणेकरांबद्दल बोलता बोलता स्किलसेटस आत्मसात वगैरे करायला वेळ मिळत नसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हे पुण्याबाहेरचे लोक असे

सूड
Wed, 05/04/2016 - 20:06 नवीन
हे पुण्याबाहेरचे लोक असे पुण्यात येऊन नसत्या तक्रारी करत बसतात!! आमच्यावेळी असं नव्हतं.
  • Log in or register to post comments

कसं होतं मग!

Ea imputo praemitto
Wed, 05/04/2016 - 21:30 नवीन
कसं होतं मग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अभ्यास वाढवा...

सूड
Wed, 05/04/2016 - 22:05 नवीन
अभ्यास वाढवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

अहो

चाणक्य
Wed, 05/04/2016 - 21:10 नवीन
हे तर काहीच नाही. एकदा कुमठेकर रोडला एका माणसाने सिग्नलला त्याचा चष्मा काढून पुसला आणि सिग्नल लागल्यावर तो निघून गेला. मला फारच माैज वाटली.
  • Log in or register to post comments

सिग्नल लागला की थांबतात ह्या

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 21:16 नवीन
सिग्नल लागला की थांबतात ह्या पुणेकरांच्या शिस्तीचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा... अप्रतीम

Ea imputo praemitto
Wed, 05/04/2016 - 21:29 नवीन
हाहाहाहा... अप्रतीम प्रतीक्रिया! हस्लोय बेक्कार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हा उपरोध समजावा काय ? ;-)

उगा काहितरीच
Wed, 05/04/2016 - 21:53 नवीन
हा उपरोध समजावा काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मी पुणेकर नाही... ;)

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 22:14 नवीन
मी पुणेकर नाही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

ते सांगावी म्हणजे सांगवी का ?

उगा काहितरीच
Wed, 05/04/2016 - 21:51 नवीन
ते सांगावी म्हणजे सांगवी का ? नवी का जुनी ? रच्याकने मी पण सांगवीतच रहातो बरं जमल्यास भेटू कधी... ;-)
  • Log in or register to post comments

मी पण

वगिश
गुरुवार, 05/05/2016 - 16:41 नवीन
मी पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

पप्पु महाजनचं खानदेश कट्टा

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 05/05/2016 - 16:49 नवीन
पप्पु महाजनचं खानदेश कट्टा सुरु आहे का हो अजुन ? पुलाच्या जवळ पेट्रोल पंपापुढले? सांगवी मधले गजानन महाराज मंदिर आमचा खास मानसिक अन भावनिक आसरा होता पुण्यात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

मला काही खास नाही आवडलं तेथील

उगा काहितरीच
गुरुवार, 05/05/2016 - 17:24 नवीन
मला काही खास नाही आवडलं तेथील जेवण... असते एकेकाची आवड. आहे अजून चालू ! बाकी गजानन महाराज मंदिराबद्दल सहमत. छान आहे मंदिर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 05/05/2016 - 17:51 नवीन
आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका त्यामुळे तुमच्या मताचा आदर, अन्नाला नावे ठेऊ नये असे म्हणतात पण मेसमधुन रोज डब्यात येणारा "धोका" पचवला की एखाददिवस पप्पु बरा वाटे अन एखादाच् दिवस परवडे सुद्धा त्याकाळी ;) असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

येथील जेवण इतर खानदेशी

उगा काहितरीच
गुरुवार, 05/05/2016 - 21:49 नवीन
येथील जेवण इतर खानदेशी हॉटेलसारखेच तिखट असते त्यामुळे कदाचित आवडत नसावे मला . बाकी अन्नाला नावे ठेवू नयेत सहमत पण मेसवाल्यांचे अन्न याला अपवाद असावे. -(मेसग्रस्त) उका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अगगा नको त्या मेसच्या आठवणी

त्रिवेणी
Sun, 05/08/2016 - 00:21 नवीन
अगगा नको त्या मेसच्या आठवणी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नवी सांगवी, नेताजी नगर

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:02 नवीन
नवी सांगवी, नेताजी नगर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

त्याचे १४ शब्द, तुमचे ३१

sagarpdy
Wed, 05/04/2016 - 21:54 नवीन
त्याचे १४ शब्द, तुमचे ३१ थोडक्यात अर्धवट पुणेकरच सिग्नल वर जास्त बोलतात.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा... हो की!

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:11 नवीन
हाहाहाहा... हो की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

सिंहगड रोड, शनिवार दुपारी ३ची

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:20 नवीन
सिंहगड रोड, शनिवार दुपारी ३ची वेळ, २सिग्नल रेड लागले मी थांबलो, ३रा लागला..काही टाळकी बिंदास तो 'रेड' तोडून सुटली... कदाचित आधीचे २ही तोडले असतील, मी गम्मत पाहत होतो... आणि समोरच तीस कदमावर चार पोलीस उभे, सिग्नल तोडलेला पाहताच साखळी केल्यासारखे रस्ताच्या मधोमध आले... २०कदमावर ते २-३ दुचाकी वीर थांबले, पण त्या वेळीच एक दुचाकी महावीर १० कदमावरच पुढल्या धोक्याची जाणीव होताच शिताफीने 'उ' वळण घेत... लागलेला 'रेड' उलट्या दिशेने तोडत असला फरार झालाय!!! सर्व पाहतच बसले, अगदी पोलीसही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

सिंहगड रोड सारसबागेपासून सुरू

सतिश गावडे
Tue, 05/10/2016 - 00:13 नवीन
सिंहगड रोड सारसबागेपासून सुरू होऊन सिंहगडावर संपतो. अठ्ठावीस किमीचा हा रस्ता आहे. तुम्ही लिहीलेली घटना या रस्त्यावर नेमकी कुठे घडली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

अगदी अगदी. सिंहगड रस्त्यावर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/10/2016 - 07:15 नवीन
अगदी अगदी. सिंहगड रस्त्यावर थेट यु टर्न मारायला सिंव्हाचं काळीज आणि मांजराची चपळाई लागते म्हणे. चायला तिकडे सिंहगड रस्त्यावरचे रिक्षावाले आणि पीएमपीएमेल वाले ज्या दिवशी लेनची शिस्तं पाळती त्या दिवशी एकवीस तोफांची सलामी द्यायचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एवढी घाई असताना इतकी माणुसकी

भक्त प्रल्हाद
Wed, 05/04/2016 - 22:42 नवीन
एवढी घाई असताना इतकी माणुसकी फक्त पुणेकरच दाखवु शकतात.
  • Log in or register to post comments

क्या बात है!

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:11 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भक्त प्रल्हाद

क्या बात है!

Ea imputo praemitto
Sun, 05/08/2016 - 13:11 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भक्त प्रल्हाद

डियर सशुश्रीके

चांदणे संदीप
गुरुवार, 05/05/2016 - 07:11 नवीन
राग आला तरी चालेल - आपल्या डायरीतली फाडलेली पाने नका हो इथे चिकटवत जाऊ! कधीतरी तुमचे लेखन आवडलेलेही आहे. इथे मिपावर किती दर्जा राखून लिहिणारे लेखक/कवी आहेत, त्यांचे लेखन वाचले तरी लक्षात येईल आपल्याला कस लिहिलं पाहिजे, अभ्यास म्हणा हवं तर. सल्लाच आहे हा, कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा! आता - माझा आयडी उडला तरी चालेल! हे विजय पुरोहित उर्फ मांत्रिक म्हणजे जाम बालिश प्रकरण आहे! सोबतीला डेडपुल म्हणजे टुकारवाडीतली बन्याबापूची जोडीच! आता येतील माझ्या प्रतिसादावर धावून....हरकत नाही. हा माझा पहिला "जाहीर" प्रतिसाद आयडींविरूद्ध लिहायचा! असले बालीश (पक्षी : टुकार/भिकार) वाद-प्रतिसाद वाचून इरिटेट होण्यापेक्षा आयडी घालवून वाचनमात्र झालेले बरे! म्हणजे, पुन्हा कितीही वैताग झाला तरी प्रतिसाद लिहिता येणार नाही! आता लिहिलाच आहे! ;) जय महाराष्ट्र! Sandy
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा